जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 180/2008. प्रकरण दाखल तारीख - 15/05/2008 प्रकरण निकाल तारीख - 08/08/2008 समक्ष - मा.श्री.विजयसिंह राणे. - अध्यक्ष. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते - सदस्य. 1. मारोती पि. चंपती धुमाळ अर्जदार. धंदा निरक 2. चंपती महादू धुमाळ धंदा निरक 3. गयाबाई चंपती धुमाळ वय,68 वर्षे धंदा घरकाम सर्व राहणार फत्तेजंगपूर (धुमाळवाडी) ता. जि. नांदेड विरुध्द. 1. व्यवस्थापकीय संचालक, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकाहरी बँक मर्यादित नांदेड, मुचय शाखा नांदेड. गैरअर्जदार 2. व्यवस्थापक नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित शिवाजी पुतळयाजवळ नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.जी.के. पोफळे गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.एस.डी. भोसले निकालपञ (द्वारा - मा.श्री. सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेवेच्या ञूटीबददल अर्जदार यांची तक्रार आहे. अर्जदार क्र.1 हा अर्जदार क्र.2 व 3 यांचा अपंग मूलगा आहे.अर्जदाराचे वडील हे वयोवृध्द असून कूठलेही काम करु शकत नाहीत. अर्जदार क्र.1 यांना त्यांच्या अंपगत्वाच्या इलाजासाठी पैसे कामे पडतील म्हणून दि.7.2.2001 रोजी अर्जदार क्र. 1 व 2 यांचे संयूक्त रु.25,000/- व दि.7.2.2001 रोजी रु.7500/- हे पूर्नगूंतवणूक मूदत ठेवीत 63 व 72 महिन्यासाठी ठेवले होते. यानंतर सप्टेंबर 2006 व डिसेंबर 2006 मध्ये गेरअर्जदार क्र.2 यांनी ही रक्कम परत मिळावी म्हणून अर्जदार गेला असता बँकेमध्ये रक्कम उपलब्ध नाही असे सांगून टाळत राहीले. अर्जदार क्र.1 हा अंपग असून त्यांला पूढील इलाजासाठी हैद्राबाद येथे जाणे आवश्यक आहे. मूदत संपल्यानंतरही रक्कम न मिळाल्यामूळे त्यांचे मानसिक व आर्थिक नूकसान झाले आहे. म्हणून त्यासाठी रु.30,000/- मिळावेत तसेच पूर्नगूंतवणूक योजनेतील रक्कम व त्यावर व्याजाही मिळावे अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले, त्यांनी आपले लेखी महणणे दाखल केले आहे. तक्रारीतील परिच्छेद क्र.1 2 मधील मजकूर बरोबर व खरा आहे. अर्जदाराने गूंतवलेल्या तिन्ही रक्कमा गैरअर्जदारांना मान्य आहेत. गैरअर्जदाराच्या बँकेमध्ये रक्कम उपलब्ध नसल्यामूळे तूम्हाला रक्कम देता येत नाही हे अर्जदाराचे म्हणणे खोटे आहे. उलट गैरअर्जदाराने अर्जदारास योग्य माहीती दिली. त्याप्रमणे आर.बी.आय. ने 35 ए कलम लावून गैरअर्जदार बँकेवर आर्थिक निर्बध घातलेले आहेत. त्यामूळे त्यांना ती रक्कम देता येणार नाही. अर्जदारांना रक्कम पाहिजे असेल तर वैद्यकीय किंवा लग्न अशा कारणासाठी विहीत नमून्यात अर्ज करुन अत्यावश्यक तरतूद म्हणून ते आर.बी.आय. कडे प्रकरण मंजूरीसाठी पाठविण्यास तयार आहेत व मंजूरीनंतर आर.बी.आय. च्या परवानगीने ते रक्कम देण्यास तयार आहेत. निर्बध असल्यामुळे जर रक्कम दिली नाही तर ती सेवेतील ञूटी होणार नाही असे म्हटले आहे. त्यामुळे रु.30,000/- देण्यास गैरअर्जदार जबाबदार नाहीत. अर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ, गैरअर्जदार यांनी आपले शपथपञ दाखल केले नाही. अर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदाराच्या सेवेतील ञूटी सिध्द होते काय नाही. 2. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी पावती क्र.136646 गयाबाई यांचे नांवे रु.25,000/- दि. 7.2.2001 रोजी ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे दूसरी पावती क्र.136644 मारोती यांच्या नांवे रु.25,000/- देखील त्यांच तारखेला ठेवलेले असून दि.7.5.2006 रोजी मूदतीअंती त्यांना प्रत्येक पावतीवर रु.50,145/- मिळणार होते. त्याप्रमाणे पावती क्र.145740 गयाबाई धूमाळ यांचे नांवाने रु.7500/- दि.12.9.2001 रोजी ठेवले होते. जे की मूदतीनंतर म्हणजे दि.12.9.2007 रोजी रु.15,246/- मिळणार होते. यामध्ये व्याजाचा दर हा 13.5 टक्के दर्शविला आहे. अर्जदाराने ठेवलेली रक्कम गैरअर्जदाराना मान्य आहे परंतु त्यांचेवर आर.बी.आय. ने 35 ए कलम लावून आर्थिक निर्बध घातल्यामूळे त्यांना आता आर.बी.आय. च्या पूर्वपरवानगीशिवाय ही रक्कम देता येणार नाही. यामुळे अर्जदार यांची पूर्ण रक्कम मिळण्याचा अधिकार जरी असला तरी गैरअर्जदार यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याकारणाने अतिआवश्यक तातडीच्या रक्कमेवर अर्जदाराचे प्रपोजल आवश्यक त्या कागदपञासह आर.बी.आय. कडे पाठवून त्यांची मंजूरी घेऊनच ही रक्कम देता येईल. म्हणून रक्कम न दिल्यामूळे सेवेतील ञूटी होणार नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत. आदेश अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 1. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 15 दिवसांचे आंत अतिआवश्यक मदतीसाठी आवश्यक त्या कागदपञासह योग्य ती शिफारस करुन हार्डशिप ग्राऊंडवर प्रपोजल आर.बी.आय. कडे पाठवावे व आर.बी.आय. ने मंजूरी दिल्यानंतर मंजूरीची रक्कम ताबडतोब अर्जदारास देण्यात यावी. 2. मानसिक ञासाबददल व दावा खर्चाबददल आदेश नाहीत. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.विजयसिंह राणे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |