जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/74 प्रकरण दाखल तारीख - 30/03/2009 प्रकरण निकाल तारीख – 17/07/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या 1. सतीश पि.दत्तात्रय देशमुख, वय वर्षे 45, व्यवसाय वकीला, अर्जदार. रा.गायकवाड गल्ली, वकील कॉलनी समोर कंधार, ता.कंधार जि.नांदेड. विरुध्द. 1. शाखाधिकारी, गैरअर्जदार. एच.डी.एफ.सी.बँक लि,नांदेड कन्नावार कलेक्शन, ऑपोझीट कलामंदीर, नांदेड. 2. मुख्य शाखाधिकारी, एच.डी.एफ.सी.बँक लि,नांदेड रिटेल असेट कलेक्शन 4 था मजला, टायटॅनिक बिल्डींग 26-ए, नारायण प्रॉपर्टी, चांदीवली, अंधेरी वेस्ट इस्ट मुंबई 400072. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी. गैरअर्जदार क्र 1 व 2 तर्फे - अड.समीर पटेल. निकालपञ (द्वारा-मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) अर्जदार यांची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडुन बजाज कंपनीची एक्स.सी.डी. हे दुचाकी वाहन खरेदी केले, ज्यासाठी त्यांनी डाऊन पेमेंट म्हणुन रु.10,000/- भरुन गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडुन बाकीची रक्कम कर्ज वाहन म्हणुन उचल केली, ज्यासाठी आवश्यक तया कागदपत्रांची पुर्तता करुन गैरअर्जदार यांना रु.1,500/- चे 36 कोरे चेक जमा केले. ज्यामधुन 36 चेकची रक्कम व्याजासह अर्जदाराकडुन वसुल करायची असा करार दोघांमध्ये झाला. अर्जदार यांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वेळोवेळी परतफेड केली, त्याप्रमाणे आजपर्यंत गैरअर्जदाराकडे रु.41,000/- एवढी रक्कम कर्जाची परतफेड म्हणुन अदा केलेली आहे. अर्जदार हे गैरअर्जदार यांच्याकडे रक्कमेची पुर्तता करत असल्यामुळे त्यांनी शक्य होईल तेवढया प्रमाणांत व्यवहारात सुरळीतपणा ठेवलेला आहे. अचानक दि.06/03/2009 रोजी गैरअर्जदार यांचे रिकव्हरी अधिकारी व कर्मचारी यांनी अर्जदार यांची वरील दर्शवलेली गाडी अचानक कुठलीही सुचना व माहीती न देता घेऊनगेले, जे की, कुठलीच कल्पना देखी देण्याची तसदी गैरअर्जदार यांनी घेतली नाही व अर्जदाराची गाडी गैरअर्जदार यांनी ओढुन नेली. अर्जदाराची गाडी ओढुन नेल्यावर त्यांना गैरअर्जदाराची नोटीस मिळाली. अर्जदार यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये महत्वाचे कागदपत्र व रु.23,000/- चे कोर्ट फिस होते सदर रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडे केली असता, त्यांनी ती देण्यास इन्कार केला व आपण पुर्ण रक्कम दंडासह व व्याजासह भरल्यावरच आपणांस ती देऊ अशी तंबी दिली. गैरअर्जदार यांनी पाठवलेली नोटीसमध्ये अर्जदाराकडे बाकी असलेली प्रिंसीपल रक्कम रु.19,644/- ही अर्जदारास मान्य आहे. परंतु त्यावर इतर जो लावलेला अवाजवी दंड व इतर शुल्क आकारली आहे तो अमान्य व अन्यायकारक आहे. त्यामुळे अर्जदार रु.19,644/- भरण्यास तयार आहे, तो स्विकारुन अर्जदाराची गाडी परत करावी तसेच गाडीचे बेबाकी प्रमाणपत्र व आर.सी.बुक देण्याचे गैरअर्जदार यांना आदेश करावेत. गैरअर्जदार यांच्या अशा कृत्यामुळे अर्जदारास मनस्ताप झालेला आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदारास सध्याची अकाऊंटची स्टेटमेंट मागीतली असता, ती देखील अर्जदारास दिली नाही. गैरअर्जदार हे ग्राहकाकडुन सुरुवातीस करारावर त्यांना पाहिजे असल्या तेवढया सहया फॉर्मवर व इतर को-या कागदांवर घेऊन ठेवतात व त्यानंतर अशा प्रकारची वागणुक देऊन आमचा करार होता असा सुर काढतात. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे वाहन परत न करुन त्यांनी सेवेत कमतरता केली म्हणुन अर्जदार यांनी ही तक्रार दाखल करुन तीद्वारे अशी मागणी केली की, अर्जदाराचाअर्ज मागणी क्र. 1 ते 6 सह मंजुर करण्यात यावा व गैरअर्जदारास त्याबातची पुर्तता करण्याचे आदेश देण्यात यावा. सदर प्रकरणांत गैरअर्जदार यांना नोटीस पाठविण्यात आली, त्यांनी हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडुन बजाज कपंनीची एक्स.