जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 272/2008. प्रकरण दाखल तारीख - 05/08/2008 प्रकरण निकाल तारीख - 20/09/2008 समक्ष – मा.सतीश सामते - अध्यक्ष (प्र.) मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्य सुरेखा भ्र. गणपती भोसले वय 40 वर्षे धंदा, घरकाम, अर्जदार. रा. कूंटूर ता. नायगांव. जि. नांदेड. विरुध्द. 1 नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कूंटूर ता. नायगांव जि.नांदेड. 2. शाखाधिकारी, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मूख्य शाखा स्टेशन रोड, नांदेड 3. सर व्यवस्थापक, गैरअर्जदार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आर.पी.सी. डी. वीभाग, वरळी, मुंबई. अर्जदारा तर्फे वकील - अड. गजानन सूर्यवंशी गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.एस.डी.भोसले. गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकिल - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या ) गैरअर्जदार नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी केलेल्या सेवेतील ञुटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार हिने तिचे पती वारल्याचे नंतर मूलाच्या भविष्यासाठी व शिक्षणासाठी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे तिच्या लहान मूलांच्या नांवाने दि.15.11.2003 रोजी मूदत ठेव क्र.359406 व 359407 मध्ये अनूक्रमे रु.40,000/- व रु.10,000/- द.सा.द.शे. 8 टक्के व्याजाने 25 महिन्यासाठी मूदत ठेव म्हणून जमा केले. दि.15.12.2005 रोजी मूदत संपल्यानंतर अर्जदार ही गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे गेली असताना व पैशाची मागणी केली असताना त्यांने देण्यास नकार दिला. अर्जदार ही वीधवा स्ञी आहे. तिच्याकडे उत्पन्नाचे दूसरे साधन नाही व दोन्ही लहान मूले शिक्षण घेत आहेत व शिक्षणासाठी तिला पैशाची आवश्यकता आहे व अर्जदार ही स्वतः दोन वर्षापासून आजारी आहे. उपचारासाठी तिला जवळपास रु.40,000/- ची आवश्यकता आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांच्याकडून रु.50,000/- 8 टक्के व्याजाने व मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च मिळावा अशी मागणी केली कआहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयूक्तरित्या व एकञितरित्या आपले लेखी म्हणणे वकिलामार्फत सादर केले. गैरअर्जदार ही बँक बंद असल्याकारणाने ते अर्जदारास रक्कम देऊ शकत नाहीत व मूदत ठेवीचे नूतनीकरणही करु शकत नाहीत. अर्जदाराचे पैसे दवाखान्याकामी खर्च झाला असेल व त्या बददलचे कागदपञ त्यांने दाखल केले पाहिजे व अशा प्रकारची रक्कम त्यांना उचलून घेण्याची असेल तर आर.बी.आय. ची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी हार्डशिप ग्राऊंडवर अर्जदाराचा प्रस्ताव यापूर्वीच पाठविला आहे. मंजूरीनंतर अर्जदारास लगेचच ही रक्कम देण्यास गैरअर्जदार तयार आहेत. गैरअर्जदार आर.बी.आय. ने कलम 35 ए लावल्याकारणाने गैरअर्जदार बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बध घातलेले आहेत. त्यामूळे अर्जदार यांना रक्कम मिळणार नाही असे केलयाने सेवेतील ञूटी होणार नाही. म्हणून सदरील अर्ज नामंजूर करण्यात यावा अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 3 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेवर नाबार्डने केलेल्या तपासणीच्या अहवालाप्रमाणे आर.बी.आय. ने कलम 35 ए दि.20.10.2005 पासून लावून त्यांचे आर्थिक व्यवहारावर निर्बध घातलेले आहेत. त्यामूळे तयांना आता आर.बी.आय. च्या पूर्वपरवानगीशिवाय रक्कम देता येणार नाही. अर्जदार यांना अतितातडीच्या मदतीसाठी हार्डशिप ग्राऊंडवर आवश्यक ते कागदपञासह प्रपोजल पाठविल्यास अशा प्रस्तावाचा विचार करुन त्यांस मंजूरी देण्यात येऊ शकते व मंजूर केलेली रक्कमच अर्जदार यांना मिळू शकते. म्हणून गैरअर्जदार यांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही सबब अर्ज खारीज करण्यात यावा. अर्जदार यांनी पूरवा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार क्र. 1, 2 व 3 यांनी आपआपले शपथपञ दाखल केले आहेत. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेला दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी सिध्द होते काय नाही. 2. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी त्यांच्या मूलांच्या नांवाने व स्वतःच्या नांवाने असलेले मूदत ठेव पावती दाखल केली आहे. त्याप्रमाणे मूदत ठेव पावती क्र.359406 यानुसार रु.40,000/- व मूदत ठेव पावती क्र.359407 यानुसार रु.10,000/- दि.15.11.2003 रोजी ठेऊन ते आठ टक्के व्याजासह 25 महिन्यानंतर मिळणार होते हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना मान्य आहे. पण गैरअर्जदार क्र. 3 यांनी कलम 35 ए लावून घातलेल्या आर्थिक निर्बधामूळे त्यांना ती रक्कम देता येत नाही व असे केल्याने ती सेवेतील ञूटी होणार नाही. म्हणून अर्जदाराचा मानसिक ञास व दावा खर्च मिळणे बाबतची मागणी नामंजूर करण्यात येते. अर्जदार हे हार्डशिप ग्राऊंडवर अतितातडीच्या मदतीसाठी प्रपोजल गैरअर्जदार क्र. 3 यांच्याकडे पाठवू शकते व त्यांच्या म्हणण्याप्रमाणे व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी कबूल केल्याप्रमाणे असे प्रपोजल गैरअर्जदार क्र. 3 यांच्याकडे पाठविण्यात आलेले आहे परंतु ते अद्यापही मंजूर होऊ आलेले नाही.त्यामूळे सध्या ती रक्कम तयांना मिळणार नाही. मंजूरी आल्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 व 2 त्यांना ती रक्कम देण्यास तयार आहेत. अर्जदार यांनी प्रपोजल पाठविले याबददलचा पूरावा दाखल केलेला नाही, परंतु गैरअर्जदारांनी ते कबूल केलेले आहे. परंतु समजा ते प्रपोजल गैरअर्जदार क्र. 3 यांना मिळाले नसलयास असे प्रपोजल परत पाठविता येईल. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. अर्जदार यांनी हार्डशिप ग्राऊंडवर योग्य ती आवश्यक कागदपञाचे प्रपोजल गैरअर्जदार क्र. 1 कडे दयावे, त्यांनी योग्य ती शिफारस करुन ते प्रपोजल आर.बी.आय.कडे पाठवावे व आर.बी.आय. ने मंजूर केलेली रक्कम गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास ताबडतोब दयावी. 3. मानसिक ञासाबददल आदेश नाही. 4. दावा खर्च ज्यांचा त्यांनी आपआपला सोसावा. श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते सदस्या अध्यक्ष (प्र.) जे. यु. पारवेकर लघूलेखक |