Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/10/650

MR NISHITH MOHAN MISHRA & MRS VANDANA MISHRA - Complainant(s)

Versus

MANAGING DIRECTOR, LUFTHANSA GERMAN AIRLINES - Opp.Party(s)

NO

19 Jul 2012

ORDER

CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM MUMBAI SUBURBAN DISTRICT
3RD FLOOR, ADMINISTRATIVE BLDG., NR. CHETANA COLLEGE, BANDRA(E), MUMBAI-51.
 
Complaint Case No. CC/10/650
 
1. MR NISHITH MOHAN MISHRA & MRS VANDANA MISHRA
1, BERIL HOUSE,WOOD HOUSE ROAD, COLABA, MUMBAI-39.
...........Complainant(s)
Versus
1. MANAGING DIRECTOR, LUFTHANSA GERMAN AIRLINES
DLF BLDG., TOWER NO. B, PHASE-II, DLF CITY, GURGAON, HARIYANA-122002.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. Mr. J. L. Deshpande PRESIDENT
 HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR Member
 
PRESENT:
तक्रारदार गैरहजर.
......for the Complainant
 
सा.वाले गैरहजर.
......for the Opp. Party
ORDER

तक्रारदार         :  एन.एम.मिश्रा हजर.

     सामनेवाले        :      वकील श्री.वरुण शंकर यांचे मार्फत हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
 निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्‍यक्ष        ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
                                                 
                                               न्‍यायनिर्णय
 
1.    सा.वाले ही प्रवाशांना विमान सेवा पुरविणारी कंपनी आहे. तक्रारदार क्र.1 हे तक्रारदार क्र.2 यांचे पती आहेत. व यापुढे न्‍याय निर्णयामध्‍ये दोन्‍ही तक्रारदारांना एकत्रितपणे केवळ तक्रारदार असे संबोधिले जाईल.
2.    तक्रारदार हे मुंबई रेल्‍वे विकास कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्‍ये संचालक असून मुंबई उपनगरीय रेल्‍वे व मध्‍य रेल्‍वेच्‍या व्‍यवस्‍थेमध्‍ये सुधारणा घडवून आणण्‍याचे ते काम बघतात. तक्रारदारांना मे.सिमेन्‍स ग्राझ,ऑस्‍ट्रीया यांनी व्‍यवसाय कामा निमित्‍त चर्चेकामी ग्राझ ऑस्‍ट्रीया येथे निमंत्रित केले होते. त्‍या प्रमाणे तक्रारदारांनी दिनांक 7.7.2010 रोजी मुंबई येथून फ्रांकफुट येथे एअर इंडियाचे विमानाने व फ्रॅकफुट ते ग्राझ ते सा.वाले यांच्‍या विमानाने प्रवास केला. प्रवासामध्‍ये तक्रारदारांकडे एकंदर तीन बॅगा होत्‍या. त्‍या सा.वाले यांच्‍याकडे लगेज म्‍हणून सुपुर्द केलेल्‍या होत्‍या. तक्रारदार ग्राझ,ऑस्‍ट्रीया येथे पोहोचल्‍यानंतर त्‍यांना असे दिसून आले की, त्‍यांच्‍या तिन पैकी फक्‍त एक बॅग ग्राझ येथे पोहोचली असून अन्‍य दोन बॅगा सा.वाले यांच्‍या विमान कंर्मचा-यांनी पोहचविल्‍या नाहीत. त्‍या बद्दल तक्रारदारांनी ग्राझ‍ विमानतळावर तक्रार नोंदविली. सा.वाले यांनी तक्रारदारांना बॅग पोहचती झाल्‍यानंतर तक्रारदारांना सुपुर्द केल्‍या जाईल असे आश्‍वासन दिले.
3.    त्‍यानंतर तक्रारदार ग्राझ येथून दुसरे दिवशी म्‍हणजे 8.7.2010 रोजी व्हियंना, ऑस्‍ट्रीया येथे पोहचले. परंतु तेथे तेखील तक्रारदारांना बॅगा पोहचत्‍या करण्‍यात आल्‍या नाही. त्‍यानंतर तक्रारदार व्हियंना येथून दिनांक 9.7.2010 रोजी विल्‍यानो, इटली येथे पोहचले. सा.वाले यांनी तक्रारदारांना त्‍यांच्‍या दोन बॅगा व्हियंना, इटली येथे दिनांक 9/10/7/2010 चे रात्री हॉटेलमध्‍ये सुपुर्द केल्‍या.
4.    तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, सा.वाले यांनी तक्रारदारांना त्‍यांच्‍या दोन बॅका ग्राझ येथे सुपुर्द न केल्‍याने त्‍यांची खुपच गैरसोय झाली. तक्रारदारांचे व्‍यवसायीक व कार्यालयीन कागदपत्र, हॉटेलमध्‍ये घालावयाचे कपडे,ब्‍लँकेट, बाहेर कार्यालयीन कामासाठी वापरावयाचे कपडे व दैनिक साहित्‍य त्‍या दोन बॅगामध्‍ये होते. आवश्‍यक ती कागदपत्रे असलेली बॅग तक्रारदारांना प्राप्‍त न झाल्‍याने तक्रारदार आपले कार्यालयीन कामकाज, बैठक व्‍यवस्थितपणे पार पाडू शकले नाहीत. त्‍यांना बाहेर जाण्‍याचे कपडे तसेच हॉटेलमध्‍ये वापरण्‍याचे कपडे टॉवेल, नॅपकीनसह स्‍वतःकरीता व पत्‍नीकरीता विकत घ्‍यावे लागले. तक्रारदारांनी त्‍या बद्दलची देयके आपल्‍या पाकीटामध्‍ये ठेवली होती. परंतू मिलॅनो, इटली येथे त्‍यांचे पैशाचे पाकीट चोरीला गेले व त्‍यामधील सर्व पावत्‍या देखील गहाळ झाल्‍या.
