Maharashtra

Kolhapur

CC/12/25

Vijay Vishwanath Joshi - Complainant(s)

Versus

Mananger, Bajaj Finance Ltd. - Opp.Party(s)

Sandip Jadhav

27 Jun 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/12/25
 
1. Vijay Vishwanath Joshi
Bandar Galli,Near Viththal mandir,Pattankodoli,Tal.Hatkanangale,Kolhapur.
...........Complainant(s)
Versus
1. Mananger, Bajaj Finance Ltd.
C/o Auto India,Rajaram road,Udyamnagar,Kolhapur.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Sanjay P. Borwal PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
For the Complainant:
Mr.R.B.Jadhav, Mr.Sandeep Jadhav
 
For the Opp. Party:
Mr.Jayendra Patil, Mr.R.R.Patil
 
ORDER

निकालपत्र (दि.27.06.2014)   व्‍दाराः- मा. सदस्‍या - सौ. रुपाली डी. घाटगे  

         

               1         प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 अन्‍वये बजाज फायनान्‍स लि. यांनी सेवेत त्रुटी ठेवलेमुळे नुकसानभरपार्इ                           मिळणेसाठी दाखल केला आहे.  

2           तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात तक्रार-

तक्रारदारांचा शेतीच्‍या व पॉलीसीच्‍या व्‍यवसायाचे कामाकरीता दुचाकी वाहनाची गरज असलेने सामनेवाले संस्‍थेकडून कर्जे उचल करुन डी.टी.एस.रजिस्‍ट्रेशन कं.एम.एच.09-बी.जे.8194 या वर्णनाची दुचाकी खरेदी करणेकरीता रक्‍कम रु.41,597/- कर्जे सामनेवाले संस्‍थेकडून घेतले.  सामनेवाले यांना अर्जदार यांनी दरमहा रक्‍कम रु.1,572/- रक्‍कमेचा हप्‍ता देणेचे कबुल केले.  दि.20.08.2009 रोजी रजिस्‍ट्रेशन होऊन व कागदपत्रांची पुर्तता करुन सदरचे वाहन खरेदी केलेले होते.  सदर वाहन खरेदी घेताना, तक्रारदारांनी डाऊन पेमेंट म्‍हणून अॅडव्‍हान्‍स रक्‍कम एकुण तीन हप्‍ते रक्‍कम रु.4,716/- व अडव्‍हान्‍स रक्‍कम रु.10,322/- तसेच आर.सी.टी.सी.साठी लागणारी रक्‍कम रु.2,812/-, मोटार परवाना रक्‍कम रु.170/- अशी एकूण रक्‍कम रु.18,016/- खर्च करुन सदरचे वाहन खरेदी केले.  सामनेवाले यांचे हप्‍ते फेडीची मुदत दि.05.09.2002 ते दि.05.08.2012 असे एकूण 36 महिन्‍याकरीता ठरलेली आहे.  तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे रु.29,868/- इतकी रक्‍कम वेळोवेळी फेड केली आहे.  तक्रारदारांच्‍या मुलाच्‍या शिक्षणाकरीता मार्च ते जुलै-2011 महिन्‍यात जादा खर्च झाले, कारणाने अर्जदारांचे लोन हप्‍ते तीन महिने कालावधीमध्‍ये थकीत झाले.  तक्रारदारांनी सामनेवाले यांनी नोटीसा पाठविल्‍या. सामनेवाले यांनी दि.09.08.2011 रोजी झालेली रक्‍कम रु.15,641/- थकील असलेबाबतचे कळविले व सदरची रक्‍कम न भरलेस तुमच्‍यावर योग्‍य ती कार्यवाही केली जाईल असे नोटीसीने कळविले.  अर्जदार हे स्‍वत: संस्‍थेत जाऊन थोडे पैसे भरुन घेणेविषयी विनंती करु लागले तथापि त्‍यांची कोणतीही विनंती मान्‍य न करता, सामनेवाले यांनी कोणत्‍याही प्रकारची पुर्वनोटीस न देता धाक दाखवून बेकायदेशीररित्‍या दि.30.09.2011 रोजी सदरचे वाहन ओढून नेऊन विक्री करुन तक्रारदारांना दयावयाच्‍या सेवेत सामनेवाले यांनी त्रुटी केलेली आहे. या कारणाने तक्रारदारांनी सदर वाहनाकरीता खर्च केलेली व भरलेली एकुण रक्‍कम रु.47,884/- द.सा.द.शे.10% दराने नुकसानभरपाई दाखल परत मिळावी अथवा सदरची अट मान्‍य न झालेस सदरचे वाहन तक्रारदारांचे ताब्‍यात सामनेवाले यांचेकडून परत देण्‍याचा आदेश व्‍हावा अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे.

3           तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत अ.क्र.1 ला दि.20.08.2009 रोजीचे वाहनाची रजिस्‍ट्रेशन पावती, अ.क्र.2 ला दि.30.07.2009 रोजी लोन टर्म शीट, अ.क्र.3 ला दि.31.07.2009 रोजी तक्रारदारांची भरलेल्‍या पैशाची पावती, अ.क्र.4 ला दि.20.08.2009 रोजी तक्रारदारांची आर.सी. व टी.सी.तसेच के.एम.सी.परवाना भरलेली पावती, अ.क्र.5 ला दि.14.10.2011 रोजीचा सामनेवाले यांचेकरीता तक्रारदारांचा खाते उतारा, अ.क्र.6 ला दि.31.07.2009  रोजीचे अॅटो इंडिया यांचेकडून वाहनाचे मिळालेले व्‍हाऊचर, अ.क्र.7 ला दि.18.4.2011 रोजी तक्रारदारांनी भरलेली पावती, अ.क्र.8 ला दि.30.01.2011 व दि.31.01.2011 रोजी पैसे भरलेल्‍या पावत्‍या, अ.क्र.9 ते 12 ला दि.15.05.2010, दि.26.05.2010, दि.01.01.2010, दि.01.09.2010 रोजी तक्रारदारांनी सामनेवाले विमा कंपनीला भरलेल्‍या पावत्‍या, अ.क्र.13 ला सामनेवाले यांची दि.09.08.2011 रोजी पाठविलेली नोटीस, दि.04.03.2013 रोजीचे तक्रारदारांचे पुराव्‍याचे शपथपत्र, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

4           सामनेवाले यांनी दि.11.04.2012 रोजी तक्रार अर्जास म्‍हणणे दाखल केले असून तक्रारदारांची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे.  तक्रारदारांनी सामनेवाले कंपनीकडून दि.06.08.2009 रोजी लोन अॅग्रीमेंट क्र.L2WKPR00147932 केले होते.  तक्रारदारांचे विनंतीनुसार रक्‍कम रु.56,592/- [फायनान्‍शिअल चार्ज रक्‍कम रु.14,995/-, 36 महिने] तसे कर्ज सदरचे वाहनासाठी घेतले असून त्‍याचा मासिक हप्‍ता रक्‍कम रु.1,572/-, 36 महिने, [दि.05.09.2009 ते दि.05.08.2012] असा आहे.  सदरचे वाहन हे सामनेवाले कंपनी कर्जे भागेपर्यंत गहाण [hypothecated] ठेवणेत आले होते. सदरचे लोन अॅग्रीमेंट तक्रारदारांनी त्‍यातील अटी व शर्ती जाणून घेऊनच सही केलेले होते.  तक्रारदारांनी सदर कर्जाचे हप्‍ते नियमीतपणे भरलेले नाहीत.  सदरचे लोन अॅग्रीमेंट वेळी तक्रारदारांची रक्‍कम रु.4,716/- इतकेचे तीन मासिक हप्‍ते पोटी भरलेले होते. रक्‍कम रु.18,016/- इतकी रक्‍कम तक्रारदारांनी भरलेचे कोणताही कागदोपत्री पूरावा सदरकामी दाखल केलेला नाही. दि.30.09.2011 रोजी रु्.22,408/- [रु.9342 हप्‍ता + रु.12,976/- over-dues] इतके रक्‍कत येणेबाकी होते.  सदरचे कर्जाची रक्‍कम भागवून सदरचे वाहन ताब्‍यात घेणेविषयी सामनेवाले यांनी तक्रारदारांना सांगितले तथापि तक्रारदारांनी सदरचे हप्‍ते दिले नाहीत.  दि.30.09.2011 रोजी तक्रारदारांनी स्‍वत: सामनेवाले यांचेकडे येऊन आपण सदरचे कर्जेफेड करणेस सक्षम नाही. त्‍याकारणाने सदरचे वाहन तक्रारदारांकडे सरेंडर [surrender] केले. सदरचे दि.30.09.2011 रोजीचे सामनेवाले कागदपत्रे जमा करुन तक्रारदारांची सदर कागदपत्रांवर पोहच/अॅकनॉलेजमेंट घेतली.  सदरचे Notarized Surrender Letter Annexure-B ला दाखल केलेले आहे.  तक्रारदारांनी सदरचे वाहन सामनेवाले यांनी विकून सदरचे कर्जे भागविणेस सांगितले. सामनेवाले विमा कंपनीने सदरचे वाहन दि.05.11.2011 रोजी रक्‍कम रु.22,000/- इतके किंमतीस विकले तथापि लोन अँग्रीमेंटप्रमाणे रक्‍कम रू.11,852/- थकीत राहिले.  सदरची थकीत रक्‍कम तक्रारदारांना फेडण्‍यास सांगितले असता, त्‍यास तक्रारदारांनी नकार दिला.  तक्रारदारांनी सदर सामनेवाले यांचे मासिक हप्‍ते कधीच वेळोवेळी भरलेले नाहीत अथवा त्‍याअनूषंगाने कोणताही सबळ पुरावा सदरकामी दाखल केलेला नाही.  तक्रारदारांनी रक्‍कम रु.47,884/- सामनेवाले यांचेकडे कधीच भरलेले नसलेने ते परत करणेचा प्रश्‍नच उदभवत नाही.  सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व रक्‍कम रु.11,852/- सामनेवाले यांना सदर वाहनाचे तक्रारदार यांचेकडून मिळावे, ही सामनेवाले यांनी विनंती केलेली आहे.  सामनेवाले यांनी दि.11.04.2012 रोजी अ.क्र.1 ला दि.06.08.2009 रोजीची Notarised Loan Agreement ची प्रत अ.क्र.2 ला दि.30.09.2011 रोजी Surrender Letter इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

5           तक्रारदारांची तक्रार व सामनेवाले यांची कैफियत, दाखल कागदपत्रे, पुराव्‍याचे शपथपत्र तसेच उभय प्‍क्षकारांचे वकीलांचा लेखी/तोंडी युक्‍तीवादाचा विचार होता न्‍यायनिर्णसाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात.             

क्र.

मुद्दे

उत्‍तरे

1

सामनेवाले-विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?

नाही.

2

आदेश काय ?

अंतिम निर्णयाप्रमाणे.

कारणमिमांसाः-

मुद्दा क्र.1-  तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून दुचाकी वाहन डिस्‍कव्‍हर डी.टी.केएच रजिस्‍ट्रेशन क्र.एम.एच.09 बी.जे.8194 या दुचाकी वाहन खरेदी करणेकरीता रक्‍कम रु.41,597/- कर्जे घेतले होते.  सदरचे वाहन तक्रारदार हे दि.30.09.2011 रोजी पैसे भरण्‍यास तयार असताना देखील सामनेवाले यांनी बेकायदेशीरपणे सदरचे वाहन ओढून घेऊन डिसेंबर, 2011 मध्‍ये विक्री केले.  सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केलेने सदरची तक्रार तक्रारदारांनी या मंचात दाखल केली आहे.  त्‍या अनुषंगाने या मंचाने सामनेवाले यांनी दाखल केलेलया लोन अँग्रीमेंट व सरेंडर लेटर, इत्‍यादी कागदपत्रांचे अवलोकन केले, तसेच तक्रारदारांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहीली असता, सदर कामी तक्रारदार म्‍हणतात, त्‍याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांचे दुचाकी वाहन बेकायदेशीर तक्रारदारांचे ताब्‍यातून कर्जेफेडी रक्‍कमेकरीता काढून घेतले का ? वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  सदर मुद्दयांचे अनुषंगाने सामनेवाले यांनी दाखल केलेले दि.06.08.2009 लोन अँग्रीमेंट पाहिले असता, लोन-41,597/-, EMI-1,572/-, Period-36, Advance EMI-Rs.4,716/- नमुद आहे.  सदरच्‍या लोन अॅग्रीमेंटवर तक्रारदारांची सही व अंगठा असुन सदरचे Loan Agreement Notarised केलेले आहे.  तक्रारदारांनी दि.18.04.2011, दि.30.01.2011, दि.31.01.2011, दि.15.05.2010, दि.26.05.2010, दि.01.01.2010, दि.01.09.2010 रोजी काही रक्‍कमा सामनेवाले यांनी जमा केलेचे दिसुन येते. तथापि मार्च ते जुलै, 2011  या महिन्‍यात मुलाच्‍या शिक्षणासाठी जादा खर्च झालेने तक्रारदारांनी सदर कालावधीत हप्‍ता न भरलेने सदरचे कर्ज थकीत झाले आहे असे तक्रारदारांनी पुराव्‍याचे शपथपत्रामध्‍ये नमुद केले आहे.  सदरकामी दाखल केलेल्‍या लोन अॅग्रीमेंट मधील

Clause14- In respect of any delayed payments, without prejudice to all other rights of BAPL under this agreements;

  1. BAPL shall be entitled to recover a sum described in part D of the Schedule.

असे नमुद आहे.  या सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदारांनी कर्जाचे हप्‍ते नियमितपणे भरणा करणे आवश्‍यक होते.  परंतु तसे हप्‍ते नियमितपणे सामनेवाले यांचेकडे तक्रारदारांनी जमा केलेचे दिसुन येत नाही. तसेच तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या अ.क्र.13 ला दि.09.08.2011 चे सामनेवाले यांचे वकीलांनी तक्रारदारांना पाठविलेल्‍या नोटीसीचे अवलोकन केले असता, सदरचे नोटीसीमध्‍ये  You are instructed to pay said arrears Rs.15,664/- within 7 days of notice and settle your loan account unless we have right to initiate following legal action against you असे नमुद आहे. त्‍याचप्रमाणे सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या दि.30.09.2011 रोजीचे सरेंडर लेटर हे तक्रारदारांनी सामनेवाले यांना लिहून दिलेले असून सदर पत्रामध्‍ये In case, I do not make payment within 10 days as aforesaid Balaji Auto shall be at liberty to sell product on my behalf and appropriate the sale proceeds towards realisation of its dues असे नमुद असून सदरचे पत्र हे नोटरी केलेले असून त्‍यावर तक्रारदारंची सही व अंगठा असून सामनेवाले कंपनीचा शिक्‍का आहे. सदरचे दि.09.08.2011 व दि.30.09.2011 चे पत्रानुसार तक्रारदारांनी मुदतीमध्‍ये सामनेवाले विमा कंपनीस कर्जाची थकीत रक्‍कम अदा करणेचे बंधनकारक होते तथापि तक्रारदारांनी सदरची रक्‍कम मुदतीत अदा केलेबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा या मंचात दाखल केलेला नाही.

            वरील सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदारांनी वेळेत कर्जाची परतफेड केलेली नाही.  तसेच दि.30.09.2011 चे पत्राने सदरचे दुचाकी वाहन, सदरची कर्जाची रक्‍कम थकीत असलेकारणाने तक्रारदारांनी सामनेवाले कंपनीस सरेंडर केलेले आहे.  या सर्व बाबींवरुन सामनेवाले यांनी लोन अॅग्रीमेंटमध्‍ये असलेल्‍या तरतुदीनुसार तक्रारदारांचे वाहन ताब्‍यात घेतले आहे. त्‍याकारणाने सदरचे वाहन कोणतीही पुर्व नोटीस न देता अथवा बेकायदेशीररित्‍या जप्‍त केलेले नाही. या निष्‍कर्षास हे मंच येत आहे व सदर बाबींवरुन सामनेवाले यांचा कोणताही अनुचित व्‍यापारी हेतु स्‍पष्‍ट होत नाही. कर्जदार व त्‍यांना आर्थिक सहाय्य करणा-या फायनान्‍स् कंपनी यांचेमधील व्‍यवहार हा परस्‍पर ठरलेल्‍या कारणाप्रमाणे होत असलेने सदरचा कराराचा कोणत्‍याही पक्षाने भंग केला असता, विरुध्‍द पक्षाला करारातील अटी व शर्तीप्रमाणे कार्यवाही करणेचा हक्‍क प्राप्‍त होतो.  त्‍यामुळे सामनेवाले यांनी कोणत्‍याही अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब न केलेने तक्रारदारांना दयावयाच्‍या सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही, या निष्‍कर्षास हे मंच येत आहे मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे मंच नकारार्थी देत आहे.

            मुद्दा क्र.2 -  उक्‍त मुद्दा क्र.1 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता, सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी न केल्‍याने खर्चाबाबत कोणतेही आदेश देण्‍यात येत नाहीत.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर हे मंच नकारार्थी देत आहे.

                सबब, मंच पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.

                                                    आदेश

  1. तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यात येत आहे.
  2. खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.
  3. आदेशाच्‍या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

 

 

 
 
[HON'ABLE MR. Sanjay P. Borwal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.