जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.2009/64 प्रकरण दाखल दिनांक – 18/03/2009 प्रकरण निकाल दिनांक – 06/06/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. श्रीमती सुजाता पाटणकर सदस्या. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. दिलीप पि. कोंडीबा पुयड (कामठेकर) वय 32 वर्षे, धंदा शेती, अर्जदार रा.कामठा ता.जि.नांदेड. विरुध्द व्यवस्थापक, वैजनाथ ग्यानोबाराव पिंपळपल्ले, जय शिवराय नागरी सहकारी बॅंक लि. गैरअर्जदार शाख विद्यूतनगर, आनंदनगर, नांदेड. अर्जदारा तर्फे - अड.के.एस.पाटील. गैरअर्जदारा तर्फे - कोणीही हजर नाही. निकालपत्र (द्वारा,मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या) गैरअर्जदार बँकेच्या सेवेच्या ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार बँकेत मूदत ठेव योजने अंतर्गत रु.12,021/- दि.19.5.2003 रोजी मूदत ठेव पावती क्र.6063 द्वारे जमा केले. या योजनेची मूदत दि.19.11.2008 रोजी संपली. मूदतीनंतर अर्जदारास रु.24,296/- गैरअर्जदार हे देय होते. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे रक्कमे बददल वेळोवेळी रक्कमेची मागणी केली. तसेच दि.20.11.2008 रोजी गैरअर्जदारास लेखी स्वरुपात मागणी केली असता गैरअर्जदार यांनी सदर रक्कम देण्यास असमर्थता दर्शविली. सदर रक्कमेची अर्जदारास शेती व गृह खर्चासाठी आवश्यकता आहे. अर्जदार शेतात वेळेवर बि, बियाणे, खत, औषधे घेऊ शकला नाही त्यामूळे त्याचे उत्पन्न कमी झाले त्यामूळे त्यांचे रु.20,000/- चे नूकसान झाले. गैरअर्जदाराने मूददामहून ञास देण्याचे उददेशाने रक्कम देण्यास टाळाटाळ केली. असे करुन गैरअर्जदारांनी सेवेत कमतरता केलेली आहे. त्यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, मूदत ठेव रक्कम रु.24,296/- 18 टक्के व्याजासह मिळावेत, तसेच शारीरिक व मानसिक व आर्थिक ञासाबददल रु.30,000/- व दावा खर्च म्हणून रु.3,000/- मिळावेत. गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस पाठविण्यात आली, नोटीसही मिळूनही ते हजर झाले नाही म्हणून त्यांचे एकतर्फा आदेश करण्यात आला. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच अर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत काय होय. 2. गैरअर्जदार यांनी सेवेमध्ये कमतरता केली आहे 2. काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुददा क्र.1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार बँकेमध्ये दि.19.5.2003 रोजी रक्कम रु.12,021/- इतकी रक्कम मूदत ठेव योजने अंतर्गत गुंतवलेली आहे. सदरची मूदत ठेव योजनेचा कालावधी दि.19.5.2003 ते दि.19.11.2008 असा आहे. म्हणजे अर्जदार यांचे मुदत ठेव योजनेचा कालावधी दि.20.11.2008 रोजी संपलेला आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत गैरअर्जदार बॅंकेकडे मूदत ठेव योजने अंतर्गत ठेवलेल्या मूदत ठेवीची झेरॉक्स प्रत या मंचामध्ये दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी सदरच्या अर्जाची नोटीस देऊनही गैरअर्जदार या मंचामध्ये हजर झालेले नाहीत अगर अर्जदार यांचे अर्जातील कथन गैरअर्जदार यांनी म्हणणे देऊन अगर शपथपञ देऊन नाकारलेले नाही. अर्जदार यांचा अर्ज त्यांनी दाखल केलेले मूदत ठेव पावती यांचा विचार होता अर्जदार हे गेरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांनी गेरअर्जदार बॅंकेकडे ठेवलेलया मूदत ठेव योजनेची मूदत पूर्ण झाल्यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार बँकेकडे सदरची रक्कमेची लेखी व तोंडी मागणी करुनही गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सदरची रक्कम दिलेली नाही. अर्जदार यांनी त्यांचे अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्जदार यांना सदरची रक्कम न मिळाल्याने अर्जदार यांना शेतीसाठी बि, बियाणे, खत व औषधे ते घेऊन शकले नसल्याने अर्जदार यांना शेतीमध्ये उत्पन्न कमी झाले. त्यामूळे रक्कम रु.20,000/- चे नूकसान झाले असे म्हटले आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत गैरअर्जदार बँकेला दि.20.11.2008 रोजी लेखी अर्ज देऊन मूदत ठेवीची रक्कम मागितलेली आहे. सदरचा अर्ज गैरअर्जदार बँकेला मिळाल्याची पोहचही सदर अर्जावर नमूद आहे. अर्जदार यांनी रु.12,021 /- इतकी रक्कम गैरअर्जदार बँकेकडे दि.19.5.2003 रोजी गूंतवलेली आहे. सदर योजनेचा कालावधी दि.19.11.2008 रोजी संपलेला आहे. म्हणजेच अर्जदार हे रक्कम रु.24,296/- गैरअर्जदार यांचेकडून मिळण्यास पाञ असतानाही गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सदरची रककम कोणतेही योग्य व संयूक्तीक कारण नसताना दिलेली नाही गर सदरची रक्कम का दिली नाही ? या बाबतही कोणताही खूलासा गैरअर्जदार यांनी या मंचामध्ये दिलेला नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञे यांचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे मूदत ठेवीची रक्कम कोणतेही योग्य व संयूक्तीक कारण नसताना अनेकदा लेखी व तोंडी मागणी करुनही दिलेली नाही यांचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांची मूदत ठेवीची मूदत पूर्ण होऊनही गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना रक्कम दिलेली नाही अगर सदरची रक्कम देणे बाबत विलंब अगर का दिली नाही ? यांचे समर्थनार्थ लेखी खूलासा दिलेला नाही यांचा विचार होता अर्जदार यांची रक्कम रु.24,296/- ही मूदत ठेवीची रककम दि.19.11.2008 रोजी पासून गैरअर्जदार यांचेकडे नाहक गूंतून पडलेली आहे. सदरची रक्कम मिळण्यासाठी अर्जदार यांना या मंचामध्ये अर्ज दाखल करावा लागला आहे आणि त्या अनुषंगाने खर्चही करावा लागलेला आहे. यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून अर्जाचे खर्चापोटी व मानसिक ञासापोटी रक्कम वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदारांचा अर्ज, शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद यांचा विचार होता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 1. आजपासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना गैरअर्जदार यांनी खालील प्रमाणे रक्कमा दयावेत, 1. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना मूदत ठेवीची रक्कम रु.24,296/- दयावेत. 1.2. रक्कम रु.24,296/- वर दि.20.11.2008 पासून प्रत्यक्ष रक्कम पदरीपडेपर्यत 9 टक्के दराने व्याजासहीत होणारी रक्कम दयावी. 1.3. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना मानसिक ञासापोटी रु.2,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- दयावेत. 1. 2. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |