Maharashtra

Beed

CC/11/75

Devkibai Yuvraj Aambad - Complainant(s)

Versus

Mandal Prabhadhak, United India Insurance com. ltd. - Opp.Party(s)

05 May 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/75
 
1. Devkibai Yuvraj Aambad
Kundewadi TQ.Vadvani
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Mandal Prabhadhak, United India Insurance com. ltd.
Shankar Nagar Chowk, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  P. B. Bhat PRESIDENT
  A P Bhosrekar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक 75/2011                         तक्रार दाखल तारीख –09/05/2011
                                         निकाल तारीख     – 05/05/2012    
देवईबाई भ्र. युवराज आंबाड
वय 30 वर्ष, व्‍यवसाय घरकाम                                  .तक्रारदार
रा.कुंदवाडी (चिखलबीड) ता.वडवणी जि.बीड
                            विरुध्‍द
                               सामनेवाला
1.    मंडल प्रबंधक,
      युनाइटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
      मंडल कार्यालय क्र.2, अंबिका हाऊस
      शंकर नगर चौक, नागपुर 440 010
2.    व्‍यवस्‍थापक,                                             सामनेवाला           
      कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग प्रा. लि.
      भास्‍करायण, एच.ढी.एफ.सी. इन्‍शुरन्‍स टाऊन सेंटर जवळ,
      सिडको,औरंगाबाद
3.    तालुका कृषी अधिकारी
      तहसील कार्यालय, वडवणी ता.वडवणी जि.बीड
 
              को र म - पी.बी.भट, अध्‍यक्ष
                         अजय भोसरेकर, सदस्‍य.
 
                          तक्रारदारातर्फे                  :- अँड.ए.डी.काळे
                          सामनेवाला क्र.1 तर्फे           ः- अँड.व्‍ही.एस.जाधव
                     सामनेवाला क्र.2 तर्फे           ः- स्‍वतः
                     सामनेवाला क्र.3 तर्फे           ः- स्‍वतः                          
                                                     निकालपत्र
 
            तक्रारदार यांनी प्रस्‍तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्‍द दाखल केली आहे.
            तक्रारदार व तिचे पती युवराज श्रीपती आंबाड हे कंदुवाडी (चिखलबीड) ता.वडवणी जि. बीड येथील रहिवासी आहेत. मौजे चिखलबीड शिवारात सव्‍हे नंबर 55 मध्‍ये 39 आर एवढी शेत जमिन तक्रारदाराच्‍या पतीची आहे. युवराज आंबाड हे शेती काम करीत असताना दि.17.07.2010 रोजी सायकांळी 7 वाजता जनावराला वैरण टाकण्‍यासाठी कडब्‍याच्‍या गंजीमध्‍ये वैरण काढत असताना त्‍याठिकाणी तक्रारदाराचे पतीस उजव्‍या हाताचे अंगठयाजवळील बोटास सर्पदंश झाला. त्‍यांनी लगेच वडवणी येथील सरकारी दवाखान्‍रूात उपचाराकामी दाखल केले त्‍याठिकाणी डॉक्‍टरांनी तक्रारदाराचे पतीस मयत घोषित केले. या संदर्भात भिमराव श्रीपती आंबाड रा.कुंदेवाडी ता.वडवणी यांनी वडवणी पोलिस स्‍टेशन येथे फिर्याद दिली. त्‍यांचा गुन्‍हा नंबर 18/10 आहे. शवाचे वडवणी सरकारी दवाखान्‍यात शवविच्‍छेदन करण्‍यात आले. डॉक्‍टरच्‍या निदानानुसार त्‍यांचा मृत्‍यू संर्पदंशाने झालेला आहे. त्‍यांचे मृत्‍यूनंतर सर्व कागदपत्र गोळा करुन नियमाप्रमाणे दावा अर्ज सामनेवाला क्र.3 कृषी अधिकारी यांचेकडे दाखल केला. त्‍यानंतर कृषी अधिकारी तहसील कार्यालय वडवणी यांचेकडे दाखल केला, त्‍यानंतर तहसील कार्यालयामधून   मिळालेल्‍या माहीतीवरुन तक्रारदाराचा क्‍लेम फॉर्म   संपूर्ण कागदपत्रासह सामनेवाला क्र.1, सामनेवाला क्र.3 व सामनेवाला क्र.2 कबाल इन्‍शुरन्‍स प्रा.लि. यांचे मार्फत पाठविण्‍यात आल्‍याचे सांगितले. त्‍यानंतर तक्रारदारांना प्रत्‍यक्ष सामनेवाला क्र.1चे कार्यालयात जाऊन दावा फॉर्म व कागदपत्र मिळाले की नाही यांची पडताळणी केली. त्‍यावेळी सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास कळविले की, आमचे काही अधिकारी गांवामध्‍ये येऊन माहीती गोळा करतील व त्‍यानंतर नियमाप्रमाणे आपणास विमा रक्‍कम रु.1,00,000/- मिळेल.
  