5.    तक्रारदारांनी  भारतात परत  आल्‍यानंतर  सा.वाले यांच्‍या
अधिका-यांकडे नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु सा.वाले यांनी तक्रारदार यांचे मागणीचे पृष्‍टयर्थ देयके हजर करु न शकल्‍याने तक्रारदारांची मागणी फेटाळली. त्‍यानंतर तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली व त्‍यामध्‍ये दोन व्‍यक्‍तीसाठी करावे लागलेली आवश्‍यक ती खरेदी, त्‍या करीता करावा लागलेला खर्च, व मानसिक त्रास व कुचंबणा, या बद्दल एकत्रित नुकसान भरपाई रु.3,000/- युरो म्‍हणजे रु.1,83,000/- अशी एकत्रित मागणी केली.
6.    सा.वाले यांनी हजर होऊन आपली कैफीयत दाखल केली. व त्‍यामध्‍ये तक्रारदारांनी फ्रॅकफुट ते ग्राझ पर्यत सा.वाले यांच्‍या विमानाने दिनांक 7.7.2010 रोजी प्रवास केला ही बाब मान्‍य केली. तसेच ग्राझ विमानतळावर तीन बॅगापैकी केवळ एक बॅग तक्रारदारांना परत देण्‍यात आली व दोन बॅगा ग्राझ विमानतळावर पोहचल्‍या नव्‍हत्‍या ही बाब मान्‍य केली. तथापी तक्रारदारांनी फ्रॅकफुट येथे आपल्‍या प्रवासाचा उद्देश व बॅगामधील साहित्‍य हे नमुद केले नव्‍हते असे कथन केले. त्‍यानंतर सा.वाले यांनी बॅगांचा शोध घेऊन दिनांक 10.7.2010 चे रात्री दोन्‍ही बॅगा तक्रारदारांना सुपुर्द केल्‍या व तक्रारदारांनी विना आक्षेप त्‍या स्विकारल्‍या.
7.    तक्रारदारांच्‍या नुकसान भरपाईचे मागणीचे संदर्भात सा.वाले यांनी असे कथन केले की, तक्रारदार व सा.वाले यांचे अधिकारी यांचे दरम्‍यान ई-मेल पत्रव्‍यवहार झाला व त्‍यामध्‍ये सा.वाले यांचे अधिका-यांनी तक्रारदारांच्‍या दोन बॅगा उशिराने सुपुर्द केल्‍याबद्दल खेद व्‍यक्‍त केला होता. नुकसान भरपाईचे संदर्भात सा.वाले यांनी असे कथन केले की, तक्रारदार हे त्‍यांचे मागणीचे पृष्‍टयर्थ कपडे व वस्‍तु खरेदीची देयके हजर करु शकले नसल्‍याने सा.वाले यांनी तक्रारदारांची मागणी फेटाळली. त्‍यातही तक्रारदारांची मागणी अवास्‍तव असून तक्रारदार सा.वाले यांचेकडून जादा पैसे वसुल करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत असेही कथन सा.वाले यांनी केले.
8.    तक्रारदारांनी आपले पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले. व तक्रारीसोबत ई-मेल पत्र व्‍यवहाराच्‍या प्रती व आवश्‍यक ती कागदपत्रे हजर केली. सा.वाले यांनी त्‍यांचे अधिकारी मंजरी गौंबा, व्‍यवस्‍थापक यांचे पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले व त्‍यासोबत प्रवासाच्‍या शर्ती व अटी याची प्रत, तसेच ई-मेल पत्र व्‍यवहाराच्‍या प्रती व इतर कागदपत्रे हजर केली. दोन्‍ही बाजुंचा तोंडी युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.
9.    प्रस्‍तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, यांचे वाचन केले. त्‍यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्‍यात येतात.

