Maharashtra

Nagpur

CC/328/2021

DR SAU JOTSANA PRASHANT PALEWAR - Complainant(s)

Versus

MANAGING DIRECTOR M/S PROVISNAL TRACTOR PRIVATE LIMIED - Opp.Party(s)

ADV SHRIRAM DEORAS

31 Jan 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/328/2021
( Date of Filing : 21 Jun 2021 )
 
1. DR SAU JOTSANA PRASHANT PALEWAR
346, GRATE NAG ROD, UNTHKHANA SHOK CHOWK, NAGPUR 440009
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. MANAGING DIRECTOR M/S PROVISNAL TRACTOR PRIVATE LIMIED
PLOT NO 154, WARD NO 21, PURANA BHANDAR AROAD, MORYABAR KE PASS NAGPUR 440008
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV SHRIRAM DEORAS, Advocate for the Complainant 1
 
Dated : 31 Jan 2022
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये -

  1.      तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019  च्‍या कलम 35 अन्‍वये दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तिने शेतीच्‍या कामाकरिता विरुद्ध पक्षाकडून Second hand Tractor NEW HOLLAND Model 3030 हा  एकूण रक्‍कम रुपये 1,00,000/- मध्‍ये घेण्‍याचा तोंडी  सौदा केला व करारानुसार तक्रारकर्तीने आर.टी.जी.एस. द्वारे विजया बँक( विलगीकरण बँक ऑफ बडोदा) नागपूर येथील बँक खात्यातून विरुद्ध पक्षाच्‍या  प्रोव्‍हीनसल ट्रैक्‍टर प्रायव्हेट लिमिटेड नागपूर यांच्‍या खात्यामध्ये रुपये 1,00,000/- जमा केले. विरुद्ध पक्षाने तक्रारकर्तीच्‍या घरी ड्रायव्हरच्‍या  हस्ते ट्रैक्‍टर पोहचविला, परंतु त्‍यावर वाहन रजिस्ट्रेशन प्लेट नव्हती. तसेच  विरुद्ध पक्षाने ट्रॅक्टर संबंधित दस्तऐवज, आरसी बुक, इन्शुरन्स इत्यादी दस्तावेज तक्रारकर्तीला दिले नाही, त्‍याचप्रमाणे ट्रॅक्टर ही तक्रारकर्तीच्‍या नावांवर ट्रान्‍सफर करून दिला नाही, त्यामुळे तक्रारकर्तीला पोलीस कारवाईला सामोरे जावे लागले. तक्रारकर्तीने संबंधित ट्रॅक्टरची दस्तावेज मिळण्याकरिता त्यांचे खात्रीचे व्यक्ती श्री वसंता भगवान दाढे यांना विरुद्ध पक्षाच्‍या  कंपनीत दिनांक 05.02.2021 ला पाठविले. त्‍यानंतर ही तक्रारकर्तीला विकलेल्‍या ट्रैक्‍टरचे दस्तावेज पुरविले नाही, त्यामुळे तक्रारकर्तीने दिनांक 31.03.2021 ला विरुध्‍द पक्षाला वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करून खालील प्रमाणे मागणी केली आहे.

 

अ. विरुद्ध पक्षाने तक्रारकर्तीला त्रुटी पूर्ण सेवा दिल्याचे घोषित करावे.

 

आ. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला विकलेल्या ट्रॅक्टरचे दस्तऐवज सुपूर्द करावे किंवा दस्तावेज सुपूर्द करणे शक्य नसल्यास विरुद्ध पक्षाने तक्रारकर्तीकडून वाहन विक्री पोटी स्वीकारलेली रक्कम रुपये1,00,000/- अदा केल्‍याच्‍या तारखेपासून18% दराने  व्याजासह परत करण्याचे आदेशित करावे.

 

इ. मानसिक व शारीरिक त्रासाकरिता करिता नुकसान भरपाई  व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश करावा.

 

  1.      विरुद्ध पक्षाला आयोगा मार्फत पाठविण्‍यात आलेली नोटीस प्राप्त झाल्‍यावर ही विरुद्ध पक्ष आयोगा समक्ष हजर झाले नाही. म्‍हणून त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 22.10.2021 ला पारित करण्यात आला.
  2.      तक्रारकर्तीने तक्रारी सोबत सादर केलेले दस्तऐवज व तोंडी युक्तिवाद ऐकल्यावर आयोगाने निकाली कामी  खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

1     तक्रारकर्ती विरुद्ध पक्षाची ग्राहक आहे काय ?          होय

 

2     विरुद्ध पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय?    होय

 

3     आदेश?                                        अंतिम आदेशानुसार

कारणमीमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत तक्रारकर्तीने विरुद्ध पक्षाकडून Second hand Tractor NEW HOLLAND Model 3030 हा  एकूण रक्‍कम रुपये 1,00,000/- मध्‍ये घेण्‍याचा तोंडी  सौदा केला व करारानुसार तक्रारकर्तीने आर.टी.जी.एस. द्वारे विजया बँक( विलगीकरण बँक ऑफ बडोदा) नागपूर येथील बँक खात्यातून विरुद्ध पक्षाच्‍या  प्रोव्‍हीनसल ट्रैक्‍टर प्रायव्हेट लिमिटेड नागपूर यांच्‍या खात्यामध्ये रुपये 1,00,000/- जमा केले हे निशाणी क्रमांक 2(2) वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. यावरून तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीकडून वाहन विक्री पोटी संपूर्ण रक्कम रुपये1,00,000/- स्वीकारून ही तक्रारकर्तीला ट्रॅक्टरचे दस्तावेज पुरविले नाही. तसेच ट्रैक्‍टर ही तक्रारकर्तीच्‍या नांवे ट्रान्सफर करून दिला नाही, ही विरुद्ध पक्षाची दोषपूर्ण सेवा आहे असे आयोगाचे स्पष्ट मत आहे.

सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला विकलेले ट्रॅक्टर तिच्‍या नांवे ट्रान्सफर करून  ट्रॅक्टरची कागदपत्रे( आरसी बुक इत्यादी) तक्रारकर्तीला हस्तांतरित करावी                                                                                                                                                                                                                                                                                                  किंवा

तक्रारकर्तीकडून ट्रैक्‍टर विक्री पोटी स्वीकारलेली रक्कम रुपये1,00,000/- दिनांक 31.05.2021  पासून म्‍हणजेच तक्रार दाखल केल्‍याच्‍या तारखेपासून  तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 18% दराने व्याजासह रक्‍कम तक्रारकर्तीला अदा करावी. तक्रारकर्तीला सदरहू रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतर तक्रारकर्तीने ट्रैक्‍टर परत करावा.  

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये10,000/- द्यावे.

        4.    वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.

  1.  उभय पक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क द्यावी.

 

  1.  तक्रारकर्तीला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.