            दि.31.12.2010 रोजी सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास पत्र पाठवून कळवीले की, त्‍यांना अत्‍यंत दूख होते तक्रारदाराचे पती युवराज यांचा अपघाती मृत्‍यूसंबंधी विमा पत्रातील अटीचा निम्‍न लिखीत कारणाने नूकसान भरपाई देऊ शकत नाही. कागदपत्र अपूर्ण असल्‍याने आपणास नूकसान भरपाई देता येत नाही असे कळवून दावा नाकारला. कोणते कागदपत्रे दिली नाही यांचा सदर पत्रात उल्‍लेख नाही. अशा प्रकारे सामनेवाला क्र.1 ने तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केला. त्‍यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झाला त्‍या बाबत रक्‍कम रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- तक्रारदारांना दयावेत.
            विनंती की, सामनेवाला क्र.1 ने तक्रारदारांना विमा रक्‍कम रु.1,00,000/- तसेच मानसिक त्रासाची रक्‍कम रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- तक्रारदारांना दयावा.
 
            सामनेवाला क्र.1 यांनी त्‍यांचा खुलासा दि.2.9.2011 रोजी दाखल केला.खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्‍यांनी नाकारलेले आहेत. दावा दाखल करण्‍यासाठी कागदपत्रे विमा कालावधीच्‍या 90 दिवसाचे ग्रेस कालावधीनंतर दाखल केलेले होते ते अपूरे होते. आता केसचा तपास करणे किंवा क्‍लेम खरा आहे किंवा कसे हे ठरवणे अवघड आहे.
 
            तक्रारीत आयूक्‍त शेती, महाराष्‍ट्र शासन यांना सामनेवाला न केल्‍याने आवश्‍यक सामनेवाला या मूददयावर तक्रार खारीज करणे योग्‍य होईल.
            आयूक्‍त शेती महाराष्‍ट्र शासन यांचे बरोबर कंपनीचा करार झालेला असून शेतकरी कंपनीकडे  प्रस्‍ताव दाखल करु शकत नाही. विम्‍याचे पैसे त्‍यांने कंपनीला दिलेले नाहीत.
            घटना घडल्‍यानंतर 90 दिवसांमध्‍ये दाव्‍याचे कागदपत्र कंपनीकडे पाठवावयास पाहिजे होते तसे झालेले नाही त्‍यामुळे क्‍लेम नामंजूर केलेला आहे.विनंती की, तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी.
 
            सामनेवाला क्र.2 यांनी त्‍यांचा खुलासा दि.14.7.2011 रोजी पोस्‍टाद्वारे दाखल केला.खुलाशात श्री.युवराज आंबाड रा.चिखलबीड ता.वडवणी यांचा अपघात दि.17.7.2010 रोजी झाला. त्‍यांचा दावा दि.16.10.2010 रोजी अपूर्ण कागदपत्र उदा.मृत्‍यूचे मूळ प्रमाणपत्र, रक्‍कम रु.20/-च्‍या स्‍टँम्‍प वरती शपथपत्र मूळ, मूळ 7/12, फेरफार, 6-क मूळ, रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल पोलिस अधिका-याने साक्षांकित केलेला. या बाबत दि.2.11.2010 रोजी पत्र देऊन कळविले व तसेच दि.6.12.2010 रोजी स्‍मरणपत्रे दिली. तक्रारदारांनी आवश्‍यक ती कागदपत्र न पाठविल्‍याने सदरचा दावा त्‍यांचे सुचनेवरुन युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी नागपूर कडे दि.21.12.2010 रोजी अपूर्ण कागदपत्र या शे-याने पाठविला. शेवटी युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनीने दि.31.12.2010 रोजीच्‍या पत्राअन्‍वये दावा बंद केला.
 
