जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/82 प्रकरण दाखल तारीख - 15/04/2009 प्रकरण निकाल तारीख – 19/03/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते. - सदस्य मधुकर पि.तुकाराम चव्हाण, वय वर्षे 25, धंदा व्यवसाय, अर्जदार. रा.पिंपळकौठा ता.मुखेड जि.नांदेड. विरुध्द. 1. शाखाधिकारी, गैरअर्जदार. एच.डी.एफ.सी.बँक लि, शाखा कलामंदिर, नांदेड. 2. शाखाधिकारी, एच.डी.एफ.सी.बँक,लि, रिटेल असिट कलेक्शन फोथ प्लोर, टायटानिक बिल्डींग 26-ए, नारायण प्रॉपर्टी, चांदीवली अंधेरी इस्ट, मुंबई – 400072. 3. शाखा व्यवस्थापक, साई अर्बन को.ऑप.बँक, मुखेड ता.मुखेड जि.नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.एस.एस.पाटील गैरअर्जदार क्र.3 - नो से आदेश निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार यांच्या देण्यात आलेल्या त्रुटीच्या सेवेमुळे अर्जदार यांनी आपली तक्रार नोंदविली आहे. त्यांची मागणी आहे की, गैरअर्जदार मागीतलेली रु.13,447/- माफ करावेत तसेच नाहरकत प्रमाणपत्र व आर.सी.बुक देण्याचे गैरअर्जदार यांना आदेशित करावे. अर्जदार यांना झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्हणुन रु.5,000/- मागीतले आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडुन रुद्य39,075/- वाहन खरेदीसाठी कर्ज घेतले. कर्जाचे हप्त्यापोटी दर महिना रुद्य1,584/- साठी त्यांनी गैरअर्जदार यांना 29 चेक दिले व याचा करार क्र.90472279 करण्यात आला. अर्जदार यांनी कर्जाची रक्कम प्रत्येक तारखेस वेळेवर परतफेड केली पण काही हप्त्याची परतफेड करीत असतांना वैयक्तिक अडचणीमुळे विलंब झाला व ते हप्ते त्यांनी थकबाकी दंड व्याजासह अदा केले आहे. हप्त्याची सर्व रक्कम परतफेड केल्यानंतरही गैरअर्जदार यांनी दि.14/02/2009 रोजी अर्जदारास नोटीस पाठवुन रु.13,447/- मासिक हप्त्यापोटी येणे बाकी आहेत, म्हणुन ती रक्कम 17 तासाच्या आंत भरण्यास सांगितले नसता वाहन जप्त करण्याची धमकी दिली. अर्जदार यांनी गैरअर्जदाराशी समक्ष भेटुन हप्ते भरल्या बाबत स्वतः जवळ असलेले कागदपत्र दाखवुन सुध्दा गैरअर्जदार यांनी ते मान्य केले नाही. त्यामुळे अर्जदार परेशान झाले. अर्जदार अकरा हप्ते दि.24/08/2008 पासुन दि.07/10/2010 पर्यंत चेकने अदा केले व बाकीची रक्कम रोखीने पावत्या घेऊन दिले, पुर्ण हप्ते भरल्यानंतरही गैरअर्जदार परत पैशाची मागणी करतात, म्हणुन अर्जदार यांनी ही तक्रार नोंदवुन वरील प्रमाणे मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. अर्जदार यांनी वाहन कर्जासाठी घेण्यात आलेले कर्जाचे कराराप्रमाणे अटी व शर्तीचे उल्लंघन केले आहे. अर्जदाराचे स्वतःचे खाते असलेली बँक म्हणजे साई अर्बन को.ऑप.बँक मुखेड यांना पार्टी म्हणुन समाविष्ट केले नाही, हे कर्ज परतफेडीचा करार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना एकुण रु.39,075/- एवढे वाहनासाठी कर्ज दिले व त्यासाठी होणारे व्याज रु.8,544.53 असे एकुण रु.47,619.53 एवढी रक्कम अर्जदाराने गैरअर्जदारास 19 महिन्यात हप्त्याने परतफेड करावयाची होती. दि.15/11/2008 पर्यंत अंतीम हप्ता देय होता पण अर्जदार यांनी 17 हप्त्याची रक्कम रु.26,928/- रोख व आठ मासिक हप्ते धनादेशद्वारे रु.12,672/- असे एकुण रु.39,600/- कर्जाच्या परतफेड म्हणुन जमा केलेली आहे. संपुर्ण रक्कम रु.47,619.53 द्यावयाचे आहे. अर्जदारास गैरअर्जदार यांनी दिलेले कर्जापोटी व्याजासह रु.47,619.53 एवढी रक्कम अदा न केल्यामुळे गैरअर्जदार यांनी दि.14/02/2009 कायदेशिर नोटीस दिली. त्याप्रमाणे धनोदश दिलेले न वटल्या गेल्यामुळे व चेक बाऊंन्स झाल्यामुळे रु.13,447/- एवढी रक्कम अर्जदाराकाडुन येणे बाकी आहे. रु.1,584/- मासिक हप्ता याप्रमाणे दहा महिन्याचा तपसिल अर्जदाराने दिला आहे. तरी गैरअर्जदारास 17 हप्त्याची रक्कम प्राप्त झाली व आठ हप्ते धनादेशाद्वारे प्राप्त झाले असुन अर्जदाराकडे एकुण चार मासिक हप्ते अधिक लेट प्रोसेंसिंग चार्जेस व चेक बाऊसिंग चार्जेस येणे बाकी आहे म्हणुन अर्जदाराची तक्रार खोटी असुन आज तागायत अर्जदाराकडुन रु.13,447/- व व्याज येणे बाकी आहे. अर्जदाराची तक्रार खोटी असुन ती खर्चासह खारीज करावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 3 हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दिले नाही म्हणुन त्यांच्या विरुध्द नो से आदेश करुन प्रकरण पुढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात चार मासिक हप्ते जे गैरअर्जदार यांनी दि.14/02/2009 रोजी अर्जदार यांना नोटीस पाठवुन त्यापोटी रु.13,447/- ची मागणी केलेली आहे. अर्जदार यांनी आपण पुर्ण हप्ते भरल्याचे म्हटले आहे त्यापोटी अर्जदाराने त्यांचे खाते असलेले बँक म्हणजे गैरअर्जदार क्र. 3 यांचे पास यांचे पासबुक दाखल केलेले आहे व गैरअर्जदार क्र. 3 यांनी पण हेच पासबुक मुळ स्वरुपात दाखल केलेली आहे, याचे अवलोकन केले असता, चेक क्र.18901, 18902, 18903,18905, 18906, 18907,1 8908, 18909 तसेच 18881, 18882, 18884, त्यांचे खात्यातुन क्लिअर झाल्याचे दिसुन येते. अकरा चेक खात्यातुन क्लिअर झाल्याचे दिसुन येते. गैरअर्जदार क्र. 3 ने जे धनादेश वटणावळीचा तपशिल दिलेला आहे तो देखील याच अकरा चेक बाबतचा आहे, परंतु गैरअर्जदार क्र. 1 हे अमान्य करतात. अर्जदाराने आपल्या तक्रारीसोबत हप्त्याची रक्कम चेकने व जे काही चेक वापस आले त्याचेसाठी विलंब शुल्कासह सोळा पावत्या म्हणजे सोळा हप्त्याची रक्कम भरल्याबद्यलचा पुरावा दिलेला आहे. म्हणजे सोळा व अकरा एकुण सत्ताविस हप्त्याची रक्कम भरल्याचे सिध्द होते. एकुण 29 हप्ते भरावयाचे होते. याचा अर्थ अर्जदाराकडे दोन हप्ते शिल्लक राहीले असा होतो. अर्जदार म्हणतात पुर्ण हप्त्याची रक्कम भरली त्यास गैरअर्जदार क्र. 3 हेही दुजोरा देतात. परंतु गैरअर्जदारांच्या मते चार हप्त्याची रक्कम शिल्लक आहे. याबद्यल गैरअर्जदार क्र. 3 यांनी डि.डी. क्र.596812 द्वारे दि.05/01/2007 रोजी सेंच्युरिअन बॅक ऑफ पंजाब लि पुणे यांना या डि.डी.द्वारे रक्कम पाठविलेली आहे. रक्कमेत चेक क्र. 18905 व 18906 हे समाविष्ट आहेत म्हणुन त्या तारखेस फक्त दोन हप्ते शिल्लक राहीले आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी पाठविलेले डि.डी. गैरअर्जदार सेंच्युरिअन बँक ऑफ पंजाब यांना पत्र लिहुन डि.डी. क्र.596806 हे मिळालेच नाही असे म्हटले आहे. परंतु नंतर सेच्युरिअन बँकेचया नांवे असलेले रु.1,22,468/’ डि.डी. क्र. 596812 याद्वारे हे क्लिअर होते की, सेच्युरिअन बँकेने हे डि.डी.हरवले म्हणुन गैरअर्जदार क्र. 3 यांनी दुसरे डुप्लीकेट डी.डी. इश्यु केले आता सेच्युरिअन बॅक ही अस्तित्वात नाही ती एच.डी.एफ.सी. बँकेत विलीन झाली. सेच्युनिअन बँकेस एच.डी.एफ.सी बँकेने विकत घेतल्यामुळे आता सर्व जबाबदारी यांचेवरच येते म्हणजे गैरअर्जदार म्हणतात डि.डी. मिळाले नाही व पुरावा दिल्यानंतर त्यांनी हे दोन हप्त्याची रक्कम मिळाल्याचे मान्य केलेले आहे म्हणजे गैरअर्जदार हे काही गोष्टी लपवित आहेत, असे दिसुन येते. गैरअर्जदार यांच्या म्हणण्याप्रमाणे आठ चेक वटले त्याची रक्कम रु.12,672/- रोखीने रु.27,829/- भरले म्हणजे एकुण रु.40,501/- त्यांना मिळाले, 29 हप्त्याचे एकुण रक्कम रु.45,936/- होते त्यावर एसबीसी रुद्य4,130/- एलपीबी रुद्य4,566/- असे एकुण रु.54632/- पैकी रु.40,501/- मिळाले म्हणुन नोटीस पाठवुन रुद्य14,231/- ची त्यांनी मागणी केलेली आहे. युक्तीवादानंतर दोन हप्त्याची रक्कम प्रत्यक्ष शिल्लक राहीले यात गैरअर्जदार क्र.3 यांनी जे चेक क्लिअर झाले त्याबद्यलची यादी दिलेली आहे, खरे तर अर्जदार व गैरअर्जदार क्र. 3 यांच्या म्हणण्याप्रमाणे 29 चेकची रक्कम गैरअर्जदार यांना मिळाल्याचे दिसुन येते. परंतु गैरअर्जदार यांना दोन हप्ते मिळाले नाही, दिले असतील तर पुरावा मागातात याबद्यल चेक 18908 व 18909 हे दोन चेक गैरअर्जदार क्र. 3 यांचे मते डि.डी. क्र.596842 ने दिले आहे असे म्हणतात व त्यांनी दाखल केलेले स्वतःचे स्टेटमेंट समोर त्यांनी हा डि.डी पेंडीग आहे असे म्हटलेले आहे जर हा चेक पेंडींग असेल तर एमएसई बँक मुंबई त्यांना हा डि.डी. देण्यात आला होता त्याची बीसी किंवा तो क्लीअर झाल्याबद्यलचा पुरावा गैरअर्जदार क्र. 3 यांना देण्याचे आदेश केले असतांना एमएसई बँकेचे स्टेटमेंट ते दाखल करु शकले नाही. म्हणुन हे दोन हप्ते जे दोन चेक ( 1,584 x 2 = 3,168) पेंडींग असल्याचे दिसुन येते. यात अर्जदाराची कुठलीही जबाबदारी नाही व त्यांच्या खात्याला ही रक्कम नांवे पडली आहे. गैरअर्जदार क्र. 3 ही बँक असतांना बँकेचे रेकॉर्ड अपटुडेट पाहीजे. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 या तीघाजवळ कुठेही रेकॉर्ड बरोबर उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वांनी अर्जदार यांना विना कारण मानसिक त्रास दिलेला दिसतो. गैरअर्जदार क्र. 3 ने डि.डी दिला व तो क्लिअर झाला का नाही हा व्यवहार झाल्यानंतर गैरअर्जदार सांगु शकत नाही. खरे तर हे डि.डी क्लिअर झाले असले पाहीजे या डी.डी.मध्ये अजुन काही चेकची रक्कमा समाविष्ट होत्या. गैरअर्जदाराच्या मते हे दोन चेक अर्जदारापासुन त्यांना मिळाले नाही. गैरअर्जदार क्र. 3 यांनी हे स्वतःचे स्टेटमेंट देऊन यात स्वतःच अडकले आहेत. याद्वारे आम्हास असे निदर्शनास आले आहे की, गैरअर्जदाराच्या सेवेत हिशोब बरोबर न ठेवून व ते बरोबर न सांगुन व गैरअर्जदार क्र. 3 यांच्या बाबत दोन हप्त्याचे चेकचा पुरावा न देणे असे दोन त्रुटी आढळुन येतात. गैरअर्जदार क्र. 3 ने गैरअर्जदार क्र. 2 यांना पत्र लिहून वरील दोन चेकचा डि.डी.मिळाले का याबाबत विचारणा केली परंतु ते पत्र त्यांनी ते दाखल केले नाही तसेच गैरअर्जदार क्र. यांना वापस पाठवुन दिले, असे दिसते यात काही तरी गडबड आहे व ती सिध्द होत नाही. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते. 2. हा निकाल लागल्या पासुन 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र. 3 यांनी दोन हप्त्याची रक्कम रु.3,168/- त्यांनी नोटीस पाठविलेली तारीख दि.14/02/2009 पासुन 8 टक्के व्याजाने रक्कम मिळेपर्यंत गैरअर्जदार क्र. 1 यांना द्यावी. रक्कम मिळाले बरोबर ताबडतोब वाहनाचे आर.सी.बुक व आर.टी.ओ.च्या नांवाने नाहरकत प्रमाणपत्र अर्जदार यांना द्यावे. 3. अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासाबद्यल रु.3,000/- व दावा खर्च म्हणुन रु.2,000/- गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदारास द्यावे. 4. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांची दि.14/02/2009 ची नोटीस या आदेशाद्वारे रद्य करण्यात येते. 5. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक |