Maharashtra

Chandrapur

CC/11/9

Prashant Sudhakar Kargirwar - Complainant(s)

Versus

Manger, Jayka Motors Pra. Com.Ltd., - Opp.Party(s)

Nandkishor C. Wandre & others

20 May 2011

ORDER


Arange sequence number in year 2009 confo-ch-mh@nic.in
Complaint Case No. CC/11/9
1. Prashant Sudhakar KargirwarAge 32 years, Occ. Business, R/o. Gajanan Kirana Stoars, Todoba Road Tukum, Chandrapur, Ta. & Distt. ChandrapurChandrapurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Manger, Jayka Motors Pra. Com.Ltd., Plot No.3, Nagpur Road, Chandrapur, Ta.& Distt. ChandrapurChandrapurMaharashtra2. The Relaince Genral Insurance co. Ltd., Through - Branch Manger,6 th Floor, Loard Mark Building, Wardha Road, Nagpur, Ta. & Distt. Nagpur- 440010NagpurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONORABLE Shri Anil. N.Kamble ,PRESIDENTHONABLE MR. Sadik M. Zaveri ,MEMBERHONABLE MRS. Adv. Varsha Jamdar ,MEMBER
PRESENT :

Dated : 20 May 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

1.           अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे.  अर्जदाराने दि.24.9.09 रोजी गै.अ.क्र.1 च्‍या शोरुममधून टाटा कंपनीची इंडिगो गाडी, मॅग्‍मा फायनान्‍स लिमिटेड यांचे मार्फत खरेदी केली.  अर्जदाराच्‍या गाडीचा नं.एम.एच.34 ए ए 1288 असून सदर वाहनाचे पेमेंटचे हप्‍ते अर्जदार कंपनीकडे जमा करीत आहे.  अर्जदाराच्‍या गाडीचा विमा गै.अ.क्र.2 कडे काढला असून त्‍याचा पॉलिसी क्र.109000787815 असून दि.24.9.09 ते 23.9.10 या कालावधीसाठी विमाकृत होती.  अर्जदाराने विम्‍याची रक्‍कम रुपये 11,967/- गै.अ.क्र.2 कडे गै.अ.क्र.1 मार्फत जमा केलेले आहे.  अर्जदार हे दि.30.8.10  ला पचमडी येथे फिरायला गेले असता, त्‍यांचे वाहन झाडाखाली उभे केले असतांना गाडीवर झाड पडले व गाडीच्‍या वरच्‍या भागाचे व दरवाजाचे नुकसान झाले.  सदर घटने बद्दलची माहिती अर्जदाराने गै.अ. ला दिली व गै.अ.क्र.1 च्‍या शोरुम मध्‍ये दुरुस्‍तीकरीता आणली.  गै.अ.क्र.1 च्‍या शोरुममध्‍ये तेथील मेकॅनिकने गाडीचे वरच्‍या भागाचे व दरवाजाचे नुकसान झाले असून दुरुस्‍ती करण्‍यासाठी रुपये 96,706.63 खर्च येईल असे सांगितले.  त्‍यानुसार गै.अ.क्र.1 ने दि.1.9.10 ला गाडी दुरुस्‍तीसाठी रुपये 96,706.63 चे इस्‍टीमेट तयार करुन गै.अ.क्र.2 कडे पाठविले.  गै.अ.क्र.2 ने अर्जदाराच्‍या गाडीचे नुकसानीचे क्‍लेम रुपये 51,000/- गै.अ.क्र.1 कडे दि.13.11.10 ला जमा केले.  गै.अ.क्र.2 ने इस्‍टीमेटनुसार रक्‍कम अदा केलेली नाही, ही गै.अ.क्र.2 ने केलेली सेवेतील न्‍युनता आहे.  घटनेच्‍या वेळी वाहनाचे चालक हे श्री देवानंद महादेव कुळमेथे हे होते व त्‍यांचेकडे वाहन चालविण्‍याचा परवाना होता.  गै.अ.क्र.1 ने गाडी दुरुस्‍ती केल्‍यानंतर अर्जदार गाडी आणण्‍यासाठी गेला असता, गै.अ.क्र.1 ने अर्जदाराला गाडी दुरुस्‍ती करण्‍यासाठी रुपये 72,675/- खर्च आला असे सांगितले व त्‍याप्रमाणे दि.4.11.10 रोजी अर्जदाराला बिल दिले.  गाडीच्‍या दरवाजाच्‍या वरच्‍या भागासह गाडीचा आणखी एक ईसीयू (Electronic Control Unit) नावाचा पार्ट निकामी झाला असल्‍याचा सांगितले.  गै.अ.क्र.1 ने सदर पार्ट नवीन बसविला होता व त्‍यासाठी अर्जदाराकडून रुपये 20,000/- ची मागणी केली.  वास्‍तविक, सदर पार्ट हा खराब झालेला नव्‍हता.  गै.अ.क्र.1 च्‍या हयगयीमुळे तो पार्ट खराब झाला व त्‍याचा भुर्दंड अर्जदारावर लावण्‍याचा प्रयत्‍न गै.अ.करीत आहे.  अर्जदाराचे गाडीला झालेले नुकसान हे पॉलिसीच्‍या कालावधीमध्‍ये झालेले आहे.  त्‍यामुळे, गै.अ.क्र.1 व 2 हे संयुक्‍तरित्‍या गाडी दुरुस्‍त करुन देण्‍यास जबाबदार आहेत.  तसेच, सदर वाहन हे गै.अ.क्र.1 कडून फायनान्‍सवर घेतल्‍याचे दि.24.9.09 पासून तर अपघाताचा दि.30.8.10 पर्यंत वॉरंटीच्‍या कालावधीमध्‍ये आहे.  या कालावधीत सदर वाहन 40900 कि.मी. धावले आहे व वॉरंटीचा कालावधी वाहन 50000 कि.मी. धावण्‍यापर्यंत असतो.  त्‍यामुळे, गै.अ.क्र.1 ची जबाबदारी आहे की, वाहनाचा जो काही पार्ट निकामी झाला असेल तो बदलवून देणे.  परंतू, गै.अ.क्र.1 ने अर्जदाराला ईसीयू या पार्टसाठी रुपये 20,000/- मागणी केलेली आहे.  सदर वाहन वॉरंटी पिरेड मध्‍ये असल्‍यामुळे संपूर्ण खर्चाची जबाबदारी गै.अ. वर आहे.  अर्जदार हे व्‍यावसायीक असल्‍याने सदर वाहनाचा उपयोग आपल्‍या खाजगी कामासाठी करीत असतात.  तसेच, अर्जदाराचे वडील सुध्‍दा वृध्‍द व्‍यक्‍ती आहे, त्‍यांची प्रकृती बरी नसते म्‍हणून अर्जदार हे सदर वाहनातून आपल्‍या वडिलांना उपचाराकरीता वेळोवेळी नागपुरला नेत असतात.  अर्जदाराकडे सदर वाहन नसल्‍यामुळे अर्जदाराला दुस-या खाजगी वाहनातून ही सर्व कामे करावी लागली, त्‍यामुळे खूप खर्च आला.  अर्जदाराने, दि.8.12.10 ला गै.अ.क्र. 1 ला विनंती अर्ज केला व संपूर्णपणे दुरुस्‍त करुन तिचा ताबा देण्‍यात यावा अशी विनंती केली.  परंतू, गै.अ.क्र.1 ने अर्जावर कुठलिही कार्यवाही केली नाही, त्‍यामुळे अर्जदाराने दि.21.12.10 ला वकीलामार्फत नोटीस पाठवून गै.अ.क्र.1 यांनी संपूर्ण गाडी दुरुस्‍त करुन देण्‍यात यावी व गै.अ.क्र.2 नी गाडी दुरुस्‍तीसाठी आलेला संपूर्ण खर्च द्यावा, अशी मागणी केली.  दि.22.12.10 गै.अ.क्र.1 ला नोटीस मिळाला व गै.अ.क्र.2 ला 24.12.10 ला नोटीस मिळाला, तरीही त्‍यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.  अर्जदाराने गै.अ.क्र.1 च्‍या निष्‍काळजीपणामुळे गाडीची ई.सी.यू. नवाचा पार्ट खराब झाला असून गै.अ.क्र.1 ने स्‍वखर्चाने तो पार्ट बसवून द्यावा व त्‍याचे रुपये 20,000/- त्‍यांनी द्यावे, अशी मागणी केलेली आहे.  तसेच, अर्जदारास नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 50,000/- व शारिरीक, मानसिक ञासापोटी रुपये 50,000/- देण्‍याचा आदेश गै.अ. विरुध्‍द व्‍हावा, ह्या मागणी सोबत एस्‍टीमेटची रक्‍कम रुपये 96,706.63 पैसे गै.अ. नी द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याजाने द्यावे व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- अर्जदाराला द्यावा, अशी मागणी केलेली आहे.  अर्जदाराने आपल्‍या तक्रारीसोबत नि.4 प्रमाणे 16 दस्‍ताऐवज दाखल केलेले आहे. 