            सामनेवाला क्र.3 हे प्रकरणात हजर झाले नाही. त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे दाखल केले नाही. म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा तक्रार चालविण्‍याचा निर्णय न्‍याय मंचाने दि.4.10.2011 रोजी घेतला.
 
            तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र.1 ते 3 यांचा खुलासा, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले.
 
            तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.काळे व सामनेवाले क्र.1 यांचे विद्वान वकील श्री.जाधव यांचा यूक्‍तीवाद ऐकला.
 
            तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदाराचे पती युवराज आंबाड हे शेतकरी असल्‍याची बाब 7/12 उता-यावरुन स्‍पष्‍ट होते. त्‍यांना दि.17.7.2010 रोजी संर्पदंश झाल्‍याने सरकारी दवाखान्‍यात उपचारकामी दाखल केले असता डॉक्‍टरांनी त्‍यांना मयत घोषित केलेले आहे व त्‍या संदर्भात पोलिस स्‍टेशन वडवणी येथे गू.र.नं.18/10 ने गून्‍हा दाखल होऊन त्‍याबाबत चौकशी पोलिसांनी केलेली आहे. घटनास्‍थळाचा पंचनामा आहे. मयताचे शवविच्‍छेदन करण्‍यात आलेले आहे. त्‍यानुसार त्‍यांचा मृत्‍यू संर्पदंशाने झालेला आहे. तसेच व्हिसेरा राखीव ठेवण्‍यात आलेला आहे. परंतु स्‍पष्‍ट निदान संर्पदंशाचे देण्‍यात आलेले आहे. सदरचा व्हिसेरा पोलिस स्‍टेशनकडे दिल्‍याची त्‍यापुढे नोंद नाही. अंतिम अहवाल देण्‍यात आलेला आहे. सदर मृत्‍यूचे संदर्भात कोणाचीही तक्रार नाही. तसेच अंतिम अहवालतही मृत्‍यूचे कारण साप चावून मृत्‍यू असे नमूद करण्‍यात आलेले आहे. सदरचा अहवाल तालूका कार्यकारी दंडाधिकारी येथे मंजूर केलेला आहे. त्‍याबाबतचे प्रमाणपत्र 10 दाखल केलेले आहे.
            युवराज आंबाड यांचे मृत्‍यूनंतर तक्रारदारांनी आवश्‍यक त्‍या कागदपत्रासह प्रस्‍ताव सामनेवाला क्र.3 कडे दाखल केला. तो सामनेवाला क्र.2 कडे त्‍यांनी पाठविला आहे.  सदरची बाब ही सामनेवाला क्र.2यांचे खुलाशावरुन स्‍पष्‍ट होते. सामनेवाला क्र.2यांनी त्‍यांची तपासणी केली असता त्‍यात मृत्‍यूचे मूळ प्रमाणपत्र रक्‍कम रु.20/- च्‍या स्‍टॅंम्‍प पेपरवर वरील शपथपत्र मूळ, 7/12 उतारा व फेरफार, 6-क मूळ, आणि रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल पोलिस अधिका-याने साक्षांकीत केलेला इत्‍यादी कागदपत्र अपूर्ण असल्‍याचे सामनेवाला क्र.2 यांचे खुलाशात नमूद केलेले आहे. व त्‍याबाबत त्‍यांनी सामनेवाला क्र.3 यांचेकडे पत्र दिलेले आहे व स्‍मरणपत्रेही दिलेली आहेत. स्‍मरणपत्रे दिल्‍याचे कागदपत्रावरुन दिसते. सदरची पत्रे हे तक्रारदारांना सामनेवाला क्र.2 यांनी दिलेली नाहीत. सदर प्रकरणात सामनेवाला क्र.3 यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश झालेला असल्‍याने त्‍यांनी सदर पत्राचे संदर्भात कोणताही खुलासा केलेला नाही.
 
            सामनेवाला क्र.2 यांनी वरील अपूर्ण कागदपत्राचे शे-यासह प्रस्‍ताव सामेनवाला क्र.1 कडे दि.21.12.2010 रोजी पाठविला.सामनेवाला क्र.1 ने सदरचा दावा दि.31.12.2010 रोजी अपूर्ण कागदपत्राअभावी  बंद केलेला आहे.
 
