::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगिळ (वैदय) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- ३०/०३/२०१६)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
१. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदार हा चंद्रपूर येथील रहीवासी असून त्यांना १० चाकी ट्रक खरेदी करावयाचा असल्यामूळे त्यांनी गैरअर्जदार क्रं. २ यांचेकडून गैरअर्जदार क्रं.२ च्या नावाने पंजिबध्द असलेला ट्रक एम एच – २९ – ९३७७ खरेदी करावयाचे ठरविले. त्या ट्रकवर गेरअर्जदार क्रं. २ ने गैरअर्जदार क्रं. १ कडून कर्ज घेतले असल्यामूळे अर्जदार व गैरअर्जदार क्रं. २ हयांनी गैरअर्जदार क्रं. १ च्या कार्यालयात जाऊन सदर ट्रक वर किती रक्कम बाकी आहे त्याबद्दल विचारले. अर्जदार व गैरअर्जदार २ मध्ये वरील गाडीचा ४,४२,०००/- मध्ये सौदा झाला. गैरअर्जदार क्रं. २ ने गैरअर्जदार क्रं.१ सोबत त्यांचे कर्जाचा खात्यात समझौता करुन गैरअर्जदार क्रं. १ ने ३,४२,०००/- रु. समझौता करण्यास मान्य झाले. अर्जदाराने वरील गाडी गैरअर्जदार क्रं.२ कडून ४,४२,०००/- रुपयामध्ये खरेदी केल्याचा समझौता केला व १,००,०००/- रु. गैरअर्जदार क्रं. १ ला नगदी दिले. परंतु अर्जदाराजवळ गाडी खरेदी करण्याकरीता एकमुस्त नसल्यामूळे गैरअर्जदार क्रं.१ ने अर्थसहाय्य देतो म्हणून सांगितले. गैरअर्जदार क्रं. १ ने गैरअर्जदार क्रं.२ सोबत ३,४२,०००/- रु. मध्ये त्याच्या खात्यात समझौता केला असल्यामूळे तेवढयाच रकमेची अर्जदाराला गरज होती म्हणून गैरअर्जदार क्रं. १ ने कराराच्या नावाखाली ५० ते १०० को-या कागदावर अर्जदारच्या सहया घेतल्या व कराराची प्रत, परतफेडीचे परिशिष्ट व गाडीचे मूळ दस्ताऐवज अर्जदाराला दिले. अर्जदाराला गैरअर्जदार क्रं. १ च्या अधिका-यांनी सांगितले कि कर्जाचे वेळीच गाडी अर्जदाराच्या नावाने हस्तांतरीत होईल व तोंडी सांगितले की, जुलै २०१२ पासून पहीला हप्ता राहणार आहे. त्यानंतर अर्जदाराने कर्जाबाबत माहीती मागितली व रोडवर चालविण्याकरीता गाडीचे कागदपञ व पासींग करुन देण्याकरीता सहयोग मागितला परंतु गैरअर्जदाराने दुर्लक्ष केले. अर्जदाराची गाडी ताब्यात घेतल्यापासून जुलै २०१२ पासून घरीच उभी आहे. आर.टी.ओ. कार्यालयात चौकशी केल्यावर गाडी गैरअर्जदार क्रं. २ चे नावावर आहे असे समजले दि. १६.०८.२०१२ रोजी अर्जदाराने लेखी अर्ज गैरअर्जदार क्रं. १ ला दिला परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. गाडी गाडी अर्जदाराच्या नावाने नसल्याने ती रोडवर चालविणे अर्जदाराला नसल्यामूळे त्याला दि. ०५.०७.२०१२ पासून प्रति दिवस १,०००/- रु. नुकसान होत आहे. दि. ०५.०७.२०१२ पासून अर्जदाराने दि. ०५.०९.