क्र.
मुद्दे
उत्‍तर
 1
सा.वाले वाले तक्रारदारांना विमान प्रवासाचे संदर्भात सेवा सुविधा‍ पुरविण्‍यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्‍द करतात
काय ?
होय.
 
 2
तक्रारदार सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई वसुल करण्‍यास पात्र आहेत काय ?
होय.रु.
 3.
अंतीम आदेश
तक्रार अशतः मंजूर

 
कारण मिमांसा
10.   तक्रारदारांनी मुंबई ते फ्रॅकफुट हा प्रवास एअर इंडीयाचे विमानाने केला व फ्रँकफुट ते ग्राझ ऑस्‍ट्रीया हा प्रवास दिनांक 7.7.2010 रोजी सा.वाले यांच्‍या विमानाने केला ही बाब सा.वाले यांनी कैफीयतीमध्‍ये मान्‍य केलेली आहे. त्‍याच प्रमाणे ग्राझ येथे पोहोचल्‍यानंतर तिन बॅगापैकी केवळ एक बॅग तक्रारदारांना परत करण्‍यात आली व दोन बॅगा ग्राझ येथे पोहोचल्‍या नव्‍हत्‍या ही बाब देखील मान्‍य केली. त्‍यानंतर दिनांक 9 व 10-7-2010 चे दरम्‍यानचे रात्री तक्रारदार मिलॅनो इटली येथे हॉटेलमध्‍ये असतांना त्‍यांना पोहचते करण्‍यात आल्‍या. सा.वाले आपल्‍या कैफीयतीमध्‍ये असे कथन करतात की, तक्रारदारांनी त्‍या दोन्‍ही बॅगा विना आक्षेप( Without protest ) स्विकारल्‍या. तक्रारदारांनी आपल्‍या पुराव्‍याचे शपथपत्रात या बद्दल खुलासा केलेला आहे व सा.वाले यांच्‍या कर्मचा-याने दोन्‍ही बॅगा हॉटेलच्‍या कौन्‍टरवर जमा केल्‍याने तक्रारदारांनी आक्षेप नोंदविण्‍याचा प्रश्‍नच निर्माण झालेला नाही. या प्रकारे दिनांक 7.7.2010 ते 10.7.2010 म्‍हणजे तिन दिवस तक्रारदारांना त्‍यांच्‍या दोन बॅगा प्राप्‍त होऊ शकल्‍या नाहीत ही बाब सिध्‍द होते.
11.   सा.वाले यांनी आपल्‍या कैफीयतीमध्‍ये असा आक्षेप नों‍दविला आहे की, तक्रारदारांनी फ्रॅकफुट येथे सा.वाले यांचे विमानात चढण्‍यापुर्वी आपल्‍या प्रवासाचा उद्देश तसेच बॅगामधील साहित्‍य याची माहिती विमान तळावरील सा.वाले यांच्‍या कर्मचा-यांना पुरविली नाही. सा.वाले हे विमान प्रवास सेवा पुरविणारी कंपनी असल्‍याने व तक्रारदारांनी स्‍वतःकरीता व त्‍यांचे पत्‍नीकरीता (दोन्‍ही तक्रारदार) यांचे करीता सा.वाले यांचे विमानाचे तिकिटे स्‍वतः खर्च करुन आरक्षित केली होती. त्‍यामुळे तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे विमान प्रवासाचा उद्देश व्‍यक्‍त करणे ही बाब गौण ठरते. त्‍याचप्रमाणे तक्रारदारांची प्रस्‍तुत तक्रार ही बॅग हरवणे अथवा त्‍यातील वस्‍तु चोरीला जाणे या बद्दलची नसून तक्रारदारांच्‍या विमानाच्‍या लगेज मधील दोन बॅगा सा.वाले यांनी तक्रारदारांना वेळोवर सुपुर्द न करणे या बद्दलची आहे. सबब बॅग मधील वस्‍तुची माहिती अथवा सुचना तक्रारदारांनी सा.वाले यांना देण्‍याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. बॅगामध्‍ये सोन्‍या चांदीच्‍या वस्‍तु अथवा मौल्‍यवान वस्‍तु होत्‍या असे तक्रारदारांचे कथन नाही व त्‍या बद्दल नुकसान भरपाईची मागणी देखील नाही. सबब सा.वाले यांचा आक्षेप चुकीचा आहे.
12.   सा.वाले यांचे वकीलांनी युक्‍तीवादाचे दरम्‍यान असे कथन केले की, तक्रारदारांकडे एक बॅग होती व त्‍यामधील साहित्‍य तक्रारदार दरम्‍यानचे तिन दिवसामध्‍ये वापरु शकले असते. यावरुन सा.वाले यांचे वकीलांना असे सूचवावयाचे होते की, तक्रारदारांची त्‍यांचे शपथपत्रात कथन केल्‍याप्रमाणे गैरसोय अथवा कुचंबणा झाली नाही. तक्रारदारांनी आपल्‍या पुराव्‍याचे शपथपत्रात या बद्दल खुलासा केलेला आहे व असे कथन केले की, त्‍यांना उपलब्‍ध झालेल्‍या तिस-या बॅगमध्‍ये त्‍यांनी खाण्‍याचे साहित्‍य ठेवले होते. कारण तक्रारदार हे शुध्‍द शाकाहारी असल्‍याने विदेशात जाताना आवश्‍यक ते खाण्‍याचे साहित्‍य ते आपल्‍या सोबत ठेवतात. व ते खाद्य पदार्थ व साहित्‍य तिस-या बॅगमध्‍ये होते जी बॅग तक्रारदारांना ग्राझ विमानतळावर सुपुर्द करण्‍यात आली. तक्रारदारांना तिनपैकी एक बॅग सुपुर्द करण्‍यात आली. या वरुन तक्रारदारांना सा.वाले यांच्‍या कर्मचा-यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे गैरसोय अथवा कुचंबणा झाली नाही असे सा.वाले कथन करु शकत नाही. तक्रारदारांना प्राप्‍त झालेल्‍या बॅगेमध्‍ये दैनंदिन वापराचे सर्व कपडे व वस्‍तु उपलब्‍ध होत्‍या ही बाब सिध्‍द झाली नसल्‍याने या प्रकारचा सा.वाले यांचा खुलासा तर्काच्‍या कसोटीवर टिकत नाही.
13.   तक्रारदारांनी तसेच सा.वाले यांनी आपल्‍या पुराव्‍याचे शपथपत्रासोबत तक्रारदार व सा.वाले यांच्‍या दरम्‍यान जो ई-मेल पत्र व्‍यवहार झाला त्‍याच्‍या प्रती हजर केलेल्‍या आहेत. तक्रारदारांनी तक्रारीसोबत निशाणी बी-1, येथे सा.वाले यांना दिनांक 22.7.2010 रोजी दिलेल्‍या पत्राची प्रत हजर केलेली आहे. त्‍यामध्‍ये तक्रारदारांना सा.वाले यांचेकडून दोन बॅग उपलब्‍ध न झाल्‍याने तक्रारदारांची जी गैरसोय व कुचंबणा झाली त्‍याचे सर्व वर्णन नमुद आहे. त्‍यापत्रानंतर सा.वाले यांनी तक्रारदारांकडे कागदपत्रे मागीतली व तक्रारदारांनी आवश्‍यक ते कागदपत्रे सा.वाले यांचेकडे पाठविली. तक्रारदार व सा.वाले यांचे दरम्‍यान झालेल्‍या ई-मेल संदेशाच्‍या प्रती असे दर्शवितात की, तो पत्र व्‍यवहार मुख्‍यतः तक्रारदारांकडून दरम्‍यान खरेदी केलेल्‍या वस्‍तुंची बिले,देयके तक्रारदारांनी हजर करणे या बद्दल होता. तक्रारदारांनी आपला ई-मेल संदेश दिनांक 4.8.2010 निशाणी बी-5, व्‍दारे सा.वाले यांना असे कळविले की, मिल्‍यानो इटली येथे दिनांक 10.7.2010 रोजी प्रवासाचे दरम्‍यान त्‍यांचे पाकीट चोरीला गेले व पाकीटामध्‍ये 1500 युरो तसेच खरेदी वस्‍तुंची बिले व देयके इत्‍यादी होती, जी पाकीटासोबत चोरीला गेली. तक्रारदारांनी त्‍या बद्दल मिल्‍यानेा येथे पोलीसांकडे तक्रार नोंदविली. त्‍याची प्रत तक्रारदारांनी तक्रारीसोबत निशाणी ए-12 येथे दाखल आहे. त्‍यामध्‍ये तक्रारदारांनी असे कथन केले की, मिल्‍यानो येथे रेल्‍वेत चढत असतांना त्‍यांचे पाकीट चोरीला गेले व त्‍यामध्‍ये युरो 1500 व वेग वेगळी क्रेडीट कार्ड चोरीला गेली. तक्रारदारांची मिल्‍यानो येथे दिलेली फीर्याद तक्रारदारांचे कथनास पुष्‍टी देते की, मिल्‍यानो इटली येथे त्‍यांचे पाकीट चोरीला गेले व त्‍यामध्‍ये आवश्‍यक वस्‍तु खरेदीची देयके/‍ि‍बले ठेवलेली होती जी देखील चोरीला गेली.
14.   सा.वाले यांच्‍या वकीलांनी असा युक्‍तीवाद केला की, मिल्‍यानो पोलीस यांचेकडे तक्रारदारांनी जी पाकीट चोरी बद्दल तक्रार केली त्‍यामध्‍ये बिलाच्‍या देयकांचा उल्‍लेख नाही. यावरुन तक्रारदारांनी आवश्‍यक वस्‍तुंची खरेदी देखील केली नव्‍हती व त्‍यांच्‍याकडे बिले देखील नव्‍हती असा निष्‍कर्ष काढावा असा युक्‍तीवाद केला. तक्रारदारांनी मिल्‍यानो येथील पोलीसांकडे तक्रार देत असतांना त्‍यांचे पाकीट चोरीला गेले व पाकीटामध्‍ये युरो 1500 व क्रेडीट कार्ड होते असे स्‍पष्‍टपणे नमुद केले. कदाचित वस्‍तु खरेदीची देयके ही गौण बाब असल्‍याने व ती मौल्‍यवान वस्‍तु नसल्‍याने तक्रारदारांनी त्‍या अहवालामध्‍ये बिले किंवा देयके पाकीटामध्‍ये होती ही बाब नमुद केली नसेल. केवळ त्‍यावरुन बिले किंवा देयके तक्रारदारांकडे नव्‍हती व तक्रारदारांनी आवश्‍यक वस्‍तुंची खरेदी केलेली नव्‍हती असा निष्‍कर्ष काढणे योग्‍य होणार नाही.
15.   वर नमुद केल्‍याप्रमाणे तक्रारदार स्‍वतः त्‍यांच्‍या पत्‍नीसोबत प्रवास करीत होते. तक्रारदार क्र.1 यांना ग्राझ ऑस्‍ट्रीया येथे कंपनीचे कामाकरीता बैठकीचे निमंत्रण होते व तक्रारदारांचे त्‍या बैठकी संबंधातील आवश्‍यक ती कागदपत्रे ज्‍या बॅगमध्‍ये ठेवली होती ती बॅग तक्रारदारांना ग्राझ येथे प्राप्‍त न झाल्‍याने तक्रारदार त्‍यांची व्‍यवसायिक बैठकेमध्‍ये भाग घेऊ शकले नाहीत. तक्रारदारांनी आपल्‍या पुराव्‍याचे शपथपत्रातील कैफीयत क्र.4 मध्‍ये असे कथन केलेले आहे की, तक्रारदार कंपनीचे व्‍यवसायिक कामाकरीता ग्राझ ऑस्‍ट्रीया,व्हियंना व मिलॅनो इटली येथे गेले होते परंतु आवश्‍यक ती कागदपत्रे उपलब्‍ध नसल्‍याने त्‍यांचा प्रवासाचा उद्देशच निष्‍फळ ठरला. सहाजिकच तक्रारदारांना मानसिक त्रास व कुचंबणा झाली असेल.  तक्रारारांच्‍या पदाचे व व्‍यवसायिक जबाबदारीचे स्‍वरुप लक्षात घेता ती कुचंबणा व गैरसोय निच्छितच विशिष्‍ट रक्‍कमेच्‍या स्‍वरुपात मोजता येऊ शकत नाही. परंतु नुकसान भरपाईचे संदर्भात निच्छितच ती विचारात घ्‍यावी लागेल.
16.   या व्‍यतिरिक्‍त तक्रारदार स्‍वतः त्‍यांचे पत्‍नीसोबत प्रवास करीत होते. सा.वाले यांनी दोघांकरीता म्‍हणजे दोन्‍ही तक्रारदारांकरीता विमान तिकिटे विक्री केली होती. व फ्रॅकफुट विमानतळावर बोर्डींग पास जारी केला होता. सा.वाले यांच्‍या कर्मचा-यांनी तक्रारदारांच्‍या तिन्‍ही बॅगा लगेज म्‍हणून स्विकारल्‍या होत्‍या परंतु त्‍यापैकी ग्राझ येथे केवळ एक बॅग परत केली तर इतर दोन बॅगा सा.वाले तक्रारदारांना परत करु शकले नाहीत. या वरुन सा.वाले यांच्‍या कर्मचा-यांचा लगेज हाताळण्‍याचे संदर्भात निष्‍काळजीपणा सिध्‍द होतो.
17.   दरम्‍यान तक्रारदार आपल्‍या पत्‍नीसह दिनांक 7.7.2010 ते 10.7.2010 पर्यत वेग वेगळया शहरामध्‍ये हॉटेलमध्‍ये मुक्‍काम करीत होते. तक्रारदारांच्‍या कथना प्रमाणे उशिरा पोहचलेल्‍या दोन्‍ही बॅगामध्‍ये त्‍यांचे कपडे,आवश्‍यक ते साहित्‍य, इत्‍यादी असल्‍याने व बॅगा उपलब्‍ध झाल्‍या नसल्‍याने तक्रारदारांना वरील सर्व साहित्‍य खरेदी करावे लागेल. तक्रारदारांनी आपले पुराव्‍याचे शपथपत्र परिच्‍छेद क्र.4 मद्ये असे कथन केले आहे की, त्‍यांनी आपल्‍या आवश्‍यक गरजांकरीता कपडे, टॉवेर्ल्‍स, अंतरवस्‍त्र, इत्‍यादी खरेदी केली. तक्रारदार बैठकी निमित्‍त बाहेर जाणार असल्‍याने व त्‍यांना बैठकीत भाग घ्‍यावा लागणार असल्‍याने तक्रारदारांना सुट देखील खरेदी करावा लागला असे तक्रारदारांनी आपल्‍या तोंडी युक्‍तीवादामध्‍ये कथन केले. तक्रारदारांना स्‍वतःकरीता व आपल्‍या पत्‍नीकरीता हे सर्व साहित्‍य खरेदी करावे लागले. तक्रारदारांनी खरेदी केलेल्‍या वस्‍तुमध्‍ये सन ग्‍लासेस व रझई, या अनावश्‍यक वस्‍तु होत्‍या असे सा.वाले यांच्‍या वकीलांनी आपल्‍या युक्‍तीवादात कथन केले. एखादी व्‍यक्‍ती हॉटेलमध्‍ये उपलब्‍ध असलेली रझई अथवा ब्‍लँकेट वापरण्‍याचे ऐवजी स्‍वतःची रझई अथवा ब्‍लॅकेट वापरत असेल तर त्‍यामध्‍ये आक्षेपार्ह  बाब आहे असे म्‍हणता येणार नाही. सन ग्‍लासेसच्‍या बाबतीत मात्र सा.वाले यांचा आक्षेप योग्‍य दिसतो. परंतु इतर वस्‍तुंच्‍या खरेदीकरीता मात्र हा आक्षेप टिकणारा नाही. सहाजिकच तक्रारदारांना तिन दिवसाचे दरम्‍यानचे कालावधीमध्‍ये शेविंग किट, नॅपकीन, टॉवेल्‍स, अंतरवस्‍त्रे, तसेच बाहेर जाण्‍याचे कपडे, इत्‍यादी स्‍वतःकरीता व पत्‍नी करीता खरेदी करावे लागले असेल. या सर्व वस्‍तुंच्‍या विदेशातील किंमती लक्षात घेता तक्रारदारांना त्‍याबद्दल बराच खर्च करावा लागला असेल. त्‍या आवश्‍यक बाबी व विदेशातील आवश्‍यक वस्‍तुंचे दर विचारात घेऊन प्रस्‍तुतचा मंच नुकसान भरपाईची रक्‍कम रु.1,25,000/- निश्चित करीत आहे. त्‍यामध्‍ये आवश्‍यक वस्‍तुची खरेदी करण्‍याकरीता तक्रारदारांना करावा लागलेला खर्च व मानसिक त्रास व तसेच गैरसोय व कुचंबणा या बद्दलची नुकसान भरपाई देखील संम्‍मलीत आहे.
18.   मॉन्‍ट्रीयल कराराप्रमाणे विमान कंपनीची नुकसान भरपाई अदा करण्‍याच्‍या रक्‍कमेवर जास्‍तीत जास्‍त मर्यादेपर्यत किती रक्‍कम अदा केली जाऊ शकते या बद्दल तरतुद केलेली आहे. सा.वाले यांनी आपले कैफीयतीचे परि‍च्‍छेद क्र.6 पान क्र.11 मध्‍ये उधृत केलेली आहे, ती पुढील प्रमाणे आहे.
     “ Regulations according to the Montreal Convention
            In International ad German domestic travel, the liability for
            Damages, destruction, loss or partial loss ad for late delivery
            of baggage is limited to a cumulative 1,131 Special Drawing
            Rights  (SDR)  per journey  and  traveler. The  SDR  is the
            accounting unit of the International Monetary Fund (IMF);
            1,131 SDR currently corresponds to about Euro 1]213 (Please
            Regard that this amount is subject to currency fluctuation and
            may vary).”
