ग्राहक तक्रार क्र. 96/2014
दाखल तारीख : 09/05/2014
निकाल तारीख : 07/03/2015
कालावधी: 0 वर्षे 09 महिने 29 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) दयानंद अप्पाराव गुजर,
वय-43 वर्षे, धंदा – शेती,
रा.नायगाव ता. केज, जि.बीड. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) व्यवस्थापकीय संचालक,
हायर अप्लायन्सेस (इंडिया) प्रा.लि.,
बी-1/ए-14, मोहन को-ऑपरेटीव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट
नवी दिल्ली -44
2) सुरेश दत्तात्रय जोशी,
लोकमान्य इलेक्टॉनिक्स अॅन्ड इलेक्ट्रीकल्स,
न.प. गाळा क्र. जी एफ, 4, 5, मेन रोड,
कळंब, ता. कळंब, जि. उस्मानाबाद.
3) गहिणीनाथ बाबुराव राऊत,
वय- सज्ञान, धंदा- अधिकृत दुरुस्ती प्रतिनिधी,
रा. केज, ता. केज, जि. बीड. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.vआर.एस.मुंढे.
विरुध्द पक्षकारा क्र.1 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
विरुध्द पक्षकारा क्र.2 तर्फे विधीज्ञ : श्री.पी.डी.देशमूख.
विरुध्द पक्षकारा क्र.3 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा:
अ) 1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारकर्ता ( तक ) यांना थंड पेय शीत राखणेसाठी, तसेच डॉक्टरांच्या सल्लयानुसार वडीलांना दिलेली औषधे फिजमध्ये ठेवण्यासाठी तसेच अथवा पालेभाज्या शीत ठेवण्यासाठी गरज असल्याने घरगूती वापरासाठी दि.23/04/2012 रोजी विप क्र.2 यांचेकडून हायर 1904 अ.क्र.4 एल 00.10 हा रेफ्रीजरेटर रक्कम रु.8,000/- मध्ये खरेदी केला. सदरचा फ्रिज एका वर्षातच व्यवस्थीत काम करत नसल्याचे लक्षात आले तसेच वीजभार जास्त घेत होता व थंड होत नव्हता म्हणून विप क्र.2 यांचेकडे तक्रार केली असता त्यांनी येऊन खात्री करुन विप क्र.1 व 3 ला कळविले त्यावर विप क्र.3 यांनी येऊन खात्री करुन विप सदर बिघाड कॉम्प्रेसर बदलावे लागेल असे सांगितले व लवकरच बदलू असे सांगितले मात्र अनेक वेळा पाठपुरावा केला असता विप क्र.3 यांनी ऑर्डीनरी कंपनीचे कॉम्परेसर बसवून फ्रिज चालू केला मात्र पहील्या पेक्षा जास्त प्रॉब्लेम वाढत गेला.सदर कॉम्प्रेसर सदर फ्रिजला मॅच होत नव्हते. तसेच पहील्यापेक्षा जास्त वीज बील भरावे लागले. सदर रेफ्रीजरेजर 4 महीन्यात बंद पडून थंड होण्याची प्रक्रीया बंद झाली. म्हणून तक यांनी विप क्र.1 व 2 यांना या बाबत वारंवार कळविले मात्र विप यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. म्हणून तक यांनी दुरध्वनीवरुन कस्टमर केअरशी संपर्क साधला असता रिक्वेस्ट आय.डी. क्र.AU20140321102263 अकाऊंट आय.डी. 1-2SX-708 व्दारे तक्रारदार यांना पुवी्रचा रेफ्रीजरेटर जमाकरुन त्याच मॉडेलचा रेफ्रीजरेटर बदलुन देणेबाबात केलैल्या विनंती वरुन निण्रय घेऊ असे कळविले परंतु आजतागायत कुठल्याही स्वरुपाचा निर्णय न घेतल्याने तक चे मानसिक व आर्थिक नुकसान झाले त्यामुळे सदरची तक्रार मंचात दाखल करणे भाग पडले. म्हणून विप क्र.1 ते 3 कडून मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/-, तक्रारीचा खर्च रु.5,000/- व तक्रारदाराचा पुर्वीचा रेफ्ररिजरेटर जमा करुन घेऊन सदर मॉडेलचा नवीन फ्रिज बदलून देणे न्याय व गरजेच आहे.
ब) 1. विप क्र. 1 यांना मंचामार्फत अनेक वेळा संधी देऊनही उपस्थित न राहील्याने दि.13/10/2014 रोजी त्यांच्या विरूध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
क) 1. विप क्र.2 यांना मंचामार्फत नोटीस बजावली असता त्यांनी दि.20/08/2014 रोजी हजर होऊन आपले म्हणणे दाखल केले.
2. तक्रारकर्ता हा आपला ग्राहक नाही. विप क्र.1 यांनी ग्राहकसेवा कक्षाशी संपर्क साधला असता विप क्र.1 यांचे दुरस्तीप्रतीनीधी म्हणजेच विप क्र.3 यांनी जाऊन पाहणी केली व त्यामधील दोषाचे निराकरण केले. त्यानंतर तक यांनी विप शी संपर्क साधलेला नाही. सदरचा दोष उत्पादनातील दोष असल्याने विप क्र.2 यांना त्यासाठी जबाबदार धरता येणार नाही. तक्रारदार यांनी कस्टमर केअरशी संपर्क साधलेबाबत व कंपनीचे डी.एम. यांनी दिलेल्या आश्वासनाबाबत प्रस्तुत विप यांना कल्पना नाही. म्हणून विप विरुध्दची तक्रार खर्चासह रदद व्हावी असे नमूद केले आहे.
ड) विप क्र.3 यांना मंचामार्फत अनेक वेळा संधी देऊनही उपस्थित न राहील्याने दि.09/06/2014 रोजी त्यांच्या विरूध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
इ) अर्जदार यांनी तक्रार व सोबत जोडलेले कागदपत्रांचे यांचे सुक्ष्म अवलोकन केले, व तोंडी युक्तिवाद ऐकला असता आमचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) तक्रारदार विप चा ग्राहक होतो काय ? होय.
2) विप यांनी सेवेत त्रुटी केली का ? होय.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहे का ? होय.
4) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
इ) कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 :
1) विप ने वस्तूमध्ये दोष असल्याचे कबूल केले असले तरी तो दोष उत्पादकाचा आहे असे म्हंटले आहे. सदर फ्रिज हा क्रॉम्प्रेसर या कान्मोनंन्टसाठी बिघडला आहे व विप ने तो दुरुस्त केला तरी तो काम करत नसल्याचे व तो मानकानुसार नसल्याचे तक चे म्हणणे आहे. या संदर्भात विप चे म्हणणे पाहीले असता तो कॉम्प्रेसर मानकानुसार होता हे कुठेही म्हंटले नाही उलट तो उत्पादनातील दोष आहे असे म्हंटले आहे. त्यामुळे जरी काही त्रुटी झाली असलीच तर ती उत्पादकाची आहे विक्रेत्याचे नाही असे विप ला सुचित करावयाचे आहे.
2. या संदर्भात उत्पादकाने वितरकामार्फत दिलेले वॉरंटी कार्ड पाहिले असता Warranty comprehensive 12 month व compressor 48 month असे दिसून येते. विप क्र. 1 हा उत्पादक असून विप क्र.2 हा या उत्पादकाचा विक्रेकता आहे. या ठिकाणी MASTER agent Relation नुसार विप क्र. 1 हा मास्टर असून विप क्र.2 हा एजंट आहे. त्यामुळे विप क्र.2 च्या स्वत:च्या म्हणण्यानूसार ही जर विप क.1 ची जबाबदारी आहे की वस्तूचे दोषाचे निराकरण करणे तर ती joint and several labiality या तत्वा नुसार विप क्र.2 ची ही जबाबदारी ठरते त्यामुळे Vicarious व Joint and several labiality या तत्वानुसार विप क्र.1 व 2 हे सेवेतील त्रुटीसाठी जबाबदार ठरतात. तसेच वस्तूमधील दोषाचे निराकरण करणे ही जबाबदारी दोघांवरीही येते. त्यामुळ कॉम्परेसरमधील हा दोष दुरुस्त झाला नाही व नवीन कॉम्परेसर हे दर्जानुसार व मानकानुसार नव्हते त्यामुळे तसेच कॉम्प्रेसर हाच फ्रिजचा सर्वात महत्वाचा घटक आहे ज्यामुळे फ्रिजींग अॅक्शनसाठी लागणारे तापमान निर्माण केले जाते. त्यामुळे मशीन मधील दोष हा सर्वार्थाने स्पष्ट होतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) तक्रारदाराने स्वत: स्व खर्चाने विप क्र.2 कडे सदर वादीत फ्रिज जमा करावा व विप क्र.2 ने नवीन फ्रिज किंवा तक्रारदाराच्या पावतीप्रमाणे सदर वादीत फ्रिजची खरेदी किंमत दयावे.
3) विप क्र.2 यांनी तक्रारदारास तक्रारीचा खर्च रु.5,000/-(रुपये पाच हजार फक्त) दयावा.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.