            या संदर्भात सदरचे पत्र तक्रारदारांनी दाखल केलेले आहे.त्‍यात अपूर्ण कागदपत्र कोणती या बाबतचा उल्‍लेख नाही. त्‍यामुळे तक्रारदारांनी सामनेवालाकडे दि.14.11.2010 रोजी पर्यत कोणते कागदपत्र पाठविले यांचा या पत्रावरुन बोध होत नाही. तसेच दि.21.12.2010 रोजी मिहाले दावा विमा कंपनीने दि.31.12.2010 रोजीचे पत्राने बंद केलेला आहे. या संदर्भात तक्रारदारांना अपूर्ण कागदपत्राची कोणती माहीती विमा कंपनीकडून मिळालेली दिसत नाही व तसेच एकाच पत्र सदरचा दावा बंद करण्‍यात आलेला आहे. निश्‍चितच सदरची बाब ही निसर्ग न्‍यायाचे विरुध्‍द आहे. तसेच या संदर्भात मूदतीत कागदपत्र दाखल न केल्‍याचे कारणाचे बाब तक्रारदारांनी खालील न्‍यायनिर्णयाचा आधार घेतला आहे.
II (2008) CPJ 403
Maharashtra ‘State Consumer Disputes Redressal Commission, Mumbai
ICICI Lombard general Insurance com. Ltd.
Vs
Sindhubhai Khanderao Khairnar
(i)                 Consumer Protection Act, 1986—Section 2(1)(g)—Insurance—Agriculturist Accident Insurance policy—Claim rejected due to delayed submission of claim papers –All required documents except driving licence submitted to insurer—Driving licence not necessary to settle claim—Clause regarding time-limit for submission of claim not mandatory—Cannot be used to defeat genuine claim—Insurance company rejected claim on highly technical ground—Rejection unreasonable—Insurer liable to pay sum assured under policy.
 
या न्‍यायनिर्णयाचा आधार तक्रारदाराने घेतलेला आहे. सदर न्‍यायनिर्णयाचे सखोल वाचन केले असता सदरचा निर्णय हा तक्रारदाराचे समर्थनार्थ लागू होतो असे जिल्‍हा मंच नम्रपणे नमूद करीत आहे.
 
            90 दिवसांचे आंत कागदपत्र दाखल न केल्‍याचे कारणावरुन सामनेवाला क्र.1 यांनी दावा नाकारला नाही. सामनेवाला क्र.1 यांनी दावा अपूर्ण कागदपत्राच्‍या कारणाने बंद केलेला आहे व अपूर्ण कागदपत्र कोणते या बाबतचा कोणताही तपशील सामनेवाला क्र.1यांचे पत्रात नसल्‍याकारणाने सामनेवाला क्र.1 यांनी योग्‍य रितीने नाकारला असे म्‍हणणे उचित होणार नाही. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचा दावा नाकारुन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्‍याची बाब स्‍पष्‍ट होत असल्‍याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना युवराज आंबाड यांचे मृत्‍यूची नूकसान भरपाई रु.1,00,000/- देणे उचित होईल असे न्‍यायमंचाचे मत आहे.
 
            सेवेत कसूरीची बाब स्‍पष्‍ट झाल्‍याने तक्रारदारांना झालेल्‍या मानसिक त्रासाबददल रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- सामनेवाला क्र.1 यांनी दयावा.
              सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
 
 
                             आदेश
 
 1.          तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2.                सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारांना मयत   
              युवराज आंबाड यांचे अपघाती मृत्‍यू दाव्‍याची रक्‍कम 
              रु.1,00,000/- (अक्षरी एक लाख फक्‍त) आदेश मिळाल्‍यापासून   
                        एक महिन्‍याचे आंत अदा करावी.
3.               सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्‍यात येतो की,वरील रक्‍कम मूदतीत  
                       न दिल्‍यास वरील रक्‍कमेवर द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज तक्रार  
                       दाखल दि.09.05.2011 पासून देण्‍यास सामनेवाला क्र.1 जबाबदार
              राहतील.
4.               सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्‍यात येतो की, मानसिक त्रासाची  
            रक्‍कम रु.5000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चाची
            रककम रु.5,000/-(अक्षरी रु. पाच हजार फक्‍त) आदेश 
            प्राप्‍तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
5.              ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20     
           (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
 
 
 
(अजय भोसरेकर)     (पी.बी.भट)
सदस्‍य          अध्‍यक्ष
                                                                                                                                                                                                                                          जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड   
 
 
[ P. B. Bhat]
PRESIDENT
 
[ A P Bhosrekar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.