Maharashtra

Jalgaon

CC/08/1534

Laxman Sakharam Barhate - Complainant(s)

Versus

Mangaldeep Gramin co.op society - Opp.Party(s)

Adv.Chordiya

07 Oct 2009

ORDER

 
Complaint Case No. CC/08/1534
 
1. Laxman Sakharam Barhate
Tapat Kathora
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Mangaldeep Gramin co.op society
Khadke Tal.Bhusawal
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. B.D. Nerkar PRESIDENT
 HON'ABLE MR. C.M. Yeshirao Member
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                      निशाणी
 जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
                        तक्रार क्रमांक 1534/2008
                        तक्रार पंजीबध्‍द करण्‍यात आले तारीखः- 20/11/2008
                        सा.वा. यांना नोटीस लागल्‍याची तारीखः- 12.01.2009
                        तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 07/10/2009
1.     लक्ष्‍मण सखाराम ब-हाटे,
वय- 68 वर्षे,धंदा-रिटायर्ड,
2.                  सौ.सिंधु लक्ष्‍मण ब-हाटे,
2.वय- 60 वर्षे,धंदा-घरकाम,
2.दोन्‍ही रा.तपतकठोरा, पो.फुलगांव, ता.भुसावळ,
2.जि.जळगांव.                                ..........      तक्रारदार
2.
      विरुध्‍द
1.     मंगलदिप ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्‍था मर्यादीत,
खडके, ता.भुसावळ, जि.जळगांव.
(तर्फे व साठी नोटीस मॅनेजर यांचेवर बजाविण्‍यात यावी.)
2.    श्री.दत्‍तात्रय गोपाळ भोळे, चेअरमन,
रा.मु.पो.खडका, ता.भुसावळ, जि.जळगांव.
3.    श्री.दिलीप आत्‍माराम भोळे, संचालक,
रा.मु.पो.खडका, ता.भुसावळ, जि.जळगांव.
4.    श्री.मधुकर तुकाराम इंगळे, संचालक,
रा.मु.पो.खडके, ता.भुसावळ, जि.जळगांव.
5.    श्री.डिगंबर मुरलीधर महाजन, संचालक,
रा.मु.पो.खडके, ता.भुसावळ, जि.जळगांव.
6.    श्री.मनोहर रामा वाणी, संचालक,
रा.मु.पो.खडके, ता.भुसावळ, जि.जळगांव.
7.    श्री.प्रविण दयाराम भोळे, संचालक,
रा.मु.पो.खडके, ता.भुसावळ, जि.जळगांव.
8.    श्री.सुमंता सवाईराम चव्‍हाण, संचालक,
रा.मु.पो.खडके, ता.भुसावळ, जि.जळगांव.
9.    श्री.अनिल मुरलीधर भिरुड, संचालक,
रा.मु.पो.खडके, ता.भुसावळ, जि.जळगांव.
10.   श्री.अर्जुन किटकुल सपकाळे, संचालक,
रा.मु.पो.खडके, ता.भुसावळ, जि.जळगांव.
11.    श्री.संतोष मधुकर सरोदे, संचालक,
रा.मु.पो.खडके, ता.भुसावळ, जि.जळगांव.
12.   सौ.लता विष्‍णू भोळे, संचालीका,
रा.मु.पो.खडके, ता.भुसावळ, जि.जळगांव.
13.   श्री.गिरीष आनंदा बोंडे, संचालक,
रा.मु.पो.खडके, ता.भुसावळ, जि.जळगांव.
14.   श्री.अनिल चिंधु वारके, व्‍हा.चेअरमन,
मु.पो.खडका, ता.भुसावळ, जि.जळगांव.           ..........      सामनेवाला
 
 
                        न्‍यायमंच पदाधिकारीः- 
                        श्री. बी.डी.नेरकर                       अध्‍यक्ष.
                        अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव           सदस्‍य.
                        अंतिम आदेश
                   ( निकाल दिनांकः 07/10/2009)
(निकाल कथन न्‍याय मंच अध्‍यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून   )
 
                  तक्रारदार तर्फे  श्री.अमित जी.चोरडीया वकील हजर
                  सामनेवाला क्रं. 1 ते 7, 10,13 व 14 तर्फे
श्री.धिरेंद्र रामभजन पाल वकील हजर.
      सामनेवाला क्र. 8,9,11,व 12 एकतर्फा.
 
