Maharashtra

Parbhani

CC/11/92

Kalwatti Shesrao Rathode - Complainant(s)

Versus

Manager,United India Insurance Company,Nagapur - Opp.Party(s)

Adv.A.D.Khapre

07 Feb 2012

ORDER


District Consumer Court,PARBHANIDistrict Consumer Court ,New Administrative Building,Near Telephone Bhavan PARBHANI
Complaint Case No. CC/11/92
1. Kalwatti Shesrao RathodeR/o Sawargwan Thanda Tq.JinturParbhaniMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Manager,United India Insurance Company,NagapurDivisional Office,Ambhika Bhavan,no.19 3 red flower Dharmpeth Extancetion,shankar nagar chowk,Nagapur.NagapurMaharashtra2. Divisional Manager,AurangbadKabal Insurance Broking Services pvt.ltd.Bhaskarwan HDFC home loan building plot no.7 sequter E-1,town centre,cidco aurangbadAurangbadMaharashtra3. Taluka Krashi Officer,JinturTaluka Krashi Officer,taluka krshi office,jinturparbhaniMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. C. B. Pandharpatte ,PRESIDENTHONABLE MRS. Sujata Joshi ,MemberHONABLE MRS. Anita Ostwal ,Member
PRESENT :Adv.A.D.Khapre, Advocate for Complainant

Dated : 07 Feb 2012
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र

                        तक्रार दाखल दिनांकः-  05/04/2011

                                    तक्रार नोदणी दिनांकः- 20/04/2011

                        तक्रार निकाल दिनांकः- 07/02/2012

                                                                                    कालावधी   09 महिने 18 दिवस

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी

अध्‍यक्ष -         श्री.चंद्रकात बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.

सदस्‍या                                                                                                    सदस्‍या

सुजाता जोशी B.Sc.LL.B.                                                          सौ.अनिता ओस्‍तवाल M.Sc.              

    

      कलाबाई भ्र.शेषेराव राठोड.                                       अर्जदार

वय  40 वर्ष.धंदा.घरकाम.                                    अड.अरुण.डि.खापरे.

रा.सावरगांव तांडा.ता.जिंतूर जि.परभणी.

               विरुध्‍द

 1    व्‍यवस्‍थापक,                                         गैरअर्जदार.

      युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कं.लि.                     अड.जी.एच.दोडीया.

      प्रा‍देशिक कार्यालय.अंबीका भवन क्रमांक 19,

      तिसरा मजला,धर्मपेठ एक्‍सटेन्‍शन,

      शंकर नगर,चौक, नागपूर.

2     विभागीय व्‍यवस्‍थापक.                                  स्‍वतः                                                  

      कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकिंग सर्व्‍हीस प्रा.लि.                            भास्‍करायन एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्‍डींग.

      प्‍लॉट नं.7.सेक्‍टर ई 1.टाउन सेंटर,सिडको औरंगाबाद.

3     तालुका कृषी अधिकारी.                                 स्‍वतः

      तालुका कृषी कार्यालय,जिंतूर

      ता.जिंतूर जिल्‍हा परभणी.

 

 

 

 

 

------------------------------------------------------------------------------------        

     कोरम  -    1)    श्री.सी.बी.पांढरपट्टे.      अध्‍यक्ष.

2)        सौ.सुजाता जोशी.                   सदस्‍या.                                              3)        सौ.अनिता ओस्‍तवाल.                 सदस्‍या.

------------------------------------------------------------------------------------------------------- 

  

                  (  निकालपत्र पारित व्‍दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्‍यक्ष.)

      शासनातर्फे उतरविलेल्‍या  शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय  नुकसान भरपाई मयत शेतक-याच्‍या वारसास  देण्‍याचे विमा कंपनीने नाकारुन त्रूटीची सेवा दिली म्‍हणून अर्जदाराने ही  तक्रार दाखल केली आहे.

            अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार मौजे सावरगांव तांडा ता.जिंतूर जि. परभणी येथील रहिवाशी आहे.महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील संपूर्ण खातेदार शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 1 यानी पुरस्‍कृत  केलेल्‍या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविलेला होता त्‍या पॉलीसीचा अर्जदारचा मयत पती हा देखील लाभार्थी होता तारीख 19/05/2010  रोजी मयत शेषेराव रावजी राठोड याचा रस्‍ता अपघातात मृत्‍यू झाला. परभणी ग्रामीण पोलिस स्‍टेशनला घटनेची खबर दिल्‍यानंतर पोलिसांनी घटनास्‍थळाचा पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा करुन  पोस्‍टमार्टेमसाठी शव तेथील सरकारी दवाखान्‍यात पाठवले.अर्जदारने त्‍यानंतर गैरअर्जदार क्रमांक 3 कडे  नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी क्‍लेमफॉर्मसह आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे पाठवली होती.त्‍यानंतर गैरअर्जदार क्रमांक 3 ने ती कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवली,व गैरअर्जदार क्रमांक 2 ने ती कागदपत्रे मंजुरीसाठी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे पाठवली.त्‍यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कपंनीने अर्जदारास पत्र पाठवुन मयताचे नाव 7/12 वर अपघात झाल्‍यानंतर टाकण्‍यात आले आहे.या कारणास्‍तव विमा नामंजूर केला असल्‍याचे कळवले.अर्जदाराचे म्‍हणणे असे की, तीच्‍या पतीचे नाव जमिनीच्‍या रेकॉर्डला 1998-99 पासून आहे.तसेच गट नं.28 ही जमीन ही बरेच वर्षांपासून पतीच्‍या मालकीची आहे.असे असतांनाही चुकीचे कारण देवुन क्‍लेम नामंजूर केला आहे.व सेवात्रुटी केली आहे. म्‍हणून ग्राहक मंचात प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन नुकसान भरपाई रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह मिळावी याखेरिज मानसिकत्रासापोटी रु.25,000/- आणि अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी मागणी केलेली आहे.

तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र ( नि. 2)  पुराव्यातील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण  26  कागदपत्रांच्‍या छायाप्रती दाखल केलेली आहेत.

      तक्रार अर्जावर लेखी म्‍हणणे सादर करण्‍यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्‍यावर गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने तारीख 30/07/2011 रोजी आपला लेखी जबाब (नि.14) सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 2 यानी पोष्‍टाव्‍दारे आपले लेखी जबाब दिनांक 16/07/2011 रोजी मंचाकडे पाठविला तो प्रकरणात नि. 8 ला समाविष्‍ठ करण्‍यात आला. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी मंचाची नोटीस स्‍वीकारुनही नेमले तारखेस मंचापुढे हजर झाले नाही.व लेखी म्‍हणणे सादर करण्‍यासाठी संधी देवुनही दिले नाही त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द तारीख 08/08/2011 रोजी एकतर्फा आदेश पारित करण्‍यात आला.     

गैरअर्जदार क्रमांक 1 यानी आपल्‍या लेखी जबाबात नि.14  तक्रार अर्जातून त्‍यांच्‍या विरुध्‍द केलेल्‍या विधानांचा इन्‍कार करुन प्रस्‍तुतची तक्रार विमा कंपनी विरुध्‍द मुळीच चालणेस पात्र नाही त्‍यांचेकडून कोणत्‍याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही असे म्‍हंटलेले आहे.कारण अर्जदाराच्‍या मयत पतीच्‍या डेथक्‍लेमची कागदपत्रे विमा कंपनीला मिळाल्‍यावर कागदपत्रातील गट नं. 128 च्‍या 7/12 उता-यामध्‍ये असे दिसून आले की,तारीख 05/06/2010 रोजी मयताचे नाव जमिनीच्‍या मालकी हक्‍कात नंतर दाखल केलेले आहे.तसेच फेरफार नं.960 मध्‍येही असे दिसते की,गट नं. 40 ची खरेदी मयताने 18/02/2010 रोजी केलेली होती.शेतकरी विम्‍याची पॉलिसी तारीख 15/08/2009 रोजी चालू झाल्‍यानंतर अर्जदाराच्‍या मयत पतीचे नांव महसूल रेकॉर्डला दाखल केलेले असल्‍याने व अपघाताचे वेळी तो शेतकरी नसल्‍यामुळे नियमानुसार अर्जदाराचा क्‍लेम तारीख 22/11/2010 च्‍या पत्रातून नामंजूर केलेला आहे.याबाबतीत विमा कंपनीकडून कोणत्‍याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही.तक्रार अर्जातील बाकीची सर्व विधाने साफ नाकारली आहेत व वरील सर्व बाबी विचारात घेवुन तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे.

लेखी जबाबाच्‍या पुष्‍टयर्थ शपथपत्र (नि.15) दाखल केले आहे. तसेच पुराव्‍यातील कागदपत्रात नि.19 लगत 22 कागदपत्रांच्‍या छायाप्रती (अर्जदाराने क्‍लेमफार्म सोबत कंपनीकडे पाठवलेल्‍या कागदपत्रे ) दाखल केलेल्‍या आहेत.

 

 

 

गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपल्‍या लेखी जबाबात (नि.8) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्‍या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्‍लेम संदर्भातील महसुल कार्यालयाकडून आलेल्‍या क्‍लेम कागदपत्रांची विमा कंपनीकडे  आवश्‍यक ती पूर्तता व छाननी करण्‍यासाठी शासनाने त्‍याना मध्‍यस्‍थ सल्‍लागार म्‍हणून नेमलेले आहे त्‍यासाठी महाराष्‍ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्‍यांचेकडून विम्‍याचा हप्‍ताही स्विकारला जात नाही. मयत शेषेराव राठोड याच्‍या विमा क्‍लेमची कागदपत्रे तारीख 12/08/2010 रोजी प्राप्‍त झाली होती.आवश्‍यक ती छाननी करुन मंजुरीसाठी विमा कंपनीच्‍या नागपूर कार्यालयाकडे तारीख 01/09/2010 रोजी पाठवली त्‍यानंतर विमा कपंनीने तारीख 31/12/2010 च्‍या पत्राने अर्जदाराचा विमाक्‍लेम नाकारला असल्‍याचे कळवले हाते त्‍या पत्राची कॉपी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे आली होती.ती लेखी जबाबासोबत दाखल करत असल्‍याचे नमुद करुन प्रकरणातून त्‍यांना वगळण्‍यात यावे,अशी शेवटी विनंती केली आहे.

लेखी जबाबासोबत विमा कंपनीने अर्जदारास पाठवलेल्‍या क्‍लेम नाकारलेल्‍या तारीख 31/12/2010 च्‍या पत्राची छायाप्रत दाखल केलेली आहे.

तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड.ए.डी.खापरे आणि   गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे अड दोडिया  यानी युक्तिवाद केला.

      निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.

    मुद्दे.                                    उत्‍तर

1          गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने अर्जदाराच्‍या मयत पतीच्‍या

मृत्‍यू पश्‍चात शेतकरी अपघात विम्‍याची नुकसान भरपाई

देण्‍याचे बाबतीत सेवात्रुटी केली आहे काय ?                   होय.     2   अर्जदार नुकसान भरपाई  मिळण्‍यास पात्र आहे  काय ?              होय  

                   

                        कारणे

मुद्दा क्रमांक 1 व 2 - 

      अर्जदाराचा मयत पती शेषेराव राठोड  हा  शेतकरी  अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्‍यात सादर केलेल्‍या नि.4/16, 4/17 व 4/25 वरील   ब्राम्‍हणगाव गट नं.149, गट नं.147 वरील या शेत जमिनीच्‍या उता-यातील नोंदी वरुन तसेच नि.4/6 वरील फेरफार नं.198 चा उतारा, नि.17/1 फेरफार नं. 5 चा उतारा   नि.4/7 वरील गाव नमुना नं.6-क चा उतारा, नि.4/18 वरील नमुना नं. 9 चा उतारा, नि.4/5 वरील तलाठ्याचे प्रमाणपत्र या कागदपत्रातील नोंदी मधून शाबीत झाले आहे. दिनांक 19.05.2010 रोजी अर्जदारा मयत शेषेराव राठोड  मोटार सायकल नं.एम.एच.22 के.351 वरुन परभणी जिंतूर रोडने गावाकडे जात असतांना झरी गावा जवळ पाठीमागून आटो क्रमांक एम.एच.22/ आर.313 च्‍या चालकाने भरधाव वेगात येवून मोटार सायकलला धडक दिल्‍याने अर्जदाराचा पती गंभीर जखमी होवुन त्‍याचा अपघती मृत्‍यू झाला होता  ही वस्‍तूस्थिती पुराव्‍यात दाखल केलेल्‍या परभणी ग्रामीण पोलिस स्‍टेशन गु.र.नं. 51/10 मधील एफ.आय.आर.(नि.4/16), घटनास्‍थळ पंचनामा (नि.4/12), मरणोत्‍तर पंचनामा (नि.4/13), पोस्‍टमार्टेम रिपोर्ट( नि.4/14) या पुराव्‍यातून शाबीत झालेले आहे.

