Maharashtra

Nanded

CC/09/95

Kishorji Mangiramji Laturiga - Complainant(s)

Versus

Manegar,Vysya Mank Limited - Opp.Party(s)

ADV.Ardhapurkar

24 Nov 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/95
1. Kishorji Mangiramji Laturiga Shree Dental Clinic Vazirabad NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Manegar,Vysya Mank Limited G.G.Road NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 24 Nov 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
                          प्रकरण दाखल तारीख - 30/04/2009
                          प्रकरण निकाल तारीख 12/03/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
        मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
   
1)   डॉ.कीशोरजी मंगनीरामजी लटूरिया,                 प्रकरण क्र.95/2009
     वय, 57 वर्षे, धंदा डॅटीस्‍ट,
     रा. वजिराबाद, नांदेड.                               
2)   सूप्रिम कीशोरजी लटूरिया                                 प्रकरण क्र.96/2009 वय 28 वर्षे, धंदा चार्टर्ड अकाऊटंट,
     रा. वजिराबाद नांदेड
3)   स्‍मीता रमेशचंद्रजी लटूरिया                               प्रकरण क्र.97/2009
     वय, 45 वर्षे, धंदा घरकाम
     रा. वजिराबाद, नांदेड.
4)   दिलीप श्रीकीशनजी काबरा                                प्रकरण क्र.98/2009                              
     वय, 50 वर्षे, धंदा शेती                                                      अर्जदार रा. टेभूर्णी ता. जाफराबाद जि.जालना.
5)   डॉ.सतीश नंदलालजी लटूरिया,                            प्रकरण क्र.99/2009 वय 41 वर्षे, धंदा वैद्यकीय,
     रा.वजिराबाद , नांदेड.
6)   श्रीराज कीशोरजी लटूरिया                                  प्रकरण क्र.100/2009     वय, 30 वर्षे, धंदा चार्टर्ड अकाऊटंट,
     रा. वजिराबाद नांदेड.
7)   सुभाष रामेश्‍वर गटटाणी,                                     प्रकरण क्र.101/2009    वय, 45 वर्षे, धंदा शेती,
     रा. वजिराबाद नांदेड.
8)   रामेश्‍वर हिरालाल गटटाणी,                                  प्रकरण क्र.102/2009   वय 78 वर्षे, धंदा शेती,
     रा. हदगांव जि. नांदेड
9)   पूजा कीशोरजी लटूरिया,                               प्रकरण क्र.103/2009 वय 52 वर्षे,धंदा घरकाम,
     रा. वजिराबाद, नांदेड.
10) सर्वेश कीशोरजी लटूरिया                                    प्रकरण क्र.104/2009    वय 24 वर्षे,धंदा चार्टर्ड अकाऊटंट,
     रा.वजिराबाद नांदेड.
11) कौसल्‍याबाई बालारामजी सोनी                         प्रकरण क्र.105/2009 वय, 63 वर्षे,धंदा घरकाम
          रा. अनसिंग जि. वाशिम
12) कमलाबाई नंदलालजी हेडा                               प्रकरण क्र.106/2009 वय, 68 वर्षे, धंदा घरकाम
     रा.अनसींग जि.वाशिम
     अर्जदार क्र.2 ते 12 तर्फे आममुखत्‍यार
     अर्जदार क्र.1 डॉ.कीशोरजी मंगनीरामजी लटूरिया,
     वय, 57 वर्षे, धंदा डॅटीस्‍ट,रा. वजिराबाद, नांदेड.
 
विरुध्‍द.
 
1.   आय.एन.जी. वैश्‍य बँक लि.
रजिस्‍टर्ड अन्‍ड कार्पोरेट ऑफिस,
आय.एन.जी.वैश्‍य हाऊस, नं.22,
एम.जी.रोड, बेंगलोर 560 001                   गैरअर्जदार
2.   आय.एन.जी. वैश्‍य बँक लि.
तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक,
जी.जी. रोड, नांदेड शाखा, नांदेड.
 
अर्जदार क्र. 1 ते 12 तर्फे वकील   - अड.वाय.एस. अर्धापूरकर.
गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील    - अड.पी.एस.भक्‍कड.
                              निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य )
 
             अर्जदार डॉ. कीशोरजी लटूरिया स्‍वःताह व  सर्व त्‍यांच्‍या कूटूंबियाचे कर्ता असून त्‍यांनी कूटूंबियाच्‍या वतीने आपल्‍या कूटूंबातील व्‍यक्‍तीच्‍या नांवे गैरअर्जदार बँकेत रक्‍कम गूंतविली होती. अर्जदाराने प्रकरण क्र.95 ते 106/2009 या सर्व अर्जदारांनी वेगवेगळी तक्रार जरी दाखल केली असली   तरी  त्‍यांचे  वतीने  देखील  पॉवर  ऑफ  अटोरनी  द्वारा  तक्रार
डॉ. कीशोरजी लटूरिया यांनीच केली आहे. सर्व प्रकरणात सर्व अर्जदाराची मागणी ही एकच असल्‍याकारणाने व गैरअर्जदार हे सर्व प्रकरणात एकच असल्‍याने आम्‍ही सर्वाचा एकञित निकाल देत आहोत.
              अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे सन 1996-97 पासून एफएफडी अकाऊंटस ( Fix Flexible Deposit)  ठेवलेले होते. या
एफएफडी अकाऊंटस मध्‍ये केव्‍हाही पैसे भरता येतात व काढताही येतात, परंतु पैसे जमा करण्‍याच्‍या दिवशी असलेल्‍या व्‍याज दराप्रमाणे पैसे काढलेल्‍या दिवशी, तेवढया मुदतीचे व्‍याज त्‍यांना मिळते. यासाठी ग्राहकाला पासबूक, चेकबूक देण्‍यात येते. यासाठी कमीत कमी 46 दिवसासाठी रक्‍कम गूंतवावी लागते. अर्जदाराचे त्‍यांचेसह त्‍यांचे कूटूंबातील व्‍यक्‍तीच्‍या नांवावर एकूण 14 एफएफडी अकाऊंटस गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे होत्‍या. सन 1997-98 साली एकाच बँकेत रक्‍कम ठेवणे सोयीचे नव्‍हते व इतर बँकेचा व्‍याज दर जास्‍त होता. अर्जदार हे  ठेवी कमी करण्‍याच्‍या मनस्थितीत असताना गैरअर्जदार क्र.2 चे व्‍यवस्‍थापक यांचे विनंतीनुसार रक्‍कम त्‍यांचेकडेच राहू दिली. त्‍यांनी आश्‍वासन दिले की, रक्‍कम कूठे जरी असली तरी एफएफडी अकाऊंटस प्रमाणे ती लवचिकता असेल व त्‍याप्रमाणे त्‍यांना व्‍याज व चक्रवाढ व्‍याज दर तिन महिन्‍याला मिळेल.  परंतु ठरल्‍याप्रमाणे न होता दि.28.2.1997 रोजी एफएफडी अकाऊंटस मध्‍ये जमा असणा-या रक्‍कमेवर 15 टक्‍के व्‍याज देणे गैरअर्जदार क्र.2 यांनी बंद केले व शाखा व्‍यवस्‍थापक श्री. मोहनराव यांनी त्‍यांचे सोयीनुसार एफएफडी अकाऊंटस मधून ऐडीआर खात्‍यामध्‍ये  त्‍या रक्‍कमा अर्जदार व त्‍यांचे कूटूंबियाच्‍या पूर्व समंतीविना वळविल्‍या. अर्जदाराने रक्‍कम कधी काढली नाही परंतु ठेवी वाढवतच गेले. त्‍यावेळेस त्‍या रक्‍कमेवर 15 टक्‍के व्‍याज त्‍यांना मिळणार होते. यानंतर मोहनराव यांचे जागी आनंदराम यांनी चार्ज घेतला व त्‍यांनी पण अर्जदारांना दिलेली फॅसीलिटी पूढेही चालू राहील असे सांगितले. 2002 साली आनंदराव यांनी ऐडीआर मधील रक्‍कमाना एफएफडी अकाऊंटस प्रमाणे सवलत देता येत नाही असे सांगितले. यानंतर अर्जदारांनी आपले नूकसान होताना पाहून  दि.17.8.2001 रोजी ईमेल द्वारे गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे तक्रार केली तेव्‍हा तत्‍कालीन मॅनेजिंग डायरेक्‍टर श्री.के.बालसुब्रमणीयन  यांनी या संबंधी अधिकारी नेमून चौकशी केली. याप्रमाणे गैरअर्जदार क्र.2 यांनी ठेवलेल्‍या दस्‍ताऐवज बॅंकींग
नियमाला धरुन नव्‍हता असा अभिप्राय दिला. दि.9.3.2009 रोजी वरिष्‍ठानी मागणी मान्‍य केल्‍याचे जे पञ आर.के.शेटटी चे सहीचे  अर्जदार यांना पाठविले. यानंतर अर्जदार व त्‍यांचे सर्व कूटूंबियाना दि.28.2.1997 रोजी जमा एफएफडी अकाऊंटस ठेवीवर द.सा.द.शे. 15 टक्‍के व्‍याज व चक्रवाढ व्‍याज व यानंतर ठेवलेल्‍या रक्‍कमेवर त्‍या वेळी असलेल्‍या व्‍याजाप्रमाणे रक्‍कम व्‍याजासह मिळेल असे सांगितले. अर्जदारानी गैरअर्जदार क्र.2 यांना  Latest   details of accounts  मागितले.   अर्जदारांनी दि.22.4.2009 रोजी  
 
 
Letter of Gratitude  आभार मानणारे पञ आर.के.शेटटी यांना पाठविले. ते त्‍यांना दिलेली मूदत संपण्‍याच्‍यापूर्वी दि.23.4.2009 रोजी मिळाले परंतु परत गैरअर्जदारा मार्फत दि. 6.5.2002 रोजी मूंबई कार्यालयास पञ लिहून त्‍यांनी दिलेली ऑफर अमान्‍य असल्‍याचे कळविले. यानंतर अर्जदारांना गैरअर्जदार यांचेवर कारवाई करावी लागली, त्‍यामूळे बॅंकीग क्षेञातील लोकपाल मूंबई यांचे समक्ष तक्रार क्र.308/RV-03-04 BOS 2002 या अन्‍वये तक्रार दिली. त्‍यात लोकपाल यांना गैरअर्जदार क्र.1 यांचे कडून चूक झाल्‍याचे आढळले व त्‍यांनी गैरअर्जदाराच्‍या दि.9.3.2002 रोजीच्‍या पञाप्रमाणे म्‍हणणे मान्‍य करावे व यानंतर बँकीग लोकपाल यांनी दि3.12.2008 रोजीच्‍या आदेशाप्रमाणे आपली तक्रार योग्‍य फोरममध्‍ये दाखल करण्‍याचे सूचविले.
 

खाते क्रमांक
ठेवीधारकांचे नांव
मुळ ठेव 28.2.97
वाढीव ठेव 28.2.97
एकूण ठेव (मूददल)
हो. रक्‍कम 31.3.09
FFD A/c no.191
कीशोरजी लटूरिया
58,894
3,370
62,264
3,60,183
प्र.क्र.95/09
FFD A/c no.231
कीशोरजी लटूरिया
55,127
14,428
69,555
3,72,958
प्र.क्र.95/09
FFD A/c no.302
सूप्रिम लटूरिया
85,504
3,170
88,674
5,17,224
प्र.क्र.96/09
FFD A/c no.23
स्‍मीता लटूरिया
1,46,831
4,570
1,51,401
8,84,959
प्र.क्र.97/09
FFD A/c no.442
दिलीप काबरा
1,63,869
 
1,63,869
9,71,485
प्र.क्र.98/09
FFD A/c no.233
सतीश लटूरिया
81,535
17,889
99,424
5,36,815
प्र.क्र.99/09
FFD A/c no.301
श्रीराज लटूरिया
73,814
22,619
96,433
5,04,614
प्र.क्र.100/09
FFD A/c no.170
सूभाष गटटाणी
1,12,519
9,988
1,22,507
6,98,741
प्र.क्र.101/09
FFD A/c no.245
रामेश्‍वर गटटाणी
53,186
51,550
1,04,736
6,11,005
प्र.क्र.102/09
FFD A/c no.232
पूजा लटूरिया
1,56,258
31,051
1,87,309
1018700
प्र.क्र.103/09
FFD A/c no.419
पूजा लटूरिया
1338
53,997
55,335
1,82,422
प्र.क्र.103/09
FFD A/c no.303
सर्वेश लटूरिया
25,483
9,230
34,713
1,74,276
प्र.क्र.104/09
FFD A/c no.436
कौसल्‍याबाई सोनी
12,674
 
12,674
75,137
प्र.क्र.105/09
FFD A/c no.219
कमलाबाई हेडा
2,327
1000
3,327
17,082
प्र.क्र.106/09

 
गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांचा मानसिक छळ केला व गैरअर्जदारांनी वाद निर्माण करुन रक्‍कम रोखून धरल्‍यामूळे त्‍या रक्‍कमेचा उपयोग अडचणीच्‍या वेळेस झाला नाही त्‍यामूळे नूकसान झाले. गैरअर्जदाराने
अर्जदारास स्विकृत व्‍याज देण्‍यास नकार दिला. सर्व अर्जदाराचा सरळसरळ वाद एवढाच आहे की, त्‍यांना त्‍यांचे दि.28.2.1997 रोजी जमा असणा-या रक्‍कमेवर एफएफडी अकाऊटंस प्रमाणे 15 टक्‍के व्‍याज व यानंतर दर तिन महिन्‍यानंतर चक्रवाढ व्‍याज व दि.28.2.1997 नंतर जमा केलेल्‍या ठेवीवर तेव्‍हा प्रत्‍यक्ष असलेल्‍या व्‍याज दराप्रमाणे व्‍याजासह पूर्ण रक्‍कम मिळावी व न्‍यायमंचास योग्‍य वाटेल ती समज व आदेश गैरअर्जदार यांचे विरुध्‍द करावा तसेच गैरअर्जदार यांचे गैरकृत्‍या बददल दंड करुन तो जनसामान्‍याच्‍या कामी येईल अशा लोकोपयोगी संस्‍थेला देणगी म्‍हणून द्यावा असे म्‍हटले आहे.
 
              गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. त्‍यांचा पहिला आक्षेप असा आहे की, अर्जदाराची कॉज ऑफ अक्‍शन दि.26.7.2002 रोजी झालेली आहे त्‍यामूळे प्रस्‍तूत प्रकरण हे सात वर्ष झाल्‍यामूळे लिमिटेशनमध्‍ये येत नाही किंवा त्‍यांचा विलंब माफीचा अर्ज देखील नाही. अर्जदार हे Banking Ombudsman  यांचेकडे तक्रार घेऊन गेले होते. जे की दि.3.12.2008 रोजी ला निकाल झाला आहे. परंतु यामूळे लिमिटेशन येणार नाही. अर्जदार व त्‍यांचे कूटूंबिय यांनी गैरअर्जदार यांचेकडे जे पैसे डिपॉझीट मागितले त्‍यांचा उददेश शेअर्स बिसिनेस मध्‍ये नफा कमवीणे असा होता त्‍यामूळे ते कमर्शियल ट्रांजेक्‍शन मानण्‍यात यावे. गैरअर्जदारांनी कोणतीही Unfair Trade Practice  केलेली नाही. गैरअर्जदारांना हे मान्‍य आहे की, अर्जदाराचे खाते हे गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे आहे. त्‍यासाठी त्‍यांना पासबूक, चेकबूक एफएफडी अकाउंटस साठी देण्‍यात आले आहे. हे ही मान्‍य आहे की, एफएफडी अकाउंटस मधील रक्‍कम केव्‍हाही जमा करता येते व केव्‍हाही काढता येत होती. अशा खात्‍यामधून चेक दिले असेल त्‍यासाठी क्रिडीट बॅलेन्‍स असणे आवश्‍यक आहे. हया खात्‍यातून स्‍टॉक इन्‍व्‍हेस्‍टमेंट म्‍हणजे शेअर्स खरेदीसाठी
 
 
रक्‍कम काढता येते. प्रत्‍येक 46 दिवसानंतर व्‍याज काढून घेता येते. परंतु दूस-या बॅकेपेक्षा गैरअर्जदार बँकेचा व्‍याज दर कमी नव्‍हता. गैरअर्जदार क्र.2 यांचे व्‍यवस्‍थापक मोहनराव यांनी कोणतेही आश्‍वासन दिलेले नव्‍हते आणि मूख्‍य कार्यालयाने बँकींग पॉलिसी जी ठरवलेली आहे ती अंमलात आणली गेली पाहिजे. व्‍यवस्‍थापकास ती बदलण्‍याचा अधिकार नाही. त्‍यामूळे कोणताही व्‍यवस्‍थापक टॅक्‍सेस बददल अर्जदार यांनी टीडीआर कार्यालयाला एक वर्षासाठी रक्‍कम जमा केली होती. अर्जदारांना हे माहीत आहे की, एफएफआर ही स्‍कीम ही बँकेने बंद केली असून त्‍यामूळे ऐडीआर अकाउंटस ला रक्‍कम दि.26.7.1997 व दि.10.101997 रोजी वळविण्‍यात आली. अर्जदारांनी रु.10,000/-, रु.10,000/- चे ऐडीआर ठेवलेले होते. मोहनराव यांची बदली 2000मध्‍ये झाली व आनंदराव यांनी असाच व्‍यवहार चालू ठेवतील असे सांगितले हे गैरअर्जदार यांना अमान्‍य आहे. अर्जदारांनी दि.17.1.2008 रोजी मूख्‍य कार्यालयाशी व यानुसार बँक यांनी अर्जदाराशी असलेले संबंध कायम ठेवण्‍यात आले. एफएफडी अकाउंटस वर 15 टक्‍के व्‍याज दर दि.28.2.1997 पासून यानंतरचा वाढीव ठेवीस त्‍यावेळेस असलेल्‍या व्‍याजदरा प्रमाणे देण्‍याचे मान्‍य केले आहे व अशा प्रकारची सेंटलमेंट करण्‍यासाठी अर्जदारांना ऑफर ऑर्डर ही दिली होती व यांची अंतीम दि.15.3.2002 अशी होती. परंतु अर्जदाराकडून कोणत्‍याही प्रकारचे उत्‍तर आले नाही. यानंतर परत एकदा सेंटलमेंटसाठी वाढीव वेळ देण्‍यात आला होता जो की, दि.30.04.2002 पर्यत होता, दि.16.4.2002 रोजी अर्जदार यांना कळविण्‍यात आले व अर्जदाराकडून यांचे प्रति उत्‍तर आले नाही व यापूढेही व्‍याज देण्‍यासाठी गैरअर्जदार यांचेवर बंधन असणार नाही असे म्‍हटले आहे. अर्जदार यांनी दि.22.4.2009ला त्‍यांचे रिजन कार्यालयाला पञ लिहीले. पण या पञातून देखील गैरअर्जदार यांची ऑफर त्‍यांनी स्विकारली की नाही यांचा उलगडा होता नाही. त्‍यामूळे गैरअर्जदार यांनी दि 6.5.2002
ला पञ लिहून ऑफर काढून घेतली आहे असे सांगितले.  गैरअर्जदार यांनी 14 पे ऑर्डर रु.12,52,221/- च्‍या पोस्‍टाने लिफाफया द्वारे पाठविल्‍या  होत्‍या. तो लिफाफा “ refused return to sender “   म्‍हणजे अर्जदाराने स्विकारण्‍यास नकार दिल्‍यामूळे वापस आला. गैरअर्जदारांनी परत दि.2.1.2002 व दि.9.4.2003 ला पञ लिहून मॅटर बंद करण्‍यात आले असून अर्जदाराने मागणी केलेला हीशोब हा चूकीचा असून अर्जदाराने  सन 1997 नंतर कोणतीही रक्‍कम जमा केलेली नाही परंतु जी काही रक्‍कम जमा आहे ती डिव्‍हीडंटची रक्‍कम जमा आहे. अर्जदारांना देण्‍यात आलेली संधी त्‍यांनी स्‍वतः
 
 
 
गमावली आहे. त्‍यामूळे आता 15 टक्‍के व्‍याज त्‍यांना मिळणार नाही. परंतु ऐडीआर चा वर्तमान व्‍याज दर 6.75 टक्‍के असा आहे. गैरअर्जदारांनी अर्जदारास सरळ योग्‍य ती सेवा देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे त्‍यामूळे खर्चासह त्‍यांची तक्रार फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
 
                  अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ,तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे तर्फे पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
          मूददे                                           उत्‍तर
 
1.   अर्जदार यांची तक्रार मूदतीत आहे काय ?                   होय.
2.   अर्जदार यांचा व्‍यवहार हा व्‍यावसायीक आहे काय ?           नाही.
3.   गैरअर्जदार यांचे सेवेत अनूचित प्रकार किंवा ञूटी
     आढळते काय ?                                        होय.           
4. काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                             कारणे
मूददा क्र. 1 ः-
              गैरअर्जदारांशी अर्जदाराचा वाद 1997 पासून जरी असला तरी या तक्रारीच्‍या अनुंषगाने अर्जदार हे Banking Ombudsman यांचेकडे गेले त्‍यांनी यावर सखोल चौकशी करुन काही मूददे त्‍यांचे अखत्‍यारित नाहीत व दोघामध्‍ये compromise  करण्‍यासाठी दोघेही एकञित येत नाहीत असे म्‍हटले आहे. Banking Ombudsman   व बँकींग लोकपाल यांनी अर्जदाराचे प्रकरण दि.3.12.2008 रोजी मेरिटवर निकाली न काढता त्‍यांचे कडील तक्रार बंद करुन अर्जदार यांना योग्‍य त्‍या फोरमकडे तक्रार करावी असे डायरेक्‍शन दिले. याप्रमाणे दि.3.12.2008 ही कॉज ऑफ अक्‍शन धरण्‍यात यावी असे अर्जदार यांनी यूक्‍तीवाद केला व याप्रमाणे दि.3.4.2009 रोजी आदेश होऊन कॉज ऑफ अक्‍शन ही दि.31.12.2008 ला आहे व तक्रार ही दि.30.04.2009 रोजी दाखल करण्‍यात आलेली आहे. म्‍हणजे ग्राहक संरक्षण कायदयाप्रमाणे ही तक्रार मूदतीच्‍या आंतच दाखल करण्‍यात आलेली आहे म्‍हणून तक्रार मूदतीत आहे.
 
मूददा क्र.2 ः-
              अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे वैयक्‍तीक व एफएफडी अकाउंटस त्‍यांचे व त्‍यांचे कूटूंबियांचे नांवाने काढले आहे व या
 
 
खात्‍यात जमा असलेल्‍या रक्‍कमेवर गैरअर्जदार बँक ही व्‍याज देते, या खात्‍यातून शेअर्स खरेदीसाठी डि.डि. काढतात ही एक गैरअर्जदार बँकेने दिलेली सूविधा आहे. त्‍यामूळे आपल्‍या रक्‍कमा हव्‍या त्‍या कारणासाठी काढू शकता. त्‍यामूळे गैरअर्जदार बँकेने जी सेवा दिलेली आहे म्‍हणून त्‍यांला व्‍यावसायीक स्‍वरुप म्‍हणता येणार नाही. अर्जदाराला वैयक्‍तीक व एफएफडी अकाउंटस या दोन्‍ही खात्‍यावर व्‍याज मिळते त्‍यामूळै हे व्‍यावसायीक ट्रान्‍जेक्‍शन नाही असे आम्‍ही ठरवित आहोत.
 
मूददा क्र.3 ः-
              अर्जदार यांची सरळ सरळ अशी मागणी आहे की, त्‍यांना दि.28.2.1997 रोजीच्‍या ठेवीवर 15 टक्‍के व्‍याज व चक्रवाढ व्‍याज मिळावे व दि.28.2.1997 च्‍या ठेवीवर त्‍यावेळेसचा जो व्‍याजाचा दर असेल त्‍याप्रमाणे व्‍याजासह रक्‍कम मिळावी. या तक्रारीला घेऊन 1997 पासून वाद सूरु आहे. हा वाद एवढा प्रदीर्घ काळ चालला आहे यात अर्जदाराची मानसिकता किती बिघडली व ससेहोलपट झाली असेल हे दिसून येते. अर्जदार यांचा एकूण रवयया त्‍यांना त्‍यांचे हक्‍काची जेवढी रक्‍कम मिळणार आहे तेवढीच पाहिजे होते. यापेक्षा जी जास्‍त रक्‍कम मिळेल ती एखादया गरीब संस्‍थेस दान करावी असाही त्‍यांचा मानस आहे. त्‍यामूळे अर्जदार यांचे तक्रारीत खोटेपणा आहे असे दिसत नाही. एकूण 10 ते 12 लाखाची रक्‍कम कित्‍येक वर्ष गैरअर्जदार बँकेत वादात पडू दयावी असे कोणत्‍याही व्‍यक्‍तीस वाटणार नाही. त्‍याऐवेजी तो एकदाची सेंटलमेंट करुन रक्‍कम घेण्‍याचा प्रयत्‍न करील. या अनुंषगाने अर्जदाराने गैरअर्जदार यांचे विरुध्‍द तक्रार केल्‍याचे, व नंतरही गैरअर्जदार हे त्‍यांचे तकारीची दखल घेत नाहीत त्‍यामूळे त्‍यांनी  Banking Ombudsman यांचेकडे आपली तक्रार घेऊन गेले. यात अर्जदार व त्‍यांचे कूटूंबातील व्‍यक्‍तीचे एकूण 14 खाती वर दिलेल्‍या तक्‍त्‍याप्रमाणे दिसून येत आहेत. अर्जदारांनी एफएफडी अकाऊंटसला या 14 खात्‍यात त्‍यांचे व त्‍यांचे कूटूंबियाची रक्‍कम गूंतविली होती व हा व्‍यवहार 1992 पासून चालू होता. एफएफडी अकाऊंटसला कमीत कमी  46 दिवस पर्यत रक्‍कम ठेवावी लागते व यासाठी पासबूक, चेकबूक ही सूविधा देण्‍यात येते. या खात्‍यातून शेअर्स खरेदीसाठी स्‍टॉक इन्‍व्‍हेस्‍टमेंट काढण्‍याची देखील तरतूद आहे. अर्जदाराची एकच तक्रार आहे की, 1997 साली गैरअर्जदार क्र.2 यांचे व्‍यवस्‍थापकाने त्‍यांचे एफएफडी अकाऊंटस मधील रक्‍कमा अर्जदाराच्‍या पूर्व संमतीविना ऐडीआर  अकाउंटसला  ट्रान्‍सफर  केल्‍या.   यांचे उत्‍तर देताना गैरअर्जदार
म्‍हणतात की, दि.27.12.1996 रोजी बँकेने एक सर्कूलर काढले व दि.28.2.1997 रोजी पर्यत एफएफडी अकाऊंटस ठेवीना   त्‍यावेळचे व्‍याज
 
 
त्‍यांना मिळेल हे सांगितले व यानंतर एफएफडी डिपॉझीट हे ओव्‍हर डयू डिपॉझीट समजण्‍यात येईल असे सांगितले. गैरअर्जदाराने त्‍यांचे संमतीविना ही रक्‍कम कशी वळविली या बददल तक्रार केली व त्‍यात  अर्जदार व गैरअर्जदार यांचेत अनेक वेळा पञव्‍यवहार झाला जो की या प्रकरणात दाखल आहे. गैरअर्जदार यांनी दि.27.12.1996 रोजीचे असे सर्कूलर होते हे दाखवून दिले नाही किंवा या प्रकरणात दाखल देखील केले नाही. खरे तर अशा प्रकारचे एफएफडी स्‍कीम ही बंद करण्‍यात आलेली आहे यांचे लेखी नोटीस अर्जदार यांना आरपीएडी पोस्‍टाने पाठवीणे आवश्‍यक होते असे न करता गैरअर्जदार हे म्‍हणतात की, ही नोटीस, नोटीस बोर्डवर लिहीली पण यांचा कोणताही पूरावा उपलब्‍ध नाही म्‍हणून  अर्जदार हे अंधारातच राहीले, त्‍यांचे मते ही स्‍कीम चालूच आहे असे त्‍यांना वाटले. 1997 चे नंतर 1998 ला अजून काही लोकांचे एफएफडी अकाऊंटस गैरअर्जदार यांनी स्विकारले आहेत. म्‍हणजे ही स्‍कीम जर बंद झाल्‍याचे सर्कूलर आहेत असे गैरअर्जदाराचे म्‍हणणे असेल तर त्‍यांनी नंतर एफएफडी अकाऊंटस नवे कसे ओपन केले. जेव्‍हा बँकेच्‍या ही गोष्‍ट लक्षात  येत नाही तेव्‍हा ग्राहकाच्‍या ही गोष्‍ट कशी लक्षात येऊ शकते. तेव्‍हा अर्जदाराच्‍या मते ही स्‍कीम बंद झालीच नव्‍हती यांला पूष्‍ठी मिळते. गैरअर्जदारांनी या प्रकरणात एवढा वाद असताना अर्जदाराची संमती घेतली किंवा एफएफडी अकाऊंटसला मधून ऐडीआर अकाऊंटसला  रक्‍कम ट्रान्‍सफर करण्‍यासाठी फॉर्म वरती सहया घेतल्‍या यांचा लेखी पूरावा मंचासमोर प्रस्‍तूत केला नाही. वर असे ही सांगितले की, केवळ विश्‍वासावर हा व्‍यवहार केलेला आहे. कोणत्‍याही बँकेत असा विश्‍वासाचा व्‍यवहार होत नाही.  एखादया  इसमाने त्‍याने  मला रु.1,00,000/- दया
म्‍हटले व चेक नंतर पाठवितो असे म्‍हटले, असा व्‍यवहार होत नाही किंवा अशा प्रकारचे अनूमान काढणे हे कायदयाचे विरुध्‍द आहे. हे नक्‍की झाले की गैरअर्जदाराने एफएफडी अकाऊंटस मधील रक्‍कम ऐडीआर अकाउंटसमध्‍ये ट्रान्‍सफर केले, त्‍यावेळेस 15 टक्‍के व्‍याज दर हा होता. बॅंकेस 1996 ते 2000 पर्यतचे रेकॉर्ड दाखल करा अशी सूचना दिल्‍यावर आमचेकडे हे रेकॉर्ड उपलब्‍ध नाही असे सांगितले. 97 पासून वाद चालू असेल तर रेकॉर्ड ठेवणे ही त्‍यांची जबाबदारी आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 यांचे व्‍यवस्‍थापक मोहनराव यांचे चौकशीची मागणी केली होती. व मूख्‍य कार्यालयाने लाच मागितली संबंधी, या तक्रारीची त्‍यांचे अधिका-यांनी चौकशी केली होती परंतु त्‍यांचा चौकशी अहवाल मंचासमोर आलेला नाही. गैरअर्जदाराच्‍या मते त्‍यांनी  अर्जदाराच्‍या सर्व तक्रारीची दखल घेऊन व चौकशीअंती अर्जदारांना विंलीगनेस पञ पाठविले त्‍यांस त्‍यांनी ऑफर पञ असे म्‍हटले आहे व ते पञ अर्जदार
 
 
यांना दि.14.3.2002 रोजी मिळाले. यातील मुख्‍य मजकूर असा,  After a careful consideration of the background and your longstanding relationship with the bank, we are happy to advise you about the Bank’s willingness to pay interest at the compounded rate of :-
 
·        15% p.a. on FFD amount with effect from 28.02.1997
·        Actual rate of interest for applicable period on each deposit made after 28.02.1997.
 
Please note that the payments will be made to you and other deposit holders as per prevalent regulations and stipulations and Reserve Bank of India/Income Tax authorities.
 
 यात सरळ सरळ दि.9.3.2002 रोजीचे पञ पाहिले असता असे दिसून येते की, गैरअर्जदार हे एफएफडी अकाऊंटस वर 15 टक्‍के व्‍याज दर दि.28.2.1997 पासून देण्‍यास तयार आहेत व दि.28.2.1997 नंतरच्‍या जमा ठेवीवर त्‍यावेळेचा जो रेट असेल त्‍याप्रमाणे व्‍याज देण्‍यास तयार आहेत.
यासंबंधी  त्‍यांनी दि.15.3.2002 रोजी पर्यत येऊन सेंटलमेंट करावे असे म्‍हटले आहे. यावर आर. के. शेटटी असोशिएटस व्‍हाईस प्रेसिंडट यांची सही आहे. यास लगेच दि.20.3.2002 रोजी अर्जदाराने पञ लिहून त्‍यांस उत्‍तर दिले आहे. यात त्‍यांनी शेवटच्‍या ओळीत My friend, I honoured your advice, As per your suggestion I postponed my further legal proceeding. असा स्‍पष्‍ट उल्‍लेख केला आहे.या पञातच अर्जदाराचे इन्‍टेंशन कळते. अर्जदार यांनी गैरअर्जदारांची ऑफर स्विकारली आहे असे अगदी स्‍पष्‍ट होते. यानंतर गैरअर्जदारांच्‍या मते परत त्‍यांनी अर्जदारास एक पञ लिहीले आहे. तूमच्‍या कडून आमच्‍या ऑफरचा विचार झाला नाही म्‍हणून आम्‍ही परत त्‍यांचे मूदत वाढवून आम्‍हाला वेळ देत आहोत व ही शेवटची संधी असेल असे पञ दि.16.04.2002 रोजी पाठविले त्‍यात Senior Management’s decisions that the settlement proposal was put forward असे म्‍हटले आहे. यांस देखील अर्जदाराने लेटर ऑफ ग्रॅटीटयूड म्‍हणून उत्‍तर दिलेले आहे व हे पञ दि.22.04.2002 रोजी गैरअर्जदार यांना मिळाले आहे याप्रमाणे Sir, when you are accepted & praised my stand on telephone, the dispute was came to an end on 12.02.2002 itself व त्‍यांनी कबूल ही केलेले आहे. म्‍हणजे थोडक्‍यात त्‍यांनी त्‍यांची ऑफर ही दि.30.09.2002 च्‍या आंतच कबूल केलेली आहे. आता मूददा हा आहे की, गैरअर्जदाराला वेळेच्‍या आंतच त्‍यांची ऑफर अर्जदारातर्फे स्‍पष्‍ट कबूल केल्‍याचे नंतर किंबहूना असेही म्‍हणता येईल की, अर्जदार यांची जी मागणी आहे की, 15 टक्‍के व्‍याजाची हमी गैरअर्जदारांनी पञ लिहून तत्‍वता मान्‍य केले आहे. दि.3.10.2001 रोजी
 
 
सूध्‍दा एक पञ के. बालसूब्रम्‍हन्‍यम यांना पाठविले होते. मग गैरअर्जदार म्‍हणतात की, ऑफर कशा बददल ?  आता ऑफर देण्‍याचा किंवा स्विकारण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही. कारण सेंटलमेंट या मूददयावर वरुन गैरअर्जदारांनी अर्जदाराची मागणी ही तत्‍वतः मान्‍य केलेली असून त्‍याप्रमाणे
आता फक्‍त त्‍यासाठी कारवाई होणे एवढेच अपेक्षित आहे. पण पूढील कारवाई न करता गैरअर्जदाराने नाही त्‍या बाबी काढून पूढील प्रोसेस का थांबविली ? मागील वाद जो काही असेल तो असेल परंतु दि.9.3.2002 रोजीच्‍या पञानुसार गैरअर्जदाराने जी कमिटंमेंट दिलेली होती म्‍हणजे अर्जदार यांचे तक्रारीत निश्चितपणे तथ्‍य होते. त्‍याप्रमाणे वागण्‍यावर व गैरअर्जदार यांचे कर्मचा-याच्‍या कृत्‍यावर  पाघंरुन घालण्‍यासाठी गैरअर्जदारांनी हे प्रकरण पूढे वाढविले आहे. कारण गैरअर्जदार यांचे गोष्‍टीत सत्‍यता असती तर ते सेंटलमेंट करण्‍यासाठी निश्चितच तयार झाले नसते. सेंटलमेंट ही कशा प्रकारची आहे ? अर्जदार म्‍हणतात तेच गैरअर्जदाराने मान्‍य केलेले आहे. अर्जदार यांनी त्‍यांचे नांवे व त्‍यांचे कूटूंबातील व्‍यक्‍तीच्‍या नांवाने 14 एफएफडी खाती त्‍यात रु.10,000/- प्रमाणे 117 ऐडीआर वर्ष 1993-1996 मध्‍ये काढले होते हे दि.1.2.2002 च्‍या पञात you have opened 14 SIFFD accounts and ADR for 13 months and 117 ADR receipts गैरअर्जदार यांनी कबूल केले आहे. त्‍यांचा उददेश एवढाच होता की, पाहिजे तेव्‍हा जेवढी रक्‍कम पाहिजे तेवढी रक्‍कम रु.10,000/- च्‍या प्रमाणात काढता येईल म्‍हणजे सगळया रक्‍कमा काढण्‍याची गरज नाही. गैरअर्जदारांनी दि.6.7.2002 रोजी 14 पे ऑर्डर द्वारा रु.12,52,231/- चे अर्जदारांच्‍या नांवे आरपीऐंडी पोस्‍टाने  दि.03.07.2002 रोजी पाठविले आहेत. तो लिफाफा  refuse to take delivery   असा रिमार्क लाऊन गैरअर्जदार यांचेकडे वापस आलेला आहे. अर्जदार या संबंधी म्‍हणतात की, अशा प्रकारचा लिफाफा पाठविला त्‍यावेळेस ते बाहेरगांवी गेले म्‍हणून  त्‍यांना लिफाफा मिळाला नाही, ही गोष्‍ट त्‍यांना ही माहीती होती हे परंतु  अमान्‍य केलेले आहे. यानंतर गैरअर्जदारांनी 2002 पासून काय स्‍टेप्‍स घेतली, तो लिफाफा त्‍यांचेकडे तसाच पडून आहे. यानंतर अर्जदार बँकेत किती वेळा गेला असेल ही किंवा गैरअर्जदाराने त्‍यांचे निदर्शनास आणून दिलेले नाही. कोणत्‍याही व्‍यक्‍तीस रु.12,00,000/- ची
रक्‍कम ही वादात ठेवावी असे कदापी वाटणार नाही. अर्जदाराने अजून एक गोष्‍ट या संबंधी लक्षात आणून दिली की, जर ही स्‍कीम 27.12.1996 ला बंद झाली असेल तर एफएफडी मधील पूर्णच्‍या पूर्ण रक्‍कम रु.10,29,359/-  ही दि.28.2.1997 रोजी ऐडीआर मध्‍ये वळती व्‍हावयास पाहिजे होती परंतु असे न करता गैरअर्जदाराने राऊंड फिगर मध्‍ये रक्‍कम रु.10,15,000/- वळती
 
 
केली व वरील चिल्‍लर रक्‍कम रु.14,359/- ही खात्‍यात तशीच शिल्‍लक ठेवली, अकाउंटस ट्रान्‍सफर करताना पूर्ण रक्‍कम ट्रान्‍सफर करीत असतात. यांचा अर्थ एफएफडी खाते बंद केले गेले असे म्‍हणता येणार नाही. तसेच दि.28.12.1996 रोजी दिलीप काबरा यांचे खाते एफएफडी 442 खाते ओपन केले जर दि.27.12.1996 रोजी खाते बंद झाले होते तर मग नंतर ओपन कसे झाले ? यानंतर देखील गैरअर्जदार यांनी दि.28.2.1997 रोजी नंतर ऐडीआर मधे वळविलेल्‍या रक्‍कमेवर एक वर्ष व त्‍यावरील ठेवीसाठी कूठे 13 टक्‍के, कूठे 11 टक्‍के, कूठे 11.50 टक्‍के व्‍याज असे वेगवेगळे व्‍याज दर दिलेले आहेत. जेव्‍हा एकाच वेळेस रक्‍कम ठेवलेल्‍या आहेत व सारख्‍या मूदतीसाठी ठेवलेल्‍या आहेत तेव्‍हा व्‍याज दर हा वेगवेगळा कसा देता येईल ? सगळया रक्‍कमाना व्‍याज दर हा सारखाच पाहिजे.  इथेही गैरअर्जदाराने अनूचित प्रकार केला आहे असे म्‍हटल्‍यास वावगे ठरणार नाही. उर्वरित रक्‍कमेवर जास्‍तीचा व्‍याज दर म्‍हणजे 13 टक्‍के हाच व्‍याज दर सर्व रक्‍कमेवर गैरअर्जदाराने दिला पाहिजे या मतास आम्‍ही आलो आहोत. अर्जदार यांचे गैरअर्जदार क्र.2 मोहनराव यांचे विरुध्‍द अनेक तक्रारी आहेत. यात लाच मागितल्‍याची तक्रार आहे. यात गैरअर्जदार क्र.1 यांनी सखोल चौकशी करुन त्‍यांचे विरुध्‍द काय निर्णय घेतला हे त्‍यांनाच माहीती आहे, या बाबत त्‍यांचे राईट असल्‍यामूळे आम्‍ही काही बोलणार नाही. पण एवढे निश्चित की, गैरअर्जदार क्र.2 यांचे व्‍यवस्‍थापकाने अर्जदार यांना सेवा देण्‍याच्‍या प्रकरणात अनूचित प्रकार केलेला आहे असे म्‍हणता येईल. दाखल
केलेले सर्व कागदपञ, पञव्‍यवहार, Banking Ombudsman, यांचा चौकशी अहवाल इत्‍यादी सर्व गोष्‍टीचे अवलोकन केले असता गैरअर्जदाराने निश्चितपणे सेवेत ञूटी म्‍हटल्‍यापेक्षा अनूचित प्रकार केलेला आहे असे म्‍हणता येईल. गैरअर्जदाराने असेही म्‍हटले आहे की, अर्जदारानी डिसचार्ज व्‍हाऊचर वर त्‍यांचे व त्‍यांचे कूटूंबियाच्‍या सहया करुन दिलेल्‍या नाहीत. त्‍याअनुषंगाने त्‍यांना पञ देखील दिलेले आहे. सर्व अर्जदार हे वेगवेगळे जरी असले तरी व त्‍यांचे मागणी वेगवेगळी नाही, गैरअर्जदाराने सर्वाच्‍या वतीने अर्जदारास म्‍हणजे डॉ. किशोरजी लटूरिया यांना उददेशूनच सर्व पञव्‍यवहार केलेला आहे. त्‍यामूळे अर्जदार डॉ. किशोरजी लटूरिया  यांनी केलेली तक्रार ही सर्व 14  लोकांसाठी   असून    गैरअर्जदार   यांचे  म्‍हणण्‍या  प्रमाणे    फक्‍त
डॉ. किशोरजी लटूरिया हे एकच तक्रार घेऊन आले. त्‍यामूळे त्‍यांचीच मागणी मान्‍य करण्‍यात यावी व इतराची मागणी मान्‍य करु नये असा यूक्‍तीवाद मान्‍य करता येणार नाही व डॉ. किशोरजी लटूरिया व त्‍यांचे इतर कूटूंबिय यांना   सर्वानाच  दि.9.3.2002  रोजीच्‍या   पञाचा  लाभ  देता  येईल.
 
 
दि.9.3.2002 यांचे पञावर व नंतर ऑफर जे रिफूज केली त्‍या पञावर आर.के.शेटटी यांच्‍या सहया आहेत व हूददा वेगवेगळा लिहीलेला आहे. हा ही प्रकार दिशाभूल करणारा आहे.आर.के.शेटटी AVP मूंबई म्‍हणजे बँकेच्‍या एक जवाबदार अधिका-यांची सही आहे, कोणी अ-या गैरा कर्मचारी नाही म्‍हणून यांस विशेष महत्‍व आहे. यूक्‍तीवाद चालू असताना गैरअर्जदार यांनी दि.16.12.2009 रोजीला एक बंद लिफाफा जो आरपीऐडी पोस्‍टाने त्‍यांचेकडे वापस आला, त्‍यात पे ऑर्डरस व अकाऊंटस स्‍टेटमेंट आहेत ते आमच्‍या समक्ष उघडले आहेत. ही अशी कृती त्‍यांनी केलेली आहे तशी कृती त्‍यांनी त्‍यांचे दि.9.3.2002 चे ऑफर ऑर्डर प्रमाणे 15 टक्‍के व्‍याज दराने करुन दिलेल्‍या ऑर्डर अर्जदार यांना दिलेल्‍या असतील तर  हा वाद त्‍यांच दिवशी तेथेच संपला असता परंतु यानंतर लागणारा भूर्दड गैरअर्जदार यांना लागला
नसता. अर्जदाराने दि.28.2.1997 रोजी पर्यत कोणतीही रक्‍कम काढून घेतलेली नाही. बँक ही जनतेचा पैसा सूरक्षित ठेवते,  तेथे जर गैरप्रकार व्‍हायला लागले तर बॅंके वरचा विश्‍वास जो आजही आहे तो यानंतर नीघून जाईल. पैसा अर्जदाराचा आजही बँकेत सूरक्षित आहे फक्‍त वाद हा व्‍याज देण्‍या बददलचा आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना वाढीव मूदत दि.30.4.2002 पर्यत दिली होती. पण गैरअर्जदार यांना दि.22.4.2002 रोजीचे अर्जदार यांचे पञ Acceptance  म्‍हणजे मूदतीचे आंत व त्‍याआधी दि.20.3.2002 रोजीचे पञ दिले आहे, अर्जदार यांचे मागणीप्रमाणे दि.31.3.2009 पर्यत प्रत्‍येकांची रक्‍कम पूढील प्रमाणे होते,

खाते क्रमांक
ठेवीधारकांचे नांव
मुळ ठेव 28.2.97
वाढीव ठेव 28.2.97
एकूण ठेव (मूददल)
हो. रक्‍कम 31.3.09
FFD A/c no.191
कीशोरजी लटूरिया
58,894
3,370
62,264
3,60,183
प्र.क्र.95/09
FFD A/c no.231
कीशोरजी लटूरिया
55,127
14,428
69,555
3,72,958
प्र.क्र.95/09
FFD A/c no.302
सूप्रिम लटूरिया
85,504
3,170
88,674
5,17,224
प्र.क्र.96/09
FFD A/c no.23
स्‍मीता लटूरिया
1,46,831
4,570
1,51,401
8,84,959
प्र.क्र.97/09
FFD A/c no.442
दिलीप काबरा
1,63,869
 
1,63,869
9,71,485
प्र.क्र.98/09
FFD A/c no.233
सतीश लटूरिया
81,535
17,889
99,424
5,36,815
प्र.क्र.99/09
FFD A/c no.301
श्रीराज लटूरिया
73,814
22,619
96,433
5,04,614
प्र.क्र.100/09
FFD A/c no.170
सूभाष गटटाणी
1,12,519
9,988
1,22,507
6,98,741
प्र.क्र.101/09
FFD A/c no.245
रामेश्‍वर गटटाणी
53,186
51,550
1,04,736
6,11,005
प्र.क्र.102/09
FFD A/c no.232
पूजा लटूरिया
1,56,258
31,051
1,87,309
1018700
प्र.क्र.103/09
FFD A/c no.419
पूजा लटूरिया
1338
53,997
55,335
1,82,422
प्र.क्र.103/09
FFD A/c no.303
सर्वेश लटूरिया
25,483
9,230
34,713
1,74,276
प्र.क्र.104/09
FFD A/c no.436
कौसल्‍याबाई सोनी
12,674
 
12,674
75,137
प्र.क्र.105/09
FFD A/c no.219
कमलाबाई हेडा
2,327
1000
3,327
17,082
प्र.क्र.106/09

 
              एकंदर या सर्व प्रकरणाचे अवलोकन केल्‍यानंतर व यांचा निचोड  म्‍हणजे दि.09.03.2002 रोजीचे पञ हे ऑफर नसून 15 टक्‍के व्‍याज देण्‍याची गैरअर्जदार यांनी इच्‍छा दर्शवली होती, व तीच अर्जदार यांची मागणी होती, त्‍यामूळे त्‍यांस OFFER letter  च म्‍हणणे चूक आहे. त्‍या अनुषंगाने सेंटलमेंटचा प्रश्‍नच उदभवत नाही, त्‍यात फक्‍त गैरअर्जदारातर्फे कार्यवाही अपेक्षित होती. वरील सर्व बाबी तपासून आम्‍ही खालील प्रमाणे आदेश करीत आहोत.
                             आदेश
1)                                         अर्जदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
2)                                         गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी सर्व अर्जदाराच्‍या नांवे दि.28.2.1997 रोजी असलेली एफएफडी/ऐडीआर ची रक्‍कम ही दि.9.3.2002 च्‍या पञात कबूल केल्‍याप्रमाणे 15 टक्‍के व्‍याजाने व दर तिन महिन्‍याच्‍या हीशोबाने चक्रवाढ  व्‍याजासह पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत दयावेत, दि.28.2.1997 रोजी नंतरच्‍या ठेवीवर  13 टक्‍के व्‍याजाने व  दर  तिन  महिन्‍याच्‍या  हीशोबाने चक्रवाढ व्‍याजाने
                   व्‍याजासह पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत व्‍याजासह दयावेत.    
                   यासाठी अर्जदार यांनी स्‍वःताह बँकेत जाऊन डिसचार्ज  
                   व्‍हाऊचर वर सही करुन नियमांची पुर्तता करावी.
    
3)                                         व्‍याज दिल्‍यामूळे वेगळी नूकसान भरपाई नाही.
 
4)                                         अर्जदारास झालेल्‍या मानसिक ञासाबददल प्रत्‍येक अर्जदारास रु.25,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- दयावेत.
 
5)                                         प्रकरणातील मूळ निकालाची प्रत  प्रकरण क्र.95/2009 मध्‍ये ठेवण्‍यात येते.
 
6)                                         मिळणा-या व्‍याजावर इन्‍कम टँक्‍स नियमांचे पालन
          करण्‍यात यावे, यात मानसिक ञास व दावा खर्च ही     
          रक्‍कम धरण्‍यात येऊ नये.
 
7)                                          पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                                                    श्री.सतीश सामते     
         अध्‍यक्ष                                                                                           सदस्‍य
 
 
 
 
जयंत पारवेकर,
लघुलेखक