सी.डी.ही दुचाकी वाहन खरेदी केलेली आहे ही मान्य केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांतील कराराप्रमाणे सदर वाहनाचा करार 24 महिन्याचा कालवधी होता व त्याप्रमाणे अर्जदाराने रु.1,541/- प्रतिमाह अशा स्वरुपात 24 महिन्याचे 24 धनादेश कर्जाची रक्कम परतफेड करण्याच्या उद्येशने गैरअर्जदारास दिले. परिच्छेद क्र. 3 मध्ये नमुद केलेला संपुर्ण मजकुर खोटा असुन गैरअर्जदारास अमान्य आहे. अर्जदाराने नऊ मासिक हप्ते भरावयाचे असुन देखील अर्जदाराने केवळ एक वेळेस बँकेमार्फत व एक हप्ता रोख मासिक नगदी स्वरुपात गैरअर्जदाराला दिले, असे एकुण रु.8,191/- एवढी रक्कम कर्जाची परतफेड म्हणुन गैरअर्जदाराकडे जमा केली आहे. परंतु कराराप्रमाणे रु.1,541/- प्रतिमाह असे 24 हप्ते पुर्णतः परतफेउ केली तरी सर्व रक्कम मिळुन रु.36,984/- एवढी होते व अर्जदार हे रु.41,000/- गैरअर्जदारांना कर्जाच्या परतफेडी पोटी दिले, असे त्यांचे म्हणणे पुर्णतः खोटे व बिनबुडाचे व अर्थहीन आहे. अर्जदार यांनी कर्जाच्या परतफेडीचा मासिक हप्ता कधीही वेळेवर न चुकता जमा केलेला नाही. परिच्छेद क्र. 4 मधील संपुर्ण मजकुर खोटा व बनावटी व दिशाभुल करणारा आहे.गैरअर्जदाराने अर्जदारास दि.18/09/08,18/10/08, 18/12/08, 19/01/09 रोजी वैधानिक नोटीस देऊन वेळोवेळी अर्जदाराने दिलेल्या धनादेश न वटल्याबद्यल नोटीस देऊन सदर बाब लक्षात आणुन दिली तसेच सदर बाबीचे दुष्परीणामाची ही कल्पना दिली. गैरअर्जदाराने दि.14/03/2009 रोजी अर्जदारास पुर्ण कल्पना देऊन तसेच संबंधीत पोलिस स्टेशनला रितसर माहीती देऊन व अर्जदाराकडुन सदर वाहनाची चावी मागुन घेऊन सदर वाहन जप्त केले आहे. अर्जदाराच्या गाडीच्या डिक्कीतुन कोणत्याही प्रकारची रक्कम व कोर्ट फिस असण्याचा प्रश्नच उदभवत नाही व सदर बाब सिध्द करण्याची जिम्मेदारी अर्जदाराची आहे. परिच्छेद क्र. 6 मध्ये नमुद केलेली ही रक्कम प्रिंसीपल आऊ स्टॅन्डींग रु.19,644/- असुन पेंडींग इन्स्टॉलमेंट रु.6,146/- रु.5,000/- रिपजेशन चार्जेस चेक बाऊंस चार्जेस रु.1,350/- फोर कलेजर चार्जेस रु.1,149/- लेट पेमेंट चार्जेस रु.410/- व मा.व्याज रु.196/- असे एकुण रु.33,941/- अर्जदाराकडुन येणे आहे व ते कराराच्या अनुषंगाने आहे. अर्जदाराचे वाहन हे लिलावाच्या माध्यामातुन विक्री करण्यात आलेले असुन दि.29/03/2009 रोजी सदर वाहनाचा विक्री व्यवहार पुर्ण झालेला आहे. त्यामुळे सदरच्या वाहनाच्या संदर्भात आलेले संबंध संपुष्टात आलेले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराने केलेली इतर विपरीत विधाने नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, अर्जदाराची मागणी खर्चासह नामंजुर करण्यात यावी. अर्जदारांचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्र,लेखी युक्तीवाद तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, शपथपत्र,लेखी युक्तीवाद याचा विचार होता, खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदारांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली काय ? होय. 3. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 – अर्जदार यांनी गैरअर्जदार बँकेकडुन बजाज एक सीडी मोटरसायकल क्र. एमएच 26 एच-8611 हे वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज घेतलेले आहे. सदरची बाब गैरअर्जदारांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्रामध्ये नाकारलेले नाही. अर्जदारांचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्र व गैरअर्जदारांचे लेखी म्हणणे, शपथपत्र त्यांनी दाखल केलेला अर्जदारांचे कर्ज खात्याचा उतारा व इतर कागदपत्र याचा विचार होता, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत, असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2 - अर्जदार यांनी गैरअर्जदार बँकेकडुन एमएच 26 एच 8611 हे वाहन खरेदी करण्यासाठी रु.28,800/- एवढे कर्ज घेतलेले आहे. सदर कर्जाची परतफेड 24 हप्त्यामध्ये मासिक रु.1,541/- याप्रमाणे करणेची होती. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दि.14/03/2009 रोजी इंटीमेशन फॉर फुल रिपेमेंट ऑफ टरमिनेशन व्हॅल्यु संदर्भात नोटीस पाठवलेली आहे. सदर नोटीसचे अवलोकन केले असता, अर्जदार यांचेकडे रु.19,644/- मुळ रक्कम व इतर अशी एकुण मिळुन रु.33,941/- एवढी रक्कम देणे बाकी दाखवलेली आहे. गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी म्हणणे व शपथपत्रामध्ये अर्जदार यांनी कर्जाचे परतफेडी पोटी रक्कम रु.8,191/- एवढी रक्कम परतफेड केलेचे नमुद केलेले आहे. दि.14/03/2009 रोजी गैरअर्जदारांनी अर्जदारांना नोटीस दिले नंतर गैरअर्जदार यांनी सदर वाहनाची विक्री ऑफ लाईन लिलावाद्वारे दि.29/03/2009 रोजी केलेली आहे. अर्जदार यांनी लेखी युक्तीवादासोबत 2007 III सी.पी.जे पान नं.163, राष्ट्रीय आयोग, सिटीक्रॉप मारोती फायनान्स लि, विरुध्द एस.विजयालक्ष्मी, या वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र या अर्जाचे कामी दाखल केलेले आहे. सदर निकालपत्राचे अवलोकन केले असता, हायरपरचेस अग्रीमेंट असतांना सुध्दा गैरअर्जदार हे अर्जदाराचे वाहन नोटीस न देता त्या वाहनाची विक्री करु शकत नाही. सदर अर्जाचे कामी गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना वाहन ताब्यात घेणे बाबत नोटीस पाठवलेली आहे. परंतु सदर वाहनाची विक्री करणे पुर्वी अर्जदार यांना त्याबाबत कोणतीही सुचना केलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र, गैरअर्जदारांचे लेखी म्हणणे व शपथपत्र व त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे आणि वरील सर्व विवेचनांचा विचार होता, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी वाहन खरेदी करतेवेळी रु.10,000/- डाऊन पेमेंट केलेले आहे. प्रत्यक्ष कर्ज रु.28,800/- आणि अर्जदार यांनी सदर कर्जाचे परतफेडीपोटी गैरअर्जदार यांचेकडे भरलेली रक्कम रु.8191/- यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून डाऊन पेमेंन्ट केलेली रक्कम रु.10,000/- परतफेडीपोटी भरलेली रक्कम रु.8191/- असे एकूण रु.18,191/- एवढी रक्कम व सदरचे वाहन विकले तारखेपासून म्हणजेच दि.29.3.2009 पासून प्रत्यक्ष रक्कम पदरीपडेपर्यत 9 टक्के व्याजासह होणारी रक्कम गैरअर्जदार यांचेकडून वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्या 2007 (III) CPJ 161 (NC) नॅशनल कमीशन न्यू दिल्ली यात सिटी कार्पोरेशन मारुती फायनान्स लि. विरुध्द एस. विजयालक्ष्मी या निकाल पञाचे अवलोकन केले असता अर्जदार यांचे गैरअर्जदार बँकेकडे शिल्लक असलेले चेक गैरअर्जदार बँकेने अर्जदार यांना परत करावेत. However, we make it clear that petitioner shall not be entitled to recover any amount from the complainant on the basis that some amount remains unpaid in their books of accounts. If any ante dated cheques are remaining with the petitioner, the same shall be treated as null and void and no action on that basis shall be taken by the petitioner against the complainant. याप्रमाणे अर्जदार यांचे खाते बंद करण्यात यावे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे वाहन ओढुन नेलेले होते. या मंचामध्ये सदरचे वाहनाची विक्री करु नये, यासाठी मनाई अर्ज मुळ अर्जासोबत दाखल केलेला होता. सदर अर्जावर दि.30/03/2009 रोजी आदेश झालेला आहे परंतु गैरअर्जदार यांनी सदर वाहनाचा ऑफ लाईल लिलाव घेऊन सदर वाहनाची विक्री दि.29/03/2009 रोजी केलेली आहे. त्यामुळे अर्जदार यांना सदरचे वाहनाचे नुकसान भरपाई पोटी, सदर वाहनाची किंमत मिळणेसाठी या मंचामध्ये अर्ज करावा लागलेला आहे व अनुषंगाने खर्चही करावा लागला आहे, याचा विचार होता, अर्जदार हे मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चा पोटी रक्कम वसुल होऊन मिळणे पात्र आहेत, असे या मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांचे वकिलांनी यूक्तीवाद झाल्यानंतर दि.07.07.2009 रोजी 2007 7 सूप्रिम कोर्ट केसेस पान नंबर 417 चरणजितसिंग चडडा व इतर विरुध्द सुधिर नेहरा, 2006 (2) सूप्रिम कोर्ट केसेस पान 598, ओरिक्स अटो फायनान्स (इंडिया लि.) विरुध्द जगमंदरसिंग व इतर, हे वरिष्ठ कोर्टाचे निकालपञ दाखल केलेले आहेत. त्यानंतर सदरचे प्रकरण बोर्डावर घेण्यासाठी दि.14.7.2009 रोजी अर्ज देऊन अतिरिक्त लेखी यूक्तीवाद व त्या सोबत कलकत्ता उच्च न्यायालयाने दिलेल्या नीर्णयाची प्रत या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेले सर्व वरिष्ठ कोर्टाचे निकालपञ हे दिवाणी कोर्टातून वाद वीषयक आहेत. सदरच्या निकालपञामध्ये हायर परचेस अग्रीमेंट प्रमाणे फायनान्स करणा-या बँक/कंपनी यांना सदरचे वाहन थकीत कर्ज रक्कमेपोटी ताब्यात घेता येऊ शकते असे म्हटलेले आहे. परंतु प्रस्तुत अर्जाचे कामी गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे वाहन ताब्यात घेऊन नोटीस न देता विक्री केलेले आहे. सदरचे सर्व निकालपञ हे दिवाणी वाद वीषयक असल्याने सदरच्या निकालपञाचा ग्राहक संरक्षण कायदा,1986 अंतर्गत असणा-या वाद वीषया बाबत विचारात घेता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. सदर कामी 2007 (3) सीपीजे पान नंबर 161 राष्ट्रीय आयोग या निकालपञानुसार आदेश पारीत करण्यात येत आहेत. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी निशानी 5 तात्पुरता मनाई हुकूमाचा आदेश करणे बाबत अर्ज दिलेला आहे. सदर अर्जावर दि.30/03/2009 रोजी आदेश झालेले आहेत. अर्जदार यांनी कर्जाचे हप्त्या पोटी कमीतकमी रक्कम रु.12,000/- दि.01/04/2009 पर्यंत मंचात जमा करण्याचे अटीवर अर्जदार यांचे वाहन विक्री करु नये असे आदेश करण्यात आलेले आहेत. सदरील आदेशा प्रमाणे अर्जदार यांनी या मंचामध्ये दि.01/04/2009 रोजी महेश अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक लि, अहमदपुर शाखा नांदेड यांचे पे ऑर्डर नंबर 044855 दि.31/03/2009 ची रु.12,000/- ची जमा केलेली आहे. सदरची रक्कम ही गैरअर्जदार यांनी अर्जदार याचे वाहन विक्री केलेले असल्याने अर्जदार यांना परत करणे योग्य व न्याय असे आहे, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र, कागदपत्रे, लेखी युक्तीवाद आणि गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, शपथपत्र, लेखी युक्तीवाद आणि वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र याचा विचार होता, खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश अर्जदार यांचा अर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे. आज पासुन 30 दिवसांच्या आंत गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना खालील प्रमाणे रक्कमा द्यावेत. 1. अर्जदार यांचे गैरअर्जदार बँकेकडे असलेले संपूर्ण कोरे चेक अर्जदार यांना परत करावेत, अर्जदार यांचे गैरअर्जदार बँकेमध्ये असलेले कर्ज खाते बंद करण्यात यावे. 2. अर्जदार यांनी नि.5 वरील आदेशा प्रमाणे या मंचामध्ये जमा केलेली रक्कम रु.12,000/- घेऊन जावे. 3. रक्कम रु.18,191/- दयावेत व सदर रक्कमेवर दि.29.3.2009 पासून प्रत्यक्ष रक्कम पदरीपडेपर्यत 9 टक्के व्याजासह होणारी रक्कम दयावी. 4. मानसिक त्रासापोटी रु.5,000/-द्यावेत. 5. अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- द्यावेत. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक. |