जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्षा-सौ.वी.वी.दाणी. मा.सदस्या-सौ.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – ३६/२०११
तक्रार दाखल दिनांक – १७/०२/२०११
तक्रार निकाली दिनांक – २१/०६/२०१३
श्री.नागराज उर्फ नगराज आधार पाटील. ----- तक्रारदार.
उ.व.५५,धंदा-शेती.
राहणार-मु.पो.रुदावली.
ता.शिरपुर,जि.धुळे.
विरुध्द
(१)मॅनेजर साो. ----- सामनेवाले.
ग्रीन गोल्ड सिड्स,
गट क्र.६५,गंगापुर,
नारायणपुर शिवार वाळूंज,जि.औरंगाबाद.
(२)मे.लेहरचंद धनजी.
मेन रोड,शिरपुर.
ता.शिरपुर,जि.धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.वी.वी.दाणी.)
(मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन.)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.डी.व्ही.घरटे.)
(सामनेवाले क्र.१ व २ तर्फे – वकील श्री.ओ.एस.तिपोळे.)
------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.वी.वी.दाणी.)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांच्याकडून सदोष बियाण्यापोटी नुकसान भरपाई मिळणेकामी सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाले नं.१ यांनी उत्पादीत केलेले “ ग्रीन गोल्ड १३३ ” तुर हे बियाणे सामनेवाले नं.२ यांच्याकडून दि.१६-०६-२०१० व दि.१२-०६-२०१० रोजी विकत घेतले व त्याची लागवड दि.२१-०६-२०१० रोजी स्वत:चे शेतात केली. त्यावेळी आवश्यक असणारी रासाणीक खते व किटकनाशके यांची फावारणी केली आहे. सदर तुरीच्या झाडांची वाढ झाली तसेच दोनदा फुलेही आलीत, परंतु सात महिन्याचे पिक होऊनसुध्दा त्या तुरीच्या झाडास शेंगा लागल्या नाहीत. त्या बाबत जिल्हा व तालूका स्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रार अर्ज केला. त्यांनी दिलेल्या अहवाला प्रमाणे सामनेवाले यांनी भेसळयुक्त बियाणे दिल्यामुळे तुरीच्या झाडांना शेंगा लागल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांना उत्पन्न मिळाले नाही व आर्थिक व मानसिक ञास सहन करावा लागला आहे. सामनेवाले यांनी भेसळयुक्त बियाणे देऊन फसवणूक केली आहे. त्याकामी होणा-या नुकसान भरपाईची मागणी केली व दि.२९-०१-२०११ रोजी नोटिस पाठविली. परंतु त्याप्रमाणे सामनेवाले यांनी वर्तन केले नाही. सबब सदरची तक्रार दाखल करावी लागली आहे.
(३) तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांनी भेसळयुक्त बियाणे दिले असल्याने उत्पन्न न मिळाल्याने झालेल्या नुकसानीकामी रु.१,८०,०००/-, लागवडीचा खर्च रु.५०,०००/-, मानसिक ञासाकामी रु.३०,०००/-, तक्रार अर्जाचा खर्च रु.१०,०००/- या सर्व रकमा द.सा.द.शे.१८ टक्के व्याजासह मिळाव्यात.
(४) सामनेवाले नं.१ व २ यांनी एकञीत रित्या त्यांचा जबाब देऊन सदरचा अर्ज नाकारला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांनी बियाणे खरेदी केले हे मान्य आहे. परंतु सदर बियाण्यामध्ये भेसळ नाही व सदर झाडांना सात महिने होऊनही शेंगा लागल्या नाहीत हे खरे नाही. पिक पाहनी पंचनामा हा महाराष्ट्र शासनाचे परिपञका प्रमाणे केलेला नाही, व त्यामध्ये फुलगळ होण्याची कारणे दिलेली नाहीत. फुलगळ होणे ही बाब हवामान, तापमान, पाऊस यावर अवलंबून असते. त्यावेळी महाराष्ट्र राज्यात अवकाळी पाऊस व वातावरण असल्यामुळे फुलगळ झालेली आहे. सदर अहवालात तुर बियाणे दोषीत आहे असे कोठेही नमूद नाही. त्यामुळे सदारचा अर्ज खर्चासह रद्द करण्याची मागणी केली आहे.
(५) तक्रारदारांचा अर्ज नि.नं.२, शपथपञ नि.नं.३, कागदपञ नि.नं.६ वर एकूण १ ते ६ तसेच सामनेवाले नं.१ व २ यांचा संयुक्तिक खुलासा,शपथपञ,कागदपञ एकूण १ ते १६ पाहता तसेच उभयपक्षांच्या विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले नं.१ व २ यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब)सामनेवाले नं.१ यांच्या सेवेत ञृटी स्पष्ट होते काय ? | : होय. |
(क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(६) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले नं.१ यांनी उत्पादीत केलेले ग्रिनगोल्ड सिड्स हे सामनेवाले नं.२ यांचेकडून खरेदी केले आहे. त्याबाबतच्या पावत्या दाखल आहेत. नि.नं.६/१ वर दाखल केलेली पावती ही दि.१६-०६-२०१० रोजीची असून बिल नं.२८६३ व बॅच नंबर ३१५०१ असे तुरगोल्ड १३३ या बियाण्याचे दोन किलो वजनाचे तीन नग एकूण रु.९९०/- चे तक्रारदाराने घेतलेले आहेत. नि.नं.६/२ वर दाखल केलेली पावती ही दि.२१-०६-२०१० रोजीची असून बिल नं.३३३६ व बॅच नंबर ३१५०१ असे तुरगोल्ड १३३ या बियाण्याचे दोन किलो वजनाचे तीन नग एकूण रु.९७५/- चे घेतलेले आहेत. सामनेवाले यांनी सदर बियाणे सामनेवाले नं.२ कडून खरेदी केल्याचे मान्य केले आहे व या बाबत वाद नाही. याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले नं.१ व २ चे ग्राहक आहेत. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी सदर बियाण्याची योग्य त्या पध्दतीने लागवड स्वत:चे शेतात केल्यानंतर त्याचे उत्पादन आले नाही त्या बाबत जिल्हा व तालूका स्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रार अर्ज केला. या प्रमाणे सदर समितीने दि.१३-०१-२०१० रोजी पिक परिस्थितीचा पंचनामा केलेला आहे. सदर पंचनामा नि.नं.६/३ वर दाखल आहे. सदर पंचनामा पाहता यामध्ये तुर पिकाची उगवण चांगली, पिकाची वाढ चांगली, पिकावर किडीचा प्रादुर्भाव नाही, पिकात आंर्तगत मशागत उत्तम, पिकात इतर वाणांची भेसळ आहे, असे नमूद केलेले आहे. तसेच या मुद्यांचा विचार घेऊन अभिप्राय नमूद केला आहे की, तुर पिकाची क्षेञ पाहणी केली असता तुर पिकाचे वय सात महिन्याचे पूर्ण होत असून त्यास दोन वेळा फुले येऊन प्रत्यक्षात झाडावर फुले येऊन उम्नळून १०० टक्के फुल गळ झालेली असून, झाडावर आजपर्यंत एकही शेंग आढळून आलेली नाही. अशा आशयाचा अभिप्राय नमूद केलेला आहे. सदर पंचनामा करतांना कृषिअधिकारी, बियाणे कंपनीचे अधिकारी, बियाणे विक्रेता व इतर असे एकूण पाच व्यक्ती हजर असून त्यावर त्यांच्या स्वाक्षरी आहेत. या पंचनाम्यासोबत तक्रारदार शेतकरी, बियाणे विक्रेते, व बियाणे कंपनीचे प्रतिनिधी यांची साक्ष नोंदविलेली आहे. कंपनी प्रतिनिधी श्री. कुणाल शरद पाटील यांनी त्यांच्या साक्षीमध्ये सदर तुर पिकास शेंगा लागलेल्या नाहीत व पिकाची फुलगळ झाली आहे, हे मान्य केले आहे.
सदर पंचनाम्याप्रमाणे, तक्रारदार यांच्या शेतामध्ये लागवड केलेल्या तुर बियाण्यास योग्य ती काळजी घेऊनही एकही शेंग आलेली नाही ही बाब स्पष्ट होत आहे.
सदर पंचनाम्यामध्ये तुर पिकास शेंग आली नाही ही बाब मान्य केली आहे, परंतु याचे कोणतेही संयुक्तीक कारण नमूद केलेले नाही. सदर परिस्थिती निर्माण होणे कामी ढगाळ हवामान किंवा पाऊस, शेतजमीन, खते, रोगाचा प्रादुर्भाव यांचा परिणाम झाला आहे किंवा नाही या बाबत कोणताही खुलासा केलेला नाही. तसेच बियाण्यात दोष आहे असेही स्पष्टपणे नमूद केलेले नाही. परंतु सदर पिकास एकही शेंग आली नाही ही बाब मांडून, त्यांनी त्याबद्दल खुलासा दिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे.
या बाबत सामनेवाले यांनी असा बचाव घेतलेला आहे की, तुर पिकाची फुलगळ होणे ही बाब हवामान, तापमान, पाऊस यावर अवलंबून असते. महाराष्ट़ राज्यात बहूतेक ठिकाणी अवकाळी पाऊस, थंडी व ढगाळ वातावरणामुळे फुलगळ झालेली आहे व त्यामुळे सदरचे बियाण्यात दोष नाही असे म्हणणे आहे. परंतु सदर पिकास हवामानाचा परिणाम होऊन उत्पादन आले नाही, तसा खुलासा पंचनामा केलेला नाही. याबाबत सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या शिरपुर विभागात त्यावेळी असेलेल्या हवामानाबाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तसेच सदर पिकावर केवळ हवामानामुळे परिणाम झालेला आहे व त्यामुळेच शेंगा आलेल्या नाहीत या बाबत कोणताही पुरावा किंवा त्यांच्या तज्ज्ञ अधिका-यांचा अहवाल दाखल केलेला नाही. त्यामुळे सामनेवाले यांचा सदरचा बचाव हा सिध्द होऊ शकत नाही.
सामनेवाले यांनी सदर बियाण्यांचे रिलीज ऑर्डर दाखल केली आहे. परंतु आमच्यामते सदर बियाण्यात दोष असल्याबाबतची तक्रार आल्यानंतर त्या बियाण्याच्या संबंधीत लॉटच्या बियाण्याचे टेस्टींग रिपोर्ट सामनेवाले यांनी दाखल करणे आवश्यक होते. परंतु त्यांनी तसे केलेले दिसत नाही.
सामनेवाले यांनी पिकाचे माहितीपञक दाखल केलेले आहेत. यामध्ये जमीन मध्यम ते भारी असावी व हवामान हे स्वच्छ सुर्यप्रकाश, पुरेसा ओलावा, कोरडे हवामान या पिकास आवश्यक असते. ढगाळ आणि दमट हवामानात फुलगळ फार होते, दाणे भरत नाहीत, किडीचा प्रादुर्भाव वाढतो आणि उत्पादनात घट येते असे नमूद केलेले आहे. या माहितीपञकाचा विचार करता तुर पिकांसाठी योग्य जमीन, हवामान, पुर्व मशागत, पेरणीची वेळ, बियाण्याचे प्रमाण व पेरणी अंतर हे आवश्यक आहे. जर हे योग्य नसल्यास उत्पादनात घट येते असे नमूद केलेले आहे. याचा अर्थ वरील प्रमाणे काळजी घेऊन पेरणी केली नसल्यास व हवामान योग्य नसल्यास उत्पादन हे पूर्णपणे येत नाही असे नसून, केवळ उत्पादनात घट येते हे स्पष्ट होत आहे.
(८) आमच्यामते सामनेवाले यांनी केवळ हवामानामुळे सदर तुर पिकास शेंगा आल्यानाहीत हा बचाव घेतला आहे, हा योग्य नाही. सदर तुर पिकास योग्य हवामान नसल्यास एकही शेंग येणार नाही, असे न होता उत्पादनात घट होण्याची शक्यता अधिक आहे. परंतु दाखल केलेल्या पंचनाम्याप्रमाणे सदर तुर पिकास एकही शेंग आलेली नाही. या परिस्थितीस हवामान हे एकच कारण योग्य असू शकत नाही. यावरुन निश्चितच सदर बियाण्यामध्ये दोष आहे ही बाब सिध्द होत आहे.
(९) यानंतर सामनेवाले यांनी असा बचाव घेतला की, सदर पंचनाम्यामध्ये बियाण्यात दोष आहे असे नमूद नाही व सदर पंचनामा हा महाराष्ट्र शासनाचे परिपञकाप्रमाणे केलेला नाही. परंतु शासन परिपञकाप्रमाणे पंचनामा करणे ही जबाबदारी संबंधीत शासकीय अधिका-याची आहे. सदर पंचनामा हा तक्रारदार शेतकरी तयार करीत नाही. संबंधित अधिका-यांनी तयार केलेला पंचनामा हा शासकीय परिपञकाप्रमाणे नसल्यास त्यास शेतकरी जबाबदार होऊ शकत नाही असे आमचे मत आहे.
सदरचा अहवाल हा सामनेवाले यांना मान्य नाही. परंतु त्यावेळी सामनेवाले यांच्या कंपनीचे प्रतिनिधी हे हजर होते. त्यावेळी त्यांनी सदर पंचनाम्यास कोणतीही हरकत घेतलेली नाही. तसेच सदर अहवाल हा मान्य नसल्याची कोणतीही हरकत घेऊन संबंधीत अधिका-यांकडे तक्रार केलेली दिसत नाही. याचा विचार होता सामनेवाले यांनी केवळ सदर अर्जात बचाव घेणेकामी सदराचा अहवाल मान्य नसल्याचे नमूद केल्याचे दिसते आहे.
(१०) तक्रारदार यांनी साक्षीदारांची पुराव्याचे शपथपञ दाखल केले आहे. यामध्ये श्री.पितांबर भगवान पाटील व मयुर भगवान पाटील व सतिष देवराम कुअर तीन्ही व्यक्ती या साक्षीदारांच्या शपथपञांमध्ये तुर पिकास एकही शेंग आली नाही, तसेच सदरचा पंचनामा करतेवेळी ते समक्ष हजर होते व त्यावर त्यांच्या स्वाक्षरी आहेत अशा आशयाचा मजकूर नमूद आहे. त्यानंतर साक्षीदार ए.टी.पाटील जिल्हा कृषी अधिकारी, धुळे यांचे शपथञ पुराव्याकामी दाखल केलेले आहे. याचा विचार होता साक्षीदार हे कृषी अधिकारी आहेत व ते तक्रारदार यांच्या अर्जावरुन पंचनामा करणेकामी गेले होते व सदर तुर पिकाची उत्तम वाढ होऊन प्रत्यक्षात झाडाला फुले येऊन १०० टक्के फुलगळ झालेली आहे व झाडावर आजपर्यंत एकही शेंग आढळून आली नाही व सदर पिकास कोणत्याही किड किंवा रोगाचा प्रादुर्भाव नाही अशा आशयाचे शपथपञ त्यांनी दाखल केलेले आहे.
या चारही साक्षीदारांचे शपथपञ पाहता, तक्रारदार यांच्या शेतामध्ये पाहणी व पंचनामा करतांना ते हजर असून, सत्य परिस्थिती कथन केली आहे. व सदर तुर पिकास एकही शेंग आढळून आलेली नाही ही बाब स्पष्ट होत आहे.
सामनेवाले यांनी या पुराव्याचे शपथञाविरुध्द पुराव्याचे प्रतिशपथपञ श्री.संतोष ज्ञानोबा वेताळ यांनी दाखल केलेले आहे. या शपथपञाचा विचार करता सामनेवाले यांनी केवळ तक्रारदार यांचे पुराव्याचे शपथपञ नाकारले आहे. परंतु त्याकामी कोणताही योग्य तो खुलासा दिलेला नाही. तसेच या विषयापुष्टयर्थ तज्ज्ञ अधिका-यांचे अहवाल दाखल केलेले नाहीत.
या सर्व कारणांचा विचार करता, सामनेवाले नं.१ यांचा बचाव सिध्द होत नाही. त्यामुळे त्यांच्या सेवेत ञृटी स्पष्ट होत आहे. या बाबीचा विचार करता मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(११) सामनेवाले नं.२ हे सामनेवाले नं.१ यांचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. सामनेवाले नं.२ हे केवळ सामनेवाले नं.१ यांच्याकडून बियाणे सिलबंद स्वरुपात घेऊन तशाच स्वरुपात ग्राहकांना विक्री करतात. तसेच सामनेवाले नं.२ यांनी कोणत्याही प्रकारची भेसळ या बियाण्यात केली आहे असे म्हणणे नाही आणि या बाबतचा कोणताही पुरावा आलेला नाही. याचा विचार होता सामनेवाले नं.२ यांनी सेवेत कोणतीही ञृटी केलेली नसल्यामुळे त्यांना सदर प्रकरणी जबाबदार ठरविता येणार नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार रदृद करणे योग्य होईल असे या न्यायमंचचे मत आहे.
(१२) अर्जदार यांनी सदर झालेल्या नुकसानीपोटी र.१,८०,०००/- ची मागणी केलेली आहे. तसेच लागवडीकामी येणारा खर्च रु.५०,००/- ची मागणी केली आहे. तक्रारदार यांनी पंचनाम्याप्रमाणे १.६० हेक्टर क्षेञामध्ये १२ किलो बियाण्यांची लागवड केली आहे. यामध्ये, तुर पिकाच्या माहितीपञकाप्रमाणे हेक्टरी ६ ते ७ क्वींटल एवढे अपेक्षीत उत्पादन आहे. त्यामुळे १.६० हेक्टर प्रमाणे ७ क्वींटलची येणारी किंमत तक्रारदारास देणे योग्य होईल. वरील प्रमाणे एकूण १२ क्वींटल अपेक्षीत उत्पादन आले असते. कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर, यांनी त्यावेळच्या दिलेल्या बाजारभावा प्रमाणे, सदर तुर पिकास मिळणारा सरासरी बाजारभाव हा प्रति क्वींटल रु.३०००/- लक्षात घेता, तक्रारदार यांना एकूण उत्पन्न हे १२ क्वींटल X ३,०००/- बाजारभाव = रु.३६,०००/- एवढे उत्पादन आले असते. सदरची रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारास देणे योग्य आहे असे या मंचाचे मत आहे. या रकमेमध्ये तक्रारदार यांना बियाणे, लागवड, खते, मशागत व होणारा नफा इत्यादी रकमा अंतर्भुत असतात. त्यामुळे त्याकामी वेगवेगळया रकमा देणे न्यायाचे होणार नाही.
वरील सर्व कारणांचा विचार करता तक्रारदारांना निश्चितच सदर पिकापासून उत्पन्न मिळालेले नाही व ही बाब सामनेवाले यांनी दिलेल्या सदोष बियाण्यांमुळे झालेली आहे. त्यामुळे तक्रारदारास मानसिक व शारीरिक ञास सहन करावा लागला आहे व सदरचा तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे. याचा विचार होता तक्रारदारास मानसिक ञासापोटी रक्कम रु.१,०००/- व शारीरिक ञासापोटी रु.५००/- मिळण्यास पाञ आहेत असे या न्यायमंचाचे मत आहे.
(१३) वरील सर्व बाबीचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले नं.१ यांनी, या आदेशाच्या दिनांकापासून पुढील तीस दिवसांचे आत.
(१) तक्रारदारास तुर पिकाचे नुकसान भरपाईपोटी, रक्कम