जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/227 प्रकरण दाखल तारीख - 08/10/2009 प्रकरण निकाल तारीख – 19/01/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते. - सदस्य मा.श्रीमती एस.आर.देशमुख - सदस्या धोंडीबा पि.लक्ष्मण केंद्रे, वय वर्षे 60 व्यवसाय व्यापार, अर्जदार. रा.कीशोरनगर ता.जि.नांदेड. विरुध्द. 1. व्यवस्थापक, शांती फायनांन्स, गैरअर्जदार. चांडक ईन्स्ट्रूमेंट प्रा.लि.कंपनी, 84/5 महाजन मार्केट, सिताबर्डी, नागपुर - 12. 2. व्यवस्थापक, श्री.मोटर्स, डॉ.किन्हाळकर दवाखाना बिल्डींग, वामननगर,पुर्णा रोड, नांदेड. 3. फोर्स मोटर्स लिमिटेड, एम 4 सुपर (फॉरमली नोन अझ बजाज टेम्पो लि) मुंबई - पुणे रोड, आकुर्डी,पुणे ता.जि.पुणे. अर्जदारा तर्फे वकील - अड.शेख जियाओद्यीन. गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.एस.व्ही.मेहता. गैरअर्जदार क्र. 3 तर्फे वकील - अड.स्वतः. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदारांनी अर्जदाराचे वाहन क्र. एम.एच.26 एच 3830 बेकायदशिररित्या जप्त केले म्हणुन ते वाहन वापस मिळावे व नुकसान भरपाई म्हणुन रु.1,00,000/- मिळावेत म्हणुन ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदार यांनी एम.एच.4 सुपर हे वाहन गैरअर्जदार क्र. यांच्याकडुन रु.2,25,000/- कर्ज घेऊन गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडुन विकत घेतले. गाडीचा हप्ता रु.8,000/- महिना होता परंतु वाहन हे मुदतीच्या आधीच खराब होऊ लागले. सदरील गाडी इंजीन जास्त गरम होऊ लागले व गाडीचे टायर सुध्दा खराब होऊ लागले. म्हणुन गाडी व्यवस्थित चालत नव्हती म्हणुन अर्जदार फक्त एक हप्ता भरु शकला नाही. गैरअर्जदाराकडे वेळोवेळी तक्रार दिली परंतु दुर्लक्ष केले व वाहन गुंड प्रवृतीच्या लोकांना हाताशी धरुन जप्त केली हे करते वेळी गैरअर्जदारांनी अर्जदारास कुठलेही लेखी नोटीस दिली नाही म्हणुन हा तक्रारअर्ज दाखल केला आहे. वाहन जप्त करते वेळी गाडीमध्ये तीन क्विंटल ज्वारी, एक क्विंटल गहु, 45 किलो तुरडाळ व दहा किलो मुगदाळ तसेच गाडीच्य डिक्कीमध्ये नगदी रु.3,200/- होते. अर्जदार हप्ता भरण्यास तयार असतांना सुध्दा गैरअर्जदारांनी ती रक्कम भरुन घेतली नाही व गाडी दिली नाही. गाडी ही दि.20/08/2009 पासुन गैरअर्जदाराच्या ताब्यात रक्कम रु.3,200/- व फायनांन्स भरलेल्या पावत्या सोबत आहेत. गैरअर्जदाराने सदरील गाडी परस्पर विकण्याचा प्रयत्न करीत आहेत. अर्जदाराने वकीला मार्फत दि.04/09/2009 रोजी नोटीस पाठविली. गैरअर्जदार क्र. 3 यांनी खराब वाहन दिल्यामुळे अर्जदारास मानसिक व शारीरिक त्रास झाला. गैरअर्जदार क्र.1 यांचे एजंट गैरअर्जदार क्र. 2 च्या कार्यालय येथे बसुन फयनांन्सचा व्यवहार झालेले आहे. मानसिक त्रास रु.2,000/- दावा खर्च म्हणुन रु.2,000/- नुकसान भरपाईसह मिळावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी वकीला मार्फत लेखी जबाब दाखल केलेले आहे. अर्जदार क्र. 2 कडुन नविन एम 4 सुपर यांचे नोंदणी क्र.