जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/257 प्रकरण दाखल तारीख - 16/11/2009 प्रकरण निकाल तारीख – 29/09/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. लक्ष्मण पि. मस्नाजी टोके वय 45 वर्षे, धंदा अटोचालक अर्जदार रा.दावणगीर, ता.देगलूर जि.नांदेड विरुध्द. 1. व्यवस्थापक, ईगल अटो, पिआजिओ व्हेईकल्स प्रा.लि. ज्योती टॉकीज रोड,शिवाजी नगर,नांदेड. 2. वीभागीय व्यवस्थापक, रिलायन्स जनरल इन्शूरन्स कंपनी लि. रजिस्टर्ड ऑफिस रिलायन्स सेंटर-19, वॉलचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट मुंबई-01. 3. व्यवस्थापक, मनीधरी अन्ड मनधिरी फायनान्स लि. 521/ए,आर्य समाज मंदिराच्या पाठीमागे, सी.ए.रोड, नागपूर-18. गैरअर्जदार 4. अशोक पि. माधव कंधारे रा. शेवडी ता. लोहा जि.नांदेड. 5. व्यवस्थापक, न्यू इंडिया अशूरन्स कंपनी लि. लाहोटी कॉम्प्लेक्स, वजिराबाद, नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.यू.एस.कसबे गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकील - अड.कदम ए.जी. गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील - वगळण्यात आले. गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील - अड.आर.जी.हटकर गैरअर्जदार क्र.5 तर्फे वकील - अड.एस.व्ही.राहेरकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदारांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदारांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, दि.02.01.2009 रोजी गैरअर्जदार क्र.1 कडून अपे पिआजिओ डिझेल पॅसेजर ऑटो क्र.एम.एच.-24-जी/4654 वीकत घेतला. सदरील वाहनाचा विमा गैरअर्जदार क्र.2 कडून उतरवीण्यात आला. सदर वाहनासाठी अर्थसहाय गैरअर्जदार क्र.3 कडून घेण्यात आले होते. दि.31.03.2009 रोजी चालकाने ऑटोमध्ये काही प्रवासी घेऊन मरखेल येथून हानेगांवकडे जात होता तेव्हा समोरुन येणा-या काळी पिवळी जीप क्र.एम.एच.-26-बी-9201 हानेगावंहून मरखेल कडे भरधाव वेगात निष्काळजीपणे तसेच हईगईने चालवून जिपने अर्जदार यांचे ऑटोस जोराची धड दिली. यात ऑटो चालकास गंभीर दूखापत झाली व ऑटोमधील प्रवासी जखमी झाले तसेच ऑटोचे अंदाजे रु.25,000/- ते 30,000/- नूकसान झाले.घटनेची माहीती पोलिस स्टेशन मरखेल यांना देण्यात आली व त्यांनी घटनास्थळावर येऊन घटनेचा पंचनामा केला व जिप चालकाचे विरुध्द गून्हा नंबर 17/2009 द्वारे गून्हा नोंदविण्यात आला.जीप चालकास अटक करण्यात आली, मा. न्यायदंडाधीकारी देगलूर यांचेकडे केस प्रंलबित आहे. सदर काळीपिवळी जिपचा गैरअर्जदार क्र.5 यांचेकडे विमा उतरविण्यात आलेला आहे. ऑटोचे झालेले नूकसान, ऑटो दूरुस्तीसाठी लागलेला खर्च, मानसिक ञास, ऑटो बंद असल्यामूळे झालेले नूकसान असे एकूण रु.1,75,000/- गैरअर्जदारांकडून मिळावेत. दोन्हीही विमा कंपन्यानी विम्यापोटी भरलेलया रक्कमेमूळे विमाधारकास नूकसान भरपाई व इतर खर्च देण्यास ते जबाबदार आहेत.अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 कडे जाऊन विम्याची रक्कम मागितली परंतु त्यांनी साफ इन्कार केला.त्यानंतर गैरअर्जदार क्र.1,2,4 व 5 यांना वकिलामार्फत दि.04.09.2009 रोजी नोटीस दिली परंतु तरी अर्जदाराच्या मागणीची पूर्तता केली नाही.ऑटो बंद असल्यामूळे गैरअर्जदार क्र.3 कडे हप्त्याची पूर्तता करता आली नाही. ऑटो दूरुस्त झाल्याबरोबर गैरअर्जदार क्र.3 यांनी ऑटो जप्त करुन घेतला आहे.म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, अर्जदाराचे ऑटोची नूकसान भरपाई रु.1,75,000/- तक्रार दाखल केल्या तारखेपासून मंजूर करण्यात यावेत. गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस पाठविण्यात आली नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालवीण्यात आले. गैरअर्जदार क्र.2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.अर्जदाराची तक्रार खोटी असून ती फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे.अर्जदाराचे ऑटो चालक असिफ मदरसाहेब शेख हे ऑटो चालवित असताना व्हॅलिड व इफेक्टीव्ह ड्रायव्हीग लायसन्स नव्हते.अर्जदाराच्या ऑटोचा दि.031.03.2009 रोजी अपघात झाला व त्यामध्ये रु.30,000/- चे नूकसान झाले हे त्यांना मान्य नाही. सदर प्रकरणामध्ये अर्जदाराच्या ऑटोने जिपला धडक दिली आहे.जिपच्या ड्रायव्हरने निष्काळजीपणे वाहन चालविल्यामूळे अपघात झालेला नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे ऑटोची पॉलिसी दि.02.01.2009 ते दि.01.01.2010 या कालावधीसाठी काढलेली आहे पण पॉलिसी कंडीशन प्रमाणे ऑटोच्या चालकाकडे व्हॅलिड लायसन्स असणे आवश्यक आहे. त्यामूळे अर्जदाराच्या ऑटो चालकाकडे ऑटोचा अपघात झाला त्यावेळेस व्हॅलिड लायसन्स नव्हते.म्हणून दावा फेटाळण्यात आला. अर्जदाराच्या चालकाकडे असीफ शेख यांचेकडे LMV (TR) लायसन्स होते, ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस तो Auto Rickshaw (Tr) हे वाहन चालवित होता. अर्जदाराच्या वाहनास 3 + 1 ची पासिंग होती, ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळच्या पोलिस पंचनाम्यानुसार ऑटोमध्ये 5 माणसे व दोन मूले होती.त्यामूळे त्यांनी पॉलिसी कंडीशनचे उल्लंघन केलेले आहे. पॉलिसी कंडीशन General Exclusion No. 3(a)and (b) नुसार व्हॅलिड लायसन्स नव्हते तसेच जास्तीचे सिट ऑटो मध्ये होते. त्यामळे पॉलिसीच्या कंडीशनचे उल्लंघन झालेले आहे. गैरअर्जदार यांनी सर्व्हेअर नियूक्त केला होता त्यांनी सर्व्हे करुन अर्जदाराच्या ऑटोचे नूकसान रु.28,478.78 झाल्याचे म्हटले आहे. म्हणून अर्जदाराचा अर्ज रु.10,000/-खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.3 यांचे विरुध्द जाहीर प्रगटनासाठी अर्जदारांनी स्टेप्स घ्यावी यासाठी प्रकरण ठेवण्यात आले होते परंतु अर्जदारांनी काही स्टेप्स न घेतल्यामूळे प्रकरण गैरअर्जदार क्र.3 विरुध्द खारीज करण्यात आले. गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील हजर झाले पण अनेक वेळा संधी देऊनही त्यांनी जवाब दाखल केला नाही म्हणून त्यांचे विरुध्द नो से चा आदेश करण्यात आला. गैरअर्जदार क्र.5 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार हे त्यांचे ग्राहक नाहीत, तसेच त्यांचेकडून कोणतीही सेवेत ञूटी झालेली नाही. त्यामूळे अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. वस्तूत अर्जदारासाठी कंपनी ही थर्ड पार्टी पक्ष आहे व तृतीय पक्षाबाबतचे अपघाता बददलचे वाद चालविणेसाठी मोटर वाहन कायदयाच्या कलम 165 प्रमाणे नांदेड येथे मोटार वाहन प्राधिकरण स्थापन झालेले आहे. विनाकारण गैरअर्जदार यांना प्रतीवादी केल्यामूळे अर्जदाराचा दावा हा Mis-Joinder of parties या कारणाखाली खारीज करण्यात यावा असे म्हटले आहे. ज्या जिपचा (जिप क्र.एम.एच-26-बी-9201 ) अपघात झाला तिच्या नूकसानीचे मूल्यमापन करुन रु.30,824/- बिल चेक रिपोर्ट प्रमाणे फूल अन्ड फायनल रक्कम म्हणून दिलेले आहेत. अर्जदाराच्या चूकीमूळे हा अपघात झालेला आहे. हे त्यांना मान्य नाही की, सदरील अपघात हा जिपच्या चूकीमूळे झाला म्हणून रु.1,75,000/- चे नूकसान झाले हे त्यांना मान्य नाही.अर्जदाराच्या वकिलाच्या नोटीसला गैरअर्जदारांच्या वकिलांनी उत्तर पाठविले आहे.सदर ऑटोचा विमा हा गैरअर्जदार क्र.2 यांनी घेतलेला हा त्यामूळे विमा रक्कम देण्याची जबाबदारी त्यांची आहे म्हणून सदरची तक्रार ही खर्चासहीत खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.2 व 5 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून दि.02.01.2009 रोजी अपे पिआजिओ डिझेल पॅसेजर ऑटो क्र.एम.एच.-24-जी/4654 वीकत घेतला होता. अटोसाठी त्यांनी गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून कर्ज घेतले होते.यात गैरअर्जदार क्र.1 यांचा कूठलाही रोल नसताना त्यांना अनावश्यक पार्टी केले गेले व गैरअर्जदार क्र.3 यांनी कर्ज दिलेले आहे. त्यामूळे यांचाही अपघातासंबंधी कूठलाही संबंध नाही. त्यांना या न्याय मंचाने नोटीस पाठविली असता ती नोटीस मीळाली नाही व अर्जदाराने यावीषयी कोणतीही स्टेप्स घेतली नाही म्हणून त्यांचे विरुध्द प्रकरण खारीज केलेले आहे. अर्जदाराच्या तक्रारीप्रमाणे दि.31.03.2009 रोजी त्यांचे अटोचा मरखेल हून हानेगांवकडे जात असताना दावणगीर गांवाचे पूढे सायकांळी 6.30वाजता समोरुन येणा-या काळीपिवळी जिप ज्यांचा क्र.एम.एच-26-बी-9201 यांनी निष्काळजीपणे वाहन चालवून अटोस जोराची धडक दिली. या अपघातात अटोचा चेंदामेंदा झाला व अटो चालकास गंभीर दूखापत झाली. अपघातात अटोचे नूकसान झाल्यामूळे अर्जदाराने त्यांना रु.25,000/- ते रु.30,000/- चा क्लेम मागितला होता पंरतु अर्जदाराच्या अटोची विमा कंपनी गैरअर्जदार क्र.2 यांनी हे क्लेम देण्याचे दि.10.06.2009 रोजी नाकारले. यात त्यांनी अपघाता संबंधी दिलेले सर्व रेकार्ड म्हणजे एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, ज्यांनी पोलिस स्टेशनला सूचना दिली त्यांचा जवाब इत्यादी सर्व कागदपञे तपासून पञात असे म्हटले आहे की, अर्जदार यांचे वाहनात चार व्यक्तीची परवानगी असताना पोलिसाच्या रिपोट प्रमाणे अपघाताचे वेळी त्यात चार पेक्षा जास्त प्रवासी होते व एफ.आय.आर. प्रमाणे अपघातग्रस्त वाहन हे असिफ मदार शेख यांचेकडे जो वाहन चालविण्याचा परवाना होतो LMV (TR) होता परंतु अटो रिक्षासाठी आर.टी.ओ. ने वेगळया प्रकारचे लायसन्स व बॅच असणे आवश्यक आहे, ते वाहन चालकाकडे नव्हते.या कारणाने General Exclusion No. 3(a)and (b) याप्रमाणे त्यांनी क्लेम नाकारला आहे. या त्यांच्या आक्षेपाप्रमाणे पोलिस रेकार्डवरुन वाहनामध्ये जास्त प्रवासी होते हे स्पष्ट केलेले आहे. परंतु यात हे ही बघणे आवश्यक आहे की, वाहनामध्ये बसलेल्या प्रवाशामूळे हा अपघात घडला होता, हे असे नसून समोरुन येणा-या वाहनाने त्या अटोला जोरदार धडक दिली. त्यामूळे अपघात झाला यात जास्त प्रवासी बसण्याचा संबंध येत नाही. त्यामूळे हा आक्षेप मान्य करण्यासारखा नाही. परंतु गैरअर्जदार क्र.2 यांचा आक्षेप की, अपघातग्रस्त वाहन हे असीफ शेख हा चालवित होता ज्यांचे एडीएल पाहीले असता यावर एलएमव्ही ट्रान्सपोर्ट असे लिहीलेले आहे. म्हणजे तो फक्त त्याच कॅटेगिरीचे वाहन चालवू शकतो. अटोरिक्षा हा तिन चाकाचा असते, आर.टी.ओ. ने त्यासाठी वेगळा लायसन्स दिलेला आहे. ज्यांचा नमूना अर्जदार लच्मण टोके यांचे नांवे असलेले लायसन्स यात अटोरिक्षा ट्रान्सपोर्ट चालविण्याचा परवाना असे स्पष्ट केलेले आहे. म्हणजे अपघातग्रस्त वाहन पोलिसाच्या पंचनाम्यावरुन हे स्पष्ट होते की, अपघातग्रस्त वाहन हा असीफ शेख हा चालविता होता व त्यांचेकडे हॅलीड लायसन्स नव्हते. क्लेम प्रपोजल जेव्हा दाखल केले त्या क्लेम प्रपोजल मध्ये अपघातग्रस्त वाहन हे अर्जदार स्वतःचालवीत होते असे त्यात नमूद केल्यावरुन दिसते व अर्जदाराचे लायसन्स हे अटोरिक्षा ट्रान्सपोर्ट चालविण्या पूरते होते परंतु अपघातगसत वाहन हे अर्जदार चालवित होते हे सिध्द होत नाही. या कारणासाठी गैरअर्जदार क्र.2 यांनी जो क्लेम नामंजूर केला तो योग्य आहे असे आम्ही ठरवित आहोत. गैरअर्जदार यांनी त्यासाठी सायटेशन 2008 (4) CPR 235 (NC) National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi, Rejinder Singh Negi Vs. The Oriental Insurance Com. Ltd. Consumer Protection Act, 1986—Section—21 (b)---Light Motor Trasport vehicle owned by complainant met with an accident—Repudiation of claim. गैरअर्जदार क्र.2 यांनी नामंजूर केले आहे ते बरोबर आहे असे म्हटले आहे. अर्जदारांनी रु.24,000/- ते रु.25,000/- खर्चून त्यांचा अटो दूरुस्त करुन घेतला आहे व तो अटो नंतर कर्जाचे हप्त भरले नाही म्हणून गैरअर्जदार क्र.3 यांनी जप्त केल्याचे दिसून येते. गैरअर्जदार क्र.5 हे थर्ड पार्टी इन्शूरन्स आहेत. त्यांनी आपले म्हणण्यात हाच आक्षेप घेतलेला आहे की, मोटार वाहन कायदा कलम 165 प्रमाणे तृतीय पार्टी साठी अर्जदार यांना नूकसान भरपाई मागता येणार नाही. अर्जदाराचे वाहनाचे ज्या विमा कंपनीने काढला त्यांच विमा कंपनीस नूकसान भरपाई मागता येऊ शकते परंतु अपघाता मध्ये अर्जदाराच्या वाहनाचा ड्रायव्हर किंवा बसलले प्रवासी यांचे नूकसान झाले असेल तर त्यांचे नूकसानी बददल मोटार वाहन प्राधीकरण यांचेकडे क्लेम दाखल करता येऊ शकतो. म्हणून असे प्रकरण या मंचात चालविता येणार नाही. त्यावेळी न्याय मंचाने हे सर्व मूददे यूक्तीवादा नंतर शेवटी एकाच वेळी तपासले जातील असे म्हटल्यामूळे अर्जदारानी गैरअर्जदार क्र.5 म्हणजे समोरुन येणारी जी काळीपिवळी जिप होती जिचा नंबर एम.एच-26-बी-9201 या वाहनाचा विमा घेतलेली कंपनी आहे. हया वाहनाच्या झालेल्या नूकसानी बददल त्यांनी त्यास रु.30,824/- नूकसान भरपाईची रक्कम देखील अदा केली आहे. अर्जदार जी नूकसान भरपाई रु.1,75,000/- मागतात यासाठी ते जबाबदार नाहीत व असे उत्तर अर्जदाराच्या नोटीसला त्यांनी दिलेले आहे. हे न्याय मंच या मतास आलेले आहे की, अर्जदाराचा क्लेम हा ड्रायव्हर किंवा त्यातील प्रवासी जखमी झाल्याची नूकसान भरपाई मागितली नसून त्यांनी यात वाहनाची नूकसान भरपाई मागितलेली आहे. त्यामूळे असे प्रकरण गैरअर्जदार क्र.5 यांचे विरुध्द या न्याय मंचात चालणार नाही. त्यांनी हे प्रकरण मोटार वाहन प्राधीकरण यांचेकडे दाखल करु शकतात. गैरअर्जदार क्र.5 यांनी सायटेशन Motor Vehicles Act, 1988 Section 165 Chapter Xii Claim Tribunals, यात 165. Claims Tribunals (1) A State Government may, by notification in the Official Gazette, constitute one or more Motor Accidents Claims Tribunals (hereafter in this Chapter referred tod as Claims Tribunal ) for such area as may be specified in the notification for the purpose of adjudicating upon claims for compensation in respect of accidents involving the death of, or bodily injury to, persons arising out of the use of motor vehicles, or damages to any property of a third party so arising, or both. म्हणून गैरअर्जदार क्र.5 यांचे विरुध्द तक्रार खारीज करण्यात येते. गैरअर्जदार क्र.4 यांचे विरुध्द तक्रार का दाखल केली हे तक्रारीत स्पष्ट केलेले नाही. फक्त वकिलाची नोटीस दिलेली आहे एवढाच उल्लेख केला आहे. गैरअर्जदार क्र.4 हे हजर झाले परंतु त्यांनी जवाब दिला नाही म्हणून त्यांचे विरुध्द नो से आदेश करण्यात आला. गैरअर्जदार क्र.4 हा कोण आहे व त्यांला कशासाठी पार्टी केले आहे व त्यांचे विरुध्द तक्रार काय आहे ? हे स्पष्ट होत नसल्यामूळे त्यांचे विरुध्द आदेश नाही. अर्जदारांनी अटोच्या नूकसान भरपाई साठी व इतर खर्च रु.1,75,000/- मागितला आहे, ही मागणी पूराव्या अभावी नामंजूर केलेली आहे. रु.30,000/-चे अटोस रु.84,000/- खर्च केला, हे मान्य होणेजोगे नाही. रु.50,000/- कशाबददल यांचा उल्लेख केलेला नाही, अशी नुकसान भरपाई मागता येते का ? म्हणून पूराव्याअभावी व नियमाप्रमाणे अर्जदार यांचा तक्रार अर्ज खारीज करण्यात येतो. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] PRESIDING MEMBER | |