जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/10. प्रकरण दाखल तारीख - 05/01/2010 प्रकरण निकाल तारीख – 28/04/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, - सदस्या. विठठल मनोप्पा शेटटी वय 41 वर्षे, धंदा हॉटल सध्या बेकार, अर्जदार रा.जानकी/ वसंत नगर, ता.जि. नांदेड. विरुध्द. 1. व्यवस्थापक गैरअर्जदार नॅशनल इन्शोरन्स कंपनी लि. मंडळ कार्यालय श्री गुरु गोविंदसिंद्य माकेंट नगिना घाट रोड, नांदेड. 2. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा एम.जी. रोड, सराफा होळी नांदेड. 3. मनोहर पि. रामनारायण तोतला रा.चैतन्य, घर क्र.2-11-610, डॉ.एन. भास्करची लेन, वजिराबाद नांदेड 4. सौ.सुजाता भ्र.विठठल शेटटी, रा.जानकी/वसंत नगर, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.उदय पा.ठाकूर गैरअर्जदार 1 तर्फे वकील - अड.जी.एस.औढेकर गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकील - अड.शंकतूला वडगावकंर गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील - अड.एस.व्ही.राहेरकर गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील - अड.एन.डी.चौधरी निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार नॅशनल इन्शूरन्स कंपनी यांनी सेवेत ञूटी दिली म्हणून अर्जदारानी मागितलेली नूकसान भरपाई रु.16,02,500/- 12 टक्के व्याजासह त्यांना मिळाले पाहिजे होते ते दिले नाही तसेच मानसिक ञासाबददल रु.20,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- देण्याचे आदेश व्हावेत म्हणून ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांची दूर्गाभवानी हॉटेल यातील जागेत असणारे बांधकाम, फर्निचर, साहित्य व ग्राहकांच्या सोईसाठी लागणारे साहित्य, मनोरंजन साहित्य व खाण्यापिण्याच्या वस्तू, किचन मधील मशीन्स,ए.सी.रम्स, कूलर,टी व्ही, टेबल खूर्च्या नवीन रुमचे बांधकाम इत्यादीच्या सूरक्षेसाठी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून रु.20,00,000/- चा विमा नंबर 310000052 व 7500000224 घेतलेल आहे. त्यांचा कालावधी दि.22.08.2008 ते 21.08.2009आहे. यात हॉटेलचे बांधकामा बाबत रु.6,00,000/- प्लांट व मशिनरी बददल रु.6,00,000/- तसेच हॉटेलमधील सूभोशित वस्तू बददल रु.5,00,000/- व स्टॉक बददल रु.3,00,000/- असा विमा घेतलेला आहे. हॉटेल सर्व सूवीधायूक्त असल्याकारणाने त्यांना व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत होते. परंतु दि.26.05.2009 रोजी राञी 10.20 ते 10.45 च्या दरम्यान हॉटेल ला मोठी आग लागली. अर्जदाराने ताबडतोब हॉटेलवर आले व लगेच अग्नीशामक दल व पोलिस स्टेशन भाग्यनगर यांना सूचना दिली परंतु मदत येईपर्यंत हॉटेल मध्ये गॅस टाकीचे स्फोट होऊन हॉटेलची भिंत व पत्रे सर्व साहीत्य उडाले व नष्ट झाले. आतील फर्नीचर जळुन खाक झाले. दि.27/05/2009 रोजी गैरअर्जदाराला या बाबतची सुचना दिली. पोलिस स्टेशन भाग्यनगर येऊन पंचनामा केला. गैरअर्जदार क्र. 3 यांनी गैरअर्जदार क्र. 1 च अधिकारी महणुन पाहणी केली आणि विद्युत निरीक्षक यांनी देखील पंचनामा करुन आपला अहवाल दिला. त्यात रात्री इलेक्ट्रीक शॉर्ट सकीटने आग लागली व हॉटेल जळुन खाक झाले. अर्जदाराने प्रिटेड अर्जावर नुकसानची यादी एकुण किंमत रु.24,72,540/- झालेचे म्हटले. गैरअर्जदार क्र. 3 ला सर्व्हेअर म्हणुन नेमले. अर्जदाराने दाखल केलेल्या सर्व कागदपत्राची मागणी करुन पुर्ण बील मान्य केले आहे. गैरअर्जदार क्र. 3 यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये रु.23,20,011/- गैरअर्जदार क्र. 1 व 3 ने मान्य करुन सुध्दा फर्निचरबद्यल रु.3,99,451/- मंजुर करुन बाकीची नुकसान भरपाई अर्जदारास देण्यास नकार दिला. अर्जदारास अंतीम नुकसान भरपाईबद्यल रु.3,97,500/- व बाकीचे नंतर मिळतील असे दीशाभुल करुन त्यांच्याकडे असलेल्या सर्व कागदपत्रावर अर्जदाराचे सहया घेऊन तेवढया रक्कमेचा धनादेश परस्पर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सराफा यांना गैरअर्जदार क्र. 1 ने दिला आहे. अर्जदाराने बराच पाठपुराव करुन गैरअर्जदाराने पुर्ण रक्कम दिली नाही म्हणुन दि.18/11/2009 रोजी वकीला मार्फत कायदेशिर नोटीस पाठवून रक्कमेची मागणी केली म्हणुन ही तक्रार नोंदविली आहे. गैरअर्जदार क्र. 1 हे वकीला मार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार खोटी आहे त्यांना दाखल करण्यास लोकस स्टण्डी नाही. गैरअर्जदारास हे मान्य नाही की, अर्जदाराच्या हिंगोली गेटला प्लॉट आहे व त्यावर हॉटेल बांधकाम आहे. इंशुरन्स गैरअर्जदारांना मान्य आहे. अर्जदाराचे रु.24,72,540/- नुकसान झाले हे गैरअर्जदारांना मान्य नाही. गैरअर्जदारांनी सर्व्हेअर नेमला व जाय मोक्यावर जाउन नुकसानीचा जायजा घेतला त्यांच्या असेसमेंट प्रमाणे रु.3,97,500/- चे नुकसान झाले आहे. यानंतर अर्जदाराने रु.3,97,500/- स्विकारलेले आहेत परंतु यांनतर अजुन काही रककम देउ असे अशवासन दिलेले नाही. दि.31/08/2009 रोजी गैरअर्जदारांनी त्यांचे क्लेम सेटल केले आहे. व अर्जदाराने रक्कमही उचललेली आहे. ते फुल अण्ड फायनल म्हणुन अर्जदाराने ते स्विकारुन व्हाउचरवर सही केलेली आहे. त्यांमुळे त्यांना अधिकची रक्कम मागता येणार नाही. अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी असे म्हटले आहे. गैरअर्जदारक क्र. 2 हे वकीना मार्फत हजर झाले आहे व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेली आहे. अर्जदाराने स्वतःची मिळकत नसतांना त्यांच्या पत्नीच्या नांवाने असलेली मिळकत व गॅरंटी म्हणुन करारावर गहाणखत करुन कर्ज स्वतःच्या नांवाने घेतलेले आहे. प्रत्यक्ष ज्या मिळकतीवर व गॅरंटीवर गैरअर्जदारांन कर्ज दिले ती मिळकत कर्ज देते वेळेस गैरअर्जदार क्र. 4 यांच्या नांवावर होती. अर्जदाराची तक्रार व मागणी दाव्याशी काही संबंध नाही. अर्जदाराच्या नांवे जी विमा रककम दिली गेली ती अर्जदाराच्या नांवे त्यांच्या खात्यावर जमा करुन घेतलेली आहे. बाकी नुकसान भरपाई अजुन द्यावी हे गैरअर्जदार क्र. 1 यांच्या अधिकारात आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 कडुन कर्ज घेतलेले असल्याने त्या कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे व विम्याची रक्कम मिळत असले तर ती गैरअर्जदार क्र. 2 यांच्या खात्यात जमा होईल. विमा कंपनीकडुन मिळाणारी रक्कम परस्पर उचलुन घेणे हा हेतु अर्जदाराचा आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन रु.20,00,000/- चा विमा घेतलेला आहे व गैरअर्जदारांकडुन रु.14,50,000/- चे कर्ज घेतलेले आहे त्या कर्जाची परतफेड करणे अर्जदारास बंधनकारक राहील बाकी मजकुराशी त्यांचा काही संबंध नाही. म्हणुन अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 3 हे सर्व्हेअर आहेत त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केलेला आहे. विमा घेतलेल्या जागेमध्ये आग लागली याबाबत त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 कडे दावा दाखल केलेला आहे. विमा कंपनीने नुकसानीचा अहवाल देण्यासाठी गैरअर्जदाराची नेमणुक केलेली आहे. गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, नुकसान झाले तर त्याचा अंदाज बांधणे कामी तज्ञ व्यक्ति आहेत व त्यांच्याकडे योग्य ती शैक्षणीक पात्रता आहे. त्यांनी कोणतीही सेवेत कमतरता केली नाही. गैरअर्जदार यांचे काम कायदा व चौकटीत राहुन केलेले आहे. गैरअर्जदाराने घटनास्थळाला भेट दिली व पाहणी केली पुढील कार्यवाहीसाठी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे अहवाल दिला. एखादया सर्व्हेअरने दिलेला रिपोर्ट इंशुरन्स कंपनीने स्विकारावा अथवा नाही हा नीर्णय त्यांचेवर अवलंबुन आहे. जाब देणारे त्यांचे प्रत्यक्ष पाहणी प्रमाणे व उपलब्ध कागदपत्रावरुन या नीर्णयाप्रत आले आहेत की, पॉलिसीच्या नियमा अंतर्गत अर्जदाराचे रु.3,99,459/- चे नुकसान झालेले आहे ते बरोबर आहे. या बरोबर सर्व्हे रिपोर्ट दाखल केलेला आहे. अर्जदार पुन्हा पुन्हा जाब देणार याच्या विरुध्द बिनबुडाचे आरोप करीत आहेत. अर्जदाराने खोटी फिर्याद दाखल केली म्हणुन ही तक्रार दंडासहीत फेटाळण्यात यावे. गैरअर्जदार क्र. 4 यांनी आपले म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराचे हॉटेल दि.26/05/2009 रोजी जळुन खाक झाले म्हणुन तेंव्हा पासुन हॉटेल बंद आहे व दि.21/02/2010 ला हॉटेल पुर्ववत सुरु केले. गैरअर्जदार यांनी स्वतः अर्जदारा सोबत जाऊन गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे कागदपत्रावर अर्जदाराचे नांव जामीनदार म्हणुन दिलेले आहे. हॉटेलचा व्यवसाय म्हणजे विमा काढणे अर्जदारास गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडुन पुर्ण नुकसान भरपई मिळाली तरीही त्यांची पुर्ण संमती राहील. पॉलिसी घेतांना यांनतर घटनेपर्यंत त्यांनी तोंडी व लेखी आक्षेप न घेता बांधकामाबाबत काहीही म्हटलेले नव्हते. आता ही बाब समोर आणत आहेत म्हणजे अर्जदाराची दीशाभुल करुन नुकसान भरपाई देण्यास नकार देत आहेत. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे, दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील अनूचित प्रकार अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. अर्जदार किती रक्कम मिळण्यास पात्र आहे ? 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदाराने पॉलिसी क्र. नंबर 310000052 व 7500000224 दाखल केलेले आहेत. गैरअर्जदा यांना पॉलिसी मान्य आहे त्याबद्यल वाद नाही. पॉलिसी देतांना हॉटेल बिल्डींगबद्यल रु.6,00,000/-, आतील फर्नीचर याबद्यल रु.6,00,000/-, डेकोरेशनबद्यल रु.5,00,000/- व स्टाकबद्यल रु.3,00,000/- असे एकुण रु.20,00,000/- पॉलिसी घेतलेली आहे. दि.26/05/2009 रोजीच्या रात्री त्यांच्या दुर्गा हॉटेलला आग लागुन सर्व जळून खाक झाले याची सुचना गैरअर्जदार क्र. 1 ला दिलयाबद्यल अर्ज व आग लागल्याबद्यलचे फायरस्टेशन ऑफिसरचे प्रमाणपत्र याप्रकरणात दाखल असुन दि.27/05/2009 राजी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व कागदपत्र प्रकरणांत दाखल आहेत. आगीचे कारण शोधण्यासाठी विद्युत निरीक्षक यांनी जाउन पाहणी केली असता, दुकानातील मेन स्विचची इंनकमींग वायर वुडनसिलींग वरुन घेतले होते सदरील वायरवर जोड होते जोड दिलेल्या भागाची इन्शुलेशन खराब होऊन फेज व न्युट्रल एकत्रित स्पर्शीले गेले व शॉर्ट सर्कीट होऊन ठीणग्या वुडून सिलींगवर पडल्या व सिलींगने पेट घेतला व सर्व साहीत्य जळुन गेले. शॉर्ट सर्कीटने आग लागली म्हणजे अपघाताने आग लागली या सर्व बाबीबद्यल गैरअर्जदारांचा आक्षेप नाही. गैरअर्जदार क्र. 2 ने अर्जदारास रु.5,00,000/- व जवळपास रु.14,50,000/- कर्ज दिलेले आहे व यासाठी त्या हॉटेलची बिल्डींग फर्नीचर मशीनरी हे सर्व त्यांचेकडे गहाण करुन ठेवलेले आहे व विमा देखील गैरअर्जदार क्र. 2 यांनीच काढलेला आहे. त्यामुळे विम्याची रक्कम जी काही मिळेल ती गैरअर्जदार क्र. 2 च्या कर्ज खात्यावर जाईल. अर्जदारांनी बिल्डींगची व्हॅल्यूयेशन बद्यल इंजिनिअरचे प्रमाणपत्र बँकेचे लोन घेतल्याबद्यलचे प्रमाणपत्र तसेच ट्रेडींग अकाऊंट व स्टेटमेंट दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र. 1 ने नुकसानीमधील काही रक्कम दि.31/08/2009 रोजी हॉटेल दुर्गा भवानी बँक आफ महाराष्ट्र यांचे नांवाने दिलेले आहे ती रक्कम रु.3,97,500/- अर्जदाराने फुल अण्ड फायनल सेटलमेंट म्हणुन स्विकारलेले आहे असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. परंतु याबाबत गैरअर्जदारांनी फुल अण्ड फायनलची पावती (वॉऊचर साईन) दाखल केलेले नाही. म्हणुन नुकसान हे जास्त झालेले आहे व रक्कम ही कमी दिल्या गेलेली आहे. अर्जदाराने त्यावेळेसच परिस्थिती व मजबुरी यात ही रक्कम ही रक्कम स्विकारलेली आहे कारण त्यांना तातडीची मदत हवी होती त्यामुळे ही रककम अंडर प्रोटेस्ट स्विकारलेली आहे असा त्याचा अर्थ होईल. सर्व्हेअरने त्यांच्या रिपोर्टमधे स्टॉकची व्हॅल्यु रु.88,981/- घेतलेली आहे. प्लँट व मशीनरीबद्यल रु.1,76,490/- फर्नीचरबद्यल रु.2,37,600/- या दोन्हीबद्यल क्रॉस असेसमेंट रु.3,82,090/- व त्यातुन डिप्रेसिएशन कमीकरुन रु.3,43,881/- यातुन सॉलवेज कमी करुन रक्कम रु. 3,20,000/- धरलेली आहे. एकुण लायब्लीटी रु.3,99,451/- धरलेली आहे, एवढी रककम त्यांना मिळाली पाहीजे. सर्व्हेअर हा जायमोक्यावर जाऊन सर्व्हे करणारा पहीला अधिकारी असतो त्यांनीच काय नुकसान झाले हे बारकाईने पाहीले असते, सर्व्हेअर हा गर्व्हमेंटतर्फे पाठविलेला अधिकारी आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांच्याशी त्याचा संबंध नसतो त्यामुळे सर्व्हे जो तयार होतो त्याल अधीक महत्व दिले जाते. अर्जदार यांनी सर्व्हे रिपोर्ट चॅलेंज केला नाही किंवा त्यात काय चूक आहे, हे सांगितले नाही तेव्हा सर्व्हेअरला पार्टी करण्याची गरज नव्हती. बांधकाम व बील्डींगबद्यल सर्व्हेअरने एकुण नुकसान रु.2,72,250/- ठरविलेले आहे. यात 75 टक्के डॅमेज झाल्याचे म्हटले आहे म्हणजे रु.2,04,000/-, डिप्रेशीएन