जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/278. प्रकरण दाखल तारीख - 19/12/2009 प्रकरण निकाल तारीख – 25/02/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य सईद उलहक अन्सारी पि. अब्दूल हकीम अन्सारी वय, 46 वर्षे, धंदा नौकरी रा. लेबर कॉलनी ब्लॉक नं.17 घर नं.93, हनुमान मंदिराच्या पाठीमागे, नांदेड अर्जदार विरुध्द. 1. मा. व्यवस्थापक, इंगळे ट्रेडर्स 27 हॉटेल गोदावरी कॉम्प्लेक्स, व्ही.आय.पी. रोड, नांदेड. 2. मा. व्यवस्थापक, गैरअर्जदार वॉटरमन इंडस्ट्रीज, प्लॉट नं.ई-5, कोहीनूर ऑईल मिलच्या बाजूला, एम.आय.डी.सी. परिसर, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.अ.व्ही.चौधरी गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - अड.पी.एन. शिंदे. गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकील - अड.एस.डी.तूप्तेवार. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार यांनी वॉरंटीमधील सूप्रिम डिलक्स वॉटर टँक निकृष्ट दर्जाचे नीघाल्यामूळे मागणीनुसार बदलून दिले नाही म्हणून संबंधीत तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांनी दि.13.4.2007 रोजी सूप्रिम डिलक्स ट्रीपल लेअर या नांवाची पाणी साठवण्यासाठी टाकी त्यांची क्षमता 1500 लिटर आहे ती रु.4050/- मध्ये विकत घेतली. परंतु त्यापूर्वी दि.12.4.2007 रोजीला पहिली टाकी रु.3400/- ला विकत घेतली व ती बदलून दूसरी रु.600/- जास्तीचे देऊन घेतली होती. यासाटी गैरअर्जदार यांनी दहा वर्षाची गॅरंटी दिली. वरील काळात कोणताही दोष आढळल्यास ती बदलून देऊ असे सांगितले. दिड वर्षात कोणताही दोष नव्हता पण यानंतर टाकीस तडा गेल्याचे दिसून आले. त्यामूळे वरच्या बाजूस टाकीमधून पाणी गळत होते. ही बाब गैरअर्जदार यांना ताबडतोब निदर्शनास आणून दिली असता त्यांनी त्यांचे कर्मचारी श्री उमाटे यांनी अर्जदाराच्या घरी येऊन सदर टाकीची परिक्षण केले व त्यांना पण वस्तूस्थिती पटली व त्यांनी टाकी बदलून देण्याचे आश्चासन दिले. परंतु असे करताना आश्चर्यकारकरित्या गैरअर्जदार क्र.1 यांनी टाकी बदलून देण्यासाठी अर्धी रक्कम अकर्जदाराने भरावी, अर्धी ते भरतील असे सांगितले. सदरील टाकीची वॉरंटी असल्यामूळै अर्जदार यांनी रक्कम देणार नाही असे सांगितले. दि.25.11.2009 रोजीला लेखी तक्रार दिली परंतु ती गैरअर्जदार क्र.1 यांनी घेतली नाही. म्हणून अर्जदाराची मागणी अशी आहे की, 1500 लिटरची टाकी बदलून दयावी तसेच मानसिक, शारिरीक ञासापोटी नूकसान भरपाई म्हणून रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु.5000/- मिळावेत असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी वकिलामार्फत आपले म्हणणे दाखल केले आहे. त्याप्रमाणे तक्रार त्यांना अमान्य आहे. हे ही सांगितले की दि.13.4.2007 रोजीला तयांनी सूप्रिम डिलक्स या नांवाची टाकी विकली नाही व जास्तीचे रु.600/- घेतले नाही. खरेदीदाराला वॉरंटीही गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून दिली जाते म्हणून फार तर अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 यांचेशी संपर्क साधून तक्रार दयावी, टाकीच्या वॉरंटी बाबत गैरअर्जदार क्र.1 जबाबदार नाहीत. एक ते दिड वर्ष टाकी वापरल्यावर तडा कशामूळे गेला हे अर्जदाराने सांगितला नाही. टाकीची आदळआपट झाल्यास असे होऊ शकते. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे पाण्याची टाकी बदलून देण्याची विनंती केली नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना जे पञ दिले त्यांचे उत्तर त्यांनी दि.1.12.2007 रोजी वकिलामार्फत दिलेले आहे परंतु अर्जदाराने ते घेतले नाही. अर्जदाराची तक्रार खोटी असून ती खर्चासह खारीज करावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी पण आपले म्हणणे वकिलामार्फत दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार ही निव्वळ खोटी आहे. अर्जदाराने सोबत कोणत्याही प्रकारचे दस्ताऐवज, पाण्याची टाकीची खरेदी पावती, वॉरंटी पावती, फोटो इत्यादी कागदपञ दाखल केलेले नाही. अर्जदाराने फक्त साध्या कागदपञावर लिहीलेला मजकूर वॉरंटी टँक ब्लॅक, वॉरंटी कार्ड एवढेच कागदपञ दाखल केलेले आहे व त्यांस फक्त गैरअर्जदार क्र.1 यांचे व्हीजीटींग कार्डचे झेरॉक्स जोडलेले आहे. गॅरंटी कार्डवर अर्जदाराचे नांवा नाही म्हणून संबंधीत तक्रार ही खोटी व निराधार आहे. अर्जदाराने सादर कलेले फोटो निळया रंगाच्या टाकीचा आहे व बिलावर वॉरंटी टँक ब्लॅक असे लिहीलेले नाही. गैरअर्जदाराचा कोणताही कर्मचारी अर्जदाराच्या घरी गेलेला नाही व टाकीचे परिक्षण केलेले नाही. त्यामूळे अर्जदार यांची तक्रार खोटी आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार याचे विरुध्द यांचेकडून टाकी खरेदी केलेली नाही. त्यामूळे टाकी बदलून देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. गैरअर्जदारास झालेल्या मानसिक ञासाबददल रु.30,000/- दंड लावण्यात यावा अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ,तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्हणून आपआपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांनी निकृष्ट दर्जाची टाकी पूरवून अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला हे अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी 1500 लिटर ची वॉरंटी टँक ब्लॅक खरेदी केल्या बददल दि.12.04.2007 रोजीची रु.3400/- चे बिल दाखल केलेले आहे व अर्जदाराने तक्रारीत म्हटल्याप्रमाणे त्यांने दूस-या दिवशी ही टाकी वापस केली. त्यामूळे अजून रु.600/- अतिरक्त देऊन रु.4500/- दूसरी टाकी विकत घेतली आहे. खरे तर हे दोन्ही बिले पक्की नाहीत. यावर गैरअर्जदार क्र.1 यांचे नांव देखील नाही तरी पण खाली बारकाईने सहीकडे पाहिले असता ती सही बी. इंगळे नांवाने केलेली आहे. यांचे व्हिजीटींग कार्ड जोडलेले आहे त्यावर भीमराव इंगळे लिहीलेले आहे. अर्जदाराने सूप्रिम डिलक्स वॉटर टँक यांचे वॉरंटी कार्ड दाखल केलेले असून त्यावर दहा वर्षाची गँरंटी दिलेली आहे.यावर अर्जदार यांचे नांव जरी नसले तरी इंगळे ट्रेडर्स चे नांव दिलेले आहे व दि.12.7.2007 असे लिहीलेले आहे. हे सर्व बिल, वॉरंटी गैरअर्जदार क्र.1 व 2 हे नाकारतात. पण असे जरी असले तरी परिस्थिती अशी दिसून येते की, बिल जरी कच्चे असले तरी जेव्हा टँक विकले आहे व यानंतर ब्लॅक टँक बदलून निळा घेण्यात आलेला आहे. बिल देण्याची जिम्मेदारी ही वितरकाची असते त्यांने वॉरंटी देत असताना कच्चे बिल दयावयास नको. म्हणून गेरअर्जदार क्र.1 हे त्यांचे बिल नाही असे जरी म्हणत असले तरी सहीवरुन हे बिल त्यांनीच दिलेले आहे व सेल्स टॅक्स व ऑक्ट्राय चूकविण्यासाठी पक्के बिल दिलेले नाही. गॅरंटी कार्डवर वितरकाची सही व शिक्का नाही. परंतु वस्तूस्थिती ही टाकी अर्जदाराला गैरअर्जदार क्र.1 यांनी विकली आहे व बिल दिले नाही. वॉरंटी कार्डवर सही नाही यांचा अर्थ त्यांनी अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे. अर्जदाराने जे फोटोग्राफस दाखल केलेले आहेत या फोटोवरुन सूप्रिम डिलक्स ट्रीपल लेअर नांव असलेली टाकी व ती गळत असल्याचे फोटोवरुन दिसत आहे. म्हणजे निळया रंगाची टाकी अर्जदाराने घेतली. टाकी एकदा वर बसवल्यानंतर एक ते दिड वर्ष ती व्यवस्थित राहीली व यानंतर लिक झाली यांचा अर्थ टाकीला दगड किंवा कशाचा मार लागला यांची शक्यता नाही. कारण ती जागेवरुन हलविलीच नाही. यात उत्पादन दोष आहे असेच म्हणावे लागेल. गैरअर्जदार क्र.2 यांनी असा आक्षेप घेतलेला आहे की, वितरकाचे बिल नाही व वॉरंटी कार्ड वर त्यांची सही व शिक्का नाही. वितरकाने बिल दिले नाही म्हणून उत्पादक कंपनीची जबाबदारी टळणार नाही. कारण त्यांनी उत्पादन केलेली टाकी ही नवी दिसत असून ती जूनी नाही. यात उत्पादक दोष तसेच टाकीस पडलेले छिद्र हे स्पष्टपणे दिसून येत आहे. वॉरंटी ही फार दीर्घ कालावधीची आहे. तेव्हा ही टाकी त्यांनी वॉरंटीमध्ये कोणत्याही पैशाची मागणी न करता बदलून देणे आवश्यक आहे.शहरातील दूकानातून टाकी विकत घेतली व अवघा एक रस्ता ओलाडूंणा-या अंतरावर ती फिट केली तेव्हा ऑक्ट्राय ची पावती, ट्रान्सफर बिल्टी इत्यादी गोष्टी त्यांना मागता येणार नाही. गैरअर्जदार क्र.2 कंपनीची जबाबदारी आहे की त्यांनी दिलेली टाकी ही दोषयूक्त आहे त्यामूळे त्यांची जबाबदारी आहे ती टाकी बदलून देण्याची आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्पादीत केलेली सूप्रिम डिलक्स टाकी फोटोतील नांवावरुन त्यांचीच आहे हे सिध्द होते. म्हणून त्यात जर काही दोष आढळला म्हणून ते बदलून देण्याची जबाबदारी पण त्यांचीच आहे. अर्जदाराने दि.25.11.2009 ला गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे टाकीची तक्रार केल्याबददल तक्रार या प्रकरणात जोडलेली आहे. एकंदर गैरअर्जदार यांनी पक्के बिल न देऊन व परत कबूलीही न देऊन गैरप्रकार केल्याचे दिसून येते. अर्जदार यांचेही कर्तव्य आहे की, एखादी दीर्घ वॉरंटीची वस्तू घेताना त्यावर वितरकाचे नांव असलेले वॉरंटी कार्डवर सही व शिक्का असलेले कार्ड घेणे आवश्यक असते परंतु काही थोडयाशा लोभापोटी वितरक आणि अर्जदार दोघेही टॅक्स चूकविण्याच्या हेतूने गैरप्रकार करतात व त्यावीषयीची रिस्कही अर्जदारावर राहते. वितरक व उत्पादक हे या गोष्टीचा फायदा घेऊन यामधून सहजपणे सूटण्यात यशस्वी होण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही गैरअर्जदारांनी अर्जदाराच्या मागणीनुसार अर्धी रक्कम मागितली व टाकी बदलून दिली नाही यामूळे अर्जदारास मानसिक ञास झालेला असणार यासाठीही गैरअर्जदार जबाबदार आहेत. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 1. 2. गैरअर्जदार क्र.2 यांनी विना मोबदला 1500 लिटर ची सूप्रिम डिलक्स ट्रीपल लेअर निळी टाकी अर्जदाराकडून जूनी घेऊन त्यांस नवीन टाकी बदलून दयावी व गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदार यांचे घरी ज्याठिकाणी होती त्या ठिकाणी बसवून दयावी. यासाठी पूढील नवीन कार्ड देण्यात यावी. 3. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी मिळून मानसिक ञासापोटी अर्जदार यांना रु.3,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- दयावेत. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्य जयंत पारवेकर, लघुलेखक. |