19.   तक्रारदारांनी आपले पुराव्‍याचे शपथपत्रात देखील मॉन्‍ट्रीयल कन्‍हेंन्‍शन मधील तरतुदींचा उल्‍लेख केलेला आहे. ज्‍यावरुन वरील बाब उभयपक्षी मान्‍य आहे असा निष्‍कर्ष काढावा लागतो. अर्थात वर उधृत केलेली तरतुद ही शेवटच्‍या मर्यादेपर्यत असून प्रत्‍येक प्रकरणामध्‍ये त्‍या प्रमाणे नुकसान भरपाई ठरवावी असा अर्थ काढता येत नाही. परंतु तक्रारदारांनी मात्र त्‍या तरतुदीच्‍या आधारे स्‍वतःसाठी व तक्रारदार क्र.2 साठी अंतीम मर्यादेपर्यत नमुद केलेली नुकसान भरपाईची रक्‍कम रु.3000 येरो म्‍हणजे रु.1,83,000/- ची मागणी केलेली आहे. तक्रारदारांची एकूण नुकसान भरपाईची मागणी वस्‍तुच्‍या खरेदीचा खर्च दोन्‍ही तक्रारदारांकरीता एकत्र रु.1,83,000/-, मानसिक त्रास व गैरसोय दोन्‍ही तक्रारदारांकरीता एकत्र रु.61,000/- व तक्रारीचा खर्च रु.1000/- अशी एकत्रित रु.2,45,000/- ची मागणी केलेली आहे. परंतु प्रस्‍तुत मंचाने सा.वाले यांचे प्रवाशांना लागू असलेल्‍या सर्वसामान्‍य शर्ती व अटी चे कलम 14.1.7 या मधील तरतुदी प्रमाणे वस्‍तुनिष्‍ट पध्‍दतीप्रमाणे नुकसान भरपाईचा आढावा घेतलेला आहे. व त्‍यावरुन एकत्रित नुकसान भरपाई आवश्‍यक कपडे व वस्‍तु खरेदी करीता रु.1,00,000/- व मानसिक त्रास व कुचंबणा करीता रु.25,000/-(दोन्‍ही तक्रारदारांकरीता एकत्रित) अशी निच्छित केलेली आहे. प्रस्‍तुत मंचाचे मता प्रमाणे वर निश्चित केलेली नुकसान भरपाईची रक्‍कम योग्‍य व न्‍याय्य असून ती सत्‍यतेच्‍या जवळपास असल्‍याची शक्‍यता आहे.
20.   तक्रारदारांनी सा.वाले यांच्‍या कर्मचा-यांचा निष्‍काळजीपणा परीणामतः तक्रारदारांना प्रवासाचे दरम्‍यान झालेली गैरसोय व कुचंबणा सिध्‍द केलेली आहे. या प्रकारे सा.वाले यांनी तक्रारदारांना त्‍यांच्‍या दोन बॅग प्रवासाचे दरम्‍यान उशिराने परत करुन सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर केली हे सिध्‍द होते. सा.वाले यांनी तक्रारदारांकडून बिले/देयके मागणी केली व तक्रारदारांच्‍या खुलाशाकडे सोईस्‍कर र्दुलक्ष केले व तक्रारदार बिले किंवा देयके हजर करु शकत नाहीत. या कारणाकरीता सा.वाले यांनी तक्रारदारांची मागणी नाकारली. जी कृती अयोग्‍य व असमर्थनीय ठरते.
21.   वरील चर्चेनुरुप व निष्‍कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्‍यात येतो.
                   आदेश
1.    तक्रार क्रमांक 650/2010 अंशतः मंजूर करण्‍यात येते.   
2.    सामनेवाले यांनी तक्रारदारांना विमान प्रवासाच्‍या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर केली असे जाहीर करण्‍यात येते.
3.    सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई बद्दल रु.1,25,000/- (एकत्रितपणे) अदा करावेत असे आदेश सामनेवाले यांना देण्‍यात येतात.
4.    सामनेवाले यांनी वरील आदेशाची पुर्तता आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्‍यापासून 8 आठवडयाचे आत करावी. अन्‍यथा एकूण रक्‍कमेवर 9 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.
5.    आदेशाच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍यपाठविण्‍यात
     याव्‍यात.
 
 
 
[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.