जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.235/2008. प्रकरण दाखल दिनांक – 03/07/2008. प्रकरण निकाल दिनांक – 07/08/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायसिंह राणे. अध्यक्ष. मा.श्री.सतीश सामते सदस्य. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर. सदस्या. चंद्रकांत पि.विठठ्लराव नागुलवार, अर्जदार. वय वर्षे 40, व्यवसाय नौकरी, रा.विठठ्ल निवास अंबिकानगर, अंबिका मंगल कार्यालया समोर, नांदेड. विरुध्द. मुख्य व्यवस्थापक, गैरअर्जदार. भारत संचार निगम लि, टेलिफोन भवन, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.एस.एम.चाऊस. गैरअर्जदार क्र.1 - अड.एस.एन.हाके. निकालपत्र (द्वारा मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) यात अर्जदार चंद्रकांत विठठ्लराव नागुलवार यांची तक्रार थोडक्यात अशी की, गैरअर्जदाराकडुन अर्जदारास दुरध्वनी क्र.263384 देण्यात आला. त्यंनी इंटरनेट सेवा प्लॅन – 500 चा उपभोग घेत असुन पुरवठा घेतल्याच्या तारखेपासुन वादातील देयक मिळाल्यापर्यत नियमितपणे रक्कम रु.500/- दरमहा भरत आहेत त्यांचेकडे कोणतीही थकबाकी नाही. गैरअर्जदारांनी डिसेंबर 2007 मध्ये अर्जदारास बेकायदेशिर रित्या देकय क्र. टि.ओ.30120085804031 देवून रु.13,190/5 भरण्यास सांगितले. इंटरनेट प्लॅन 500 प्रमाणे सदरील सेवेवर मोफत देण्यात येणारी दोन जी.बी. च्याआतच उपभोग घेतला असुन त्यास देण्यात आलेली देयके चुकीची व अवैध आहेत. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार यांना प्रत्यक्ष भेटु देयकाबद्यल विचारणा केली असता, त्यांना उउवाउउवीचे उत्तरे देण्यात आली. शेवटी त्यांनी दिनांक 25/02/2008 रोजी गैरअर्जदार यांना सदरील देयकाबद्यल खुलासा मागितला व त्यांना देण्यात आलेले इंटरनेट सेवा बंद करण्याबद्यल विनंती केली. परंतु गैरअज्रदारांनी इंटरनेट सेवा खंडीत केली असुन आणि त्यांचा दुरध्वनी क्र.263384 सुध्दा बंद केला. अर्जदारांना देण्यात आलेली सुविधा बंद करुन गैरअर्जदारांनी जाणुन बुजून त्रास देत आहेत व उध्दट वागणुक दिली आहे. गैरअर्जदारांनी अर्जदाराचे दुरध्वनी सेवा बंद करुन सेवेत त्रुटी केलेली आहे. म्हणुन त्यांनी ही तक्रार दाखल करुन तीद्वारे त्यांचा दुरध्वनी क्र.263384 पुर्ववत चालु करावे माहे डिसेंबर 2007 चे देयक रक्कम रु.13,190/- बेकायदेशिर घोषीत करुन रद्य करावे आणि त्यांना दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्यल रक्कम रु.25,000/- व दावा खर्च गैरअर्जदार यांचेकडुन मिळावेत अशा मागण्या केल्या आहेत. यात गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे असे की, ते वर्षे 2000 पासुन इंटरनेट सेवा प्लॅन 500 सुरु केला आहे. अर्जदारांनी सदरील तक्रार सुडबुध्दीने व चुकीच्या माहीती आधारे केलेली आहे. गैरअर्जदार यांनी हे मान्य केले आहे की, अर्जदार यांना दुरध्वनी क्र.263384 दि.11/01/2001 रोजी देण्यात आली. डिसेंबर 2007 मध्ये उपभोगलेल्या इंटरनेट ब्रॉड बॅन्ड सेवेनुसार अर्जदारास कायदेशिर देयक क्र. टी.ओ.30120085804031 रक्कम रु.13,190/- देण्यात आले आहे. अर्जदारास देण्यात आलेले देयक पुर्णतः सत्य असुन नियमाप्रमाणे आहे. अर्जदाराने अद्यापर्यंत वरील देयकाचा भरणा केलेला नाही, तसचे गैरअर्जदारांनी दिलेली देयके दि.01/01/2008 ते दि.31/01/2008 पर्यात देयक क्र.30220086638899 रु.1,649/- चा अर्जदाराने भरणा केलेला नाही. म्हणुन गैरअर्जदाराने अर्जदारास देण्यात आलेली सुवीधा व दुरध्वनी दि.12/02/2008 रोजी खंडीत केला आहे. अर्जदाराने दुरध्वनीचे बिल तसेच ब्रॉड बॅन्उ इंटरनेट सेवेचे बिल भरणा करण्याचे बाकी असल्यामुळे दोन्ही सेवा बंद करण्यसात आल्या. अर्जदाराने प्रत्यक्षात ब्रॉड बॅन्ड इंटरनेश्ट प्लॅन 500 हा मोफत दरापेक्षा जास्त वापर केला त्याप्रमाणे बिल देण्यात आले. अर्जदारास त्यांचा दुरध्वनी पुर्ववत जोडुन मिळणेचा अधिकार नाही. अर्जदारास देण्यत आलेले बिल कायदेशिर व बरोबर असल्याने त्यांच तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. अर्जदार यांनी आपल्या अर्जासोबत यादीप्रमाणे दस्तऐवज व शपथपत्र दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांन आपल्या जबाबासोबत यादीप्रमाणे दस्तऐवज व शपथपत्र दाखल केलेले आहे. अर्जदारा तर्फे वकील युक्तीवादाच्या वेळी कोणी हजर नाही. गैरअर्जदा यांच्या तर्फे वकील एस.एन.हाके यांनी युक्तीवाद केला. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय? होय. 2. गैरअर्जदार सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय? नाही. 3. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. मुद्या क्र. 1 - अर्जदार यांनी अर्जासोबत दुरध्वनी बिल दाखल केलेले आहे. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत ही बाब गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी म्हणणे व शपथपत्रामध्ये नाकारलेले नाही. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यासोबत अर्जदार यांना दिलेले मुळ बिल तसेच कॉल डिटेल्स बाबत अनेक्चर 1 दाखल केलेले आहे याचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2 - माहे डिसेंबर 2007 चे गैरअर्जदार यांनी अर्जदारास देयक क्र.टी.ओ.30120085804031 हे रक्कम रु.13,190/- चे दिले आहे. अर्जदार यांचे अर्जात नमुद केल्याप्रमाणे अर्जदार यांनी ब्रॉड बॅन्ड इंटरनेट सेवा प्लॅन 500 प्रमाणे दोन जी.बी.च्या आतच सदर सेवेचा उपभोग घेतलेला आहे. दि.25/02/2008 रोजी अर्जदार यांनी ब्रॉड बॅन्ड सेवा बंद करण्याबद्यल कळविले नंतर अर्जदाराचे दुरध्वनी क्र.263384 बंद करुन टाकलेले आहे. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये अर्जदार यांना दि.11/01/2001 रोजी दुरध्वनी क्र.263384 हा दिल्याचे नमुद केलेले आहे. अर्जदार यांनी माहे डिसेंबर 2007 मध्ये उपभोगलेले इंटरनेट ब्रॉड बॅन्ड सेवेनुसार आहे.गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना कायदेशिररित्या देयक क्र.टि.ओ.30120085804031 देऊन अर्जदारा रु.13,190/- जमा करण्याचे बिल दिलेले आहे. दि.01/12/2007 ते दि.31/12/2007 पर्यंत अर्जदाराने घेतलेल्या सेवेचा तपसिल खालील प्रमाणे आहे. लोकल कॉल दर | महिन्याचे ठरावकि दर | डाटा दर | सेवाकर | सुवीधा | बिल भरण्याच्या मुदतीनंतर भरणा करण्याचे दर | एकुण | 408 | 166 | 10776 | 1407 | 33 | 400 | 13,190 |
एकुण वापरलेले एम.बी. | मोफत सेवा एम.बी. | मोफत व्यतीरीक्त वापरलेली एम.बी. | वापर दर | ब्रॉड बॅन्ड प्लॅन दर | एकुण | 15405 | 2560 | 12845 | 10276 | 500 | 10776 |
गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यासोबत अर्जदार यांचे ब्रॉड बॅण्ड इंटरनेट सेवेचे डिटेल्स अनेक्चर 1 येथे दाखल केलेले आहे त्याचे अवलोकन केले असता, अर्जदार यांनी ब्रॉड बॅण्ड इंटरनेट सेवेचा ज्या प्रमाणात डिसेंबर 2007 मध्ये उपभोग घेतलेला आहे त्या बाबत विस्तृत माहीती स्पष्टपणे नमुद केल्याचे दिसुन येते व त्याबाबतचे गैरअर्जदार यांनी बिल दिलेले आहे. तसेच अर्जदार यांनी दुरध्वनी क्र.263384 चे बिल न भरल्यामुळे अर्जदार यांचा दुरध्वनी खंडीत केलेला आहे. त्यामुळे अर्जदार यांच्या अर्जातील कथनास काहीच अर्थ उरत नाही. अर्जदार हे गैरअर्जदार यांनी सेवा देणेमध्ये कमतरता केलेली आहे ही बाब पुराव्यानीशी सिध्द करु शकले नाहीत.गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी म्हणण व दाखल केलेले कागदपत्र याबाबत अर्जदार यांनी प्रतीउत्तर दिलेले नाही अगर गैरअर्जदाराच्या लेखी म्हणण्यातील कोणतेही कथने अर्जदाराने नाकारलेली नाही त्यानंतर येणा-या नियमित तारखांना अर्जदार हे गैरहजर राहीले आहेत. अर्जदाराने या कामी लेखी अगर तोंडी युक्तीवाद केलेला नाही. अर्जदाराचा अर्ज त्यांनी दाखल केलेले कागदपत्र, गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे त्यांनी दाखल केलेले कागदपत्र व त्यांचे वकीलांनी केलेला युक्तीवाद याचा विचार होता खालिल प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज खारीज करण्यात येते. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांना आपापला सोसावा. 3. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे)(श्रीमती.सुजाता पाटणकर)(श्री.सतीशसामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार, लघुलेखक. |