जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/23. प्रकरण दाखल तारीख - 29/01/2010 प्रकरण निकाल तारीख –14/06/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. हरमिदंरसिंघ पि.साहेबसिंघ पटवारी वय 36 वर्षे, धंदा व्यापार अर्जदार रा. गूरुद्वारा गेट नं.2 नांदेड विरुध्द. 1. मुख्य व्यवस्थाप, 1.रॉयल सूदंरम अलायंस इन्शूरन्स कंपनी लि.. 45 व 46 व्हाईट रोड, चेन्नई -600 014 2. रॉयल सूदंरम अलायंस इन्शूरन्स कंपनी लि.. मार्फत मॅनेजर/सिग्नेटरी ऑफिसर गैरअर्जदार ऑफिस 315, अरेंजां कॉर्नर, तिसरा माळा,प्लॉट नं.71, सेक्टर 17 वसई नवी मुंबई 400703 3. रॉयल सूदंरम अलायंस इन्शूरन्स कंपनी लि.. मार्फत शाखाधिकारी, आयकर भवन बाफना टी पॉईट, नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.भूरे बी.व्ही. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सूवर्णा देशमूख, सदस्या ) गैरअर्जदार रॉयल सूंदरम अलायंस इन्शूरन्स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, अर्जदार हे गूरुद्वारा नांदेड येथील रहीवासी असून व्यवसायाने जरी व्यापारी असले तरी त्यांचेवर त्यांचे व कूटूंबाचा उदरनिर्वाह चालतो असे त्यांनी आपल्या तक्रारी अर्जात स्पष्ट केलेले आहे. अर्जदाराने टाटा कंपनीचे ट्रक खरेदी करुन आरटीओ कार्यालय नांदेड येथे त्यांचे रजिस्ट्रेशन करुन त्यांचा नंबर एम.एच. 26/6505 असा घेतलेला आहे. अर्जदार हा त्या ट्रकचा मालक असल्या संदर्भात अर्जदाराने आर सी बूक मंचासमोर दाखल केलेले आहे. सदरील वाहनाचा विमा अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे उतरविलेला असून त्यांचा कालावधी दि.19.1.2009 ते 28.01.2010 असा आहे. अर्जदाराच्या ट्रकला दि.17.4.2009 रोजी अंजेगांव ते चंद्रपूर रोडवर एका ट्रकने ओव्हरटेक करुन समोर येऊन ब्रेक दाबल्यामूळे अर्जदाराचा ट्रक सदरील अज्ञात ट्रकवर आदळला व त्यात अर्जदाराचे ट्रकचे रु.1,34,030/- चे नूकसान झाले. या घटनेची माहीती अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीला दिली. त्यानंतर गैरअर्जदारानी सर्व्हेअर व लॉस असेंसर यांची नेमणूक केली. सर्व्हेअर व लॉस असेंसर यांनी घटनास्थळाची पाहणी करुन आपला अहवाल दिला व इतर कागदपञ गैरअर्जदार यांचेकडे जमा केले. त्यांचे सांगण्याप्रमाणे अर्जदारांनी सदरील वाहन दूरुस्तीसाठी देण्याची परवानगी मागितली. सदरील दूरुस्तीचे इस्टीमेंट गैरअर्जदार यांचेकडे दाखल करुन रक्कमेची मागणी केली पण गैरअर्जदार यांनी आजपर्यत अर्जदाराचा क्लेम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. दि.27.8.2009रोजी गैरअर्जदाराने रु.24,615/- चा चेक अर्जदारास दिला व त्यांचे सोबत एक पञ दिले. ज्यामध्ये सदरील रक्कम ही Interim settlement of above claim या हेडचे अंतर्गत दिली. अशा प्रकारचे पञ अर्जदाराने मंचासमोर दाखल केले आहे. तसेच रु.1950/- चा चेक देखील गैरअर्जदार यांने पोस्टाने पाठविला व अर्जदाराने तो चेक ठेऊन घेतला.त्यानंतर अर्जदाराने जाणीवपूर्वक क्लेमची मागणी केली तेव्हा त्यांना टाळाटाळ केली.