      मयत शेषेराव राठोड हा शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विम्‍याचा लाभार्थी असल्‍यामुळे अर्जदाराने (मयताची पत्‍नी) विम्‍याची नुकसान भरपाई रुपये 1 लाख मिळणेसाठी गैरअर्जदार क्रमांक 3 कडे विमा क्‍लेमसह आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे सादर केलेली होती ही गोष्‍ट गैरअर्जदारानीही नाकारलेली नाही कागदपत्रांच्‍या छायाप्रती अर्जदाराने पुराव्‍यात नि. 4 लगत दाखल केलेल्‍या आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी लेखी जबाबातून घेतलेल्‍या बचावात तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबासोबत सादर केलेल्‍या नि.9 वरील विमा कंपनीने क्‍लेम तारीख 31/12/2010 च्‍या पत्रातून क्‍लेम नामंजूर पत्रात असे नमुद केले आहे की, 7/12 मध्‍ये मयत शेषेराव राठोड याचे नाव पॉलिसी जारी केल्‍यानंतर टाकण्‍यात आलेले आहे असे नामंजुरीचे कारण दिलेले आहे.लेखी जबाबामध्‍ये देखील त्‍याबाबत असा खुलासा केला आहे की, तारीख 15/08/2009 रोजी पॉलिसी जारी झाल्‍यानंतर फेरफार नं.960 हा फेरफार केला आहे.गैरअर्जदारांनी या संदर्भात चौकशी अधिकारी श्रीकांत आर.शिवणकर यांची नेमणुक करुन मयत शेषेराव राठोड हो विमा पॉलिसी जारी होण्‍यापूर्वी शेतकरी होता का या संबंधी चौकशी करण्‍या संदर्भात चौकशी अधिकारी म्‍हणून नेमणुक केली होती.त्‍यांच्‍या चौकशी अहवालाची प्रत पुराव्‍यात नि.19/1 वर दाखल केलेली आहे. त्‍यामध्‍येही चौकशी अधिका-याने 7/12 उता-यामध्‍ये मयताचे नावाचा फेरफार हा मृत्‍यू नंतर केला असल्‍याचे कारण दिलेले आहे.गैरअर्जदारा तर्फे दिलेले कारण निश्चितपणे चुकीचे असल्‍याचे अर्जदाराने पुराव्‍यात नि.17/1 वर दाखल केलेल्‍या सावरगांव तांडा ता.जिंतूर येथील मंडल अधिकारी यांच्‍या रेकॉर्ड मधील फेरफार नं.5 प्रमाणे  तारीख 08/02/1994 रोजी अर्जदाराचा मयत पतीसह इतर दोन इसमाने गट नं.310/128 क्षेत्र 2 हेक्‍टर 40 आर ही जमीन 50,000/- रुपयास दत्‍ता ढवळे यांच्‍याकडून रजिष्‍टर पत्राने खरेदी केली होती त्‍यामध्‍ये अर्जदाराच्‍या मयत पतीचा हिस्‍सा 0.50 आर असल्‍याचे फेरफारमध्‍ये नोंद असून तारीख 27/11/1994 रोजी रितसर नोटीसा बजावून तो मंजूर झालेला आहे.यावरुन अर्जदारचा मयत पती हा 1994 सालीच शेतकरी होता हे सिध्‍द झाले आहे.अर्जदाराने क्‍लेमफॉर्म सोबत पाठवलेल्‍या कागदपत्रात कदाचित फेरफार नं. 5 चा उतारा देण्‍याचे नजर चुकीने राहून गेले असावे त्‍यामुळेच विमा कंपनीने 31/12/2010 चे पत्र पाठवुन क्‍लेम नामंजूर केला असला पाहिजे असे आम्‍हांस वाटते.तरी परंतु राज्‍यातील खातेदार शेतक-यांसाठी महाराष्‍ट्र शासनाने स्‍वतःच्‍या तिजोरीतील विमा हप्‍त्‍याची रक्‍कम भरुन शेतकरी वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी घेतलेली आहे.अपघाता मध्‍ये शेतक-याचा मृत्‍यू झाल्‍यास अथवा कायमचे अपंगत्‍व आल्‍यास त्‍याच्‍या कुटूंबाला आर्थिक हातभार मिळावा या उद्देशाने हि कल्‍याणकारी योजना राबवली जात आहे अर्जदाराच्‍या मयत पतीचा पॉलिसी मुदतीत अपघाती मृत्‍यू झाला होता ही वस्‍तुस्थिती आहे. त्‍यामुळे अर्जदार पॉलिसी हमी प्रमाणे नुकसान भरपाई मिळणे निश्चित पात्र आहे.पॉलिसी जारी केल्‍यानंतर अर्जदाराच्‍या मयत पतीचे नाव 7/12 उता-यावर नंतर चढविले अशी वस्‍तुस्थिती पुराव्‍यातून मुळीच दिसून येत नाही.पॉलिसी जारी करण्‍यापूर्वीचा फेरफार अर्जदार कडून क्‍लेमफॉर्म सोबत नजर चुकीने न दिल्‍यामुळेच विमा कंपनीने तो क्‍लेम नामंजूर केला असला तरी तो चुकीचा निर्णय घेतला असल्‍यामुळे मुदतीची कोणतीही अट विचारात न घेता अर्जदाराकडून फेरफार नं 5 पुन्‍हा स्विकारुन अर्जदाराचा क्‍लेम मंजूर करणे न्‍यायोचित होईल.      

