जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/20. प्रकरण दाखल तारीख - 18/01/2010 प्रकरण निकाल तारीख – 22/07/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. 1. ईश्वर पि. गुणाजी सोनवळे वय 44 वर्षे, धंदा शेती 2. श्रीमती पार्वतीबाई भ्र. ईश्वर सोनवळे वय 41 वर्ष, धंदा घरकाम रा.देवूळगांव पो.बेरळी ता.लोहा जि.नांदेड अर्जदार विरुध्द. 1. मूख्य व्यवस्थापक, लाईफलाईन लाईफ केअर सर्व्हीसेस प्रा.लि. मुख्य कार्यालय, 3 रेनबा हाऊस सवेदी रोड, अहमदनगर. 2. व्यवस्थापक ओरिएंटल इन्शूरन्स कंपनी लि. गैरअर्जदार शाखा कार्यालय, शिवम चेबर्स, दूसरा मजला झोपडी कॅन्टीन समोर, सावेदी रोड, अहमदनगर. 3. व्यवस्थापक, ओरिएंटल इन्शूरन्स कंपनी लि. शाखा संत गूरुकृपा मार्केट, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.शकूंतला वडगावंकर गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे वकील - अड.शामराज राहेरकर. गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकिल - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सूवर्णा देशमूख, सदस्या) अर्जदार क्र.1 व 2 यांनी ही तक्रार मयत गुणाजी यांचे जनता वैयक्तीक अपघात पॉलिसी ओरिएनटल इन्शूरन्स कंपनी अहमदनगर यांनी मंजूर न केल्यामूळे दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, मयत गूणाजी यांचा मृत्यू दि.01.06.2008 रोजी झालेला होता. अर्जदार क्र.1 हे वडील असून अर्जदार क्र.2 ही आई आहे. दि.02.02.2007 ते 01.02.2012 पर्यत गूणाजी ईश्वर सोनवळे यांची जनता वैयक्तीक अपघात पॉलिसी ही ओरिएन्टल इन्शूरन्स कंपनी द्वारा लाईफ लाईन केअर सर्व्हीसेस प्रा.लि. यांचेकडे काढलेली होती. त्यांचा पॉलिसी नंबर 59775/1839 असा आहे. मयत गूणाजी हा जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स जोशी मठ, मल्हारी रोड, जिल्हा चमोली उत्तराखंड येथे दि.6.6.2008 पासून ड्रायव्हर म्हणून नौकरीस होता. अर्जदाराच्या घरातील तो कमविता एकटाच मूलगा असून पूर्ण कूटूंब त्यांचेवर अवलंबून होते. अपघाताचे वेळी त्यांचे वय 22 वर्ष होते. दि.01.06.2009 रोजी मयत गूणाजी डयूटीवर असताना ट्रक चालवत होता त्यावेळेस जोशी मठ येथे ट्रक खडडयात पडल्यामूळे पलटी होऊन अंगावर पडला व त्यामध्येच गूणाजी हा जागेवर मरण पावला. सदरचा अपघात हा पॉलिसी कालावधीमध्ये झालेला असून गैरअर्जदार हे पॉलिसी रक्कम देण्यास बांधील आहेत. म्हणून अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे क्लेम फॉर्म दि.09.0.6.2009रोजी दिलेला आहे. तरी देखील आजपर्यत गैरअर्जदार यांनी अर्जदारास क्लेम रक्कम दिली नाही. अर्जदाराने सूरुवातीस फक्त गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना दाव्यातील गैरअर्जदार म्हणून तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अर्जदाराने तक्रारीमध्ये सूधारणा करुन सूधारीत दावा दाखल केला. मूख्य व्यवस्थापक लाईफ लाईन केअर सर्व्हीसेस प्रा.लि. अहमदनगर यांना दि.18.03.2010 ला गैरअर्जदार क्र.1 केले. अर्जदाराने शपथपञ दाखल केले आहे व इतर कागदपञ दाखल केले. तसेच पॉलिसीची प्रत दाखल केली. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे मयत गूणाजी हे केंद्र सरकारचे खात्यात नौकरीत होते व घटनेच्या दिवशी दि.01.0.6.2009 रोजी अपघातात मरण पावले. अर्जदारास देण्यास आलेल्या पॉलिसीतील Exclusion Clause नुसार जर विमाधारकाचा मृत्यू सैन्यात काम करीत असताना अपघाताने मृत्यू झाला तर कंपनी कूठलीही नुकसान भरपाई देणे लागत नाही. म्हणून अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदार विरुध्द खर्चासह खारीज करावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी शपथपञ दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनीही शपथपञ दाखल केले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञे तपासली असता खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय ? होय. 2. अर्जदार यांनी मागणी केलेली विमा रक्कम देण्यास गैरअर्जदार हे बांधील आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे पॉलिसी काढली होती या बददल उभयपक्षात वाद नसल्यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत हा मूददा स्पष्ट होतो. म्हणून मूददा क्र.1 हिचे उत्तर सकारात्मक देण्यात आले. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांचे मूलाचा मृत्यू दि.01.06.2009 रोजी झालेला आहे व पॉलिसी कालावधी हा दि.0.2.02.2007 ते 01.02.2012 पर्यत आहे. त्या मूळे सदरील घटना ही पॉलिसी कालावधी मध्ये झालेली आहे हे स्पष्ट होते. अर्जदार यांची पॉलिसी आहे या बददल ही गैरअर्जदार यांना आक्षेप नाही. गैरअर्जदार यांनी आपले लेखी म्हणण्यात व शपथपञात असे कथन केले आहे की, विमाधारकाचा मृत्यू हा सैन्यात काम करीत असताना अपघाताने मृत्यू झाला तर कंपनी काही देणे लागत नाही. The Policy does not cover death, injury, disablement resulting from service on duty with armed force. म्हणून गैरअर्जदार कंपनीने अर्जदाराचा दावा फेटाळला व त्यांस योग्य कारण आहे. पॉलिसीचे नियम व अटी गैरअर्जदार यांनी दाखल केलेले आहेत. त्यामध्ये Exclusion Clause मध्ये असे दिलेले आहे की, Service on duty with armed force यानुसार अर्जदारास पॉलिसी रक्कम देता येत नाही असे गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे. यावर अर्जदार यांचे वकिलांनी असा यूक्तीवाद केला आहे की, मयत गूणाजी हा ट्रक घेऊन जात होता हा ट्रक जरी आर्मफोर्स चा असला तरी त्यामध्ये कोणतेही यूध्दासाठी शस्ञाअस्ञे नव्हती. त्यामूळे हा यूध्दावर जात होता असा निष्कर्ष काढता येत नाही. तो मिलटरी मध्ये ट्रक ड्रायव्हर म्हणूनच नौकरीस लागलेला होता. त्यामूळे कार्यालयाचा कोणताही ट्रक नेणे ही त्यांची डयूटी होती. अपघाताचे वेळी मयत गूणाजी चालवित असलेला ट्रक हा रिकामा होता. त्यामूळे गैरअर्जदार यांनी दाखवलेले Exclusion Clause या अंतर्गत अपघात येत नाही म्हणून मयत गूणाजी ची नूकसान भरपाईची विमा रक्कम देण्यास गैरअर्जदार बांधीत आहेत. आजपर्यत मयत गूणाजी यांनी दाखल केलेला विमा दावा रक्कमेचा गैरअर्जदार यांनी कोणताही विचार न केल्यामूळे अर्जदारास दावा दाखल पुरावा लागला म्हणून त्यांस रु.50,000/- व मानसिक,शारीरिक ञास व इतर खर्च या बददल रु.50,000/- 12 टक्के व्याजाने मागितलेले आहे. दि.01.06.2009 रोजी मयत गूणाजी यांचा मृत्यू झाला व त्यानंतर लगेच दि09.06.2009 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे क्लेम फॉर्म भरुन दिला. पूर्ण एक वर्ष गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा क्लेम सेटल केला नाही. ही एक प्रकारे सेवेतील ञूटीच आहे. या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. म्हणून अर्जदारास विमा पॉलिसीची रक्कम रु.50,000/- व त्यावर 9 टक्के व्याज दि.09.08.2009पासून एक महिन्याचे आंत गैरअर्जदार यांनी दयावे, असे न केल्यास संपूर्ण रक्कमेवर एक महिन्यानंतर 12 टक्के व्याज रक्कम फिटेपर्यत गैरअर्जदार यांनी अर्जदारास दयावे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून एक महिन्याचे आंत अर्जदार यांना विमा रक्कम रु.50,000/- व त्यावर दि.09.08.2009 पासून 9 टक्के व्याज दयावे, असे न केल्यास रु.50,000/- वर एक महिन्यानंतर 12 टक्के व्याज पूर्ण रक्कम फिटेपर्यत गैरअर्जदार यांनी अर्जदारास दयावेत. 3. मानसिक ञास व दावा खर्च म्हणून रु.3000/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास एक महिन्याचे आंत दयावेत. 4. उभयपक्षाना नीर्णय कळविण्यात यावा. 4. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जयंत पारवेकर लघूलेखक |