म्हणुन रु.20,400/- कमी केलेले आहे असे एकुण रु.1,83,600/- सॉलवेज हे रु.73,600/- कमी करुन नेट लायब्लीटी रु.1,10,000/- झालेली आहे. यात भिंतीबद्यल रु.29,000/- ही जबाबदारी रु.1,39,000/- ची येते. त्याची नेट लायब्लीटी रु.1,17,499/- होते ही असेसमेंट केलेले आहे. ही रक्कम गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदाराला दिलेले नाही. अर्जदारास पुर्ण रक्कम द्यावी ही रक्कम न देण्याचे कारण हॉटेलची बिल्डींग ही अर्जदाराची पत्नी सुजाता यांच्या नांवावर आहे. अर्जदारांना पॉलिसी देतांना या गोष्टीची खातरजमा गैरअर्जदाराने केली नाही व आम्ही गुडफेथवर ही पॉलिसी दिली असे म्हटले आहे. एखादया प्रॉप्रर्टीचा विमा घ्यायचा असेल तर ती जागा जो विमा घेतो त्यांच्या नावावर आहे किंवा नाही याची खात्री करुन घेतली पाहीजे उदा. एखादया कारचे इंशुरन्स करायचे असेल तर गैरअर्जदार हे त्या वाहनाची पुर्ण तपासणी करुन आर.सी.बुकवर त्यांचे नांव व बील त्याचे नांववर आहे किंवा नाही याची खात्री करुनच त्या वाहनाचा विमा देतात तसेच एखादा प्रॉपर्टीचा विमा घ्यायचा असेल तर ती प्रॉपर्टी त्याच्या नांवावर आहे किंवा नाही हे पाहणे त्याचे काम आहे. एकदा पॉलिसी दिली व त्याचा प्रिमीयम त्यांनी स्विकारला की गैरअर्जदारावर त्यांनी स्विकारलेली जबाबदारी आलीच. विमा बँकेने काढलेला आहे व बँकेमधे ही सर्व कागदपत्र आहेत यात बँकेने अर्जदाराच्या नांवे कर्ज मंजुरी दिली असली तरी त्याच्या पत्नीची बिल्डींग ही ग्राहय धरुन त्यांना लोन दिलेले आहे. जामीनदार म्हणुन त्यांची पत्नी आहे. हिंदु एकत्रित कायदा या प्रमाणे पती व पत्नीच्या नांवे असलेली प्रापर्टी ही त्यांचे मालक एकच असल्याचे म्हटले आहे. बॅकेने कर्ज दिलेले आहे त्याबद्यल विमा कंपनीने विमा देऊन नुकसान भरपाईची जबाबदारी स्विकारली असल्या कारणाने व विमा देण्याचे आधि गैरअर्जदार क्र. 1 ने याची शहानीशा करुन घेतली नसती तर ती त्यांची चुक आहे. एकदा विमा पॉलिसी दिली आता गैरअर्जदार क्र. 1 हे त्यांचे जबाबदारातुन मुक्त होऊ शकत नाही. म्हणुन बिल्डींगबद्यल रक्कम रु.1,39,000/-यातून डिप्रशियशन जाता नेट रु.1,17,499/- हि रक्कम मिळण्यास अर्जदार पात्र आहे. रक्कम रु.1,17,499/- एवढी रक्कम मिळण्यास अर्जदार पात्र आहे. येथे सर्व्हेअरने सर्व्हे रिपोर्टमध्ये टोटल व्हॅल्यु रु.6,60,000/- + रु.5,00,00/- = रु.7,10,000/- असे म्हटलेले आहे. बाकी डेकोरेशन, प्लॅन मशीनरी व स्टॉकबद्यल सर्व्हेअरने असेसमेंट केलेली रक्कम ही बरोबर आहे व अर्जदाराने ती घेतलेली आहे. म्हणुन त्याबद्यल आता काही म्हणावयाचे नाही. वरील रक्कम गैरअर्जदारांनी न देऊन सेवेत ञूटी केलेली आहे. सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत आहोत. आदेश
1. अर्जदाराचा तक्रारअर्ज मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदाराने हा निकाल लागल्या पासुन 30 दिवसांचे आंत रु.1,17,499/- अर्जदार यांना द्यावेत. 3. मानसिक त्रासाबद्यल रु.15,000/- दावा खर्च रु.2,000/- द्यावेत. 4. निकालचे प्रती पक्षकारांना देण्यात यावेत. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक.
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] PRESIDING MEMBER | |