या संदर्भात मा. महाराष्‍ट्र राज्‍य आयोगानेही रिपोर्टेड केस 2008 (2) All MR (Journal) page 13 आय.सी.आय.लोंबार्ड विरुध्‍द सिंधुताई खैरनार या प्रकरणात असे मत व्‍यक्‍त केले आहे की, क्‍लेम दाखल करण्‍यास उशीर झाला ही अट मुळीच बंधनकारक तथा मॅडेटरी नाही हे मत प्रस्‍तूत प्रकरणालाही  लागू पडते याखेरीज मा. राष्‍ट्रीय आयोगाने देखील रिट पिटीशन 3329/07 युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी विरुध्‍द अरुणा या प्रकरणात 22.10.2007 रोजी दिलेल्‍या निकालपत्रात देखील वरील प्रमाणेच मत व्‍यक्‍त केलेले आहे.ते प्रस्‍तुत प्रकरणाला लागु पडते. सबब मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देवून आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.

         आदेश                         

1          अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्‍यात येते.

2          अर्जदाराने आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यावर रजि.पो.ने गैरअर्जदार नं 1 यांना फेरफार नं 5 चा उतारा क्‍लेम मंजुरीसाठी पाठवावा व त्‍यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने पूढील 30 दिवसांच्‍या आत अर्जदाराचा विमा क्‍लेम सेटल करावा.

 

 

 

 

 

3     पक्षकारांनी आपला खर्च आपण स्‍वतः सोसावा.

4     पक्षकाराना आदेशाच्‍या प्रती मोफत पुरवाव्‍यात  

 

 

 

 

 

सौ. अनिता ओस्‍तवाल              सौ.सुजाता जोशी        श्री. सी.बी. पांढरपटटे

     सदस्‍या                        सदस्‍या                  अध्‍यक्ष

 

 

 

 

 

 

 

 


[HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member