                        सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्‍तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
                        1.         सामनेवाला ही महाराष्‍ट्र को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी अक्‍ट 1960 चे कायद्यान्‍वये स्‍थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्‍था आहे.    वेगवेगळया प्रकारच्‍या ठेवी स्विकारणे, त्‍यावर व्‍याजदेणे, कर्ज वाटप करणे इत्‍यादी सामनेवाला या पतसंस्‍थेचे कार्य आहेत.   तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्‍थेत पुढील प्रमाणे रक्‍कम गुंतविलेल्‍या आहेत, मुदत ठेवी तपासल्‍या असता त्‍याचा तपशील पुढील प्रमाणेः-
           

अ.क्र.
पावती /खाते क्रमांक
 ठेव दिनांक
रक्‍कम रुपये
देय तारीख
1
4422
-
6,876/-
02/05/2007
2
4423
-
31,105/-
09/05/2007
3
बचत खाते क्र.2/93
-
18,135/-
-
4
आवर्तक खाते क्र.12/33
-
10,400/-
-
5
आवर्तक खाते क्र.7
-
5,500/-
-
6
आवर्तक खाते क्र.30
-
5,600/-
-
7
3239
-
18,971/-
31/01/2007
8
3240
-
14,384/-
31/01/2007
9
3241
-
24,474/-
31/01/2007
10
4408
-
3,648/-
28/01/2007
11
2506
30/08/2006
1,252/-
30/08/2007     
12
2513
30/10/2006
2,500/-
30/10/2007
13
2518
04/01/2007
2,431/-
16/12/2007
14
2523
12/01/2007
3,000/-
12/01/2008
15
2160
-
3,412/-
31/01/2007
16
2511
16/10/2006
14,000/-
16/10/2008

 
                  तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्‍या मुदत ठेव पावतीची मुदत संपलेली असल्‍याने व तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्‍याने, तक्रारदार हे त्‍यांची मुदत ठेवीची रक्‍कम  व बचत तसेच आवर्तक खात्‍यातील शिल्‍लक रक्‍कमेची सामनेवाला यांचेकडे व्‍याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्‍तरे देऊन व पैसे देण्‍यास टाळाटाळ करुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे ठेवीची रक्‍कम तसेच बचत खात्‍यातील रक्‍कम देण्‍यास नकार दिलेला आहे.  त्‍यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्‍हणून तक्रारदार  यांनी त्‍यांच्‍या मुदत ठेवीची रक्‍कम व्‍याजासह परत मिळणेकामी तसेच त्‍यांना झालेल्‍या त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्‍द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.       
            2.    सदरची तक्रार पंजीबध्‍द करण्‍यात आल्‍यानंतर, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्‍यात आल्‍या.   सामनेवाला क्र. 1 ते 7, 10,13 व 14 हे वकीलामार्फत हजर झाले व त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे प्रस्‍तुतकामी दाखल केलेले आहे. सामनेवाला क्रं. 8,9,11,व 12 हे मंचाची नोटीस मिळुनही प्रस्‍तुत प्रकरणी हजर झालेले नसल्‍याने सामनेवाला क्रं. 8,9,11,व 12 विरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आले.  
            3.    सामनेवाला क्र. 13 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे.   तक्रारदाराचा तक्रार अर्ज खोटा, बनावट व बेकायदेशीर असुन तो तक्रारदारास मान्‍य नाही.    सामनेवाला संस्‍थेत सामनेवाला क्र. 13 हे मॅनेजर म्‍हणुन नौकरीस होते त्‍यामुळे त्‍यांना निर्णय घेण्‍याचे अधिकार नव्‍हते.   सामनेवाला क्र. 13 हे संस्‍थेचे संचालक म्‍हणुन कधीही राहीलेले नाहीत.    तक्रारदाराने हेतुपुरस्‍सर त्रास देण्‍याचे हेतुने या कामी सामील केलेले असल्‍याने तक्रारीतुन सामनेवाला क्र. 13 चे नांव कमी करण्‍यात यावे व नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती सामनेवाला क्र. 13 यांनी केली आहे.
            4.    सामनेवाला क्र. 1 ते 7, 10 व 14 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली असुन तक्रारदाराचे तक्रारीतील म्‍हणणे साफ खोटे असुन लबाडीचे व बेकायदेशीर आहे.   विविध व्‍यक्‍तींचे नांवे ठेवीच्‍या रककमेची तक्रार या मंचासमोर चालु शकणार नाही.   मुदत ठेव पावत्‍यावर सामनेवाला यांच्‍या सहया नाहीत.   महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम,1960 अन्‍वये संस्‍था नोंदणीकृत असल्‍याने महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम 1960 चे कलम 163 व कलम 164 ची बाधा येते.   तक्रार दाखल करणेपुर्वी तक्रारदाराने मा.निबंधक यांची परवानगी घेतलेली नाही.   तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे कधीही रक्‍कमेची मागणी केलेली नाही.    सामनेवाला संस्‍थेने वाटप केलेल्‍या कर्ज रक्‍कमेच्‍या वसुलीच्‍या प्रमाणांत संस्‍था सहकार खात्‍याच्‍या नियंत्रणाखाली ठेवीदाराच्‍या रक्‍कमा परत करीत आहे.   सामनेवाला पतसंस्‍थेत जशी जशी रक्‍कम वसुल होईल तशी तशी रक्‍कम ठेवीदारांना परत करेल.   सर्व ठेवीदारांची रक्‍कम एकदम परत करणे कोणत्‍याही पतसंस्‍थेस किंवा बँकेस शक्‍य नाही.    सबब तक्रारदाराची तक्रार सामनेवाला क्र. 1 ते 7, 10 व 14 विरुध्‍द खर्चासह रद्य करण्‍यात यावी अशी विनंती सामनेवाला क्र. 1 ते 7, 10 व 14 यांनी केली आहे.
            5.  तक्रारदार यांची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे याचे अवलोकन केले असता व  उभयंतांचा युक्‍तीवाद ऐकला असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
            1.     सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्‍य ती सेवा न
                  देऊन आपल्‍या सेवेत कसूर केला आहे काय       ?     ...... होय
 
      म्‍हणून आदेश काय                 अंतिम आदेशाप्रमाणे
निष्‍कर्षाची कारणेः-
             6.  मुद्या क्रमांक 1   सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्‍यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्‍थेत रक्‍कम  गुंतवणूक  केलेल्‍या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्‍यानंतर किंवा मुदत संपण्‍याआधी ठेवीदाराने सदरील रक्‍कमेची मागणी केल्‍यास ग्राहकांना त्‍यांच्‍या ठेवीच्‍या रक्‍कमा त्‍यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे हा ग्राहकाचा वाद आहे. सदरील मुदत ठेवीची रक्‍कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्‍याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्‍यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्‍कम आपल्‍या फायद्याकरीता मुद्याम स्‍वतःकडे ठेऊन घेतली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यास नाईलाजास्‍तव सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहेतसेच सदरील तक्रार दाखल केल्‍यानंतर व तक्रारदार यांनी तक्रारीत त्‍यांचे शपथपत्र दाखल केल्‍यानंतरही सदरील रक्‍कम तक्रारदार यास परत न करुन सामनेवाला यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन आपल्‍या सेवेत कसूर केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्‍हणून तक्रारदार हा सामनेवाला यांचेकडून त्‍यांची ठेव रक्‍कम व्‍याजासह परत मागणेस व नुकसान भरपाईची रक्‍कम मागणेस हक्‍कदार आहे. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
                        आ    दे    श 
            ( अ )       तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
            ( ब )       सामनेवाला क्रं. 1 ते 14 यांना असे निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यांची  उपरोक्‍त आदेश कलम 1 मध्‍ये नमुद मुदत ठेव पावत्‍या मॅच्‍युअर्ड झालेल्‍या असल्‍याने त्‍यावरील मुदती अंती देय असलेल्‍या रक्‍कमा त्‍या त्‍या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्‍यापासून ) एकत्रित रक्‍कमेवर द.सा.द.शे. 5 टक्‍के व्‍याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
            तसेच सामनेवाला क्र. 1 ते 14 यांना असे निर्देशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदाराचे बचत खाते क्र.2/93, आवर्तक खाते अनुक्रमे क्र.12/33, 7 व 30 यामध्‍ये जमा असलेली रक्‍कम त्‍या त्‍या खात्‍यावरील प्रचलित व्‍याजदरानुसार तक्रारदारास अदा करावी.
                     ( क )       सामनेवाला क्रं. 1 ते 14 यांना असेही  निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास झालेल्‍या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्‍हणून देण्‍यात यावे.
             ( ड )      सामनेवाला क्रं. 1 ते 14 यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी   रक्‍कम रुपये 1000/-   देण्‍यात यावे. 
            ( इ )             सामनेवाला क्रं. 1 ते 14 यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी वरील सर्व रक्‍कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या आत द्याव्‍यात अन्‍यथा वरील सर्व एकत्रित रक्‍कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे . 6 टक्‍के व्‍याजासह संपूर्ण रक्‍कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
            ( ई )       सदरील तक्रारीच्‍या आदेशाची पुर्तता मुदतीत न केल्‍यास सामनेवाला क्रं. 1 ते 14 हे ग्राहक संरक्षण कायदा 1986चे कलम 25 व 27 प्रमाणे कार्यवाहीस पात्र ठरतील.  
            ( फ )       उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्‍क्‍याची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  गा 
दिनांकः- 07/10/2009
                              (श्री.चंद्रकांत मोहन येशीराव )         ( श्री.बी.डी.नेरकर )
                            सदस्‍य                       अध्‍यक्ष 
                                         जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव
 
 
[HON'ABLE MR. B.D. Nerkar]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. C.M. Yeshirao]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.