जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/12 प्रकरण दाखल तारीख - 06/01/2010 प्रकरण निकाल तारीख – 22/10/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. सौ.देवकीबाई भ्र.यादवराव नेम्मानीवार वय 58 वर्षे, धंदा घरकाम वार्ड क्रमांक-8, वेलमापूरा,किनवट अर्जदार तर्फे सर्वाधिकार पञधारक यादवराव मुकूंदराव नेम्मानीवार रा.किनवट ता.किनवट जि.नांदेड. विरुध्द. 1. व्यवस्थापक, श्री.साई शिवा इण्डेन इण्डेन गॅस वितरक गैरअर्जदार गोकुदा रोड.किनवट ता.किनवट जि.नांदेड 2. चिफ एरिया मॅनेजर, इंडियन ऑईल कार्पोरेशन, जि.रामदास पेठ,नागपूर. 3. सहायक प्रबंधक, इंडियन ऑईल, कार्पोरेशन जि.यवतमाळ. अर्जदारा तर्फे वकील - स्वतः. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार यांचे सेवेच्या ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, कंपनीचे नियमावली व करारातील अटीप्रमाणे श्री साई शिवा इण्डेनच्या नांवाने ग्राहकाचे बुकींग करण्यासाठी, इंन्टीमेशन लेटर न देता श्री साई इंटरप्राईज हया बोगस नांवाने रु.1000/- अग्रीम स्विकारुन, तसेच 15 दिवस उशिरा श्री साईशिवा इण्डेनच्या नांवाने इन्टीमेशन लेटर दिले आहे. सदर इन्टीमेंशन पञात पुर्वी स्विकारलेले अग्रीम रक्कमेचा उल्लेख न करता नवीन कनेक्शन सेवेसाठी परत पुर्ण रक्कमेची मागणी केली आहे. नवीन कनेक्शन सेवेसाठी ग्राहकाला रु.4000/- अतिरिक्त पेमेंट करण्यासाठी जबरदस्ती करणे, न दिल्यास 60 दिवसानंतर बुकिंग लॅप्स झाल्यांचे सांगत आहेत. गॅस सिलेंडर डिपॉझीट,सेक्यूरिटी डिपॉझीट, इन्स्टालेशन चार्जेस, गॅस कार्ड, हॉटपॉट इत्यादीचे चार्जेस पेमेंट केल्यावरह परत मागणी करतात, तसेच त्याशिवाय नवीन कनेक्शन सेवेची नोंद घेत नाहीत.अर्जदार हे नगर परीषद किनवट क्षेञातील घर क्रमांक 9-157 चे मालक आहेत. दि..2.1.2009 रोजी रु.1000/- गैरअर्जदार यांचेकडे डिपॉझीट म्हणून जमा केले. रक्कम भरल्यावर इन्टीमेशन लेटर दि.17.1.2009 रोजी पाठविण्यात आले. दि.17.3.2009 रोजी मूलास रु.50/-चा बॉड, आयकार्ड व उर्वरित रक्कमेसह पाठविले असता मॅनेजर यांने 60दिवस मुदत संपल्याचे सांगून नविन कनेक्शन सेवेसाठीचे व रु.860/- स्विकारण्यास व पावती देण्यास इन्कार केलेला आहे. सदर अतिरिक्त रु.4000/- पेमेट करण्याची तयारी दर्शवूनही पावतीची मागणी केली असता रक्कम घेण्यास इन्कार केलेला आहे.दि.22.4.2009 रोजी नागूपर कार्यालयला नोटीस संदर्भाने खूलाशाची मागणी करुन दूसरे इन्टीमेशन लेटर देण्याची विनंती केली. तसेच गैरअर्जदार क्र.1 हे नविन कनेक्शन अतिरिक्त रक्कमेची मागणी करीत आहेत, अशी तक्रार केली.सदर इन्टीमेंशन पञाचे प्रत अवलोकनसाठी सोबत जोडलेली आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी गैरअर्जदार क्र.1 व 3 यांना आदेशीत करुन नवीन कनेक्शन सेवा देण्यास आदेशीत केले आहे ते पञ सोबत जोडले आहे. परंतु अग्रीम रक्कम व अतिरीक्त चार्जेस देणे बंधन कारक आहे किंवा कसे या बाबतीत काहीच नमूद केलेले नाही. सदर गॅस एजन्सी मध्ये इलेक्ट्रीकल अप्लायंसेस ठेवण्याचे व विकण्याची करारात तरतूद नाही. किनवट येथे 5000 नवीन कनेक्शन धारकाकडून प्रत्येकी रु.4000/- प्रमाणे मागील पाच वर्षात 5000 x 4000 = रु.2,00,00,000/- अवैध पणे जमा केले असल्याचे लक्षात येते. यावरही एरिया चिफ मॅनेजर व वीभागीय सेल्स ऑफिसर आय.ओ.सी. यांने कोणतीच कारवाई न केल्याने त्यांच्या विरुध्द संशय बळावतो. तसेच लोकांना माहीत होऊ नये म्हणून दरपञक लावलेला नाही. म्हणून अर्जदाराने तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, अर्जदारास नविन गॅस कनेक्शन आय.ओ.सी. धोरणाप्रमाणे निश्चित दरात वितरीत करण्यास गैरअर्जदारांना आदेश करावेत, तसेच मानसिक ञासापोटी प्रत्येकी रु.10,000/- प्रमाणे कूटूंबातील पाच व्यक्तीना मिळावेत तसेच दावा खर्च म्हणून रु,5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 ते 3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.अर्जदाराने वारंवार स्वतःचा उल्लेख अपीलकार असा केलेला आहे.अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये कोणताही पूर्णत्वास गेलेला करार झालेला नाही. तसेच सेवा पुरवीणारे आणि ग्राहक असे नातेही झालेले नाही. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत असे तक्रारीत कूठेही नमूद नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे कोणतीही रक्कम जमा केलेली नाही. ज्या पावतीचा उल्लेख केलेला आहे ती श्री साई इंटरप्राईजेस या संस्थेची आहे सदर प्रकरण हे सदर संस्थेविरुध्द दाखल करण्यात आलेले नाही. सदर प्रकरण दाखल करणारी एक व्यक्ती आहे पण अर्जदााने पाच व्यक्तीसाठी नूकसान भरपाई मागितली आहे. हे म्हणणे चूकीचे व खोटे आहे, दि.2.1.2009 रोजी रु.1000/- डिपॉझीट करण्यात आले. गैरअर्जदाराने कोणतीही साई इंटरप्रायजेस नांवाची बोगस पावती दिलेली नाही. अर्जदाराचा अर्ज हा गैरसमजूतीवर आधारित आहे. हे म्हणणे खोटे आहे की, रु.860/- स्विकारण्यास व पावती देण्यास इन्कार केला. दि.13.1.2009 रोजी 114236400001007 अन्वये बूंकीग केल्या गेली व पञ दि.17.1.2009 रोजी पाठविण्यात आले ज्यांची वैधता 60 दिवसात संपते म्हणजे ती वैधता दि.16.3.2009 रोजी संपली होती व कालावधीनंतर बुकींग रदद होते.रक्कम न भरता कनेक्शन मागणी करणे चूकीचे आहे. तक्रारीमध्ये तथ्य असल्यास चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आदेशीत करण्यात आलेले होते.शेगडी खरेदी करणे मॅडेटरी नसल्याचे म्हटलेले आहे या बाबत वाद नाही परंतु गॅस वितरण एजन्सीमध्ये इलेक्ट्रीकल अप्लायंसेस ठेवण्याची व विकण्याची करारात तरतूद नाही हे म्हणणे खोटे आहे.गैरअर्जदार यांनी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही. दरपञक लावलेले नाही हे म्हणणे खोटे आहे. कारण गैरअर्जदार क्र.1 यांचे दूकानात सिंलेंडरची किंमत व सर्व संबंधीत अधिका-यांची नांवे व पत्ता लावलेला आहे.अर्जदाराचे पती यांनी यापूर्वी किनवट शहरातील विवीध बाबी बाबत माहीतीचा अधिकार 2005 अन्वये विवीध अर्ज करुन अनेक सरकारी अधिका-यांना जेरीस आणलेले आहे. तसाच प्रयत्न गैरअर्जदार यांचे सोबत केलेला आहे. अर्जदारास तक्रारीचे निरसन करण्यासाठी दि.26.8.2009रोजी बोलावले होते परंतु अर्जदार तेथे आले नाहीत.अर्जदाराने गॅस कनेक्शनसाठी केवळ अर्ज दिलेला होता. अर्जदाराने स्वतःस गॅस जोडणी घेऊन ग्राहक या संज्ञेस पाञ करुन घेतलेले नाही म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय,अंशतः 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे घरगूती गॅस बूकींगसाठी अग्रीम रु.1,000/- भरले व त्याबददलची पावती साई इंटरप्रायजेस या नांवाने दिली. ही चूकीची पावती आहे. प्रत्येक नवीन कनेक्शनसाठी त्यांनी रु.4000/- जास्तीचे मागितले असे आपल्या तक्रारीत म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी यांस आक्षेप घेत ती पावतीच त्यांची नाही त्यामूळे ते त्यांचे ग्राहकच होऊ शकत नाही असा उजर घेतला आहे. साई इंटरप्रायजेसची पावती पाहीली असता त्यावरील पत्ता व फोन नंबर हा गैरअर्जदार क्र.1 यांचाच आहे असे अर्जदार म्हणतात व गैरअर्जदार यांस नकार देतात. अशी साई इंटरप्रायजेसच्या पावत्या अजून काही ग्राहकांना दिल्या गेल्या व अशा दिलेल्या पावत्याच्या अनुषंगाने त्या ग्राहकाला गॅस कनेक्शन देण्यात आले अशा प्रकारचा पूरावा देऊन अर्जदाराने तें सिध्द केलेले नाही. त्यामूळे ही नक्की पावती कोणाची ? हे स्पष्ट होत नाही व अर्जदार ते सिध्द ही करु शकत नाहीत. परंतु या पावत्यास जोडूनच गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांना गॅस बूकींग सोंबत इन्टीमेंशन लेटर दिले व हया इन्टीमेंशनच्या द्वारे 60 दिवसांत बूकींग करण्यास सांगितले. 60 दिवसानंतर बूकींग लॅप्स होईल असेही सांगीतले. परंतु या इन्टीमेंशन लेटरच्या मध्ये अर्जदाराने दिलेले रु.1,000/- वजा केले नाही अशी त्यांची मूख्य तक्रार आहे. गॅसला लागणारी शेगडी ही अतिरिक्त घेण्यासाठी जबरदस्ती करणे व ग्राहकाकडून रु.4,000/- उकळणे असा उददेश गैरअर्जदार क्र.1 यांचा होता परंतु अर्जदाराने रु.4000/- अतिरिक्त मागितले या संबंधीचा कोणताही पूरावा किंवा साक्षीदार किंवा कोणाचे शपथपञ दाखल केलेले नाही. दि.17.1.2009 रोजी जे इन्टीमेंशन लेटर पाठविण्यात आलेले आहे त्याप्रमाणे एकूण रु.1860/- अर्जदारांना मागणी करण्यात आले व इन्टीमेंशन प्रमाणे फक्त एवढीच रक्कम मागितले हे सिध्द होते परंतु अतिरीक्त रु.4,000/- मागितल्याचे सिध्द होत नाही. परंतु या इन्टीमेशन लेटर द्वारे रु.1,000/- साई इंटरप्रायजेस चे गैरअर्जदार क्र.1 यांचेच आहेत असे जर गृहीत धरले तर ते रु.1,000/- या रक्कमेतून कमी करुन फक्त रु.860/- उर्वरित रक्कम घेऊन गॅसचे कनेक्शन दयायला पाहिजे होते. दि.17.3.2009 रोजीला अर्जदाराचा