::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 06/04/2015 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आपल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदाराने दि. 21/1/12 रोजी हिरो होंडा कंपनीची टु व्हिलर गाडी रक्कम रु. 54,751/- ला गैरअर्जदार क्रं. 2 चे मार्फत गैरअर्जदार क्रं. 3 कडून खरेदी केली आहे. तसेच गैरअर्जदार क्रं. 1 यांचे कडे सदर गाडीचा इन्शुरन्स काढलेला होता. सदर गाडीचा इंजिन नं. एच ए 10 इ. डी. बी. जी. एम. 64616 असून सदर गाडीचे तात्पुरते रजिस्ट्रेशन गैरअर्जदार क्रं. 4 कडे दि. 24/1/12 रोजी झालेले आहे व सदर तात्पुरते रजि.चे प्रमाणपञ गैरअर्जदार क्रं. 4 यांनी अर्जदाराला दिले परंतु मूळ स्वरुपातील रजि. सर्टिफिकेट अर्जदाराला दिल्या गेलेले नाही.
2. अर्जदाराने पुढे कथन केले कि, 25/1/12 रोजी सदर गाडीला अचानक आग लागून गाडी पूर्णपणे जळून गाडीचे नुकसान झाले. अर्जदाराने त्यासंदर्भातला रिपोर्ट पोलिस स्टेशन राजुरा येथे दिला होता व त्या नंतर सदर गाडीच्या विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरीता गैरअर्जदार क्रं. 1 कडे आवश्यक सर्व कागदपञासह प्रस्ताव दिला होता व गैरअर्जदार क्रं. 2 व 3 यांना फोन व्दारे माहीती दिली होती.
3. अर्जदाराने पुढे कथन केले कि, गैरअर्जदार क्रं. 3 यांनी अर्जदाराला विमा क्लेम क्रं. 000526780 असा दिला होता. परंतु गैरअर्जदाराने विमा क्लेम दिला नाही म्हणून अर्जदाराने दि. 8/12/12 व 22/12/12 रोजी पञ देवून विमा क्लेम देण्याची मागणी केली व सदर पञाची प्रत गैरअर्जदार क्रं. 2 यांना सुध्दा दिलेली आहे. परंतु गैरअर्जदार यांनी त्यावर काहीच कार्यवाही केली नाही. गैरअर्जदार क्रं. 1 यांनी अर्जदाराला विमा क्लेम देणें आवश्यक आहे परंतु तो न दिल्याने अर्जदाराने मंचासमक्ष सदर तक्रार दाखल करुन गैरअर्जदार क्रं. 1 यांनी विमा क्लेम म्हणून त्या स्वरुपाची नविन गाडी दयावी किंवा गाडीची रक्कम रु. 54,751/- दि. 21/1/12 पासून 18 टक्के व्याजासह तसेच तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी रक्क्म रु. 1,00,000/- व तक्रारीचा खर्च 10,000/- गैरअर्जदार क्रं. 1 ते 4 कडून संयुक्तपणे अथवा वेगवेगळे पणे अर्जदारास देण्याचा आदेश व्हावे अशी मागणी केली आहे.
4. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदार क्रं. 1 ते 4 विरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रं. 1, 2 व 4 हजर होवून यांनी अनुक्रमे नि. क्रं. 22, 18, व 13 वर आपले लेखी उत्तर दाखल केले.
5. गैरअर्जदार क्रं. 1 ने आपल्या लेखीउत्तरात कथन केले कि, अर्जदाराच्या सदर गाडीचा इन्शुरन्स गैरअर्जदार क्रं. 1 कडून काढला होता तसेच अर्जदाराने सदर गाडी गैरअर्जदार क्रं. 2 च्या मार्फत गैरअर्जदार क्रं. 3 कडून खरेदी केली होती व सदर गाडीचे तात्पुरते रजि. गैरअर्जदार क्रं. 4 कडे झाले होते. तसेच पुढे कथन केले कि, दि. 25/1/12 रोजी गाडीला आग लागुन गाडी पूर्णपणे जळाल्याने गाडीचे नुकसान झाले त्याबाबत अर्जदाराने पोलिस स्टेशन राजुरा येथे रिपोर्ट दिला होता व अर्जदाराने सर्व कागदपञासह जळालेल्या गाडीची विमा रक्कम मिळण्याकरीता प्रस्ताव गैरअर्जदार क्रं. 1 यांचेकडे प्रस्ताव दिला होता व गैरअर्जदार क्रं. 2 व 3 यांना फोन व्दारे माहीती दिली होती. तसेच त्यानंतर गैरअर्जदार क्रं. 1 यांनी अर्जदारास 000526780 असा विमा क्लेम क्रं. दिला होता. तसेच अर्जदाराने गाडीचे विमा क्लेम मिळण्याचे प्रस्तावाबाबत आवश्यक ते सर्व कागदपञ गैरअर्जदार क्रं. 1 कडे पाठविले होते याबाबत वाद नाही. परंतु गैरअर्जदार क्रं. 1 ने नाकबुल केले आहे कि, ते अर्जदाराला विमा क्लेम देण्यास टाळाटाळ व विलंब करीत आहे व पुढे नमुद केले कि, गैरअर्जदार क्रं. 1 यांनी अर्जदारास सेवेत कुठलीही न्युनता दिली नाही. गैरअर्जदार क्रं. 1 आजही नुकसान भरपाईची रक्कम देण्यास तयार आहे. अर्जदाराने खोटी व बनावटी तक्रार केल्याने अर्जदाराचा अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
6. गैरअर्जदार क्रं. 2 ने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत लावले सर्व आरोप हे खोटे असून ते नाकबुल केले आहे. तसेच गैरअर्जदार क्रं. 2 ने नमुद केले कि, अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 2 ला गाडी जळाल्याबाबत फोन किंवा पञव्यवहार केला नाही तसेच अर्जदाराचा क्लेम गैरअर्जदार क्रं. 2 विरुध्द नाही. गैरअर्जदार क्रं. 2 ने पुढे कथन केले कि, गैरअर्जदार क्रं. 2 ने अर्जदाराला कोणताही मानसीक, शारिरीक ञास दिला नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 2 विरुध्द खोटी व बनावटी तक्रार दाखल केली असल्याने अर्जदाराचा अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा अशी विनंती केली आहे.
7. गैरअर्जदार क्रं. 3 यांना नि. क्रं. 6 क नुसार नोटीस प्राप्त होवून सुध्दा ते मंचासमक्ष हजर न झाल्याने दि. 13/3/14 रोजी नि. क्रं. 1 वर गैरअर्जदार क्रं. 3 विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
8. गैरअर्जदार क्रं. 4 ने आपले लेखीउत्तर प्राथमिक आक्षेपासह दाखल केले व त्यांनी आपल्या लेखीउत्तरात प्राथमिक आक्षेपात नमुद केले कि, अर्जदाराने उप प्रादेशिक अधिकारी चंद्रपूर यांचे कार्यालयात सदर गाडीची नोंदणी करण्याकरीता गैरअर्जदार क्रं. 4 यांचे कार्यालयात तात्पुरता नोंदणी प्रमाणपञाकरीता अर्ज केला व शासकिय शुल्क अदा केले. गैरअर्जदार क्रं. 4 यांचे कार्यालयाने आपले कार्य करतांना मोटार वाहन कायदा 1988 चे अंतर्गत अर्जदाराला कोणतीही सेवा दिली नाही. गैरअर्जदार क्रं. 4 हा सदर कायदयातील नियमांचे पालन करणारा अंमल अधिकारी आहे. गैरअर्जदार क्रं. 4 हे ग्रा. सं. कायदयाच्या कोणत्याही तरतुदी खाली सेवा देत नाही म्हणून अर्जदार हा गैरअर्जदार क्रं. 4 चा ग्राहक होत नाही. त्यामुळें अर्जदार गैरअर्जदार क्रं. 4 कडून कोणतीही नुकसान भरपाईची रक्कम घेण्यास हक्कदार नाही. तेव्हा अर्जदारावर खर्च लादुन सदर तक्रार खारीज करण्यात यावी.
9. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदार क्रं. 1, 2 व 4 चे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1)
आहे काय ? होय.
(2) गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 ने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? होय.
(3) आदेश काय ? अंतीम आदेशा प्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
9. अर्जदाराने दि. 21/1/12 रोजी हिरो होंडा कंपनीची टु व्हिलर गाडी रु. 54,751/- ला गैरअर्जदार क्रं. 2 चे मार्फत गैरअर्जदार क्रं. 3 कडून खरेदी केली आहे. तसेच गैरअर्जदार क्रं. 1 यांचे कडे सदर गाडीचा इन्शुरन्स काढला त्या संदर्भात अर्जदाराने नि.क्रं 5 वर दस्त क्रं अ(1) पावती अ(2), अ(6) फॉर्म व अ(7) वर पॉलिसी दाखल केली आहे तसेच सदर बाब ही उभय पक्षांना मान्य असल्याने अर्जदार हा गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांचा ग्राहक आहे असे सिध्द होत असल्याने मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
10. अर्जदाराची तक्रार तसेच गैरअर्जदार क्रं. 1, 2 व 4 ने दाखल केलेले लेखीउत्तर व दस्ताऐवजांची पडताळणी करता असे निर्देशनास आले कि, अर्जदाराने सदर गाडीचा इन्शुरन्स गैरअर्जदार क्रं. 1 कडून काढला होता तसेच अर्जदाराने सदर गाडी गैरअर्जदार क्रं. 2 च्या मार्फत गैरअर्जदार क्रं. 3 कडून खरेदी केली होती व सदर गाडीचे तात्पुरते रजि. गैरअर्जदार क्रं. 4 कडे झाले होते. दि. 25/1/12 रोजी गाडीला आग लागुन गाडीचे नुकसान झाले. व अर्जदाराने सर्व कागदपञासह जळालेल्या गाडीची विमा रक्कम मिळण्याकरीता गैरअर्जदार क्रं. 1 यांचेकडे प्रस्ताव दिला होता व गैरअर्जदार क्रं. 2 व 3 यांना फोन व्दारे माहीती दिली होती. तसेच अर्जदाराने त्यानंतर गैरअर्जदारांना लेखीपञ पाठविले हेाते.अर्जदाराने आपल्या तक्रारीतील कथनापुष्ठयर्थ नि.क्रं 5 वर दस्त क्रं अ(1) ते अ(19) दस्तावेज दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्रं. 1 यांनी अर्जदारास 000526780 असा विमा क्लेम क्रं. दिला होता. याबाबत अर्जदार व गैरअर्जदार क्रं. 1 यांच्यामध्ये वाद नाही. तसेच गैरअर्जदार क्रं. 1 ने आपल्या लेखीउत्तरात परि. क्रं. 4 मध्ये नमुद केले कि, ‘’ यात काही वाद नाही कि, अर्जदाराने गाडीचे विमा क्लेम मिळण्याचे प्रस्तावासोबत आवश्यक ते सर्व कागदपञ गैरअर्जदार क्रं. 1 कडे पाठविले होते.” परंतु गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदारास, अर्जदाराने सदर गाडीचे आवश्यक कागदपञ प्रस्तावासोबत गैरअर्जदार क्रं. 1 कडे देवूनही गै.क्रं 1 ने अर्जदारास परत दस्तावेजांची मागणी करून विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केली व आज पर्यंन्त सदर गाडीच्या विमा दाव्याची रक्कम दिलेली नाही. गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदारास विमा दाव्याची रक्कम दिली नाही. तसेच गैरअर्जदार क्रं. 2 व 3 ने अर्जदारास विमा दाव्याची रक्कम मिळवुण देण्यास सहकार्य केले नाही व हीच गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांनी अर्जदाराप्रति दिलेली सेवा ही न्युनतापूर्ण सेवा आहे असे सिध्द हेात आहे असे या मंचाचे मत असल्याने सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
11. अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 4 यांच्या मध्ये इंजिन नं एच ए 10 इ.डी.बी.जि.एम 64616 असलेल्या गाडीचा विमा संबंधी कोणताही व्यवहार झालेला नसल्याने गैरअर्जदार क्रं. 4 विरुध्द कोणताही आदेश नाही. सबब मुद्दा क्रं. 1 ते 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदार क्रं. 1 यांनी अर्जदारास विमा दाव्याची रक्कम रु. 45,078/-
आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत दयावी.
(3) गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांनी अर्जदाराला झालेल्या शारीरिक व मानसिक
ञासापोटी रु. 10,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत
वैयक्तिक किंवा सुयंक्तीकरित्या दयावी.
(4) गै.क्रं 4 च्या विरूध्द कोणताही आदेश पारित करण्यात येत नाही.
(5) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
(6) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 06/04/2015