( आदेश पारित द्वारा : श्री विजयसिंह ना. राणे, मा.अध्यक्ष ) आदेश ( पारित दिनांक : 30 नोव्हेंबर, 2010 ) तक्रारदार व गैरअर्जदार हजर. तक्रारदाराने प्रतिउत्तर दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, गैरअर्जदाराने दाखल केलेला माती परिक्षणाचा अहवाल खोटा आहे. त्यांची प्रत गैरअर्जदाराने तक्रारदाराला दिलेली आहे. त्यासंबंधी प्रत व दस्तऐवज दाखल केले. दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकले. सदर प्रकरणात गैरअर्जदाराने मंचाने दिलेल्या आदेशाचे पालन आता उशिरा का होईना आता केलेले आहे. गैरअर्जदाराने माती परिक्षण अहवाल संबंधीत विभागाकडुन प्राप्त करुन घेऊन तो दाखल केलेला आहे. त्याची प्रत तक्रारदारास दिलेली आहे. त्याचप्रमाणे गैरअर्जदाराने आदेशाप्रमाणे तक्रारदारास देय असलेली रक्कम सुध्दा मंचात यापूर्वीच जमा केलेली आहे. अशा परिस्थितीत आता या प्रकरणात कोणतेही तथ्य उरलेले नाही की, जेणे करुन ते पुढे चालविण्यात यावे. सदर प्रकरणात गैरअर्जदाराने कोणत्याही संयुक्तिक कारणाशिवाय मुळ आदेश दिनांक 29.4.2006 च्या आदेशाचे पालन 4 वर्ष कालावधी उलटुन गेल्यानंतर केलेले आहे व त्यांनी असे का केले त्यासंबंधी कोणतेही संयुक्तिक कारण मंचासमोर आलेले नाही. एकप्रकारे न्यायमंचाचे आदेशाचा हा अनादर आहे व त्यांचे गांर्भीर्य समजुन न घेणे हे चुकीचे आहे. असे असले तरी ग्राहक सरंक्षण कायदा कलम 27 मधील तरतुद ही, मंचाने केलेल्या आदेशाची पुर्तता होण्यासाठी वचक बसावा, अशा मुख्य हेतुने केलेली असल्याने त्यांत लोकांना कोणतीही शिक्षा करण्याचा मुख्य हेतु नाही. वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. अर्जदाराचा अर्ज निकाली काढण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांनी तक्रारदारास कॉस्ट दाखल प्रत्येकी रुपये 500/- द्यावे (जयश्री येडे ) (जयश्री यंगल) ( विजयसिंह ना. राणे) सदस्या सदस्या अध्यक्ष अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर
| [HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER | |