::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 5.11.2015)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
1. दि.21.11.2012 रोजी गैरअर्जदाराकडे कर्ज घेण्याकरीता आले होते आणि अर्जदाराचे मागणीवरुन गैरअर्जदाराने रुपये 1 लाख 5 हजार रुपयाचे कर्ज मंजूर केले. गैरअर्जदाराने अर्जदारास सदर कर्जाचा व्याजदार 17 टक्के असल्याचे, तसेच त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची प्रोसेस फी लागणार नाही आणि कोणत्याही प्रकारचे तारण देखील लागणार नाही असे सांगीतले होते. गैरअर्जदाराने उपरोक्त सर्व दिलेली माहिती खोटी आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराने घेतलेल्या कर्जाच्या रकमेवर व्याजदर 30.70 टक्के लावलेला आहे, तसेच सदर कर्जाच्या रकमेवर इ.एम.आय.4874/- रुपये लावला असून 30.50 टक्के प्रोसेस फी कपात केली आहे. सदर कृत्य हे नियमांचे विरुध्द आहे. गैरअर्जदाराने सदर घडामोडी बद्दल अर्जदारास सुचना दिली नाही. अर्जदाराने आठ मासीक हप्ते गैरअर्जदाराचे कार्यालयात वेळोवेळी एकूण रुपये 39,244/- जमा केले आहे. अर्जदाराला गैरअर्जदाराने कर्जाची एकूण रक्कम रुपये 96,063/- दिली व या रकमेपैकी अर्जदाराने रुपये 39,063/- गैरअर्जदाराला दिलेली असून उर्वरीत रक्कम रुपये 56,819/- द्यावयाची आहे. उपरोक्त कर्ज घेतेवेळी गैरअर्जदाराने अर्जदाराकडून 18 ते 20 कोरे धनादेश घेतले, त्या धनादेशात अर्जदाराची फक्त सही असून कोणत्याही प्रकारची रक्कम भरलेली नाही. अर्जदाराकडून को-या 100/- रुपयाचे स्टॅम्प पेपर वर सह्या घेतलेल्या आहे. अर्जदारास गैरअर्जदाराकडून शारीरीक, मानसिक व आर्थिक ञास सहन करवा लागत आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, अर्जदाराकडून गैरअर्जदारांनी शिल्लक कर्जाची रक्कम रुपये 56,819/- स्विकृत करण्याचा आदेश पारीत व्हावा, तसेच अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व अर्जदाराचे सर्व कोरे धनादेश, स्टॅम्पपेपर व सह्रया केलेले सर्व कागदपञ गैरअर्जदाराकडून परत देण्याचा आदेश पारीत व्हावा.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. नि.क्र.5 वरील अहवालानुसार गैरअर्जदाराने मंचाचा नाटीस घेण्यास नकार दिल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे नि.क्र.1 वर गैरअर्जदाराविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दि.4.4.2014 ला पारीत करण्यात आला. अर्जदाराने नि.क्र.7 वर शपथपञ दाखल केले. अर्जदारास लेखी युक्तीवाद दाखल करण्याची संधी देवून लेखी युक्तीवाद दाखल केला नाही, त्यामुळे नि.क्र.1 वर अर्जदाराचे लेखीयुक्तीवादाशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश दि.15.9.15 ला पारीत करण्यात आला. तसेच अर्जदारास तोंडी युक्तीवाद करण्याची संधी मीळूनही तोंडी युक्तीवाद केला नाही, त्यामुळे नि.क्र.1 वर अर्जदाराचे तोंडी युक्तीवादाशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश दि.21.10.15 ला पारीत करण्यात आला.
4. अर्जदारची तक्रार, दस्ताऐवज, व शपथपञावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ? : होय
3) अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? :अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदार दि.21.11.2012 रोजी गैरअर्जदाराकडे कर्ज घेण्याकरीता आले होते व गैरअर्जदाराने अर्जदाराला दि.3.12.2012 रोजी रुपये 96,063/- कर्ज दिले होते, ही बाब अर्जदाराने नि.क्र.4 वर दस्त क्र.5 वर दाखल अर्जदाराचे खाते उतारामध्ये सिध्द होते. सबब, अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहे हे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून रुपये 96,063/- ऐवढाच लोन घेतला असून गैरअर्जदाराने अर्जदाराला महिन्याचा हप्ता रुपये 4,874/- लावण्यात आलेला होता ही बाब अर्जदाराने दाखल त्याचे खाते उतारावरुन सिध्द होत आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराला 30.50 टक्के प्रोसेस फी कापली व व्याज दर 30.70 टक्के लावण्यात आले ही बाब नियमांच्या विरुध्द असल्याने व लोन मंजुर करतोवेळी सांगण्यात आलेली नव्हती. त्याकरीता अर्जदाराने गैरअर्जदाराला नि.क्र. 4 वर दाखल दस्त क्र.1 च्या अन्वयाने गैरअर्जदाराला नोटीस पाठविला. सदर नोटीस प्राप्त होऊन सुध्दा गैरअर्जदाराने कोणतेही त्यावर उत्तर दिले नाही, तसेच या प्रकरणात सुध्दा गैरअर्जदाराने नोटीस नाकारुन प्रकरणात हजर झाले नाही. अर्जदाराने तक्रारीत केलेले कथन नि.क्र. 7 नुसार शपथपञ दाखल करुन सिध्द केलेले आहे. सबब, गैरअर्जदाराने अर्जदाराला अनुचीत व्याजदर लावून अर्जदाराप्रती न्युनतम सेवा दर्शविलेली आहे असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन अर्जदार खालील अंतिम आदेशाप्रमाणे मागणीस पाञ आहे.
अंतीम आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदाराने अर्जदाराला दिलेला कर्जावर 11 टक्के व्याज लावून अर्जदाराने भरलेली रक्कम समावीष्ठ करुन उरलेली रक्कम अर्जदाराकडून स्विकृत करावे.
3) अर्जदाराने वरील नमूद प्रमाणे कर्जाची रक्कम 11 टक्के व्याजदराने गैरअर्जदाराकडे पूर्णपणे भरल्यानंतर अर्जदाराकडून घेतलेले कोरे धनादेश व अमानत म्हणून घेतलेले कागदपञ अर्जदाराला नियमाप्रमाणे परत करावे.
4) अर्जदारने तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
5) आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठविण्यात यावी.
6) सदर निकालपञाची प्रत संकेतस्थळावर टाकण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 5/11/2015