सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांचेसमोर.
दरखास्त क्रमांक - 06/2012
श्री विलास विष्णू कुर्ले
रा.कुलवाडी उभादांडा,
ता.वेंगुर्ला, जिल्हा- सिंधुदुर्ग 416516 ... फिर्यादी.
विरुध्द
1) मिळकत व्यवस्थापक,
कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ,
पोटमाळा गृहनिर्माण भवन,
बांद्रे (पुर्व) मुंबई – 400 051
2) मुख्य अधिकारी,
कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ,
पोटमाळा गृहनिर्माण भवन,
बांद्रे (पुर्व) मुंबई – 400 051 ... सामनेवाला/आरोपी
- आदेश –
(दि.27/02/2013)
1) मूळ तक्रार क्रमांक 114/2008 मधील पारीत निकालपत्राची विरुध्द पक्षाने अंमलबजावणी न केल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 27 अंतर्गत सदरचे दरखास्त प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
2) सदर दरखास्तीचे नोटीस विरुध्द पक्ष यांना बजावण्यात आले. दरम्यान सामनेवाला आरोपी यांनी उपरोक्त आदेशाप्रमाणे सर्व रक्कमेचा धनाकर्ष फिर्यादीस अदा करीत असल्याची पुरसीस नि.7 वर उभय पक्षाने दाखल केली असून सामनेवाला/आरोपी यांचेविरुध्द कोणतीही तक्रार उरली नसल्याचे कथन केले आहे. दरम्यान जिल्हा मंचाची बैठक न झाल्याने सदरचे प्रकरण आज आदेशासाठी ठेवण्यात आले. त्यामुळे सदरचे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- आदेश -
1) तक्रारदार यांनी नि.7 वर दाखल केलेल्या पुरसिसनुसार सदरचे दरखास्त प्रकरण निकाली काढण्यात येते.
2) खर्चाबद्दल काही हुकूम नाही
ठिकाण- सिंधुदुर्गनगरी.
दिनांक - 27/02/2013
Sd/- sd/- sd/-
(उल्का गावकर) (डी. डी. मडके) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सिंधुदुर्ग