मूलगा रु.50/- चा बॉंड व उर्वरित रक्कम घेऊन गेला त्यावेळी मूदत संपली होती म्हणून ते स्विकारता येणार नाही असे गैरअर्जदाराने म्हटले आहे. यांस गैरअर्जदाराने नकार दिलेला आहे. एकंदरीत रु.1000/- च्या पावतीवरील टेलीफोन नंबर व पत्ता बघीतल्यास गैरअर्जदार क्र.1 यांचीच पावती आहे म्हणून अर्जदाराला तक्रार दाखल करता येते शिवाय इन्टीमेंशन लेटर जे दिलेले आहे त्यात ही रक्कम जरी भरली गेली नसली तरी गॅस कनेक्शन वीषयी त्यांची तक्रार आहे म्हणून अशा प्रकारची तक्रार अर्जदाराने ग्राहक म्हणून या तक्रार मंचात दाखल करता येते. इंडियन ऑईल कार्पोरेशन लि. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे नियमावलीप्रमाणे रु.1860/- ची रक्कम अर्जदारांना भरता येईल शेगडी घेण्यावीषयी किंवा अतिरीक्त त्यांना जबरदस्ती करता येणार नाही. एकंदर इन्टीमेंशन लेटर अर्जदारांना दोन वेळेस देण्यात आले परंतु त्यांनी ती रक्क्म भरली नाही तो कालावधी संपला. रक्क्म भरल्यानंतर अर्जदारांना वरील प्रमाणे तक्रार करता आली असती परंतु एकंदर या तक्रारीचे स्वरुप पाहिले असता अर्जदार यांनी गॅस कनेक्शन मिळण्यापेक्षा अतिरिक्त तक्रारी करण्यात जास्त रस होता असे दिसते. आजही त्यांचे यूक्तीवादावरुन असे वाटते की, त्यांना गॅस कनेक्शन मिळण्यापेक्षा गैरअर्जदार क्र.1 यांचे वितरकपद कसे रदद करता येईल या कारणासाठी जास्त रस आहे. अर्जदाराने जे जे मूददे येथे मांडले आहेत त्यात गॅस वितरकाने बोर्ड लावावयास हवा, त्यावर दर दयावेत, हे सर्व गैरअर्जदाराने आपल्या दूकानात केले असल्याबददल स्पष्ट केलेले आहे. अर्जदार यांना फक्त त्यांना गॅस मिळण्यापर्यतची तक्रार या मंचात देता येईल. त्यांना जर जनहीत याचिका दाखल करावयाची असेल तर त्यांनी उच्च न्यायालयात जावे लागेल, अर्जदाराने माहीतीच्या अधिकाराखाली जो पञव्यवहार केलेला आहे व अनेक लोकांची माहीती यात गोळा केली आहे. याशिवाय गैरअर्जदार क्र.1 यांचे प्रो. यांचे विरुध्द देखील अनेक प्रकारच्या माहीतीच्या अधिकाराखाली तक्रारी केलेल्या आहेत. यात त्यांनी केलेले बांधकाम व ते पाडण्यात यावे अशी ही तक्रार नगर पालिका यांचेकडे केलेली आहे. शिवाय गैरअर्जदार क्र.1 हे कशा प्रकारे भ्रष्ट्राचार करतात व कशी जास्तीची रक्कम उकळतात या संबंधी चौकशी व्हावी म्हणून गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेकडे तक्रारी केलेल्या आहेत. या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी गैरअर्जदार क्र.2 व 3 आले असताना त्यावेळी अर्जदार त्यांना भेटत नाहीत. म्हणून एकंदरसर्वाना ञास देणे व त्यांस जनहित याचिका म्हणणे असाच दिसतो. गैरअर्जदाराने नगर पालिका यांचेकडे या संबंधी तक्रार केल्या बददलचा पञव्यवहार या प्रकरणात दाखल केलेला आहे. गैरअर्जदार क्र.1 यांचे अनाधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी केली आहे. अजूनही अशा अनेक जणांच्या तक्रारी केल्यावीषयीच्या तक्रारी या प्रकरणात दाखल केलेल्या आहेत. याउलट गैरअर्जदार यांची एजन्सी व्यवस्थीत चालू आहे, आदीवासी भागत असली तरी ते योग्य प्रकारे सेवा देतात या बददल त्यांनी विलास गोणेवार शिवसेना शहर प्रमूख तसेच खासदार श्री.डी.बी.पाटील यांचे प्रशंसा पञ यात दाखल केलेले असून यात सिंलेडर सेवा देणे या एजन्सी कडून यांची कोणतीही तक्रार नाही असे म्हटले आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे गैरव्यवहार बददल कोणताही साक्षीदार किंवा पूरावा या तक्रारी सोबत दाखल केलेला नाही. याशिवाय किनवट शहरातील अनेक लोकांच्या विरुध्द अर्जदार यांचे मूखत्यार आम यांने अनेक तक्रारी केलेल्या आहेत. तेव्हा एकंदर केवळ उपद्रव निर्माण करणे व सर्वाना ञास देणे हा त्यामागचा उददेश असतो. अर्जदार यांनी केवळ आपल्याला गॅस कनेक्शन मिळावे इथपर्यतचीच तक्रार करावी किंवा मागणी करावी याशिवाय गैरअर्जदार क्र.1 यांचे गैरव्यवहार किंवा त्याचे दूकानाची अनियमितता या संबंधी त्यांची डिलरशिप या बाबतचा जो काही नीर्णय आहे तो गैरअर्जदार क्र.2 व 3 हे घेतील व त्यांना यात तथ्य आढळल्यास त्या दीशेने योग्य ती कारवाई करतील. न्याय मंचात त्यांनी गॅस मागण्याशिवाय इतर बाबीची त्यांचे मागणीचा विचार आम्ही करणार नाही. म्हणून अर्जदार यांनी भरलेला अग्रीम रक्कम रु.1,000/- ही गृहीत धरुन गैरअर्जदार क्र.1 यांनी गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेशी संपर्क करुन अर्जदार यांना परत एक इन्टीमेंशन लेटर दयावे व त्या इन्टीमेंशन लेटरची मागणी रक्कम रु.1860/- मधून रु.1,000/- वजा करुन उर्वरित रु.860/- स्विकारुन अर्जदाराचे नांवे नवीन गॅस कनेक्शन दयावे इतकाच काय तो मर्यादित आदेश आम्ही करीत आहोत.याशिवाय जास्तीत जास्त वितरकाशी निगडीत दर सूचक फलक व ग्राहकांना देण्यात येणारी सूवीधा तसेच नवीन गॅस कनेक्शनची किंमत ही आपल्या दूकानात बोर्डावर स्पष्ट लिहावी असे निर्देश देता येतील. प्रत्येकाच्या घरात दोन दोन कंपनीचे गॅस कनेक्शन असतात. आजपर्यत अर्जदार यांचे घरात स्वयपांक घर चालू आहे व चालूच असले पाहिजे त्यांचमूळे या गॅस कनेक्शनमूळे त्यांचे काही वैयक्तीक नूकसान झाले किंवा कूटूंबाचे नूकसान झाले म्हणून त्यांचे पाच व्यक्तीसाठीची नूकसान भरपाईची मागणी नामंजूर करण्यात येते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 यांनी आज पासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांचेकडून नवीन गॅस कनेक्शनसाठी रु.860/- स्विकारुन त्यांना गॅस कनेक्शन देण्यात यावे, याबददलची कागदपञ कारवाई गैरअर्जदार क्र.1 यांना नियमाप्रमाणे करुन घेता येईल. 3. मानसिक ञासाबददलची मागणी नामंजूर करण्यात येत आहे. 4. दावा खर्च दोन्ही पक्षकारांनी आपआपला सोसावा. 5. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे विरुध्द आदेश नाही. 6. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER | |