Maharashtra

Nanded

CC/09/252

Saurabh Govind Lonkar - Complainant(s)

Versus

Manger,National Insurance Co.Lit - Opp.Party(s)

ADV.N.A.Quadri

26 Feb 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/252
1. Saurabh Govind Lonkar R/o.Yaswant Nager NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Manger,National Insurance Co.Lit NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 26 Feb 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :2009/252
 
                    प्रकरण दाखल तारीख -   04/11/2009     
                    प्रकरण निकाल तारीख    26/02/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
                मा.श्री.सतीश सामते.               - सदस्‍य                
 
सौरभ पि.गोविंद लोणकर,
वय सज्ञान, धंदा नौकरी,                                       अर्जदार.
रा.भारतनगर,कोथरुड,पुणे.
सध्‍या रा.यशवंतरनगर,नांदेड.
 
      विरुध्‍द.
 
नॅशनल इन्‍शुरन्‍स कं.लि.
मार्फत विभागीय अधिकारी,                               गैरअर्जदार.
विभागीय कार्यालय,नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील            - अड.मु.अ.कादरी.
गैरअर्जदार तर्फे वकील          - अड.जी.एस.औढेंकर.
 
 निकालपत्र
 (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्‍य)
 
                   यातील अर्जदार यांची तक्रार थोडक्‍यात अशी की, अर्जदार यांचे वडीलांनी एक मोटार कार अल्‍टो ज्‍याचा रजि.नं.एमएच-38/1775 त्‍यांच्‍या घरगुती उपयोगाकरीता घेतली होती. सदर कारचा गैरअर्जदार यांचेकडे रितसर पॉलिसी क्र.3221733, दि.17/11/2007 ते 16/11/2008 या काळासाठी उतरविला होता, सदरील अल्‍टो कारला एस.टी.बस क्र. एमएच-20/डी-7547 ने दि.09/05/2008 रोजी अंदाजे 1.30 वाजता औंढा ते परभणी रोडवर जाराची धडक दिली त्‍यात अर्जदाराचे वडील व सदरील कारचा ड्रायव्‍हर लक्ष्‍मण पि.सोपानराव चव्‍हाण हे दोघेही मरण पावले. अर्जदाराचे कार चालकाकडे सदर अपघाताचे वेळेस तो कार चालविण्‍याचा वैध परवाना अस्तित्‍वात होता. सदर घटनेची नोंद पोलिस स्‍टेशन हटटा ता.बसमत जि.हिंगोली येथे गुन्‍हा क्र.75/08 अन्‍वये रजिस्‍टर करण्‍यात आली. अर्जदाराने गाडीचे क्‍लेम मिळण्‍याकरीता आवश्‍यक ती सर्व कागदपत्रांच्‍या प्रती गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केली व गैरअर्जदार कंपनीने श्री.एम.आर.तोतला, सर्व्‍हेअर मार्फत सर्व्‍हे केला व त्‍यांनी तसा अहवाल दिला आहे. दि.22/11/2008 रोजी अचानकपणे गैरअर्जदार कंपनीने अर्जदारास पत्र देवुन कळविले की, त्‍यास विमा कंपनी तर्फे त्‍याचे झालेल्‍या कारची नुकसान भरपाई मिळणार नाही. सदर अपघात होवून त्‍यांचे नुकसान झालेले आहे. अर्जदाराने कसल्‍याच प्रकारची पॉलिसीचा भंग केलेला नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमा क्‍लेम न देवुन सेवेत त्रुटी केली म्‍हणुन अर्जदाराची अशी मागणी आहे की, गैरअर्जदाराकडुन अर्जदारास झालेले नुकसान भरपाई रक्‍कम रु.2,77,196/- व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्चापोटी रु.2,500/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
          सदर प्रकरणांत गैरअर्जदार यांना नोटीस पाठविण्‍यात आली त्‍यांनी वकीला मार्फत हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्‍यांचे म्‍हणणे असे की, अर्जदार यांनी दाखल केलेली तक्रार खोटी व चुकीची असुन ते फेटाळण्‍यात यावी. वाहन क्र. एमएच-38/1775 या वाहनाचा विमा काढलेला होता व त्‍याचा अपघात झाला हे मान्‍य आहे. सदर वाहनाचा विमा हा पॉलिसीच्‍या नियम व अटीनुसार काढलेला होता. वाहन चालक लक्ष्‍मण चव्‍हाण यांचेकडे अपघाताच्‍या वेळेस वाहन चालविण्‍याचा वैध परवाना नव्‍हता. गैरअर्जदार यांनी सर्व्‍हेअर श्री.तोतला यांची नियुक्‍ती केली होती त्‍यांनी सर्व्‍हे करुन दि.31/07/2008 रोजी अहवाल दिला. अहवालानुसार अपघात हा दि.09/05/2008 रोजी झाला व त्‍यामध्‍ये वाहन चालक लक्षमण चव्‍हाण हा दि.18/01/2008 रोजी मरण पावला. अपघाताच्‍या वेळेस ड्रायव्‍हींग लायसन्‍स रिन्‍युव्‍ह केलेले नव्‍हते. तक्रारीमध्‍ये सर्व्‍हे रिपोर्ट, फौजदारी कागदपत्र व वाहन चालक लक्षमण यांचा एम.डी.एल.रिपोर्ट आहे. दि.22/11/2008 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना पत्र पाठवुन क्‍लेम नाकरल्‍या बाबत कळविले आहे. वाहन चालक यांचा वाहन परवाना दि.19/01/2005 ते 18/01/2008 पर्यंतचा होता व अपघात हा दि.09/05/2008 रोजी झाला. वाहकाकडे वाहन चालविण्‍याचा वैध परवाना अपघाताच्‍या वेळेस नसल्‍यामुळे त्‍यांचा क्‍लेम नामंजुर करण्‍यात आला. त्‍यामुळे गैरअर्जदार यांच्‍या सेवेत कोणतीही त्रुटी नाही त्‍यामुळे अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजुर करण्‍यात यावा अशी विनंती केली आहे.
 
          अर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र दाखल केले तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र दाखल केले आहे. दोन्‍ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज बारकाईने तपासुन व वकिला मार्फत केलेला युक्‍तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात.
     मुद्ये.                                       उत्‍तर.
 
1.   गैरअर्जदाराच्‍या सेवेतील त्रुटी अर्जदार सिध्‍द करतात काय?   होय.
2.   काय आदेश?                                                  अंतीम आदेशा प्रमाणे.
 
                            कारणे.
मुद्या क्र.1
 
    मयत गोविंद लोणकर यांच्‍या नांवाने एमएच-38/1775 ही कार असल्‍याबद्यल व त्‍यांच्‍या मृत्‍युनंतर ते वाहन त्‍यांचा मुलगा म्‍हणजे अर्जदार यांच्‍या नांवाने ट्रांन्‍सफर झाल्‍याबद्यलचे आर.सी.बुक तसेच पॉलिसी अर्जदाराने दाखल केलेली आहे. कारचा अपघात झाला याबद्यल वाद नाही व गैरअर्जदारांनी दि.22/11/2008 रोजी अर्जदारांच्‍या नांवाने पत्र लिहुन एम.आर.तोतला या सर्व्‍हेअरने सर्व्‍हे केला त्‍यांनी ज्‍या कागदपत्रांच्‍या आधारे अहवाल दिला याप्रमाणे अपघाताच्‍या वेळी लक्ष्‍मण सोपानराव चव्‍हाण हा वाहन चालवत होता परंतु अपघात घडले त्‍या वेळेस त्‍याच्‍याकडे वैध ड्रायव्‍हींग लायसन्‍स नव्‍हते म्‍हणजे त्‍यांचा लायसन्‍स एमएच-38/1575 हे दि.18/01/2008 रोजी एक्‍सपायर झालेले असुन ते पुढे रिनिव्‍ह केलेले नाही म्‍हणुन मोटर वाहन कायदयानुसार व करारनामातील अटी व तरतुदीप्रमाणे अर्जदार यांचा क्‍लेम नाकारला आहे, असे पत्र दिलेले आहे. दि.09/05/2008 रोजी एमएच-38/1775 या अल्‍टो कारचे दुपारी 1.30 वाजता औंढा ते परभणी रोडवर धडक दिल्‍यामुळे अपघात झाला या विषयी पोलिस स्‍टेशन हटटा ता.वसमत येथे गुन्‍हा क्र. 75/08 नोंदविला. गाडीचा क्‍लेम मिळण्‍यासाठी आवश्‍यक ती सर्व कागदपत्र सर्व्‍हेअर श्री.तोतला यांचेकडे देण्‍यात आले. याप्रमाणे पॉलिसी क्र.3221733 याप्रमाणे विम्‍याची रक्‍कम ही वाहनाच्‍या किंमतीप्रमाणे रु.2,77,190/- अशी होती. सर्व्‍हेअर श्री.तोतला यांनी दि.16/06/2008 ला अपघाताची सुचना मिळाल्‍याबरोबर स्‍पॉटवर जाऊन दि.17/06/2008 ला सर्व्‍हे केला. याप्रमाणे त्‍यांनी वाहनाचे फोटो घेतले व अपघातग्रस्‍त वाहनाच्‍या दुरुस्‍तीसाठी त्‍यांनी आयटम वाईज स्‍पेअर पार्टची यादी तयार करुन त्‍याची अंदाजे खर्च रु.2,63,261/- व यातुन सॉलवेज, पॉलिसी एक्‍सेस वजा जाता यासाठी लायब्‍लीटी रु.2,49,500/- अशी ठरविली व वाहनाचे टोटल लॉस रु.2,76,696/-  असे काढले, यातुन वाहनाचे सॉलवेज रु.65,000/- वजा जाता नेट जबाबदारी रु.2,11,696/- ठरविली. सर्व्‍हेअरने वाहनाची काय नुकसान झाले व किती रक्‍कम ठरविली आहे, व त्‍यांनी आपल्‍या ओपीनियन देत असतांना असे म्‍हटले आहे की, वाहन चालवीणारा ड्रायव्‍हरचे लायसन्‍स हे दि.18/01/2008 रोजी एक्‍सपायर झालेले होते व अपघात हा दि.09/05/2008 झाला त्‍यामुळे अपघाताच्‍या दिवशी परीणाम कारक ड्रायव्‍हींग लायसन्‍स नसल्‍या कारणाने क्‍लेम देता येणार नाही. मोटर वाहन कायदा रुल 3 (1) याप्रमाणे हा नियम जरी असला तरी पॉलिसीचे नियम व अटीप्रमाणे त्‍यात असे म्‍हटले आहे की, वाहन परवाना रद्य झालेला नसावा ड्रायव्‍हरवर मोटर वाहन कायदाप्रमाणे गुन्‍हा दाखल नसावा, वाहन चालवीण्‍याचा परवाना मिळाल्‍यानंतर तो सुरुवातीसच कंपनीने विस वर्षासाठी असतो किंवा वयोमानाप्रमाणे परवाना दिला जातो व तो परवाना त्‍या तारखेस एक्‍सपायर झाले असेल व तो पुढे नुतणीकरण करुन घेतले नसेल याचा अर्थ तो ड्रायव्‍हर मोटर वाहन चालविण्‍याचे कौशल्‍य विसरुन गेला असे होत नाही. त्‍यामुळे विमा कंपनीस हा नियम दाखवुन जबाबदारीतुन सुटता येणार नाही. विमा कंपनी ही जबाबदारीतुन तेंव्‍हाच सुटू शकेल जेंव्‍हा एखादा गुन्‍हा वाहन चालकाच्‍या नांवाने झाला असेल त्‍या सबबीवर त्‍यांचे वाहन परवाना रद्य केला असेल तरच विमा कंपनी आपल्‍या जबाबदारीतुन सुटू शकते पण असे काहीच नसेल व केवळ वाहन परवाना नुतनीकरण झाले नसेल व अपघातानंतर त्‍याला तो नुतनीकरण करता येईल यासाठी, I 2007 C.P.J—74 ही पंजाब राज्‍य आयोगाचे सायटेशन पाहिले असता ड्रायव्‍हरकडे अपघाताचे दिवशी व्‍हॅलिड लायसन्‍स नव्‍हते म्‍हणजे लायसन्‍स हे एक्‍सपायर झाले, अपघात झाला व यानंतर लायसन्‍स रिनिव्‍ह केले नाही याचा अर्थ ड्रायव्‍हरने वाहन चालविण्‍याचे कौशल्‍य गमावले आहे असे होत नाही, म्‍हणुन त्‍याला क्‍लेम देणे बंधनकारक आहे, असे आदेश केलेले आहे.
          दुसरे एक रुलिंग मा.उच्‍च न्‍यायालय, जम्‍मु अण्‍ड काश्‍मीर यांचे 2007 ACJ 2784 यांच्‍या आदेशाचा उल्‍लेख करता येईल. यात देखील,
Motor Vehicles Act 1988,section 149 (2) (a)(ii) read with sections 2 (10) 3,14 and 15--- Motor insurance – Driving licence—Non-renewal of—Liability of insurance company—Insurance company disputed its liability on the ground that licence of the driver of offending vehicle had not been renewed on the date of accident and the driver is not duly licensed to drive the vehicle—whether non-renewal of licence would disable the drive to driver the vehicle and insurance company is exempted from liability—Held no; non-effectiveness of licence would not permit that a driver be treated as not duly licensed under section 149 (2) of the Act; a driver once licensed continues to possess the ability to drive the vehicle unless it is proved that he has incurred any physical disability to drive; such omission entails infraction of the provisions of the Act calling for punishment.
 
          I 2007 CPJ 26 राजस्‍थान राज्‍य आयोग, जयपुर यांचे प्रताप चांद विरुध्‍द नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी यामध्‍ये,
         Consumer Protection Act, 1986—section 2 (1) (g)--- Insurance—Driving licence—Not valid on date of accident---Renewed subsequently--- Violation of terms of policy alleged—Claim repudiated—Driver, not in any manner, disqualified from holding valid and effective licence—Same got renewed just 2 days after accident, without any disqualification—mere omission of driver to get licence renewed, cannot amount to violation of policy--- Repudiation unjustified--- Insurer nor exempted from liability--- Loss assessed by Surveyor payable with interest @ 9% p.a.
 
         2005 ACJ 797 मा.उच्‍च न्‍यायालय कर्नाटक बँगलोर, ओरीएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी विरुध्‍द के.सुंदरअम्‍मा व इतर, यात देखील वाहन चालकाचे ड्रायव्‍हींग लायसन्‍स अपघाताच्‍या वेळी एक्‍सपायर झाले होते व अपघाताच्‍यानंतर काही दिवसांनी नुतनीकरण केले. विमा कंपनी करारानामाचा भंग केला म्‍हणुन क्‍लेम नाकारला होता व मा.उच्‍च न्‍यायालयाने विमा कंपनीस जबाबदार ठरवून विम्‍याचे रक्‍कम देण्‍याचे आदेश केले आहे.
 
          1996 ACJ 1178, सर्वोच्‍च न्‍यायालय, बी.व्‍ही.नागाराजु विरुध्‍द ओरीएंटल इंशुरन्‍स कपंनी लि, यात मोटर वाहन कायदा सेक्‍शन 147 अपघाताच्‍या वेळी जास्‍त प्रवाशी बसविले म्‍हणुन करारनामाचा भंग केला म्‍हणुन क्‍लेम नाकारला होता परंतु मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने विमा कंपनी अपघाताचे कारण जरी प्रवाशी जास्‍त बसलेले असतील तरी विमा कंपनीची जबाबदारी येते, हा केस लॉ या प्रकरणाशी तंतोतंत लागु होत नसले तरी करारनामाचा भंग केला म्‍हणुन या केस लॉचा आधार घेता येईल.
     या प्रमाणे सर्व्‍हेअरने दोन ऑपशन दिले आहेत. त्‍याप्रमाणे अर्जदाराच्‍या वकीलाने युक्‍तीवादाच्‍या वेळी टोटल लॉस नेट बेसेवर क्‍लेम मिळावा अशी मागणी केली होती. याप्रमाणे सर्व्‍हेअरने टोटल लॉस बेसेसवर रु.2,76,696/- ही किंमत काढली व यातुन सॉलवेज रु.65,000/- कमी केले. आमच्‍या मते सॉलवेज हे विमा कंपनीने ठेवुन घ्‍यावे व पुर्ण रु.2,76,696/- रक्‍कम अर्जदारास द्यावी ही रककम गैरअर्जदारांनी न देऊन सेवेत त्रुटी केल्‍याचे अर्जदाराने सिध्‍द केले आहे. गैरअर्जदार यांचे वकीलांनी युक्‍तीवाद करते वेळेस सांगीतले की, त्‍यांनी केलेली कार्यवाही हि, पॉलिसीच्‍या नियम व अटी प्रमाणे केली. त्‍यांनी त्‍यांचे काम केले, त्‍यांचे हे म्‍हणणे आम्‍ही ग्राहय धरतो व अर्जदार यांना व्‍याज, दंड व मानसिक त्रास नाकारतो.
 
     वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                              आदेश.
 
1.   अर्जदाराचा तक्रारअर्ज मंजुर करण्‍यात येतो.
 
2.   गैरअर्जदार विमा कंपनी हा निकाल लागल्‍या पासुन 30 दिवसांच्‍या  आंत अर्जदारास रु.2,76,696/- नेट टोटल लॉस बेसेसवर द्यावे. असे न केल्‍यास त्‍यावर दि.27/03/2010 पासुन 9 टक्‍के व्‍याजाने पुर्ण रक्‍कम मिळेपर्यंत व्‍याजासह द्यावे. वाहनाच्‍या सॉलव्‍हेजवर गैरअर्जदार यांचा अधिकार राहील.
 
3.   गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दावा खर्च म्‍हणुन रु.2,000/- द्यावे.
 
4.   संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्‍यात यावा.
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे पाटील)                                                                                      (श्री.सतीश सामते)     
        अध्‍यक्ष                                                                                                               सदस्‍य
 
 
गो.प.निलमवार.लघूलेखक.