Maharashtra

Nanded

CC/09/75

Yeshvant Marothrao Kharat - Complainant(s)

Versus

Mangeer,Life Insurance co.of India - Opp.Party(s)

ADV.S.N.Hake

08 Jul 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/75
1. Yeshvant Marothrao Kharat Shram safalya,Behind Mahtma phule His\gh School Vijaynager,NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Mangeer,Life Insurance co.of India Degloor Dist NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 08 Jul 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
 
प्रकरण क्र.2009/75.
                                                     प्रकरण दाखल दिनांक  31/03/2009.
                                                     प्रकरण निकाल दिनांक 08/07/2009.
                                                   
समक्ष         -    मा. श्री.सतीश सामते,              अध्‍यक्ष.(प्र.)
                       मा.श्रीमती सुजाता पाटणकर,         सदस्‍या.
                
यशवंत पि. मारोत्‍तीराव खरात
वय, 37 वर्षे, धंदा व्‍यापार
रा.साधना नगर, देगलूर ता.देगलूर, जि.नांदेड.                   अर्जदार
 
विरुध्‍द
 
1.   शाखा व्‍यवस्‍थापक,
     भारतीय जीवन विमा निगम
     शाखा देगलूर.                                     गैरअर्जदार
2.   वीभागीय व्‍यवस्‍थापक,
     भारतीय जीवन विमा निगम,
     गांधी नगर, नांदेड.
 
अर्जदारा तर्फे.               - अड.पी.जी.नरवाडे.
गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे      - अड.एम.डी.देशपांडे.
 
निकालपत्र
(द्वारा,मा.श्री. सतीश सामते, अध्‍यक्ष (प्र.))
 
               गैरअर्जदार भारतीय जीवन विमा निगम कंपनीच्‍या सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी नूकसान भरपाई म्‍हणून रु.5,00,000/- तसेच मानसिक ञासाबददल रु.50,000/- व दावा खर्च म्‍हणून रु,5,000/- मिळणे बाबत अर्जदार यांनी दावा दाखल केलेला आहे.
 
              अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून पॉलिसी नंबर 98313789 दि.25.2.2004 रोजी व दूसरी एक पॉलिसी नंबर 98267666 घेतली आहे. दोन्‍ही पॉलिसी या डबल बेनिफिट म्‍हणजे लाईफ व अपघात बेनिफिट अशा आहेत. अर्जदार हे दि.31.10.2007 रोजी महामंडळाच्‍या बसने देगलूनहून मूंबई कडे जात असताना समोर येणा-या ट्रकने बसला जोराची धडक दिली सदर अपघातात अर्जदार यांचे दोन्‍ही पाय फँक्‍चर झाले. अर्जदार यांनी साई हॉस्‍पीटल येथे दोन्‍ही पायावर शस्‍ञक्रिया करुन घेतली परंतु दोन्‍ही पायात कायमचे अपंगत्‍व आले आहे. गैरअर्जदार यांनी जोखीम स्विकारल्‍याप्रमाणे अर्जदार यांनी आपली मागणी पूर्ण करण्‍यासाठी हा दावा दाखल केलेला आहे.
 
              गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदारांनी दि.24.6.2008 रोजी प्रकरणातील वादातील विमा नंबर 98313789 व 98267666  हे दोन्‍ही अपंगत्‍वाचे दावे नाकारलेले आहेत. अर्जदार यांनी साई सर्जीकल अन्‍ड अक्‍सीडेंट हॉस्‍पीटल नांदेड  येथे अपघातात पायास झालेल्‍या दूखापती बाबत सदरच्‍या डॉ.उमेश देशपांडे  यांचेकडून 54 टक्‍के अपंगत्‍वाचे प्रमाणपञ दि.10.7.2008 रोजी दाखल केलेले आहे व गैरअर्जदाराच्‍या विरुध्‍द क्षेञिय कार्यालयात सदरचे प्रमाणपञ दाखल करुन त्‍यांच्‍या अपंगत्‍वाच्‍या दाव्‍याचे पूर्नविचार करण्‍याची विनंती केली. त्‍यानुसार गैरअर्जदारांनी क्षेञिय कार्यालयाच्‍या निर्देशानुसार दि.17.3.2009 रोजी अर्जदार यांना नोंदणीकृत पोस्‍टाने पञ पाठविले व देगलूर येथील डॉ.भूमे यांचेकडून परत तपासणी करुन प्रश्‍नावली भरुन देण्‍यास सांगितले परंतु अर्जदाराने हे पञ घेतले नाही, व ते पञ परत आले.  यात अर्जदार यांचे सहकार्य मिळाले नसल्‍यामूळे पूर्ननीर्णय बाबत चौकशी करता आली नाही. गैरअर्जदाराने गैरकायदेशीर दावा नाकारला हे म्‍हणणे चूक आहे. अर्जदाराच्‍या  नोटीसचे उत्‍तर दि.30.08.2008 रोजी गैरअर्जदाराने दिलेले आहे. अर्जदाराने त्‍यांच्‍या तक्रारीच्‍या रिलीफ क्‍लॉज द्वारे त्‍यांला शस्‍ञक्रियेसाठी लागलेला खर्च व नूकसान भरपाई रु.5,00,000/- मागितली होती परंतु दोन्‍ही विम्‍याच्‍या अटी व नियमानुसार अशा प्रकारची रक्‍कम मिळण्‍याबाबत प्रावधान नसल्‍यामॅळे याबाबतची मागणी मान्‍य करता येणार नाही. दोन्‍ही विम्‍यात इतर लाभासंबंधी अपघात लाभ या लाभाचाही समावेश आहे. अर्जदार हे दि.30.10.2008 रोजी बसने मुंबई कडे जात असताना त्‍यांना अपघात झाला. या बाबत चौकशीसाठी फॉर्म नंबर 5279 भरुन दिला त्‍यानुसार डॉ.उमेश देशपांडे  यांनी केलेल्‍या चौकशीमध्‍ये अर्जदाराच्‍या अंपगत्‍वाचे प्रमाणपञ हे 20 टक्‍के सांगितले आहे जे की, 16 महिन्‍यात दूरुस्‍त होऊ शकते. अपघातामूळे झालेल्‍या अपंगतव तात्‍पूरते आहे. डॉ.ए.डी.सदावर्ते यांनी अर्जदाराच्‍या सेंट्रल नर्वस सिस्‍टीम च्‍या तपासणी नंतर भरुन दिलेल्‍या प्रश्‍नावलीत अर्जदाराचे अपंगत्‍व साधारण असल्‍याचे सांगितले आहे. तसेच अर्जदाराच्‍या व्‍यंगा बाबत पायाच्‍या नळीला फॅक्‍चर झाल्‍याचे सांगितले आहे. तसेच डॉ. रेडडी यांनी अर्जदारास 20 टक्‍के अपंगत्‍व असल्‍याचे सांगितले. तसेच अहवालात शाखाधिकारी श्री. शिंदे यांनी अर्जदाराचे अपंगत्‍व तात्‍पूरते असून ते भविष्‍यात दूरुस्‍त होऊ शकते असे म्‍हटले आहे. दोन्‍ही वादातीत विम्‍याच्‍या अट क्र.10.4 नुसार अपंगत्‍व कशा प्रकारचे असावे हे सांगितलेले आहे. अपंगत्‍व हे अपघातापासून आलेले असावे व त्‍यापासून त्‍यांला पूर्णतः व कायमचे अपंगत्‍व आलेले असल्‍यास व त्‍यामूळे ते कोणतेही काम करण्‍यास असमर्थ झाल्‍यास तसेच दोन्‍ही डोळयांच्‍या दूष्‍टीची, दोन्‍ही हात किंवा मनगटाच्‍या वरील भागाचे विच्‍छेदन, दोन्‍ही पाय किंवा पायाच्‍या घोटयाच्‍या वरच्‍या भागाचे विच्‍छेदन, एक हात किंवा मनगटाच्‍या वरील भागाचे विच्‍छेदन एक पाय किंवा पायाच्‍या घोटाच्‍या विच्‍छेदन यामूळे न भरुन नीघणारे नूकसान झाल्‍यास अशा प्रकारचे अपंगत्‍व असल्‍यास या अटीनुसार विमाधारक विम्‍याखालील अक्‍सीडंट बेनिफिट मिळण्‍यास पाञ होतो असे म्‍हटले आहे. तसेच गैरअर्जदार यांनी विम्‍याच्‍या अटी नंबर 10.2, 10.3, 10.4, 10.5, 10.6  नुसार अर्जदाराचे अपंगत्‍व बसत नसल्‍यामूळे दोन्‍ही दावे फेटाळले आहेत. अर्जदार आजही काम करण्‍यास समर्थ असून त्‍यांना कायमचे अपंगत्‍व नाही. त्‍यामूळे गैरअर्जदार यांचा नीर्णय योग्‍य आहे. अर्जदार यांनी केलेली तक्रार खोटी असून ती रु.5,000/- खर्चासह फेटाळावी असे म्‍हटले आहे.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                               उत्‍तर
   1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्‍द
      करतात काय ?                               नाही. 
 2. काय आदेश ?                         अंतिम आदेशाप्रमाणे
                          कारणे
मूददा क्र.1 ः-
                     गैरअर्जदार यांना पॉलिसी नंबर 982671666 व 983137898 हे मान्‍य आहेत या बददल वाद नाही.  वाद एवढाच आहे की, अर्जदाराच्‍या मते त्‍यांना दि.31.10.2007 रोजी झालेल्‍या अपघातात दोन्‍ही पायास अपंगत्‍व आले व ते 54 टक्‍के आहे व कायमचे आहे म्‍हणून त्‍यांना अक्‍सीडेंट बेनिफिट मिळावा यासाठी अर्जदाराने अपंगत्‍वा बददल एफ.आय.आर., पोलिस पंचनामा, साई हॉस्‍पीटलचे भरती कार्ड, शस्‍ञक्रिये रेकॉर्ड व डिसचार्ज कार्ड व डॉ. उमेश देशपांडे यांनी दिलेले 54 टक्‍केचे अपंगत्‍वाचे प्रमाणपञ इत्‍यादी कागदपञे दाखल केलेली आहेत. गैरअर्जदारांनी दि.24.6.2008 रोजी अपंगत्‍वाचे दावा नाकारला यानंतर अर्जदारांनी गैरअर्जदाराच्‍या क्षेञीय कार्यालयास पूर्नविचार करण्‍याची विनंती केली ती त्‍यांनी मान्‍य ही केली परंतु पूढे अर्जदाराने त्‍यांचेकडून आलेले पञ घेतले नाही व ते डॉ.भूमे देगलूर यांचेकडे पूर्नतपासणीसाठी गेले ही नाही. अर्जदाराने स्‍वतः मागणी करुन सहकार्य केले नाही हे स्‍पष्‍टपणे दिसून येते.  यानंतर गैरअर्जदाराने काही डॉक्‍टरांना पूर्नतपासणीसाठी पाचारण केले असता चौकशी अंतर्गत फॉर्म नंबर 5279 भरुन दिल्‍यावर डॉ.उमेश देशपांडे यांनी 20 टक्‍के अपंगतव असल्‍याचे सांगितले. यानंतर डॉ.सी.व्‍ही. रेडडी यांनीही अर्जदाराकडून प्रश्‍नावली भरुन घेतली व तपासणीनंतर 20 टक्‍के अपंगत्‍व असल्‍याचे सांगितले. डॉ. सदावर्ते यांनी अर्जदाराच्‍या सेंट्रल नर्वस सिस्‍टीम ची तपासणी करुन अर्जदाराचे अपंगत्‍व साधारण असल्‍याचे सांगितले. हे सर्व प्रश्‍नावली त्‍यांची उत्‍तरे व अर्जदाराचा तपासणी रिपोर्ट डॉक्‍टरांच्‍या सहीनीशी या प्रकरणात दाखल आहे. गैरअर्जदार यांनी यानंतर दि.30.8.2008 रोजी अर्जदाराच्‍या वकिलाने पाठविलेल्‍या कायदेशीर नोटीसला उत्‍तर देताना डॉक्‍टराच्‍या रिपोर्ट नुसार स्‍पष्‍टपणे नमूद केलेले असून याप्रमाणे अर्जदार यांना फक्‍त 20 टक्‍के अपंगतव आहे जे की 16 महिन्‍यात चांगले होऊ शकते. सध्‍या अर्जदार हा दुस-याच्‍या सहायाने चालू शकतो असे त्‍यांचे तपासणी अधिका-याने रिपोर्ट दिलेला आहे. गैरअर्जदाराने अर्जदार यांना फूल साईज फोटो मागितला असता तो त्‍यांनी दिला नाही. त्‍यामूळे कंडीशन नंबर 10.2, 10.,3,10.4, 10.,5, 10.,6 अर्जदाराचे अपंगतव कायम स्‍वरुपाचे नाही व त्‍यामूळे अपघात लाभ हा अर्जदारास देता येणार नाही. अर्जदाराने घेतलेल्‍या दोन्‍ही पॉलिसी या अपघातामध्‍ये झालेल्‍या वैद्यकीय उपचारासाठी खर्चाची रक्‍कम मिळण्‍याचे प्रावधान नाही. त्‍यामूळे त्‍यांचा दावा नाकारला आहे. हे पञ अर्जदारानेच या प्रकरणात दाखल केलेले आहे. दोन्‍ही पॉलिसी या अपघातामधील खर्चासाठी नाहीत तर कायमचे अपंगत्‍व आल्‍यास त्‍यासाठी आहेत. गैरअर्जदारांनी दोन्‍ही पॉलिसी या प्रकरणात दाखल केलेल्‍या आहेत या पॉलिसीच्‍या मागील पानावर नियम दाखविले आहेत यात नियम नंबर 10.4 नुसार,
The disability above referred to must be disability which is the result of an accident and must be total and permanent and such that there is neither than nor at anytime thereafter any work, occupation or profession that the Life Assured can over sufficiently do or follow to earn or obtain any wages, compensation or profit. Accidental Injuries which independently of all other causes and within 120 days from the happening of such accident, result in the irrecoverable loss of the entire sight of both eyes or in the amputation of both hands at or above the wrists, or in the amputations of both feet at or, above ankies, or in the amputation of one hand at or above the wrist and one foot at or above the ankle, shall also be deemed to constitute such disability.
 
अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांचे अपंगत्‍व 54 टक्‍के आहे परंतु इतर 4-5 डॉक्‍टरांनी केलेल्‍या तपासणीप्रमाणे त्‍यांचे अपंगत्‍व 20 टक्‍के असल्‍याचे दिसते. अर्जदाराने आपला फूल साईज फोटो दिला नसल्‍यामूळे ते उभे कसे राहतात व कसे चालतात यांचा उलगडा होत नाही. अर्जदाराने दाखल केलेले प्रमाणपञ  हे खाजगी डॉक्‍टराचे आहे व अपंगत्‍वाचे प्रमाणपञ हे नियूक्‍त केलेल्‍या बोर्डाचे असेल तरच या अंतर्गत मिळणारे  बेनिफीट बस पास, रेल्‍वे पास यांचा लाभ्‍ मिळू शकतो. आमच्‍या समोर हे प्रकरण चालू असतना आम्‍ही अर्जदारास स्‍वतः समोर येण्‍यास सांगितले असताना हे प्रकरण संपेपर्यत समोर आलेले नाहीत.  गैरअर्जदाराचा असा आक्षेप आहे की ते वॉकरच्‍या सहायाने चालू शकतात.  पॉलिसीच्‍या नियमानुसार अर्जदार हे एक पाय, एक हात किंवा दोन्‍ही डोळे यांस कायमचे अपंगत्‍व आले हे अर्जदार सिध्‍द करु शकलेले नाहीत. त्‍यामूळे त्‍यांना या पॉलिसी अंतर्गत अपंगत्‍वाचा लाभ मिळू शकत नाही. यावर
   
                     National Commission II (2003) 102 (NC)
 
                                   L.I.C. Vs. D.K.Panachal
 
Section 21 (b) –Insurance – Disability Benefit – Accidental fall from roof of house, resulting injury to right thigh – Disability of complainant 40 % to
 50 % -- Disability must be total and permanent to claim disability benefit – Complainant not entitled to disability benefit.
 
                             वरील सर्व बाबीचा गांभीर्याने विचार केला असता गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्‍द करु शकलेले नाहीत म्‍हणून ते आपल्‍या मागणीस पाञ नाहीत.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                        आदेश
1.                                         अर्जदाराची तक्रार फेटाळण्‍यात येते.
 
2.                                         पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
 
3.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
(श्रीमती सुजाता पाटणकर)                       (श्री.सतीश सामते)    
              सदस्‍या                                        अध्‍यक्ष (प्र.)
 
जे.यु, पारवेकर
लघुलेखक.