२०१३ पर्यंत अर्जदाराने रु. ८०,१००/- र गैरअर्जदार क्रं. १ कडे भरणा केली. गाडी घरीच उभी असल्यामूळे कर्जाची रक्कम भरु शकत नाही असे म्हटल्यावर गैरअर्जदार क्रं. १ च्या अधिका-यांनी त्याला गाडी जप्त करु अशी धमकी दिली. अर्जदाराने दि. २०.०९.२०१३ रोजी गैरअर्जदाराच्या कार्यालयात जाऊन स्टेटमेंटची मागणी केली असता स्टेटमेंट बघीतल्यावर अर्जदाराला धक्का बसला कारण गैरअर्जदार क्रं. १ ने अर्जदाराच्या कर्जाची रक्कम ३,५५,०००/- दर्शविली होती जुन्या खात्यामध्ये ३,४२,८३५/- रु. जमा केल्यानंतर उर्वरित रक्कम अर्जदाराला आजपर्यंत मिळालेली नाही गैरअर्जदार क्रं. १ ने परतफेडीच्या स्टेटमेंटमध्ये दर्शविलेला करार सीएनडीपीआर ०२०५३१०००२ हा करार अर्जदाराला स्टेटमेंट मिळाल्यावर माहीत झाला तसेच दुस-या कर्जाची रक्कम २१,४३५/- रु. ही अर्जदाराने कधीही मागितली नव्हती. सदर कर्जाची रक्कम अर्जदाराने भरण्यास मनाई केल्यावर गैरअर्जदार क्र.१ ने गाडी जप्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, गुंडाना पैसे देवून अर्जदाराने गाडी वाचवली. सदर कृती गैरअर्जदार क्र.१ ची अर्जदाराप्रती अनुचित व्यापार पध्दतीत न्युनता असल्यामुळे अर्जदार सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली.
२. अर्जदाराची मागणी अशी आहे की, गैरअर्जदार क्र.१ ने करार क्र.CNDPR ०२०५३१०००२ मध्ये जास्तीची रक्कम रुपये १२,१६५/- मुळ कराराच्या रकमेमधून व्याजासह वळती करावे. तसेच अर्जदाराची गाडी जप्त करु नये व गाडी अर्जदाराचे नावाने हस्तांतरीत होईपर्यंत कोणतेही व्याज आकारणी करु नये. तसेच दुस-या करारातील रक्कम व त्यावरील व्याज अर्जदाराला मागु नये व अर्जदाराला योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी.
३. गैरअर्जदार क्र.१ व २ यांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.१ ने हजर होऊन निशाणी क.१७ वर त्यांचे उत्तर दाखल केले व त्यात त्यांनी अर्जदाराने लावलेले आरोप खोटे असून गैरअर्जदार क्र.१ विरुध्द अर्जदारानी दाखल केलेली तक्रार खारीज करण्यात यावी, असे नमूद करुन निशाणी क्र.२२ वर त्यांचे अतिरिक्त लेखी बयाण दाखल केले, त्यात त्यांनी अर्जदाराने सदर ट्रक खरेदी करण्याकरीता दिनांक ३१.५.२०१२ रोजी रुपये ३,५५,०००/- चे कर्ज घेतले होते व त्या कर्जाची नियमाप्रमाणे व्याजासह परतफेड अर्जदाराला रुपये १३,४७४/- नियमीत पहिला हप्ता व उर्वरीत ४४ हप्ते रुपये १२,३३१/- असे दिनांक ५.७.२०१२ पासून दिनांक ५.३.२०१६ पर्यंत एकूण रक्कम ५,५६,०३८/- रुपये परतफेड करावयाची होती. अर्जदार व गैरअर्जदार क्र.१ यांच्यात दिनांक ३१.५.२०१२ रोजी करारनामा झाला त्याबाबत अर्जदाराला दस्ताऐवज मिळाल्याबाबत पोचपावती सुध्दा दिलेली नाही तसेच अर्जदाराने दिनांक २६.१२.२०१२ रोजी गैरअर्जदार क्र.१ कडून करार क्र. CNDPR ०२१२२६०००९ नुसार रुपये २१,४३५/- इंशुरन्स कर्ज घेतले. सदर कर्जाची परतफेड अर्जदाराला १२ हप्त्यात दिनाक ५.२.२०१३ पर्यंत रुपये २५,०२५/- करावयाची होती. परंतु, अर्जदाराला उपरोक्त कर्ज गैरअर्जदार क्र.१ कडे नियमीत भरले नाही. दिनांक १०.१२.२०१३ पर्यंत रुपये ८०,१००/- एवढयाच रकमेचा भरणा अर्जदाराने केलेला आहे. अर्जदार हा थकीतदार असून दिनांक १०.१२.२०१३ पर्यंत कर्जाची रुपये १,१९,३५२.९९ त्याच्यावर थकबाकी आहे. अर्जदाराविरुध्द थकीत कर्जाची वसूलीकरीता कायदेशीर कारवाई करु नये या वाईट हेतून अर्जदाराने सदर तक्रार गैरअर्जदाराविरुध्द दाखल केलेली आहे. तसेच अर्जदाराने गैरअर्जदार क्र.२ कडून वादग्रस्त वाहन विकत घेतले व त्याकरीता गैरअर्जदाराकडून रुपये ३,५५,०००/- चे कर्ज घेतले. सदर वाहन अर्जदाराच्या नावाने करण्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची आहे. सदर जबाबदारीतून हात झटकण्याकरीता अर्जदाराने गैरअर्जदाराचे तेंव्हाचे व्यवस्थापक यांचेवर खोटे आरोप केलेले आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराला कसलीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेले नाही म्हणून सदर तक्रार खर्चासहीत खारीज करण्यात यावी.
४ गैरअर्जदार क्र.२ यांनी हजर होऊन निशाणी क्र. १९ वर त्याचे उत्तर दाखल केले त्यात त्यांनी असे नमूद केले की, गैरअर्जदार क्र.२ च्या नावाने असलेला सदर ट्रक अर्जदाराने खरेदी केला. सदर ट्रक वर गैरअर्जदार क्र.२ ने गैरअर्जदार क्र.१ कडून कर्ज घेतलेले असल्यामुळे अर्जदार व त्यांनी गैरअर्जदार क्र.१ कडे जाऊन कर्जाची माहिती घेतली. परंतु, हे अमान्य आहे की, अर्जदार व गैरअर्जदार 1 यांच्यात गाडीचा सौदा रुपये ४,४२,०००/- मध्ये झाला. परंतु हे मान्य आहे की, गैरअर्जदार क्र.२ ने गैरअर्जदार क्र.१ सोबत गाडीच्या कर्जात रुपये ३,४२,०००/- मध्ये समझोता केला म्हणून तेवढीच रक्कम अर्जदाराला अर्थसाह्य लागत होती. सदर वाहन कर्जाचे वेळीच अर्जदाराच्या नावे होईल असे गैरअर्जदार क्र.१ ने सांगीतले होते. परंतु त्यांनी अर्जदाराला करुन दिले नाही. सदर मामल्यात गैरअर्जदार क्र.१ ने अर्जदाराला कर्ज मंजूर करण्याच्या आधी गाडी अर्जदाराच्या नावाने हस्तांतरीत करुन द्यायला पाहिजे होती. गाडी ट्रान्सफर करुन द्यायची जबाबदारी माझी नाही व माझ्या नावाची गाडी अर्जदाराला चालविता येत नाही. यात गैरअर्जदार क्र.२ ची कोणतीही चुक नाही म्हणून गैरअर्जदार क्र.२ विरुध्द तक्रार खारीज करण्यात यावी.
५. अर्जदाराने निशाणी क्र.२ वर अंतरीम अर्जदाखल केला. त्यावर गैरअर्जदाराने उत्तर दाखल केले. परंतु, अर्जदार व गैरअर्जदार यांनी अंतरीम अर्जावर सुनवाई करीता कोणतेही प्रयत्न व सुनवाई केली नसल्यामुळे सदर अर्ज अंतिम आदेशासोबत निकाली लावण्यात येत आहे.
६. अर्जदाराची तक्रार, दस्ताऐवज, शपथपञ तसेच निशाणी क्र.२५ वर दाखल केलेली पुरसीस तसेच गैरअर्जदार क्र.१ ने दाखल केलेले उत्तर, शपथपञ व युक्तीवाद व गैरअर्जदार क्र.२ ने दाखल केलेले उत्तरावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
(१) अर्जदार गैरअर्जदार क्र.१ चा ग्राहक आहे काय ? : होय
(२) अर्जदार गैरअर्जदार क्र.२ चा ग्राहक आहे काय ? : होय
(३) गैरअर्जदार क्र.१ ने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीची : होय
अवलंबना व सेवेत न्युनता अवलंब केली आहे काय ?
(४) अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १ बाबत ः-
७. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.२ यांचेकडून ट्रक खरेदी करण्याकरीता कर्ज घेतले, ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार क्र.१ चा गाहक आहे हे सिध्द होत असल्यामुळे मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. २ बाबत ः-
८. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.२ कडून सदर वाहन विकत घेतले ही बाब गैरअर्जदार क्र.२ यानांही मान्य असल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार क्र.२ चा ग्राहक आहे हे सिध्द होत असल्यामुळे मुद्दा क्रं. २ चे उत्तर हे होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ३ बाबत ः-
९. गैरअर्जदार क्र.१ ने गैरअर्जदार क्र.२ ला तक्रारीत नमूद असलेल्या ट्रकवर कर्ज दिले होते ही बाब गैरअर्जदार क्र.१ ला मान्य आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या निशाणी क्र.४ दस्त क्र.१ वरील आर.सी. बुकवर गैरअर्जदार क्र.२ चे नावाची नोंदणी असून त्यावर एच.पी. गैरअर्जदार क्र.१ ची चढलेली आहे. गैरअर्जदार क्र.२ ने त्याची सदर गाडी त्यावर गैरअर्जदार क्र.२ चे कर्ज असतांना त्यात गैरअर्जदार क्र.१ सोबत समझोता करुन ते कर्ज उतरवून सदर गाडी अर्जदार यास विकली. परंतु, गैरअर्जदार क्र.२ ने सदर गाडी विकतांना आणि गैरअर्जदार क्र.१ ने गाडीवर अर्जदाराच्या नावाने कर्ज देतांना गाडी अर्जदाराच्या नावाने परिवहन कार्यालयातून जाऊन नोंदणी करुन दिली नाही किंवा त्यावर अर्जदाराचे नावाची नोंदणी केली नाही. गैरअर्जदार क्र.१ यांनी सदर वाहनावार अर्जदारास कर्ज दिले हे गैरअर्जदाराने दाखल निशाणी क्र.२१ दस्त ब-१ वरुन सिध्द होत आहे. त्यामुळे मंचाच्या मत सदर वाहन अर्जदाराच्या नावाने करुन देऊन त्यावर गैरअर्जदार क्र.१ ची एच.पी. चा शेरा असणे आवश्यक आहे आणि ही जबाबदारी पूर्णपणे गैरअर्जदार क्र.१ व २ यांची आहे. मंचाच्या मते गैरअर्जदार क्र.२ व गैरअर्जदार क्र.१ यांनी सदर वाहन विकल्यावर व त्यावर कर्ज दिल्यावर ते वाहन अर्जदाराच्या नावाने करुन देण्याचा प्रयत्नही केला नाही हे स्पष्ट होत आहे. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी सदर जबाबदारी नाकारुन अर्जदाराप्रती सेवेत न्युनता व अनुचित व्यापार पध्दती अवलंबिली आहे असे सिध्द होत आहे म्हणून मुद्दा क्र.३ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ४ बाबत ः-
१०. मुद्दा क्रं. १ ते ३ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(१) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(२) गैरअर्जदार क्र.१ व २ ने उप प्रादेशीक परिवहन कार्यालयामधून अर्जदारास वादग्रस्त ट्रकची नोंदणी अर्जदाराच्या नावाने आदेशाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसाचे आत करुन दयावी.
(३) अर्जदाराने गैरअर्जदार क्र.१ कडून घेतलेले कर्ज नियमीत परतफेड करावी.
(४) गैरअर्जदार क्र.१ ने अर्जदारास शारिरीक, मानसिक ञासापोटी रुपये ५०००/- व तक्रार खर्च रुपये २५००/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसाचे आत करुन दयावे.
(५) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - ३०/०३/२०१६