जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2011/59 प्रकरण दाखल तारीख - 28/02/2011 प्रकरण निकाल तारीख – 27/05/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. उत्तम पि. नागोराव कुमरे वय 35 वर्षे, धंदा शेती अर्जदार रा.दहेगांव ता.कीनवट जि. नांदेड विरुध्द. शाखा व्यवस्थापक, स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद, शाखा किनवट ता.किनवट जि.नांदेड गैरअर्जदार अर्जदारा तर्फे वकील - अड.शरद देशपांडे गैरअर्जदारा तर्फे - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमुख, सदस्या ) अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की,अर्जदार हे अत्य अल्प भुधरक असून त्यांना 1 हेक्टर 65 आर एवढी शेती आहे. त्याबददल 7/12 व होल्डींग दाखल केले आहे. अर्जदार यांचे वडिलांनी कर्ज उचलले होते व माझे वडील मयत झाल्यामुळे ते कर्ज गैरअर्जदार यांनी माझे नांवावर लावले आहे. गैरअर्जदाराकडून कर्ज घेतले होते. त्यातून मी सन 2009 मध्ये रु.25,000/- व त्यानंतर 2010 मध्ये पुन्हा रु.25,000/- कर्ज फेडले आहे. त्यानंतर मला गैरअर्जदार यांनी रु.40,000/-कर्ज वर्ष 2011 मध्ये दिले. महाराष्ट्र शासनाने अल्प व अत्य भुधारकास 100 टक्के कर्ज माफी दिली असताना गैरअर्जदार यांनी अर्जदार अशिक्षीत व गरीब असल्याचा फायदा घेऊन दावे दाखल केले व एकतर्फी निकाल लाऊन आर. डी. द्वारे अर्जदारावर कायदयाची टांगली तलवार ठेवली आहे. गैरअर्जदार यांनी दि.4.2.2011 रोजी अर्जदारास नोटीस पाठवून रु.19,798/- एवढे क्रॉप लोन असे लिहून दिले आहे जे की अर्जदार यांनी घेतलेले नाही. अशाच तक्रारीमध्ये परभणी जिल्हा ग्राहक मंचाने बँकेला अल्प व अत्य अल्प भुधारकाकडून पैसे वसूल न करण्याचे आदेश दिलेले आहेत जे महाराष्ट्र शासनाच्या परिपञकानुसार आहे. त्यांची प्रत दाखल केली आहे. अर्जदार यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर सूध्दा गैरअर्जदार यांनी त्यांची वसूलीची कार्यवाही सूरुच ठेवली आहे. अर्जदार हा महाराष्ट्र शासनाद्वारे मिळणा-या सर्व सवलतीचा तो हक्कदार आहे. म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, अर्जदाराचा अर्ज रु.20,000/- खर्चासह मंजूर करावा व गैरअर्जदारास अल्प व अत्य अल्प भुधारकाचे महाराष्ट्र शासनाच्या परिपञकाचे पालन करीत पूर्ण कर्ज माफ करण्याचे आदेश व्हावेत. 2. गैरअर्जदार यांनी नोटीसची बजावणी होऊन ते हजर झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. अर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञ पाहून जे मूददे उपस्थित होतात, ते मुददे व त्यावरील उत्तरे खालील प्रमाणे, मूददे उत्तर 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली रक्कम देण्यास बांधील आहेत काय ? नाही 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 व 2 ः- 4. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून आलेली नोटीस दाखल केली आहे त्यात अर्जदाराकडे रु.56,350/- बाकी दाखवलेले आहे व वसूली संदर्भात नोटीस दिलेली आहे. त्या नोटीसमध्ये खाते क्र.04/2006 दि.04.02.2011 रोजीची आहे दिसून येते.अर्जदार यांनी त्यांना शेत असल्याबददल 7/12 व होल्डींग दाखल केलेले आहे. तसेच अर्जदार यांनी पेपरचे काञण दाखल केले आहे त्यात थकबाकीदार शेतक-याचे कर्ज वसूल न करण्याचे आदेश अशी बातमी आली त्याची प्रत दाखल केली आहे. 5. सदर तक्रारीमध्ये गैरअर्जदार हे जरी हजर झाले नसले तरी अर्जदार यांनी आपली तक्रार पूराव्या सहीत सिध्द करणे आवश्यक होते. कारण यात अर्जदार जे म्हणतात की महाराष्ट्र शासनाने जे परिपञक काढले आहे की, त्यात अत्य अल्प भुधारकाचे कर्ज शासनाने 100 टक्के माफ केले आहे. त्या परिपञकाची प्रत अर्जदाराने दाखल केली नाही ? कर्ज माफ झाले हे सिध्द केलेले नाही.तसेच अर्जदाराने जी पेपरच्या काञणाची सत्य प्रत दाखल केली आहे. ती योग्य आहे काय ? त्यांचा मूळ पेपर दाखल करणे आवश्यक होते. पेपर मधील बातमी नुसार राज्यातील सर्व शेतक-यांना शासनाने कर्ज माफी दिली आहे काय ? असेल तर अर्जदार यांनी ते महत्वाचे महाराष्ट्र शासनाचे परिपञक दाखल करणे आवश्यक होते. अर्जदार यांनी मूळ पूरावाच दाखल केलेला नाही.अर्जदार हे स्वतःची तक्रार सिध्द करु शकलेले नाहीत. अर्जदार आपल्या तक्रारीत असेही लिहीतात की, गैरअर्जदार यांनी आर.डी.क्र.04/2006 असें लिहून कर्ज भरायची नोटीस पाठवली आहे यावरुन अर्जदाराने घेतलेले कर्ज जहे बरेच जुने असून त्यामध्ये दिवाणी न्यायालयात कोर्ट केस होऊन त्यांचा निकाल गैरअर्जदार यांचे बाजूने लागल्यामूळे त्यांनी अर्जदारास सदरील नोटीसेस पाठवल्या. जर सदरील प्रकरण 2002 चे असेल तर ते मूदत बाहय स्वरुपाचे होते हे सिध्द होते. गैरअर्जदार यांनी दिलेल्या नोटीस मूळे अर्जदार यांनी गैरअर्जदार बँकेचे कर्ज घेतले होते हे सिध्द होते व कर्ज न भरल्यामुळे गैरअर्जदार यांनी त्यांना नियमाप्रमाणे नोटीस दिलेली आहे. असे करुन गैरअर्जदार यांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्यात येतो. 1. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 2. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघुलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE MR. President B.T.Narwade] PRESIDENT | |