एम.एच.26 एच.3830 हे माल वाहुन वाहन दि.12/01/2009 रोजी विकत घेतले आहे व यासाठी गैरअर्जदार क्र. यांचेकडुन अर्थ सहाय रु.2,25,000/- इतके घेतले आहे त्यासाठी गैरअर्जदारासोबत अर्जदाराने दि.15/12/2009 रोजी हायर पर्चेस अग्रीमेंट केलेला होता त्यामुळे गैरअर्जदार हा मालक असुन अर्जदार हे भाडेकरु आहेत. कर्जाचे रु.8,000/- हप्ता ठरलेला असुन 48 हप्त्यात या रक्कमेची परतफेड करावयाची आहे. अर्जदाराची गाडी व्यवस्थीत चालत नाही हे गैरअर्जदाराने नाकबुल केले आहे व त्यासाठी ते जबाबदार नाही. गैरअर्जदारांनी गुंड प्रवृती लोकांना हाताशी धरुन गाडी जप्त केली हे म्हणणे गैरअर्जदारांनी नाकबुल करतात. गैरअर्जदारांनी त्यांना सुचना किंवा नोटीस दिली नाही तसेच गाडी मध्ये तीन क्विंटल ज्वारी, एक क्विंटल गहु, 45 किलो तुरदाळ, दहा किलो मुगदाळ तसेच गाडीच्या डिक्कीमध्ये रु.3,200/- होते हे म्हणणे गैरअर्जदारांनी नाकबुल करतात. अर्जदारास लेखी व तोंडी अनेक वेळा गैरअर्जदाराच्या थकीत रक्कमेबद्यल कळविण्यात आलेले होते तसेच अर्जदाराचा पुत्र लालजी केंद्रे यांच्या मोबाईलवरुन बोलणे झाले होते. हायर पर्चेस अग्रीमेंट यांचा क्लॉज क्र.14 याप्रमाणे अर्जदार थकबाकीदार असले तर नोटीस न देता देखील ते त्यांचे वाहन जप्त करु शकतात. अर्जदाराने रक्कम भरण्याची तयारी दर्शविली होती हे त्यांचे म्हणणे खोटे आहे. गाडी ताब्यात घेतांना गाडीची बॅटरी, गाडीचे चार टायर, त्यांची स्थिती ठिक नव्हती अशा परिस्थितीत गाडी ताब्यात घेतली आहे. खरे पहाता सध्याच्या उदभवणा-या स्थितीला अर्जदार स्वतः जबाबदार आहेत. अर्जदाराने कर्जाची फेड योग्य रित्या केली नाही. अर्जदार हप्ते भरण्यास नियमित नव्हता उदा. अर्जदाराचा पहीला हप्ता दि.15/01/2009 ला असतांना त्यांनी दि.23/02/2009 ला रु.7,000/- दि.27/03/02/209 रोजी रु.1,000/- अशी परतफेड केली. दुसरा मासिक हप्ता दि.15/02/2009 असतांना दि.27/03/2009 ला रु.6,000/- दि.24/04/2009 ला रु.2,000/- अशी परतफेड केली आहे. दि.15/03/2009 ला हप्ता असतांना दि.29/06/2009 ला रु.6,000/- व दि.12/06/2009 ला रु.3,000/- भरले चौथा हप्ता दि.12/04/2009 ला असतांना दि.15/04/2009 ला रु.4,000/- भरले दि.11/06/2009 ला रु.4,000/- भरले पाचवा हप्ता हा दि.15/05/2009 ला असतांना दि.11/07/2009 ला रु.3,000/- भरले म्हणजे प्रत्येक हप्ता हा उशिराने भरलेला आहे. यानंतर हप्ता भरला नाही. सत्य परिस्थितीत अर्जदाराकडे दि.16/11/2009 रोजी मासिक हप्त्याबद्यल रु.53,000/- रु.6,460/- लेटफिस रु.4,388/- पार्कींग चार्जेस असे एकुण रु.63,854/- येणे बाकी आहेत. अर्जदाराने खोटी तक्रार केल्यामुळे गैरअर्जदारास विना कारण त्रास सहन करावा लागला म्हणुन खर्चासह तक्रार खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 2 हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. याप्रमाणे त्यांनी अर्जदाराला एम.एच.26 एच 3830 हे वाहन दि.12/01/2009 रोजी विकले आहे. सदर गाडी मुदतीच्या आंत खराब होऊ लागले, गाडीचे इंजन गरम होऊ लागले, ऑईल डिझेल जास्त लागु लागले, टायर खराब होते ही तक्रार त्यांना मान्य नाही. परिच्छेद क्र. 2 शी त्यांचा संबंध नाही. परिच्छेद क्र. 3,4,5 ,6 हे गैरअर्जदार नाकबूल करतात. परिच्छेद क्र.7 ला जबाब देतांना गैरअर्जदार हे सदर गाडीचे निर्माते नाहीत त्यामुळे काही दोष असतील तर त्यास ते जबाबदार नाही. परिच्छेद 9 ला याप्रमाणे गैरअर्जदार क्र.2 हे गैरअर्जदार क्र. 1 चं एजंट नाही परंतु अर्जदाराच्या विनंतीनुसार त्यांना अतिरीक्त सेवा म्हणजे गैरअर्जदार क्र. 1 यांच्या फायनांन्सचे हप्ते स्विकारले आहे. वाहन चांगल्या स्थितीत असेल त्याची नियमित देखभाल व काळजी घ्यावी लागते याला गैरअर्जदार क्र. 3 यांनी 360 कि.मी.ची वॉरंटी किंवा 36 हजार कि.मी. अशी वॉरंटी दिली आहे. ग्राहकाला यासाठी सहा फ्रि सर्व्हीसींग ते न घेतल्यास वॉरंटी रद्य होते. कंपनीच्याय नियमानुसार अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे नांदेड येथील वर्कशॉपला दि.15/03/2009 ला पहिला फ्रि सर्व्हीसींग घेतली आहे. त्या वेळेस पुर्ण गाडीची सर्व्हींसींग करुन दिली अशी कुठलीच तक्रार नव्हती त्यांनी समाधानकारक काम झाले म्हणुन सही केलेली आहे यानंतर दि.28/03/2009 ला गाडीचे सेल्फ स्टार्टची तक्रार घेऊन आले तो गैरअर्जदाराने व्यवस्थीत दुरुस्त करुन दिले आहे व अर्जदाराचे समाधान झाले तेंव्हा गाडी ताब्यात घेतले. दुसरी फ्रि सर्व्हीसिंग दि.14/07/2009 ला घेतले तेंव्हा गाडीचे नियमित काम तपासणी केली व सर्व्हीसींग करुन ट्रायल घेऊन समाधान झाल्यावरच अर्जदार गाडी घेऊन गेला. जेव्हा एखादी गाडी अप्रशिक्षीत व्यक्ति चालवील व भरधाव वेगाने चालवीली निर्माते कंपनीने सांगीतलेल्या वजन क्षमतेपेक्षा जास्त माल भरले तर वाहनात तांत्रिक अडचण येऊ शकते यासाठी गैरअर्जदार जबाबदार नाहीत. सत्य सोडुन तोडुन मोडुन तक्रार दाखल केली म्हणुनते खर्चासह खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 3 यांनी वकीला मार्फत आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारांनी केलेली सर्व आरोप नाकबुल केली आहे. एम 4 सुपर एम.एच.26 एच 3830 अर्जदारास विकलेले वाहन हे त्यांनी निर्मीती केलेले मान्य आहे. गैरअर्जदार क्र. 2 व 3 हे त्यांचे एजंट नाही असे सर्व्हीसींग रिपोर्ट स्पष्ट दिसते, अर्जदारांना व्यवस्थीत सर्व्हीसिंग देण्यात आली आहे परंतु सेवा ही कुठेच नाकारलेली नाही. गाडी चालवीण्याच्या पध्दतीमुळे किंवा व्यवस्थीत देखभाल न केल्यामुळे तसेच रस्त्याची परिस्थितीमुळे, गाडीत लादलेल्या मालाचे वजन इ.कारणामुळे गाडीत दोष निर्माण होऊ शकतो. प्रत्येक गाडीची कडक गुणवत्ता चाचणी करुनच वाहन देण्या आधी त्याचे इन्सपेक्शन केले जाते व सर्व तपासण्या केल्यानंतर गाडी ताब्यात दिले जाते. गैरअर्जदार यांचा कर्जाशी, गाडी जप्त करण्यावर काही संबंध नाही. अर्जदाराकडुन कुठलाही कायदेशीर नोटीस त्यांना मिळालेली नाही. म्हणुन प्रस्तुत तक्रार ही तथ्यहिन आहे ती खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार क्र. 1 ,2 व 3 यांनी पुरावे म्हणुन आपापले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 – अर्जदार यांचा पहीला आरोप की, अर्जदाराने तक्रार पहिल्यांदा गैरअर्जदार क्र. 1 यांचे फायनांन्स कंपनीवर आहे. यांचे म्हणणे की, ते नियमितपणे हप्ते भरत असतांना गैरअर्जदारक्र. 1 यांनी दि.20/08/2009 रोजी यांचे वाहन जप्त केले व वाहन जप्त करते वेळी त्यांना सुचना अथवा लेखी नोटीस दिली नाही तसेच गैरअर्जदारांनी जबरदस्तीने गुंड लोकांना हाताशी धरुन गाडी जप्त केली. गाडी जप्त करते वेळी गाडीमध्ये तीन क्विंटल ज्वारी, एक क्विंटल गहु, 45 किलो तुरडाळ व तसेच दहा किलो मुगदाळ तसेच गाडीच्या डिक्कीत नगदी रक्कम रु.3,200/- होते. गैरअर्जदार क्र. 1 यांनी दिलेल्या पुराव्यावरुन हे स्पष्ट दिसुन येते की, अर्जदार हे गैरअर्जदाराचे हप्ते ठरल्याप्रमाणे नियमित हप्ते भरत नव्हते व एक रक्कमी देखील भरली नव्हती. त्यामुळे अर्जदार हे हप्ते भरण्यास नियमित होते असे दिसते नाही. गैरअर्जदार क्र. 2 यांनी आपल्या लेखी म्हणण्यात त्या विषयी तारखा दिलेल्याय आहेत. याप्रमाणे दि.15/01/2009 चा हप्ता अर्जदाराने दि.23/03/2009 ला रु.7,000/- व दि.27/03/2009 ला रु.1,000/- म्हणजे तारखे पेक्षा उशिरा भरले आहे. दुसरा हप्ता दि.15/02/2009 ला असतांना त्यांनी रक्कम रु.6,000/- दि.27/03/2009 ला रु.2,000/- दि.29/04/2009 रोजी असे भरलेले आहेत. तिसरा हप्ता दि.15/03/2009 ला असतांना रु.5,000/- दि.29/04/2009 ला व रु.3,000/- दि.12/06/2009 ला भरला आहे. चाथा हप्ता दि.15/04/2009 रोजी असतांना रु.4,000/- दि.12/06/2009 ला व रु.4,000/- दि.11/07/2009 ला भरला आहे. पाचवा हप्ता दि.15/05/2009 असतांना दि.11/07/2009 ला रु.3,000/- भरले आहे. प्रत्येक उशिराने भरला आहे.यानंतर हप्ता भरलेले नाही पाचव्या महीन्यानंतर आज 7 ते 8 महिने होऊन गेले म्हणजे अर्जदाराकडे जवळ जवळ आठ हप्त्याची रक्कम शिल्लक आहे. गैरअर्जदाराचे म्हणण्यानुसार दि.16/11/2009 रोजी मासिक हप्ता पोटी रु.53,000/- लेटफिस म्हणुन रु.6,466/- गाडी जप्त केल्यानंतर पार्कींग चार्जेस म्हणुन रु.4,388/- असे एकुण रु.63,884/- येणे बाकी आहे. एकंदरीत पाहीले असता, सुरुवातीचा पाचवा हप्ता अर्जदाराने एक रक्कमी भरलेली नाही व प्रत्येक हप्ता हा उशिरा भरलेला आहे. करारनामाच्या क्लॉज 14 प्रमाणे गैरअर्जदार म्हणतात की, त्यांना थकीत बाकी वसुल करण्याचे असल्यास नोटीस देण्याची गरज नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मुलाशी फोनवर बोलले शिवाय नोटीस दिलेली आहे सदर नोटीस या प्रकरणांत दाखल केली आहे. त्यामुळे अर्जदार यांना सुचना दिली नव्हती असे म्हणता येणार नाही. दुसरी गोष्ट वाहन तक्रारीप्रमाणे जबरदस्तीने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरुन जप्त केले असे म्हणणे असेल तर अर्जदाराने त्या वेळेस गैरअर्जदारावर फौजदारी केस दाखल करणे जरुरीचे होते परंतु अशा प्रकारची कुठलीही कार्यवाही अर्जदाराने आजपर्यंत केली नाही किंवा असा पुरावा देखील समोर आणलेला नाही. त्यामुळे गुंड लोका मार्फत वाहन ताब्यात घेतले असे म्हणता येणार नाही. अर्जदाराची तक्रार वाहन जप्त करते वेळेस त्यांच्या वाहनात तीन क्विंटल ज्वारी, एक क्विंटल गहु, 45 किलो तुरडाळ व दहा किलो मुगदाळ व डिक्कीमध्ये रु.3,200/- होते या म्हणण्यासाठी अर्जदाराने कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. गाडी जप्त करतांना वाहनामध्ये बॅटरी एक टायर एमआरएफ 50 टक्के, दोन टायर 25 टक्के एक टायर शिवलेला आहे समोरचा डाव्यासाईडच 155/80 डी 12, डेक नही है, यह सामान के अलावा गाडी में कुछ नही है यासाठी कैलास केंद्रे म्हणुन अर्जदाराच्या प्रती निधीचे सही आहे असा पुरावा आहे. यावरुन अर्जदार म्हणतात असा माल किंवा रक्कम त्या वाहनामध्ये नव्हते असे स्पष्ट होते. अर्जदाराची तिसरी तक्रार गैरअर्जदार क्र.2 डिलर यांच्या विरुध्द आहे गाडीचे इंजीन गरम होत होते, ऑईल डिझेल जास्त लागत होते. अर्जदाराने फ्रि सर्व्हींसींग मिळालेले नाही अशी त्यांची तक्रार होती या विषयी गैरअर्जदाराने जॉबकार्ड दाखल केलेले आहे हे जॉबकार्ड पाहीले असता, पहीली सर्व्हीसिंग अर्जदाराने दि.15/03/2009 ला घेतली यात नियमित तपासणी करुन सर्व्हीसींग करुन ऑईल चेंज करुन ट्रायल देऊन वाहन अर्जदारांना दिले आहे व समाधानकारक काम झाले म्हणुन अर्जदाराने यावर सही केली आहे. दुसरी सर्व्हीसिंग दि.15/05/2009 ला करुन देण्यात आले यानंतर इंजीन बदलेले असे नियमित सर्व्हीसिंगचे काम करुन व दुसरे काम करुन दिले. अर्जदाराने समाधानकारक केले म्हणुन सही करुन दिले आहे. तिसरी सर्व्हींसिंगची तारीख दि.14/07/2009 रोजी देण्यात आली असुन हेही समाधानकारकरित्या काम झाले म्हणुन अर्जदाराने सही करुन दिली आहे. यानंतर सर्व्हींसिंगसाठी अर्जदाराने गाडी आणले का नाही या विषयी अर्जदार काहीही म्हणत नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 यांनी सेवा देण्यात त्रुटी केली असे म्हणता येणार नाही. अर्जदार वाहन ताब्यात घेते वेळेस दि.12/05/2009 रोजी अर्जदाराकडुन समाधान असल्याचे प्रमाणपत्र घेण्यात आलेले आहे. अर्जदाराने आर.टी.ओ. पासींगसाठी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे नगदी रक्कमेची मागणी केली होती. गैरअर्जदार क्र. 2 यांनी वाहनाची आर.सी.बुक इंजीनचे मुळ कॉपी आर.टी.ओ.ची पावती सी.आर.टी.एम. फिटनेस प्रमाणपत्र इ.कागदपत्र दि.19/01/2009 ला दिलेले आहेत, याबद्यल अर्जदाराने सही केलेली आहे. तेंव्हा अर्जदाराचे वाहनामध्ये काय दोष आहे हे अर्जदाराने पुराव्यानिशी सिध्द केले नाही व गैरअर्जदार यांनी फ्रि सर्व्हीसिंग व्यवस्थितरित्या केल्याबद्यल जॉबकार्ड दाखल करुन व अर्जदाराचे त्यावर समाधान झाल्याबद्यलची सहीवरुन वाहनात काही दोष नव्हता व सर्व्हीसिंग देखील व्यवस्थीतरित्या करुन दिलेली आहे. त्यामुळे अर्जदार म्हणतात ती तक्रार सिध्द होत नाही. दि.12/05/2009 रोजी अर्जदाराने वाहन ताब्यात घेतांना देखील प्रि डिलीवरी वाहन पुर्ण तपासुन व तसे पत्र सही करुन वाहन समाधानकारक रित्या ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अर्जदाराची ही तक्रार सिध्द होत नाही. गैरअर्जदार क्र. 1 यांनी दिलेला शेडयुलप्रमाणे दर महा भरावयाचे हप्ते रु.8,000/- जे मे च्या नंतर थकलेल्या आहेत व याबद्यलची नोटीस अर्जदारास गेली आहे या शिवाय दि.17/08/2009 मोहमंद समीर अण्ड पार्टी यांना अर्जदाराने चौकशीच्या कामी नेमलेले होते व यानंतर गाडी जप्त करण्यात आलेली आहे. दर महिना भरावयाची रक्कम याची कल्पना अर्जदारांना 2 – 3 वेळा नोटीस पाठवुन दिलेली आहे. शेवटची नोटीस ही दि.16/11/2009 ची असुन यावर अर्जदार यांचेकडे रु.59,466/- दंड रक्कमेसह येण्याचे बाकी आहेत व ती रक्कम त्यांना मागण्यात आलेली आहे. अर्जदार जर डिफॉल्टर असतील व ठरल्याप्रमाणे हप्ते भरत नसतील तर स्वच्छ हाताने मंचात आले नाही असे म्हणावे लागेल. म्हणुन गैरअर्जदार यांनी जी तक्रार नोंदविली आहे. त्याप्रमाणे गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी ते सिध्द करु शकले नाहीत. अर्जदार यांनी ज्या पावत्या ड्रॉप्टबद्यल पाठवल्याचे दाखल केले आहेत त्या त्या रक्कमेच्या पुढे मागे तारीख म्हणुन गैरअर्जदाराने त्यांच्या खात्यास जमा केलेले आहे व गैरअर्जदार क्र. 2 यांनी जे पावत्या दिलेले आहे त्या वाहनाची खरेदीबद्यच्या पावत्या आहेत. म्हणुन हे कर्जाची रक्कमेत धरता येणार नाही. गैरअर्जदाराने डिसेंबर 2008 ची काही रक्कम इंशुरन्सबद्यल दिलेली आहे तसे कव्हर नोट गैरअर्जदाराने दाखल केली आहे. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज नामंजुर करण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री. बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.एस.आर.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार,लघुलेखक. |