 

2.          अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गै.अ.ना नोटसी काढण्‍यात आले.  गै.अ.क्र.1 ने नि.10 नुसार व गै.अ.क्र.2 ने नि.18 नुसार आपले लेखी उत्‍तर दाखल केले.

 

3.          गै.अ.क्र.1 ने, हे मान्‍य केले की, अर्जदाराचे अपघातग्रस्‍त वाहन गै.अ.क्र.1 च्‍या कार्यालयात दुरुस्‍ती आणले होते व त्‍याचे निरिक्षण करुन आवश्‍यक तेवढया खर्चाचे अंदाजे एस्‍टीमेट दिले होते, तसेच एस्‍टीमेटची एक प्रत गै.अ.क्र.2 यांना दिली होती.  गै.अ.क्र.1 चे म्‍हणणे नुसार सदर वाहन हे पुर्णतः क्षतीग्रस्‍त झालेले होते म्‍हणजे समोरील बोनेट पासून मागच्‍या डिकीपर्यंत वाहनाचे नुकसान झालेले होते.  त्‍यानुसार, गै.अ.क्र.1 ने दि.4.11.10 रोजी अर्जदाराला बिल दिले होते.  अर्जदाराचे हे म्‍हणणे की, वाहनाचा ईसीयु पार्ट हा हलगर्जीपणामुळे खराब झाला होता, हे गै.अ.क्र.1 ने अमान्‍य केले आहे. अर्जदाराने दि.8.12.10 पाठविलेल्‍या नोटीसचे उत्‍तर गै.अ.क्र.1 ने दिले व अर्जदाराला सहकार्य करण्‍याचे आश्‍वासन दिले. परंतू, अर्जदाराने कधीही कोणत्‍याही प्रकारच्‍या पैशाची मागणी केलेली नाही.  गै.अ.क्र.1 ने अर्जदाराचे इतर कथन अमान्‍य करुन असे म्‍हटले की, अपघातग्रस्‍त वाहनाच्‍या दुरुस्‍तीसाठी गै.अ.क्र.1 हा बांधील नाही.  गै.अ.क्र.1 हे टाटा कंपनीच्‍या वाहनाची विक्री व दुरुस्‍ती करणारे व्‍यवसायी आहे व त्‍यानुसार ग्राहकाच्‍या वाहनाची दुरुस्‍ती करणे असल्‍यास त्‍यासाठी लागणारा खर्च ग्राहकांकडून घेण्‍याचा पूर्ण अधिकार त्‍यांना आहे.  अर्जदार हे व्‍यावसायीक असून त्‍यांचे गजानन किराणा स्‍टोअर्स या नावाचा व्‍यवसाय आहे.  अशा वेळेस लक्‍झरी वाहन खरीदने हे उदरनिर्वाहासाठी नसल्‍याने अर्जदार हा ग्राहक म्‍हणवल्‍या जाणार नाही.  अर्जदाराचे अपघातग्रस्‍त वाहन यावेळी गै.अ.क्र.1 च्‍या वर्कशॉपमध्‍ये आले, त्‍यावेळी वाहन हे पूर्णतः क्षतीग्रस्‍त झालेले होते व पाहताक्षणी जी क्षती दिसली त्‍यानुसार एस्‍टीमेट दिलेले होते.  परंतू, प्रत्‍यक्ष काम झाल्‍यावर त्‍याच्‍या खर्चाचा तपशील दिल्‍या जातो व तो खर्च दिलेल्‍या एस्‍टीमेट पेक्षा कमी अथवा काही प्रमाणात जास्‍त सुध्‍दा असू शकतो.  गै.अ.क्र.2 ला झालेल्‍या क्षती बद्दल कळविले होते व त्‍यांच्‍या सर्व्‍हेअरनी येऊन वाहनाची पाहणी करुन दुरुस्‍ती कामाला गै.अ.क्र.1 ला मान्‍यता दिलेली होती. सदर काम पूर्ण झाल्‍यावर खर्चाचे रुपये 72,675/- चे बिल दि.4.11.10 रोजी अर्जदारास व गै.अ.क्र.2 यांना देण्‍यात आले.  त्‍यानुसार, गै.अ.क्र.2 यांनी रुपये 51,000/- मंजूर करुन गै.अ.क्र.1 ला दिले.  वाहनाच्‍या पुर्ननिरिक्षण करतेवेळी असे लक्षात आले की, वाहनाला झालेल्‍या मोठ्या आघातामुळे बोनटच्‍या खाली लागून असलेल्‍या ईसीयु (Electronic Control Unit) हा भाग निकामी झाला असून, त्‍याबाबत दि.28.10.10 रोजी अर्जदाराला सप्‍लीमेंटरी ईस्‍टीमेट नुसार गै.अ.क्र.1 ने कळविले होते.  परंतू, अर्जदाराने सदर पार्ट बदलविण्‍यास नकार दिला, त्‍यामुळे गै.अ.क्र.1 यांना नाईलाजास्‍तव निकामी झालेला पार्ट न बदलताच दि.4.11.10 रोजी खर्चाचे बिल बनवावे लागले व त्‍यानुसार गै.अ.क्र.2 यांनी रुपये 51,000/- गै.अ.क्र.1 कडे जमा केले.  अर्जदाराने, आजही ईसीयु हा पार्ट बदलविलेला नाही.  गै.अ.क्र.1 ने नमूद केले की, ईसीयु हा वाहनाचा महत्‍वाचा भाग असून ते सर्व ईलेक्‍ट्रॉनिक उपकरणांना संचालित करीत असते.  हा भाग ईलेक्‍ट्रानिक चिपवर अवलंबून असून नाजूक वस्‍तु असते, त्‍यामुळे कोणत्‍याही मोठ्या आघातामुळे हा भाग निकामी होऊ शकतो.  अर्जदाराच्‍या वाहनाचा हा भाग मोठ्या आघातामुळे निकामी झालेला आहे.  ईसीयु हा भाग वॉरंटी मध्‍ये मोडत नाही. अर्जदार किंवा गै.अ.क्र.2 ने उर्वरीत रक्‍कम रुपये 21,675/- गै.अ.क्र.1 कडे जमा केलेली नाही.  अर्जदाराने ईसीयु. बदलविण्‍याची मागणी नाकरल्‍यामुळे गै.अ.क्र.1 यांनी रुपये 20,000/- ची मागणी करण्‍याचे काहीही कारण उरलेले नाही.    अर्जदाराचे वाहनाचा क्षतीग्रस्‍त भाग हा पूर्णपणे डेटींग व पेंटींग करुन गै.अ. कडे उभी आहे.  अर्जदार उर्वरीत रक्‍कम भरुन आपले वाहन ताब्‍यात घेऊ शकतात.  ईसीयु. चे नुकसान सुध्‍दा वाहनाच्‍या अपघातामुळेच झालेले असून, गै.अ. यांनी जाणून-बुजून किंवा हलगर्जीमुळे निकामी झाले नाही.  सदर वाद हा अर्जदार व विमा कंपनी यांचेमध्‍ये असल्‍याने नाईलास्‍तव गै.अ.क्र.1 यांना नुकसान व मानसिक ञास सहन करावा लागत आहे.  गै.अ.क्र.1 यांनी आपल्‍या कामा कसलीही हलगर्जी किंवा न्‍युनतम सेवा प्रदान केलेली नाही.  गै.अ.यांनी कमी वेळात वाहन दुरुस्‍त करुन ठेवलेले आहे व आज रोजी उर्वरीत रक्‍कम ही अर्जदार यांचेकडून गै.अ.क्र.1 यांना घेणे आहे.  त्‍यामुळे, अर्जदाराची तक्रार खर्चासहीत खारीज करावी, अशी मागणी केली आहे.

 

4.          गै.अ.क्र.2 ने अर्जदाराचे संपूर्ण कथन नाकारले आहे.  गै.अ.क्र.2 चे म्‍हणण्‍यानुसार अर्जदार यांनी सदर गाडी खाजगी उपयोगासाठी घेतली असून, ती टक्‍सी म्‍हणून चालवीत आहे.  अर्जदाराने अपघाता संबंधी कोणतेही कागदपञ दाखल केले नाही.  अर्जदाराचे म्‍हणणे नुसार घटना घडल्‍यानंतर सदर गाडीचे वरचे टप व दरवाजाचे नुकसान झाले होते व सदर गाडी ही अर्जदाराने पचमढीवरुन चालवत आणली याचा अर्थ सदर गाडीचे इंजिनला व गाडीचे स्‍पेअर पार्टला कोणतीही खराबी आली नाही.  अर्जदाराला जायका मोटर्सनी जे एस्‍टीमेट दिले ते फायनल बिल झाले नव्‍हते ते फक्‍त अंदाजे लागणारा खर्च होता व जायका मोटर्सनी पाठविलेल्‍या बिलाप्रमाणे गै.अ. विमा कंपनीने त्‍याचा दावा मंजूर केला.  अर्जदाराचे म्‍हणण्‍याप्रमाणे गै.अ.क्र. 2 ने गै.अ.क्र.1 ला दि.13.11.10 ला रुपये 51,000/- चा चेक दिला.  सदर चेक हा पूर्ण गाडी दुरुस्‍त झाल्‍यावर दिला जातो.  याचा अर्थ सदर गाडी इ.सा.यु. नावाचा भाग हा गाडी दुरुस्‍त झाल्‍यानंतर खराब झाला आहे.  अर्जदाराचे म्‍हणण्‍यानुसार सुध्‍दा सदर इ.सी.यु. नावाचा भाग हा गाडी दुरुस्‍त झाल्‍यावर खराब झाला.  करीता, सदर अर्ज गै.अ.क्र.2 विरुध्‍द खारीज करण्‍यात यावा, अशी मागणी केली आहे.

 

5.          अर्जदाराने नि.19 नुसार शपथपञ दाखल केले.  गै.अ.क्र.1 नि.10 नुसार शपथपञ व नि.21 नुसार 7 दस्‍ताऐवज दाखल केले. गै.अ.क्र.2 ने नि.22 नुसार दाखल केलेले उत्‍तर हेच शपथपञ समजण्‍यात यावे अशी पुरसीस दाखल केली.  अर्जदाराने नि.24 नुसार लेखी युक्‍तीवाद दाखल केला.  गै.अ.क्र.1 ने नि.25 नुसार व गै.अ.क्र.2 ने नि.26 नुसार लेखी युक्‍तीवाद दाखल केला.  अर्जदार व गैरअर्जदार क्र.1  व 2 यांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज, शपथपञ, लेखी युक्‍तीवादावरुन खालील कारणे व निष्‍कर्ष निघतात.

 

                        @@ कारणे व निष्‍कर्ष @@

 

6.          अर्जदाराचे गाडीला दि.30.8.2010 रोजी पचमढी येथे झाड पडून अपघात झाला.  अर्जदाराने, सदर वाहन हे गै.अ.क्र.1 कडे दुरुस्‍तीसाठी आणली असता, गाडी दुरुस्‍तीसाठी येणा-या खर्चाचे एस्‍टीमेट दि.1.9.10 रोजी रुपये 96,706.62 दिले ते नि.4 अ-4 वर दाखल आहे.  गै.अ.क्र.1 ने अर्जदाराला नि.21 ब-6 नुसार सप्‍लीमेंट्री एस्‍टीमेट दिले होते व त्‍यामध्‍ये अर्जदाराच्‍या गाडीचा इ.सी.यु. हा पार्ट निकामी झाला असून, तो बदलविण्‍याचा खर्च रुपये 16,886.18 येणार हे कळविले.  हे एस्‍टीमेट दि.28.10.10 ला अर्जदाराला देण्‍यात आले.  अर्जदाराने, नि.4 अ-11 वर गै.अ. ला पाठविलेल्‍या नोटीसमध्‍ये ही बाब मान्‍य केली आहे.  गै.अ.क्र.2 ने अर्जदाराच्‍या गाडीच्‍या विम्‍याची रक्‍कम रुपये 51,000/- दि.14.1.2011 चे पञ नि.4 अ-5 व्‍दारे मंजूर केले.  अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार गै.अ.क्र.1 ने, गै.अ.क्र.2 कडून क्‍लेमची रक्‍कम रुपये 51,000/- मिळाल्‍यानंतर गाडी दुरुस्‍तीचे काम सुरु केले, याचा अर्थ असा कि, अर्जदाराला दि.14.1.2011 च्‍या पञा पूर्वीच गै.अ.क्र.1 ने इ.सी.यु. पार्टच्‍या बिघाडाबद्दल कळविले होते.  अर्जदाराने, त्‍या पार्टला बदलावयाचे किंवा नाही व त्‍यासाठी येणा-या खर्चा बद्दल गै.अ.क्र.1 ला कोणतेही उत्‍तर दिले नाही किंवा आक्षेप घेतला नाही.  त्‍यामुळे, गै.अ.क्र.1 ने अर्जदाराची गाडी दुरुस्‍त करुन नि.4 अ-5 नुसार रुपये 72,675/- चे बिल अर्जदाराला दिले आहे.  त्‍यामध्‍ये, इ.सी.यु. पार्ट बाबत रक्‍कम जोडलेली नाही.  अर्जदाराचे म्‍हणणे आहे की, अर्जदाराचे वाहन 40900 कि.मी. धावले असून, 50000 कि.मी. धावेपर्यंत वॉरंटीचा कालावधी असतो.  त्‍यामुळे, वॉरंटी पिरेड मध्‍ये जो पार्ट निकामी झालेला असेल तो नवीन बदलून देण्‍याची जवाबदारी गै.अ.क्र.1 ची आहे.  परंतु, गाडीची वॉरंटी दाखवणारा एकही दस्‍ताऐवज रेकॉर्डवर नाही.  त्‍यामुळे, पुराव्‍या अभावी गाडीच्‍या कोणत्‍या पार्टची किती वॉरंटी होती व इ.सी.यु. हा पार्ट वॉरंटी मध्‍ये होता किंवा नाही, हे ठरविणे कठीण आहे.  अर्जदाराने सरधोपटपणे वॉरंटी असल्‍या कारणाने गै.अ. नी गाडीचे पार्टस् बदलून द्यावे, असे म्‍हटले आहे.  परंतु, ही बाब सिध्‍द करण्‍यासाठी एकही दस्‍तऐवज दाखल केला नाही, त्‍यामुळे अर्जदाराची ही बाब ग्राह्य धरता येणार नाही. इतकेच नव्‍हेतर, गै.अ.क्र.1 ने अर्जदाराला इ.सीयु. पार्टच्‍या बिघाडा बद्दल कळविल्‍या नंतर ही अर्जदाराने, गै.अ.क्र.2 ला कळविले नाही.  अर्जदाराने दाखल केलेल्‍या नि.4 अ-16 वरुन हे स्‍पष्‍ट आहे कि, गै.अ.क्र.1 ने दि.14.12.10 ला इ.सी.यु. हा पार्ट वॉरंटी मध्‍ये येत नसल्‍याचे सांगितले असून, विमा कंपनी कडून त्‍यासंबंधात मागणी करता येईल असे सांगितले.  तसेच, एक्‍सीडेन्‍टल इन्‍चार्ज आणि पूर्वी ज्‍यांनी ह्या वाहना संबंधी सर्वे केला त्‍या सर्वेअरला भेटावयास सांगितले.  परंतु, अर्जदाराने तसे कोणतेही प्रयत्‍न केल्‍याचे दिसून येत नाही.

 

7.          गै.अ.क्र.1 ने आपल्‍या लेखी उत्‍तरात मान्‍य केले आहे कि, अर्जदाराचे वाहन ज्‍यावेळी दुरुस्‍तीसाठी आले त्‍यावेळी पूर्णतः क्षतिग्रस्‍त झाले होते.  समोरच्‍या बोनेटपासून तर मागच्‍या डिक्‍की पर्यंत वाहनाचे नुकसान झाले होते आणि त्‍यातच वाहनाचा इ.सी.यु. हा पार्ट क्षतिग्रस्‍त झाला होता.  अर्जदाराचे म्‍हणणे कि, सदर पार्ट हा गै.अ.क्र.1 च्‍या हलगर्जीपणामुळे खराब झाला, हे दाखवण्‍यासाठी काहीही पुरावा अर्जदाराने सादर केला नाही.  त्‍यामुळे, गै.अ.क्र.1 चे म्‍हणणे कि, इ.सी.यु. हा पार्ट अपघातामुळे निकामी झाला हे ग्राह्य धरण्‍यासारखे आहो.  गै.अ.क्र.1 ने अर्जदाराला सप्‍लीमेन्‍ट्री एस्‍टीमेट दिल्‍यानंतर अर्जदाराने नि.4 अ-11 प्रमाणे नोटीस पाठविला.  परंतु, त्‍या नोटीस मध्‍येही अर्जदाराने गै.अ.क्र.2 कडून इ.सी.यु. च्‍या इन्‍शुरंस संबंधी रकमेची मागणी केली नाही.  त्‍यामुळे, गै.अ.क्र.2 चे म्‍हणणे कि, अर्जदाराच्‍या दाव्‍यामधील इ.सी.यु. भागाचा गै.अ.क्र.2 शी कसलाही संबंध नाही, हे म्‍हणणे ग्राह्य धरण्‍याजोगे आहे.

 

8.          अर्जदाराने क्षतिग्रस्‍त झालेल्‍या वाहनातील इ.सी.यु. पार्ट संबंधी इंन्‍शुरंस मिळवून घेण्‍यासाठी कुठलीही कार्यवाही केली नाही.  उलट पक्षी, गै.अ.क्र.1 ने सुचना देऊनही, कार्यवाहीसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही.  त्‍यामुळे, गै.अ.क्र.1 ने सेवेत न्‍युनता केली असे म्‍हणता येणार नाही. गै.अ.क्र. 1 ने अर्जदाराच्‍या अपघातग्रस्‍त गाडीची पाहणी करुन रुपये 96,706.63 चे एस्‍टीमेंट दिले.  गै.अ.क्र.2 ने ते मंजूर न करता फक्‍त रुपये 51,000/- मंजूर करुन रक्‍कम पाठविली.  गै.अ.क्र.1 ने फाईनल बिल नि.4 अ-5 नुसार रुपये 72,675/- चे दाखल केले आहे.  गै.अ.क्र.2 चे म्‍हणणेनुसार ह्या बिलांमधील गाडीचा घसारा वळता करता रुपये 51,000/- मंजूर करण्‍यात आले. गै.अ.क्र.2 ने आपल्‍या लेखी युक्‍तीवादात नि.26 नुसार म्‍हटले कि, त्‍यांच्‍या सर्वेअर ने दिलेल्‍या रिपोर्टनुसार दावा निकाली काढण्‍यात आला.  परंतु, असा कोणताही सर्वे रिपोर्ट तक्रारीत दाखल केला नाही,  त्‍यामुळे, सर्वेअर ने कितीचा खर्च सांगितला होता व कोणत्‍या हिशोबाने गै.अ.क्र.2 ने मंजूर केला, ह्याचा कुठेही खुलासा झाला नाही.  नि.4 अ-5 वर दाखल बिलामध्‍ये रुपये 30,595/- हे लेबर चार्जेस म्‍हणून लावण्‍यात आले आहेत.  म्‍हणजे रुपये 51,000/- मधून लेबर चार्जेस वळते केले असता, रुपये 20,405/- ही रक्‍कम उरते.  कारण, लेबर चार्जेस चे पूर्ण पैसे दिल्‍या जातात.  त्‍याच बिलात गाडीचे पार्टसची किंमत रुपये 42,080/- सांगण्‍यात आली आहे.  म्‍हणजे गै.अ.क्र.2 ने अर्जदाराला गाडीच्‍या पार्टसच्‍या किंमती पैकी फक्‍त रुपये 20,405/- दिले.  ही रक्‍कम एकूण पार्टसच्‍या खर्चाच्‍या 50 % पेक्षा ही कमी आहे, ह्या बाबत गै.अ.क्र.2 ने काहीही खुलासा केला नाही. 

 

9.          अर्जदाराने गाडी दि.24.9.09 ला खरेदी केली व अपघात दि.30.8.10 ला झाला.  म्‍हणजे, गाडी घेऊन जेमतेम एक वर्ष ही पूर्ण झाले नव्‍हते.  अश्‍या परिस्थितीत, गै.अ.क्र.2 ने गाडीच्‍या पार्टस चा झालेला घसारा कोणत्‍या पध्‍दतीने मोजला ?  गै.अ.क्र.2 ने सर्वे रिपोर्ट दाखल केला नाही.  तसेच, त्‍यांनी केलेल्‍या गणने (Calculation) बद्दल कुठलाही खुलासा केला नाही.  त्‍यामुळे दाखल अंतिम बिला वरुन हे स्‍पष्‍ट आहे कि, रुपये 72,675/- पैकी फक्‍त रुपये 51,000/- मंजूर करुन सेवेतील न्‍युनता केली आहे. गै.अ.क्र. 2 चे म्‍हणणे कि, गाडीचा घसारा वगळून विम्‍याची रक्‍कम देण्‍यात आली, ही बाब सिध्‍द करण्‍यात अपयशी ठरला आहे.  त्‍यामुळे, अर्जदाराने केलेली मागणी सर्व परिस्थिती बघता ग्राह्य धरण्‍याजोगी आहे, असे ह्या मंचाचे मत आहे. गै.अ.क्र.2 ने दिलेली सेवेतील न्‍युनता आहे. गाडीमध्‍ये डॅमेज झाल्‍यास त्‍याची विम्‍याची रक्‍कम कशी Calculate केली हे दाखविण्‍याची जवाबदारी गै.अ.क्र.2 ची होती. परंतु, गै.अ.क्र. 2 ने ते न दाखवल्‍यामुळे अर्जदाराने मागणी केल्‍याप्रमाणे रुपये 72,675/- गाडी दुरुस्‍तीसाठी आलेला खर्च देण्‍यास गै.अ.क्र.2 जवाबदार असल्‍याच्‍या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले असून, खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

                        // अंतिम आदेश //

(1)   अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर.

(2)   गैरअर्जदार क्र.2 ने, अर्जदाराची अपघातग्रस्‍त गाडी क्र.एम.एच.34 एए 1288 च्‍या दुरुस्‍तीसाठी झालेला खर्च रुपये 72,675/- मधून रुपये 51,000/- वळते करुन रुपये 21,675/- अर्जदाराला द्यावे.

(3)   अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.1 ला थकबाकी असलेली रक्‍कम रुपये 21,675/- देऊन गाडी घेऊन जावी.

(4)   आदेशाची अंमलबजावणी 30 दिवसाचे आंत करावी.

(5)   गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदारावर कुठलेही पार्कींग चार्जेस न लावता थकीत रक्‍कम घेऊन गाडी अर्जदाराला द्यावी.

(6)   गैरअर्जदार क्र.2 ने गाडीचे Salvage गैरअर्जदार क्र.1 कडून घ्‍यावे.

(7)   सर्व पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.

(8)   सर्व पक्षांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी.

 


[HONABLE MR. Sadik M. Zaveri] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER