जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.2009/84 प्रकरण दाखल दिनांक – 15/04/2009. प्रकरण निकाल दिनांक –15/07/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. मोहनाजी संभाजी आलेवाड वय 50 वर्षे, धंदा शेती रा.पाटोदा (त.ब.) ता.नायगांव जि. नांदेड. अर्जदार विरुध्द 1. व्यवस्थापक, नायगांव तालुका खरेदी विक्री संघ मर्यादित नायगांव (बा) जि. नांदेड. गैरअर्जदार 2. वीभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य को. ऑप मार्केटींग फेडरेशन लि, वीभागीय कार्यालय, नांदेड. 3. व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित, कॉटन कॉम्पलेक्स, अंजनी चौक, वर्धा रोड, नागपूर -15. अर्जदारा तर्फे. - अड.सुरेश पन्नासवाड गैरअर्जदार क्र.1 तर्फे - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे - अड.शारदा बाजीराव नाईक निकालपत्र (द्वारा,मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष) अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून कापूस विक्रीपोटी रु.26,800/- वसूलीसाठी हा दावा दाखल केलेला आहे. अर्जदार हे पाटोदा ता. नायगांव येथील रहीवासी असून तेथे शेती करीत आहेत व 1974 पासून कापूस पणन महासंघ यांची उपवीभागीय देगलूर केंद्र बरबडा यांचेकडे विकतात. तो ते कापूस सूतगिरण्याना विकतात. अर्जदाराला सदर कापसाच्या एकूण किंमतीत सन 1974 पासून आपले कापूस उत्पादक पणन महासंघ एकाधिकारी कापूस खरेदी योजनेअंतर्गत भांडवल उभारणी नीधीपोटी 1 टक्के ते 3 टक्के रक्कम कपात करीत असतात.सन 1990 पर्यत या नीधीची रक्कम कपातीच्या रक्कमकेतून कपात करुन अर्जदारास ती रक्कम मिळाली आहे. दि.23.5.2006 रोजी एकूण नीधीपोटी एकूण कपात व्याजासह देण्याचे ठरलें होते परंतु गैरअर्जदार यांनी काही शेतक-यांना रक्कम अदा केल्या परंतु अर्जदारास अशी रक्कम देण्यात आली नाही. यात अर्जदाराने नांवे एकूण रु.14,277/- दर्शविण्यात आली आहे. याप्रमाणे एमआयसीआर नंबर एचएएफ 0206320 पणन महासंघ नागपूर चे चेक इश्यू रजिस्ट्रर पान क्र.1059 अनु.क्र.40 प्रमाणे रु.14,277/- चा धनादेश तयार करण्यात आलेला होता तो अर्जदारास देण्यात आलेला नाही. म्हणून ती रक्कम व मानसिक ञासापोटी रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.2500/- असे एकूण 26,777/- मिळावेत म्हणून तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांना नोटीस पाठविण्यात आली. त्यांना नोटीस मिळूनही ते गैरहजर राहीले म्हणून एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच अर्जदारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार आपली तक्रार या मंचात दाखल करण्यास कार्यक्षेञ येते काय ? नाही. 2. अर्जदार ग्राहक होतात काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- प्रकरण नोंदणी झाल्यानंतर व गैरअर्जदार यांना नोटीस गेल्यानंतर या मंचाचे असे लक्षात आले की, अर्जदार या प्रकरणात ग्राहक होत नाहीत म्हणून मंचाने हा मूददा उपस्थित केला. यानंतर अर्जदाराच्या वकिलांनी यावर यूक्तीवाद केला. तक्रारीवरुन हे अतीशय स्वच्छ व स्पष्ट आहे की, अर्जदार हे शेतकरी आहेत व कापूस उत्पादक आहेत. त्यांनी आपला माल (कापूस) बरबडा येथील कापूस फेडरेशनला विकला आहे व यात सरळसरळ अर्जदार हे कापूस विक्रेते आहेत व फेडरेशन यांनी कापूस विकत घेतला आहे. अशा परिस्थितीत फेडरेशन हे अर्जदाराचे ग्राहक होऊ शकतात व त्यांना शेतक-याचे विरुध्द तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. परंतु अर्जदार हे विक्रेते असल्यामूळे ते ग्राहकच होणार नाहीत. आपले मंच हे ग्राहक तक्रार निवारण मंच आहे. त्यामूळे अर्जदार ग्राहकच नसेल तर या मंचात तक्रार दाखल करु शकणार नाहीत. अर्जदार हे ग्राहक होत नसल्याकारणाने या मंचास कार्यक्षेञही येत नाही. येथे अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे त्यांना कापूस विकल्यानंतर जे 1 टक्के ते 3 टक्के भांडवल नीधी उभारणीसाठी गैरअर्जदारानी रक्कम कपात केलेली आहे ती रक्कम काही अंशी त्यांना मिळाली व काही अंशी ही रक्कम त्यांना मिळाली नाही. गैरअर्जदार हे सहकारी संस्था आहेत. म्हणून आपल्या मागण्यासाठी अर्जदार यांना सहकारी न्यायालयात दाद मागता येईल. परंतु हे ग्राहक मंच असल्याकारणाने व अर्जदार ग्राहक होत नसल्याने या मंचास कार्यक्षेञ येत नाही. म्हणून प्राथमिक मूददयावरुन अर्जदाराचे प्रकरण खारीज करण्यात येते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक.
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER | |