Maharashtra

Parbhani

CC/10/166

Bhagwan Shankarrao Sangle - Complainant(s)

Versus

Managing Director, National Seeds Corporation Ltd. - Opp.Party(s)

Adv. P. G. Bangar

13 Jan 2011

ORDER


District Consumer Court,PARBHANIDistrict Consumer Court ,New Administrative Building,Near Telephone Bhavan PARBHANI
Complaint Case No. CC/10/166
1. Bhagwan Shankarrao SangleR/O Dabha, Tq. Jintoor ParbhaniMaharashtra2. Area manager,National seeds corporation ltd.e-8midc,naregaon road,chikalthana,MIDC.Chikalthana,AurangbadAurangbadMaharashtra3. Proprietor,Swati Agro SeedsAt.Jintur Tq.JintutParbhaniMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Managing Director, National Seeds Corporation Ltd.Bijbhawan Pusa parisar New DelhiDelhi ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. C. B. Pandharpatte ,PRESIDENTHONABLE MRS. Sujata Joshi ,MemberHONABLE MRS. Anita Ostwal ,Member
PRESENT :Adv. P. G. Bangar, Advocate for Complainant

Dated : 13 Jan 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

 
निकालपत्र
 
                        तक्रार दाखल दिनांकः- 02.07.2010
                                    तक्रार नोदणी दिनांकः- 05.07.2010
                        तक्रार निकाल दिनांकः- 13.01.2011
                                                                                    कालावधी          6महिने08 दिवस
 
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी
 
अध्‍यक्ष -         श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे,B.Com.LL.B.
सदस्‍या                                                                                                सदस्‍या
सुजाता जोशीB.Sc.LL.B.                                                          सौ.अनिता ओस्‍तवाल M.Sc.
 
 
           प्रकरण क्रमांक 166/2010 आणि 167/2010
 
1     भगवान पिता शंकरराव सांगळे                अर्जदार- तक्रार क्रमांक166/2010
वय 43 वर्षे धंदा शेती रा.दाभा,
ता.जिंतूर जि.परभणी
 
2     जनार्दन पिता शामराव घुगे                 अर्जदार- तक्रार क्रमांक167/2010
वय 45 वर्षे धंदा शेती रा.दाभा,
ता.जिंतूर जि.परभणी
( अर्जदारांतर्फे अड पी.जी.बांगर )     
 
 
 
 
 
विरुध्‍द
 
1        मॅनेजिंग डायरेक्‍टर                                                        गैरअर्जदार
      नॅशनल सिडस कार्पोरशन लिमीटेड             ( अड व्हि.एन.पोंढूळकर)
( गव्‍हमेंट आफ इंडिया अंडरटेकींग) बिजभवन,
पुसा परीसर न्‍यू दिल्‍ली 110012.  
 
2        एरीया मॅनेजर                                                                  गैरअर्जदार
      नॅशनल सिडस कार्पोरशन लिमीटेड             ( अड व्हि.एन.पोंहडूळकर)
इ-8 एम.आय.डी.सी. नारेगांव रोड चिकलठाणा,
औरंगाबाद ता.जि.औरंगाबाद.
 
3        प्रोप्रायटर                                                                गैरअर्जदार
      स्‍वाती अग्रो सिडस जिंतूर                     ( अड आर.जी.सोमाणी )
ता.जिंतूर जि.परभणी.
 
 
     कोरम -    1)    श्री.सी.बी.पांढरपटटे      अध्‍यक्ष
2)        सौ.सुजाता जोशी                    सदस्‍या                                                3)        सौ.अनिता ओस्‍तवाल                   सदस्‍य
-------------------------------------------------------------------------------------------------------
(  निकालपत्र पारित व्‍दारा .श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्‍यक्ष. )
         
निकृष्‍ट दर्जाचे भुईमुंग बियाणामुळे अपेक्षीत उत्‍पन्‍न मिळाले नाही म्‍हणून  नुकसान भरपाई मिळणेसाठी प्रस्‍तुतच्‍या तक्रारी आहेत.
 
दोन्‍ही  प्रकरणातील अर्जदार मौजे दाभा ता. जिंतूर  जि.परभणी येथील रहिवासी शेतकरी आहेत. त्‍यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 या कंपनीने उत्‍पादीत केलेले भुईमंग बियाणे गैरअर्जदार क्रमांक 1 या बियाणे विक्रेत्‍याकडून खरेदी केले होते परंतू पेरल्‍यानंतर अपेक्षीत उत्‍पनन मिळाले नाही अशा अर्जदारांच्‍या तक्रारी आहेत. दोन्‍ही  प्रकरणातील तक्रारदारांचे तक्रारीचे स्‍वरुप व त्‍यावर गैरअर्जदारानी सादर केलेले लेखी जबाब एकसारखेच असल्‍याने दोन्‍ही  प्रकरणाचा संयुक्‍त निकालपत्रा व्‍दारे निर्णय देण्‍यात येत आहे.
 
अर्जदारांच्‍या तक्रारीची थोडक्‍यात हकीकत खालीलप्रमाणे.
 
तक्रार अर्ज क्रमांक 166/2010 मधील अर्जदाराने त्‍याच्‍या मालकीचया गट क्रमांक 48 आणि गट क्रमांक 49 आणि प्रकरण क्रमांक 167/2010 मधील अर्जदाराने त्‍याच्‍या मालकीच्‍या गट क्रमांक 8 आणि गट क्रमांक 9 मध्‍ये  जानेवारी ते जुन 2009 च्‍या हंगामात शेतात भुईमुंगाचे पीक घेण्‍यासाठी गैरअर्जदार क्रमांक 3 यांचे दुकानातून गैरअर्जदार क्रमांक 1 यानी उत्‍पादीत केलेल्‍या टॅग क्रमांक 24 वाणाच्‍या बियाणाच्‍या पिशव्‍या अनुक्रमे 20 किलाे व 180 किलो याप्रमाणे खरेदी केल्‍या होत्‍या. दोन्‍ही अर्जदारानी खरेदी केलेले बियाणे जमिनीची आवश्‍यक ती मशागत करुन दिनांक 28.01.2009 रोजी पेरले. पेरणीनंतर आवश्‍यक ते खत पाणी देण्‍याची काळजीही घेतली होती पण अपेक्षीत दर एकरी 45 पोत्‍या ऐवजी फक्‍त 5 पोती उत्‍पन्‍न मिळाले. त्‍याबाबत तक्रार केल्‍यावर  दिनांक 19.05.2009 रोजी बियाणे तक्रार निवारण समितीच्‍या सदस्‍यानी दोन्‍ही अर्जदारांच्‍या शेतातील पिकांची समक्ष पाहाणी करुन अहवाल दिला. त्‍यानंतर दिनांक 06.06.2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचेकडे प्रकरण क्रमांक 166/2010 मधील अर्जदाराने त्‍याच्‍या एकूण 5 एकर क्षेत्रातील पेरलेल्‍या बियाणांची नुकसान भरपाई रुपये 199800/- आणि प्रकरण क्रमांक 167/2010 मधील अर्जदाराने त्‍याच्‍या एकूण 4 एकर 20 गुंढे क्षेत्रात पेरलेल्‍या बियाणाची नुकसान भरपाई रुपये 189280/- मिळण्‍याची मागणी केली होती. गैरअर्जदार क्रमांक 2 ने त्‍याप्रमाणे कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्‍याचे अर्जदाराना आश्‍वासन दिले मात्र त्‍याची पूर्तता केली नाही म्‍हणून अर्जदारानी गैरअर्जदार क्रमांक 1 व2 याना वकिलामार्फत नोटीस पाठवून नुकसान भरपाई देण्‍याबाबत कळविले होते त्‍यालाही प्रतिसाद मिळाला नाही. म्‍हणून ग्राहक मंचात तक्रारी दाखल करुन गैरअर्जदाराकडून प्रकरण क्रमांक 166/2010 मधील अर्जदाराने        रुपये 199800/- आणि प्रकरण क्रमांक 167/2010 मधील अर्जदाराने रुपये 189280/- च्‍या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
 
      तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ अर्जदारांची शपथपत्रे (नि.2) आणि पुराव्‍यातील कागदपत्रात नि. 6 लगत बियाणे खरेदीच्‍या पावत्‍या गैरअर्जदाराकडे नुकसान भरपाई संबंधी पाठविलेल्‍या लेखी तक्रारीच्‍या स्‍थळप्रती, बियाणे तक्रारी निवारण समितीचा पीक पाहाणी अहवाल, जमिनीचे 7/12 उतारे, लिगल नोटीशीची स्‍थळप्रत वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत
.
तक्रार अर्जावर लेखी म्‍हणणे सादर करण्‍यासाठी दोन्‍ही प्रकरणातील गैरअर्जदाराना मंचातर्फे नोटीसा पाठविल्‍यावर गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 तर्फे दिनांक 14.10.2010 रोजी आणि गैरअर्जदार क्रमांक 3 तर्फे दिनाक 14.09.2010 रोजी लेखी जबाबा सादर केले.
 
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 तर्फे सादर केलेल्‍या लेखी जबाबात ( नि.21) तक्रार अर्जातील सर्व विधाने खोटी असल्‍याचे कथन करुन साफ नाकारली आहेत. त्‍याचे म्‍हणणे असे की, पेरलेल्‍या टॅग 24 शेंगदाणे बियाण्‍याचा तक्रारी संदर्भात बियाणे तक्रार निवारण समितीने अर्जदारांच्‍या शेताची पाहाणी करण्‍यापूर्वी गैरअर्जदारास कोणतीही पूर्व कल्‍पना अथवा नोटीस न देता त्‍यांचे अपरोक्ष पाहाणीकरुन दिलेला अहवाल त्‍यांचेवर बंधनकारक नाही तो बेकायदेशीर आहे. तसेच बियाणाच्‍या उगवणीबाबत अगर कमी उत्‍पन्‍न मिळाले संबधी अर्जदारानी कंपनीकडे यापूर्वी  कोणतीही लेखी अथवा तोंडी तक्रार केलेली नसल्‍याने उत्‍पन्‍न कमी मिळाल्‍या संबधीची अर्जदारांची तक्रार गळपडूपणाची   असून गैरअर्जदार कोणतीही नुकसान भरपाई देणे लागत नाही. सदरचे बियाणे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यानी उत्‍पादीत केलेले नसून  आंध्रप्रदेश सीड सर्टीफीकेशन एजन्‍सी हैद्राबाद यानी उत्‍पादीत केलेले आहेत व गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 याचे मार्फत विक्री केलेले आहे. त्‍यामुळे बियाण्‍याचे निकृष्‍टतेची  जबाबदारी गैरअर्जदारावर येत नसल्‍याने त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार फेटाळण्‍यात यावी. तक्रारीस नॉन जॉईंडर आफ नेसेसरी पार्टी ची बाधा येते. गैरअर्जदारांचे पुढे म्‍हणणें असे की, वादातील बियाणे अत्‍यंत उच्‍च प्रतीचे असून त्‍याची प्रथम चाचणी घेवून व उगवण क्षमता व इतर बाबी तज्ञाचे मार्गदर्शनाखाली तसेच प्रयोग शाळेत तपासून पडताळून मगच विक्रीसाठी काढले आहेत. संपूर्ण   महाराष्‍ट्रात सुमारे 4414 क्विंटल बियाणे विकलेले आहेत. अर्जदारांच्‍या व्‍यतिरीक्‍त अन्‍य कुणाची बियाणाबद्यल कंपनीकडे तक्रार आलेली नाही. अर्जदारानी पेरलेल्‍या बियाणामधून उत्‍पन्‍न कमी मिळाले अशी तक्रार आहे परंतू उत्‍पन्‍न कमी मिळाल्‍यास बरेच घटक अवलंबून असतात जसे की,   मातीचा दर्जा, हवामान आद्रता, खते. लागवडीची पध्‍दत, पाणी, मशागत वगैरे बाबीचा योग्‍य वापर न झाल्‍यास उत्‍पन्‍नावर परीणाम होतो अर्जदाराकडून याबाबतीत दुर्लक्ष झाल्‍यामुळेच त्‍याना उत्‍पन्‍न कमी मिळाले असले पाहीजे. कृषी विभागाच्‍या बियाणे तक्रार निवारण समितीने अर्जदारांच्‍या शेताची पाहाणी करुन दिलेला अभिप्राय विक्रेता व उत्‍पादन यांच्‍या अपरोक्ष दिलेला असल्‍यामुळे तो संशायास्‍पद आहेत. अर्जदारानी ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या कलम 13 (1) (क) मधील तरतूदीनुसार पेरलेल्‍या बियाणाचे नमुने प्रयोग शाळेत तपासून त्‍याचा अहवाल मागविलेला नाही या कारणास्‍तव देखील   तक्रार अर्ज रुपये 10,000/- च कॉम्‍पेनसेटरी कॉस्‍टसह फेटाळण्‍यात याव्‍यात अशी शेवटी विनंती केली आहे.
 
लेखी जबाबाचे पुष्‍टयर्थ एरीया मॅनेजर यांचे शपथपत्र (नि.22) दाखल केले आहे तसेच पुराव्‍याचे कागदपत्रात नि. 25 लगत अ.पी.सीड सर्टीफीकेट एजन्‍सीने टॅग 24 बियाणाची प्रयोगशाळेतून तपासणी  करुन घेतलेल्‍या चाचणी अहवाल दाखल केला आहे.
 
गैरअर्जदार क्रमांक 3 बियाणे विक्रेते यानी सादर केलेल्‍या लेखी जबाबातून    (नि. 17) त्‍यांचे विरुध्‍द तक्रार अर्जातून केलेली सर्व विधाने नाकारली असून पुढे असा खुलासा केला आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 कंपनीचे डिलर आहेत कंपनीकडून आलेल्‍या बियाणाच्‍या पिशव्‍या टॅगसहीत सिलबंद असतात त्‍याच अवस्‍थेत त्‍यांचेकडून शेतक-याना विकल्‍या जातात . अर्जदारानाही सिलबंद पीशव्‍या विकलेल्‍या होत्‍या. त्‍यासंबंधी अर्जदाराची ही तक्रार नाही त्‍यामुळे‍ बियाणाच्‍या सदोषतेची कोणतीही जबाबदारी गैरअर्जदार क्रमांक 3 ची नाही. बियाणाच्‍या सदोषतेमुळे अर्जदारानी त्‍याचेकडेही तक्रार दिलेली नव्‍हती. कृषी विभाग बियाणे तक्रार निवारण समितीने शेतातील पिकाची पाहाणी करण्‍यापूर्वी गैरअर्जदारास न बोलविताच  परस्‍पर त्‍यांचे अपरोक्ष अहवाल दिला आहे बियाणे मुळीच सदोष नव्‍हते. गैरअर्जदारानी संबधीत बियाणाचे नमुने सरकारी प्रयोगशाळेतून तपासणी करुन घेवून  ते उत्‍तम दर्जाचे आहेत अशी मान्‍यता  घेतली आहे. गैरअर्जदार याला तक्रारीमध्‍ये औपचारीक पक्षकार म्‍हणून सामील केलेले आहे तो विक्रेता असल्‍यामुळे नुकसान भरपाईची त्‍याचेवर कसलीही जबाबदारी नाही सबब त्‍यांचे विरुध्‍दची प्रस्‍तूतची तक्रारी खारीज करणेस याव्‍यात अशी शेवटी विनंती केली आहे.
 
लेखी जबाबाचे पुष्‍टयर्थ गैरअर्जदार क्रमाक 3 चे शपथपत्र ( नि.18) दाखल केले आहे.
 
अंतिम सुनावणीचे वेळी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 तर्फे  अड. पोहंडूळकर आणि
गैरअर्जदार क्रमांक क्रमांक 3 तर्फे अड ए.के. उमरीकर यानी युक्तिवाद केला. अर्जदाराचे वकिलानी युक्तिवादासाठी तीन - चार वेळा मुदती देवून ही स्‍वतः अर्जदार अथवा त्‍याचे तर्फे नेमलेले वकिल मंचापुढे हजर न राहील्‍याने मेरीटवर प्रकरणाचा अंतीम निकाल देण्‍यात येत आहे.  
 
मुद्दे.                                                       उत्‍तर.
 
1     गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 या कंपनीचे अर्जदारानी खरेदी केलेल्‍या टॅग 24
वाणाचे भुईमुग बियाणे निकृष्‍ट दर्जाचे व कमी उत्‍पन्‍न देणार निघाले
हे अर्जदारानी कायदेशीररित्‍या शाबीत झाले आहे काय ?               नाही
 
2     गैरअर्जदाराकडून याबाबतीत अनूचीत व्‍यापारी प्रथेचा अथवा सेवा त्रूटी
झाली आहे काय ?                                             नाही
 
3     निर्णय ?                                  अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
 
मुद्या क्रमांक 1 ते 3 ः-
 
दोन्‍ही प्रकरणातील अर्जदारांनी गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्‍या दुकानातून गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कंपनीचे टॅग 24 वाणाचे भुईमुंग बियाणे खरेदी केले होते ही अडमिटेड फॅक्‍ट आहे शिवाय बियाणे  खरेदीच्‍या पावत्‍यांच्‍या छायाप्रती प्रकरणात नि. 6 लगत दाखल केल्‍या  आहेत. त्‍यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 चे अर्जदार ग्राहक आहेत ही प्राथमिक बाब अर्जदाराकडून शाबीत झाली आहे. प्रकरण क्रमांक 166/2010 मधील अर्जदाराने दिनांक 28.01.2009 रोजी गट क्रमांक 48 व 49 मधील 2 हेक्‍टर          ( 5 एकर क्षेत्रात ) 20 किलोच्‍या 10 पिशव्‍या पेरल्‍या होत्‍या तसेच प्रकरण क्रमांक 167/2010 मधील अर्जदाराने त्‍याच्‍या मालकीच गट क्रमांक 8 व 19 मधील 4 एकर 20 गुंडे क्षेत्रात 20 किलोच्‍या तीन पिशव्‍या दिनांक 28.01.2010 रोजी पेरल्‍या होत्‍या असे तक्रार अर्जात नमूद केले आहे हे पुराव्‍यातून शाबीत करताना नि. 6 लगत जमिनीचे 7/12 उतारे दाखल केले असल्‍यामुळे ही बाब देखील पुराव्‍यातून शाबीत झालेली आहे.
 
अर्जदाराने तक्रार अर्जामध्‍ये बियाणे उगवण योग्‍य प्रकारे झालेली नाही असे केवळ त्रोटकपणे नमूद केले आहे. बियाणे पेरल्‍यावर  उगवण क्षमते संबंधी अर्जदारांना शंका आल्‍यावर किंवा त्‍यांच्‍या नेहमीच्‍या अनुभवातून उगवण चांगल्‍या प्रकारे झाली नाही असे दिसून आल्‍यावर त्‍यानी बियाणे विक्रेत्‍याकडे त्‍या संबंधी लेखी तक्रार केली होती असे तक्रार अर्जात नमूद केलेले नाही किंवा त्‍याचा पुरावा ही दाखल केलेला नाही.  एवढेच नव्‍हे तर उत्‍पन्‍न निघल्‍यानंतर नेहमीप्रमाणे दर एकरी 45 पोती ( 40 किलो चे एक पोते प्रमाणे )  अपेक्षीत उत्‍पन्‍न मिळाले पाहीजे होते त्‍याऐवजी फक्‍त प्रती एकरी 5 पोतेच उत्‍पन्‍न मिळाले त्‍यामुळे पेरलेले बियाणे  निकृष्‍ट दर्जाचे निघाले होते त्‍याची खात्री पटल्‍यानंतर तरी किमान अर्जदाराने विक्रेते व उत्‍पादक कंपनी  ( गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 ) यांच्‍याकडे त्‍याबाबतीत लेखी तक्रार न करता त्‍या ऐवजी कृषी विभागाच्‍या बियाणे तक्रार निवारण समितीकडे अर्ज देवून त्‍यांच्‍या 19.05.2009 तारखेच्‍या  मिळालेल्‍या अहवालाचे आधारे गैरअर्जदाराविरुध्‍द प्रस्‍तूतची तक्रार केलेली असल्‍याचे दिसून येते. तक्रार निवारण समितीकडे तक्रार देण्‍यापूर्वी  गैरअर्जदाराकडे तक्रार दिली होती परंतू त्‍यानी दाद दिली नाही असा कोणताही सबळ पुरावा अर्जदाराने मंचापुढे दाखल केलेला नाही. दोन्‍ही प्रकरणात पुराव्‍यात दाखल केलेल्‍या बियाणे तक्रार निवारण समितीचे निरीक्षण पाहाणी अहवालाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तपशील क्रमांक 5 खाली निरीक्षण क्रमांक 6 व  7 मध्‍ये पेरणीसाठी वापरलेले बियाणे खते आणि किटकनाशके याचा उल्‍लेख केलेला आहे परंतू ती खते व किटकनाशके शेतक-यानी खरोखर वापरली होती या संबधीचा कसलाही ठोस पुरावा म्‍हणजे खरेदीच्‍या पावत्‍या अगर लेबरस मंचापुढे आलेला नसल्‍यामुळे अहवालातील त्‍या तपशीलातील  नोंदी कायदेशीररित्‍या शाबीत झालेल्‍या नाहीत . क्षेत्र निरीक्षण समितीच्‍या सदस्‍यानी केलेल्‍या पाहाणीतील जे अभिप्राय दिलेले आहे त्‍यामध्‍ये असे नमूद केले आहे ‘’ भुईमुंग पिकाची वाढ शेंगा व वेल टॅग 24 च्‍या वाणाचे गुणधर्माशी विसंगत होती त्‍यामुळे शेतक-याचे अर्थिक नुकसान झालेले आहे. ‘’  समितीच्‍या सदस्‍यानी वरीलप्रमाणे दिलेला निष्‍कर्ष हा कशाचे आधारे दिलेला आहे या संबंधी कसलाही सविस्‍तर खुलासा अहवालात दिलेला नाही किंवा तो निष्‍कर्ष काढताना सदस्‍यानी काय निकष लावले होते याचाही खुलासा केलेला नाही त्‍यामुळे केवळ दोन ओळीच्‍या अभिप्रायामधून अर्जदाराने पेरलेले बियाणे टॅग 24 वाणाचे गुणधर्माशी विसंगत आहे हे मुळीच कायदेशीररित्‍या ग्राहय धरता येणार नाही याखेरीज देखील  अहवालात आणखी ब-याच त्रूटी व विसंगती दिसतात  त्‍या अशा की, बियाणा पासून कमी उत्‍पन्‍न मिळाले यासंबंधी अर्जदाराने कृषी विकास अधिकारी जिल्‍हा परीषद यांच्‍याकडे दिनांक 12.05.2009 रोजी तक्रार केल्‍यानंतर महाराष्‍ट्र शासनाचे कृषी  संचालनालयाच्‍या मुख्‍य गुणवत्‍ता नियंत्रण अधिकारी यानी वेळोवेळी प्रसिध्‍द केलेल्‍या परिपत्रकातील मार्गदर्शनाप्रमाणे समितीने  पीक पाहाणी केलेली दिसून येत नाही.   शेतक-यांने  कृषी विकास अधिकारी यांच्‍याकडे लेखी तक्रार केल्‍यावर तक्रार निवारण  समितीच्‍या सर्व सदस्‍यांनी शेतक-याचे शेतात भेट देण्‍यापूर्वी उत्‍पादकाला व विक्रेत्‍याला त्‍यासंबंधीची पूर्व नोटीस देवून पिकाची पाहाणी केली पाहीजे. यासंबधीच्‍या  कार्यपध्‍दती व मार्गदर्शक सुचनांचे परीपत्रक क्रमांक कृषी संचलनालयाने दिनांक 10 जुन 82 व 2 जानेवारी 84 रोजी संदर्भ  क्‍यूसीसी/कप्‍लेंट/3083/कृषी 66 तसेच दिनांक 27.03.1992 रोजीचे परीपत्रक गु.नि.यो/बियाणे/स्‍था.ज./5/92/का.66 प्रसिध्‍द केले आहे त्‍यानंतर ही माहे जुलै 1998 मध्‍येही याच संदर्भात सुधारीत परिपत्रक प्रसिध्‍द केले आहे त्‍या मध्‍ये दिलेल्‍या मार्गदर्शनाप्रमाणे प्रकरणातील बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल नाही. सदरची पाहणी मुळातच गैरअर्जदाराच्‍या अनुपस्थितीत त्‍यांचे अपरोक्ष करुन अभिप्राय दिलेला असल्‍यामुळे व तो एकतर्फी असल्‍यामुहे शंकास्‍पद वाटतो वास्‍तविक पीक पाहाणी  बियाणे उत्‍पादक व विक्रेता यांचे समक्ष रंन्‍डम पध्‍दतीने पाहाणी करुन पंचनामा करणे बंधनकारक असते तशी कोणतीही प्रक्रीया केलेली दिसत नाही अथवा समितीने तशी दक्षता घेतलेली नाही. पिक पाहाणी केलेल्‍या वस्‍तूस्थितीचा पंचनामा ति-हाईत पंच साक्षीदारा समक्ष करणे बंधनकारक आहे व ती एक महत्‍वाची मार्गदर्शक सुचना आहे परंतू त्‍याकडे समितीच्‍या सदस्‍यानी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले दिसते व तक्रार अर्जामध्‍ये अर्जदाराने पंचनामा केला असल्‍याचे महटले आहे परंतू तो पुराव्‍यात का दाखल केलेला नसल्‍यामुळे ते विधान पोकळ स्‍वरुपाचेच केले आहे असे दिसते अर्जदाराने पुराव्‍यात नि. 6 लगत गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्‍याकडे  बियाणे फेल निघाल्‍या संबंधीची दिनांक 06.06.2009 रोजी लेखी तक्रार केली होती त्‍या अर्जाची छायाप्रत पुराव्‍यात नि. 6/10 वर दाखल केलेली आहे परंतू सदरची तक्रार गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्‍याकडे पाठवल्‍याचा ठोस   पुरावा दाखल केलेला नसल्‍यामुळे केवळ स्‍थळप्रती वरुन गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्‍याकडे तक्रार केली होती हे पुराव्‍यातून शाबीत होवू शकत नाही.
 
सर्वात महत्‍वाची गोष्‍ट महणजे ग्राहक मंचात अर्जदारानी गैरअर्जदाराविरुध्‍द प्रस्‍तूतची तक्रारी दाखल केल्‍यावर त्‍यानी खरेदी केलेले बियाणे निकृष्‍ट दर्जाचे होते म्‍हणून अपेक्षापेक्षा कमी उत्‍पन्‍न मिळाले त्‍याची नुकसानी भरपाई मिळण्‍यासाठी गैरअर्जदाराविरुध्‍द तक्रारी दाखल केल्‍यावर वास्‍तविक ती गोष्‍ट कायदेशीररित्‍या शाबीत करण्‍यासाठी त्‍यानी पेरलेले बियाण्‍याचे नमुने स्‍वतः अगर गैरअर्जदाराकडून घेऊन समुचीत प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्‍यात यावेत म्‍हणून ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 13(1) (क) मधील तरतूदीप्रमाणे मंचाकडे प्रकरणाचा अंतिम सुनावणीचे नेमलेल्‍या तारखेपर्यंत देखील  मागणी केलेली नाही अथवा त्‍याबाबतीत आग्रह धरलेला नसल्‍यामुळे बियाणे निकृष्‍ट  दर्जाचे होते हे प्रयोग शाळेतील तपासणी अहवालाखेरीज कायदेशीररित्‍या मुळीच ग्राहय धरता येत  नाही. अर्जदाराकडून ही मोठी  त्रूटी राहून गेली आहे  तोच एकमेव ठोस पुरावा आहे. अर्जदाराने कृषी विभाग जिल्‍हा परीषद परभणी यांच्‍या  बियाणे तक्रार निवारण समितीच्‍या अहवालातील अभिप्रयावर विसंबून राहून  गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई मागितली आहे परंतू दोन्‍ही अहवाल एकतर्फी असल्‍यामुळे पुराव्‍याचे शाबीतीच्‍या दृष्‍टीकोनातून ते निष्‍फळ ठरले आहेत त्‍यामुळे  अर्जदारांची तक्रार मुळीच मान्‍य करता येणार नाही. पेरलेले बियाणे चांगल्‍या प्रकारे उगवले नाहीत अपेक्षीत उत्‍पन्‍न मिळाले नाही याला अनेक बाबी अवलंबून असतात त्‍यामध्‍ये मुख्‍यतः जमिनीची प्रत, आद्रता, पेरणीनंतर  व योग्‍य प्रकारे किटकनाशक , खते याची मात्रा देणे उगवणीनंतर आवश्‍यक ती मशागत करणे, आवश्‍यक तो पाणी पुरवठा देणे या सर्व गोष्‍टी पाहाव्‍या लागतात  अर्जदारानी कदाचीत वरील सर्व बाबींची आवश्‍यक ती दक्षता व काळजी  योग्‍य प्रकारे व योग्‍य वेळी घेतली नसावी त्‍यामुळेच उत्‍पन्‍न कमी मिळाले असावे ही शक्‍यत नाकारता येत नाही  मुळातच गैरअर्जदारावर केलेले आरोप कायदेशीररित्‍या सिध्‍द होवू शकलेले नाहीत. शाबीत झाल्‍याखेरीज तक्रार मान्‍य करता येणार नाही या संदर्भात
 
(1) रिपोर्टेड केस 2009 (2) सी.पी.जे.पान 414 (महाराष्‍ट्र राज्‍य आयोग)
Field inspected by committee – Report of committee could not be acted upon as expert if not associated as required by Govt. Resolution – Seed Defective not proved – No Relief entitled.
(2) रिपोर्टेड केस 2008 (3) सी.पी.आर.पान 260 ( महाराष्‍ट्र राज्‍य आयोग )          मध्‍ये असे    मत व्‍यक्‍त केले आहे की,
 
Seed Committee report placed on record not at all sufficient to establish infirior quality of seeds  
 
(3) रिपोर्टेड केस (अ ) 2007 (2) सी.पी.जे.पान 148 ( राष्‍ट्रीय आयोग )
              (ब ) 2008 (2) सी.पी.आर.पान 193 (राष्‍ट्रीय आयोग)
When there was no laboratory testing report, then complaint was   liable to be dismissed.
 
(4) रिपोर्टेड केस 2003 (3) सी.पी.जे पान 628 या प्रकरणात देखील मा.महाराष्‍ट्र राज्‍य आयोगाने वरील प्रमाणेच मत व्‍यक्‍त केले आहे.
 
(5) रिपोर्टेड केस 2009 (1) सी.पी.आर.पान 182 (राष्‍ट्रीय आयोग)
Question of quality of seeds is to be determined procedure contemplated under section 13 (1) (c) of Consumer Protection Act and not on the besis of assumption or presumption .
 
(6) रिपोर्टेड केस 2007 (1) सी.पी.जे.पान 266 ( राष्‍ट्रीय आयोग )
 
If Laboratory testing report supports the seed manufacturer that seed was of 99.6 % purity. Then he is not liable for any compensation
     
वरील सर्व रिपोर्टेड केसेस मध्‍ये व्‍यक्‍त केलेली मते व दोन्‍ही प्रकरणाला लागू पडतात. गैरअर्जदार कंपनीने उत्‍पादीत केलेले बियाणे मार्केटमध्‍ये वितरीत करण्‍यापूर्वी आध्रप्रदेश State Seed Certification Agency यांच्‍याकडून बियाणे तपासणी केली होती त्‍या अहवालाची प्रत नि. 24/ए/बी दाखल केली आहे त्‍याचे अवलोकन केले असता बिज विश्‍लेषण रिपोर्टमध्‍ये अर्जदाराने खरेदी केलेले टॅग 24 लॉट क्रमांक 9296 याची बियाणेची उगवण क्षमता 82%  व शुध्‍दता 97.5 %  असल्‍याचे तपासणीमध्‍ये नमूद केले आहे बियाणे 20 किलोच्‍या बॅगवर देखील सदर तपासणी अहवालाचे लेबल लावले आहे  ते मुळ लेबल अर्जदारानेच पुराव्‍यात नि. 26 लगत दाखल केले आहे. अनालासीस रिपोर्ट मधील तपासणी मधून संबंधीत बियाणे चांगल्‍या प्रकारचे व उत्‍तम उत्‍पन्‍न क्षमतेचे असल्‍याचे तपासणीतून आढळून आल्‍याचा रिपोर्ट पुराव्‍यातून दिसत असल्‍याने बियाणे मुळीच निकृष्‍ट दर्जाचे नव्‍हते हे गैरअर्जदारानी शाबीत केले आहे त्‍यामुळे अर्जदारानी केलेल्‍या तक्रारी खोटया असल्‍याचा यातून निष्‍कर्ष निघतो. दोन्‍ही तक्रारी मधून गैरअर्जदाराविरुध्‍द  केलेले आरोप कायदेशीररित्‍या शाबीत झालेले नसल्‍यामुळे अर्जदार कोणतीही नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाहीत. सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्‍तर नकारार्थी देवून  आम्हीखालीलप्रमाणेआदेशदेत आहोत.
 
आदेश
 
1     अर्जदारांचा तक्रार अर्ज क्रमांक 166/2010 आणि 167/2010 नामंजूर करण्‍यात येत आहे.
2     दोन्‍ही पक्षानी आपआपला तकारीचा खर्च सासावा.
3     संबंधीताना आदेश कळविण्‍यात यावा.
4     निकालपत्राची मुळप्रत प्रकरण क्रमांक 166/2010 मध्‍ये ठेवावी.
 
 
श्रीमती.अनिता ओस्‍तवाल.           सौ.सुजाता जोशी.       श्री.सी.बी.पांढरपट्टे.
     सदस्‍या.                       सदस्‍या.                 अध्‍यक्ष.
 
 
           
 
 
 

[HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member