शेवटी अर्जदाराने वकिलामार्फत दि.26.10.2009 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून नूकसान भरपाईची मागणी केली. नोटीस मिळून सूध्दा गैरअर्जदार यांनी आजपर्यत अर्जदारास क्लेम दिलेला नाही. यावरुन गैरअर्जदार यांचे कामाबददल दिरंगाई झाली ही गोष्ट अर्जदाराने स्पष्ट केले व गैरअर्जदार यांचे कृत्यामूळै अर्जदाराच्या व्यापारावर परीणाम झाल्यामूळे अर्जदारास मानसिक ञास झाला. म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदार यांनी रु.85,000/- नूकसान भरपाई व त्यावर 18 टक्के व्याज दि.17.4.2009 रोजी पासून रक्कम मिळावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांना अर्जदाराची तक्रार मान्य नाही. सर्व्हेअरने रेडीऐशन, इंटरकूलर व फॅन या बददल रक्क्म काढली ती जास्तीची काढलेली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दाव्याबददल रु.24,615/- फूल अन्ड फायनल सेंटलमेंट म्हणून दिलेले आहेत. तसेच अर्जदाराने सदर तक्रार ही अरबिट्रेटर कडे दाखल करावी असे म्हटले आहे. गैरअर्जदारयांनी नॅशनल कमीशनची सायटेशन देऊन अर्जदार यांची तक्रार फेटाळावी असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपञानुसार व दोन्ही पक्षकारांचा यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय ? होय 2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास ञूटीची सेवा दिली आहे काय ? होय 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार हे नांदेड येथील रहीवासी असून व्यवसायाने जरी व्यापारी असले तरी त्यांचेवर त्यांचे व कूटूंबाचा उदरनिर्वाह चालतो असे त्यांनी आपल्या तक्रारी अर्जात स्पष्ट केलेले आहे. अर्जदाराने टाटा कंपनीचे ट्रक खरेदी करुन आरटीओ कार्यालय नांदेड येथे त्यांचे रजिस्ट्रेशन करुन त्यांचा नंबर एम.एच. 26/6505 असा घेतलेला आहे. अर्जदार हा त्या ट्रकचा मालक असल्या संदर्भात अर्जदाराने आर सी बूक मंचासमोर दाखल केलेले आहे. सदरील वाहनाचा विमा अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे उतरविलेला असून त्यांचा कालावधी दि.19.1.2009 ते 28.01.2010 असा आहे. अर्जदाराच्या ट्रकला दि.17.4.2009 रोजी अंजेगांव ते चंद्रपूर रोडवर एका ट्रकने ओव्हरटेक करुन समोर येऊन ब्रेक दाबल्यामूळे अज्रदाराचा ट्रक सदरील अज्ञात ट्रकवर आदळला व त्यात अर्जदाराचे ट्रकचे रु.1,34,030/- चे नूकसान झाले. या घटनेची माहीती अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीला दिली. त्यानंतर गैरअर्जदारानी सर्व्हेअर व लॉस असेंसर यांची नेमणूक केली. सर्व्हेअर व लॉस असेंसर यांनी घटनास्थळाची पाहणी करुन आपला अहवाल दिला व इतर कागदपञ गैरअर्जदार यांचेकडे जमा केले. त्यांचे सांगण्याप्रमाणे अर्जदारांनी सदरील वाहन दूरुस्तीसाठी देण्याची परवानगी मागितली. सदरील दूरुस्तीचे इस्टीमेंट गैरअर्जदार यांचेकडे दाखल करुन रक्कमेची मागणी केली पण गैरअर्जदार यांनी आजपर्यत अर्जदाराचा क्लेम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. दि.27.8.2009रोजी गैरअर्जदाराने रु.24,615/- चा चेक अर्जदारास दिला व त्यांचे सोबत एक पञ दिले. ज्यामध्ये सदरील रक्कम ही Interim settlement of above claim या हेडचे अंतर्गत दिली. अशा प्रकारचे पञ अर्जदाराने मंचासमोर दाखल केले आहे. तसेच रु.1950/- चा चेक हदेखील गैरअर्जदार यांने पोस्टाने पाठविला व अर्जदाराने तो चेक ठेऊन घेतला.त्यानंतर अर्जदाराने जाणीवपूर्वक क्लेमची मागणी केली तेव्हा त्यांना टाळाटाळ केली.शेवटी अर्जदाराने वकिलामार्फत दि.26.10.2009 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून नूकसान भरपाईची मागणी केली. नोटीस मिळून सूध्दा गैरअर्जदार यांनी आजपर्यत अर्जदारास क्लेम दिलेला नाही. यावरुन गैरअर्जदार यांचे कामाबददल दिरंगाई झाली ही गोष्ट अर्जदाराने स्पष्ट केले व गैरअर्जदार यांचे कृत्यामूळै अर्जदाराच्या व्यापारावर परीणाम झाल्यामूळे अर्जदारास मानसिक ञास झाला. म्हणून अर्जदाराने गैरअर्जदार यांना रु.85,000/- नूकसान भरपारई व त्यावर 18 टक्के व्याज दि.17.4.2009 रोजी पासून रक्कम मिळावी अशी मागणी केली आहे. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत याबददल उभयपक्षात वाद नाही म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येत आहे. वाहनाचा अपघात झालेला आहे हे देखील गैरअर्जदार यांनी नाकारलले नाही. उलटपक्षी पोस्टाने अर्जदारास चेक पाठवून देऊन योग्य क्लेम दिला नाही ही सेवेतील ञूटी आहे म्हणून मूददा क्र.2 चे उत्तर सकारात्मक देण्यात येत आहे. गैरअर्जदार हे हजर झाले व त्यांनी आपले म्हण्णे दाखल केलेले आहे. त्यामध्ये त्यांनी अज्रदारास रु.24,615/- हे फूल अन्ड फायनल सेटलमेंट चे दिले. त्यामूळे त्यांचेकडे उर्वरित रक्कम क्लेमची देणे बाकी नाही अशा पध्दतीचे म्हणणे मांडलेले आहे. सदरची तक्रार ही अरबिट्रेटर कडे मांडण्यात यावी असेही सांगितलेले आहे. तसेच सर्व्हेअरने काढलेल्या लॉस असेसंमेंट मध्ये अर्जदाराने radiation, intercooler and fan यांचे संदर्भात जी रक्कम दिलेली आहे ती जास्त लिहीलेली आहे. त्यामूळे अर्जदारास फक्त रु.24,615/- देण्यात आले. सर्व्हेअरने काढलेले लॉस असेंसमेट पाहता त्यावर रु.83,855/- अर्जदारास दयावेत, म्हणजे अर्जदाराचे नूकसान झालेले आहे अशा प्रकारची माहीती दिली आहे. प्रत्यक्ष वाहन हे सर्व्हेअरने पाहिली असल्यामूळे त्यांनी सांगितलेली नूकसानची रक्कम रु.83,855/- गृहीत धरली व गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेली रक्कम रु.24,615/- व रु.1950/- ही रक्कम वजा करता उर्वरित रक्क्म रु.57,290/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास देणे बाकी आहे. हे सत्य समोर येते. सर्व्हेअरने काढलेली रक्कम नूकसान भरपाई ही अर्जदारास मिळावी या नीर्णयापर्यत हे मंच आलेले आहे व गैरअर्जदारांनी सेवेत ञूटी केली हे सूध्दा सिध्द होते. म्हणून गैरअर्जदार यांनी अर्जदारास दि.17.5.2009 पासून 9 टक्के व्याजाने रु.57,290/- एक महिन्याचे आंत अर्जदारास दयावेत, तसे न केल्यास सदर रक्कमेवर 12 टक्के व्याज अर्जदारास गैरअर्जदार यांनी रक्कम फिटेपर्यत दयावे, तसेच मानसिक ञासापोटी अर्जदारास गैरअर्जदार यांनी संयूक्तीक व वैयक्तीकरित्या रु.5000/- व दावा खर्च म्हणून रु.1000/- एक महिन्याचे आंत दयावेत. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1,2 व 3 यांनी वैयक्तीक अथवा संयूक्तीकरित्या हा निकाल कळाल्यापासून एक महिन्यांचे आंत अर्जदार यांना रु.57,290/- व त्यावर दि.17.05.2009 पासून 9 टक्के व्याज दराने पूर्ण रकक्म मिळेपर्यत दयावेत, असे न केल्यास सदर रक्कमेवर 12 टक्के व्याज दराने रक्कम फिटेपर्यत व्याज दयावे. 3. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी संयक्तीकरित्या किंवा वैयक्तीकरित्या अर्जदारास मानसिक ञासापोटी रु.5000/- व दावा खर्च म्हणून रु.1000/- एक महिन्याचे आंत दयावेत. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक |