जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/255. प्रकरण दाखल तारीख - 11/11/2009 प्रकरण निकाल तारीख – 26/02/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य संगिता भ्र.शेषराव पौळ वय, 29 वर्षे, धंदा घरकाम, रा.बनचिंचोली ता. हदगांव जि.नांदेड. सध्या रा. आनंद नगर, नांदेड. अर्जदार विरुध्द. दि न्यू इंडिया एश्योरन्स क.लि. वीभागीय कार्यालय नांदेड, गैरअर्जदार लाहोटी कॉम्प्लेक्स, प्रभात टॉकीज, वजिराबाद, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.मू.अ.कादरी गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.एस.व्ही. राहेरकर. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लि. यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदार यांनी नूकसान भरपाई म्हणून विम्याची रककम रु.1,00,000/- तसेच मानसिक ञासापोटी रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मागितले आहेत. गैरअर्जदार यांच्या तक्रारीत अर्जदार म्हणतात की, अर्जदार ही मयत शेषराव पौळ यांची पत्नी आहे.मयत शेषराव यांनी त्यांचे हयातीत गैरअर्जदार यांचेकडे विमा पॉलिसी त्यांचे मोटार सायकलची पॉलिसी नंबर 160900/31/09/01/00000629 द्वारे दि.13.4.2009 ते 12.04.2010 या कालावधीची होती. दि.9.5.2009 रोजी सकाळी 10 वाजता मयत शेषराव हे मोटार सायकल एम.एच.-26-व्ही-6753 वरुन हदगांव कडे जात असताना हदगांव ते वारंगा रोडवर राज पेट्रोल पंप जवळ ट्रकने अर्जदाराच्या पतीच्या मोटार सायकल जोराची धडक दिली व अर्जदाराचे पती जागीच मरण पावले. गैरअर्जदार यांनी घटनेची सूचना दिल्यावर आवश्यक ती कागदपञ देऊन विम्याच्या रक्कमेची मागणी केली असता त्यांनी दि.4.8.2009रोजी क्लेम नाकारला. कारण अर्जदाराचे पती हे अपघाताचे वेळी शिकाऊ लायसन्स धारक होते. पाठीमागे बसलेल्या व्यक्तीकडे कायमचा परवाना होता. ज्यांचा नंबर एम.एच.-26-2964/008 असा असून मोटार सायकल वर एल म्हणजे लर्निग असे लिहीलेले आहे. ही खरी बाब गैरअर्जदाराने लक्षात न घेता मयत शेषराव यांचे मागे कोणीही नव्हते असे म्हटले आहे. म्हणून वरील मागणी साठी तक्रार नोंदविण्यात आली. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले म्हणणे दाखल केलेले आहे. याप्रमाणे अर्जदारास तक्रार दाखल करण्याचे काही कारण नाही. मयत अर्जदाराचे पती यांना पॉलिसी नियम व अटी यामध्ये दिलेली आहे. यातील महत्वाची अट अशी आहे की, विमाधारक वाहन चालवित असेल त्यावेळेस त्यांचेकडे कायदयाप्रमाणे वाहन चालविण्याचा परवाना पाहिजे. कागदपञाची पाहणी करता ही बाब अतीशय स्पष्ट आहे की, मयत शेषराव यांचे शिकाऊ वाहन परवाना होता व ते एकटेच वाहन चालवित असताना अपघात झालेला आहे. शिकाऊ परवाना त्यांचेकडे आहे त्यांनी वाहन चालविताना कोणती काळजी घेतली पाहिजे अशी स्पष्ट तरतूद मोटार वाहन कायदयात आहे जी पूढील प्रमाणे, Learner”s Licnese. One may drive the vehicle holding the learners license unless has besides him a person duly licensed to drive the vehicle in every case the vehicle carries, “ L ” plays that is learning both in the front & rear of the vehicle. या तरतूदीचे मयताकडून उल्लंघन झाले. अर्जदार हा स्वच्छ हेतूने मंचाकडे आलेला नाही. विमा कंपनीच्या कराराशी केलेल्या अटीचा भंग झालेला आहे. गैरअर्जदार कंपनीचे असे ही म्हणणे आहे की, वाहनावर बसवलेल्या व्यक्तीकडे कायमचा परवाना होता व मोटार सायकल वर एल असे लिहीलेले होते हे खरे नाही त्यामूळे त्यांना विम्याची रक्कम व मानसिक ञास देण्याची जबाबदारी गैरअर्जदार यांचे वर नाही. अर्जदाराने पूर्वकल्पीक कहाणी रचली असून ती खोटी आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ,तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी विमा पॉलिसी हिरो होंडा मोटार सायकलचे आर सी बूक त्यावर मयत शेषराव पौळ यांची नोंद आहे. तसेच पॉलिसी, लर्निग लायसन्स दाखल केलेले आहे. अर्जदाराचे म्हणणे असे आहे की, तिचे पती दि.9.5.2009 रोजी स्वतःचे मोटार सायकल क्र.एम.एच.-26-व्ही-6753 वरुन हदगांवकडे जात असताना अपघात झाला. त्यावेळेस त्यांचेकडे लर्निग लायसन्स होते व जे पाठीमागे बसले होते त्या व्यक्तीकडे कायमचा परवाना होता ज्यांचा नंबर त्यांनी दिलेला आहे. हे देत असताना त्यांनी पाठीमागे कोण बसलेले होते त्यांचे नांव त्यांनी सांगितलेले नाही. याशिवाय गैरअर्जदाराने घटना घडल्यानंतर एफ.आय.आर. दाखल केलेला आहे. या वरुन मयत शेषराव यांचे चूलते यांनी पोलिस स्टेशनला गून्हा दाखल केल्याचे म्हटले आहे. एफ.आय.आर. प्रमाणे अपघाताचे वेळेस मयत शेषराव हा वाहन चालवित होता असे म्हटले आहे व ट्रकटरने धडक दिल्यामूळे त्यात त्यांचा मृत्यू झाला एवढेच आले आहे. त्याचे मागे कोण बसले होते किंवा त्यांचे नांव हे एफ.आय.आर. मध्ये आलेले नाही. अपघात झाल्यानंतर मयत शेषराव यांला हॉस्पीटल मध्ये पाठविले व एवढा जबरदस्त अपघात झाला की त्यात मयत शेषराव हे मरण पावले व त्यांचे मागे कोण व्यक्ती बसलेले असेल तो ही या अपघातात गंभीर जखमी झाला असला पाहिजे व त्यांना हॉस्पीटलमध्ये नेल्याचे कागदपञ उपलब्ध करुन अर्जदारास दाखल करता आले असते पण असे काही घडलेले नाही. मयत हा एकटाच मोटार सायकल चालवित होता त्यामूळे मागील व्यक्तीचे हॉस्पीटलचे कागदपञ किंवा त्यांचे लायसन्स अर्जदार दाखल करु शकलेले नाहीत. म्हणजे नेमका हाच आक्षेप गैरअर्जदाराने घेतलेला आहे की, Learner”s Licnese. One may drive the vehicle holding the learners license unless has besides him a person duly licensed to drive the vehicle in every case the vehicle carries, “ L ” plays that is learning both in the front & rear of the vehicle. असा आक्षेप घेतलेला आहे. शिकाऊ लायसन्स जे दाखल केलेले आहे यावर स्पष्टपणे हा नियम नमूद केला असून त्यावर मयत शेषराव यांची सही आहे व एखादया शिकाऊ व्यक्ती वाहन चालवित असेल तर त्यांचेमागे परमन्ट लायसन्स होल्डर हा मागे बसायलाच पाहिजे. वाहनावर प्लेट होती हा फोटो पुरावा ही ग्राहय धरता येणार नाही, फोटो नंतरही काढला जाऊ शकतो. या नियमाचे उल्लंघन झालेले आहे व विमा देताना नियम व कराराचे ही उल्लंघन झालेले आहे. त्यामूळे अपघाताचे वेळी मयत शेषराव हे एकटेच मोटार सायकल चालवित होते हे सिध्द होते. त्यामूळे पॉलिसीच्या तरतूदीनुसार घेतलेला आक्षेप आम्ही ग्राहय धरुन गैरअर्जदाराने क्लेम नाकारुन सेवेत ञूटी केली नाही या निष्काषास आला आहोत. 2005 ACJ 803 IN THE HIGH COURT OF RAJASTHAN AT JODHPUR या न्यायालयातील Geeta Devi and others Vs Shiv Shankar and another या प्रकरणात Workmen”s Compensation Act, 1923, section 3(1) and Motor Vehicles Act, 1988 यात एमप्लाई साठी ही तरतूद आहे. हे केस या प्रकरणात लागू होणार नाही. 1996 ACJ 1178 IN THE SUPREM COURT OF INDIA AT NEW DELHI या न्यायालयातील B.V. Nagaraju Vs. Oriental Insurance Co. Ltd. यात मोटार वाहन कायदा सेक्शन 147 प्रमाणे करारनाम्याचा भंग म्हणून क्लेम नाकारला होता, वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसलेले आहेत. म्हणून करारनाम्याचा भंग झालेला आहे पण या प्रकरणात कराराचा मूख्य उददेश कोणता व अपघात कशामूळे घडला हे नक्की कळत नाही. त्यामूळे करारनाम्याचा भंग झालेला आहे कारण लायसन्स वर शिकाऊ मागे जो नियम लिहीलेला आहे तो आवश्यक आहे. त्या नियमांचा भंग करुन मयत शेषराव हा स्वतःस मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. सर्वोच्च न्यायालय इंडिया यात कीशोर रावत व इतर विरुध्द संग्रामसिंग सौंळकी यात मोटार वाहन कायदा 1988 प्रमाणे ड्रायव्हींग लायसन्स हे एलएमव्ही याप्रमाणे ज्या वर्गासाठी लायसन्स दिलेले आहे त्यानुसारच ते वापरले गेले पाहिजे. असे न केल्यास इन्शूरन्स कंपनी जबाबदार राहणार नाही. क्लेम प्रपोजल जे भरुन दिलेले आहे त्यात देखील मागे व्यक्ती कोण होता त्यांचा तपशील दिलेला नाही. हे पञ गैरअर्जदार यांनी यानुसार दि.4.8.2009 रोजी अर्जदार यांना पञ लिहून व त्यामध्ये कारण नमूद करुन क्लेम नाकारलेला आहे. त्यांनी केलेली कारवाई योग्य ठरवून गैरअर्जदार यांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही हे सिध्द होते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावार. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्य जयंत पारवेकर, लघुलेखक. |