निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 18/03/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 05/04/2011 तक्रार निकाल दिनांकः- 16/09/2011 कालावधी 05 महिने 11 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. तुळशीराम पिता उत्तमराव घुगे. अर्जदार वय 32 वर्ष.धंदा.शेती. अड.एस.बी.धुळे. रा.सेलसुरा.ता.कळमनुरी.जि.हिंगोली. विरुध्द व्यवस्थापक. गैरअर्जदार. युनायटेड इंडिया इन्शुरंस कं.लि.दयावान कॉम्पलेक्स. अड.जी.एच.दोडिया. स्टेशन रोड परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराकडे MH-38 1983 ईंडीका कार असून सदरील गाडीचा दिनांक 23/04/2010 ते 22/04/2011 या कालावधीसाठी विमा क्रमांक 230601/31/10/01/00001770 असा होता.दिनांक 30/10/2010 रोजी औरंगाबाद जालना रोडवर अपघात होवुन गाडीचे नुकसान झाले पोलिस स्टेशन करमाड येथे मोटार अपघात नोंद क्रमांक 30/2010 अन्वये नोंदवण्यात आली.यामध्ये गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले व दुरुस्तीचा खर्च रु.90044/- आला व सर्व्हेअर फीस रु.6000/- दुरुस्तीसाठी वाहन नेण्याचा खर्च रु.2300/- व इतर येण्याजाण्याचा खर्च असा एकुण रु.1,03,300/- झाला गैरअर्जदाराकडे वाहन दुरुस्तीची सर्व कागदपत्रे देवुनसुध्दा त्यांनी अर्जदाराला फक्त रु.45,600/- इतकी नुकसान भरपाई मंजूर केली अर्जदाराने फरकाची रक्कम रु.57,700/- मिळण्याठी ही तक्रार दाखल केली.व मानसिक त्रासापोटी रु.15000/- व दाव्याचा खर्च रु.5000/- मिळण्याची मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, घटनास्थळ पंचनामा, सान्या मोटर्सने दिलेली गाडी दुरुस्तीची बिले, गैरअर्जदाराने दिलेल्या चेकची छायाप्रत, ड्रायव्हींग लायसेंन्स, इन्शुरंस पॉलिसी, वाहनाचे रजिस्ट्रेशन इ.कागदपत्र दाखल केलेली आहेत. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराने अपघाताची माहिती दिल्यानंतर वाहनाचा सर्व्हे करण्यासाठी गैरअर्जदाराने सर्व्हेअर नेमला व सर्व्हेअरच्या असेसमेंट नुसार अर्जदाराला रु.45,600/- चा चेक क्रमांक 969094 दिनांक 17/02/2011 ला दिला व अर्जदाराने तो स्वीकारला.कायद्यानुसार तक्रारदाराने डीसचार्ज व्हाउचरवर सही केल्यानंतर त्याला कुठलाही दावा दाखल करता येणार नाही.म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासहीत फेटाळण्याची विनंती गैरअर्जदाराने केली आहे. गैरअर्जदाराने त्याचे शपथपत्र, बीलचेक रिपोर्ट, क्लेम डीसबर्समेंट व्हाउचर, सेटलमेंट ईंटीमेशन व्हाउचर, इन्शुरंन्स पॉलिसी हे कागदपत्र लेखी जबाबासोबत दाखल केलेले आहेत. तक्रारीत दाखल कागदपत्रावरुन व वकीलांच्या युक्तीवादावरुन तक्रारीत खालील मुद्दे उपस्थीत होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? नाही. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा नुसार. कारणे. अर्जदार हा ईंडीका क्रमांक एम.एच.- 38.1983 चा मालक असुन सदरील गाडीचा दिनांक 23/04/2010 ते 22/04/2011 पर्यंतचा विमा क्रमांक 230601/31/10/01/00001770 अर्जदाराने गैरअर्जदाराकडून घेतलेला होता ही बाब सर्वमान्य आहे.अर्जदाराच्या ईंडीकाचा अपघात दिनांक 30/10/2010 रोजी झाला होता हे नि.5/1 वरील घटनास्थळ पंचनाम्यावरुन सिध्द होते. अपघात झाल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे वाहनाचा विमा दावा दाखल केला व गैरअर्जदाराने अर्जदारास विमादाव्याचे रु.45,600/- मंजूर केले हे नि.15/1 वरील क्लेम डिसबर्समेंट व्हाउचर वरुन समजते व अर्जदाराने ती रक्कम पूर्ण समाधानाने स्वीकारल्याचे नि.15/2 वरील “ सेटलमेंट ईंटीमेशन व्हाउचर ” वरुन सिध्द होते गैरअर्जदाराने रु.45,600/- सर्व्हेअरच्या बीलचेक रिपोर्ट ( नि.15/9) प्रमाणे दिलेले आहेत. रिपोर्टेड केस 1999(3) CPR 53 सर्वोच्च न्यायालय व 2003 (1) CPR 72 मा.राष्ट्रीय आयोग मध्ये एकदा विमाधारकाने विमा कंपनीने दिलेली विमादाव्याची रक्कम पूर्ण समाधानाने विनातक्रार स्वीकारली तर त्याला विमाकंपनी विरुध्द तक्रार ग्राहक न्यायमंचात दाखल करता येत नाही असे स्पष्ट मत दिलेले आहे.जे सदरील तक्रारीस तंतोतंत लागु पडते.म्हणून अर्जदारास गैरअर्जदाराने कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही असे आम्हास वाटते व खालील प्रमाणे खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे. 2 तक्रारीचा खर्च अर्जदार व गैरअर्जदाराने आपापला सोसावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष. जिल्हा ग्राहक न्याय मंच परभणीच्या मा.2 सदस्यांनी दिलेल्या निकाल पत्रातील आदेशाशी मी सहमत नसल्यामुळे मी माझे वेगळे निकालपत्र या निकालपत्रा सोबत देत आहे.
सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.जिल्हा ग्राहक न्याय मंच परभणी. (निकालपत्र पारीत व्दारा सौ.अनिता ओस्तवाल.सदस्या) मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणती दाद मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा नुसार. कारणे. अर्जदाराच्या इंडिकाला दिनांक 30/10/2010 रोजी अपघात झाला. सदर वाहनाचा विमा दिनांक 23/04/2010 ते दिनाक 22/04/2011 या कालावधीसाठी गैरअर्जदाराकडून घेण्यात आला होता.सदर वाहनाच्या दुरुस्तीसाठीचा खर्च रक्कम रु.90,044/- + इतर खर्च असे एकुण रक्कम रु. 1,03,300/- चा खर्च अर्जदारास करावा लागला पॉलिसी हमी पोटी क्षतीग्रस्त वाहनाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने आवश्यक कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर गैरअर्जदाराने केवळ रक्म रु.45,600/- इतकी नुकसान भरपाई मंजूर केली. अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.सदर प्रकरणाचा निर्णय घेण्यासाठी मुद्दा असा उपस्थित होतो की, गैरअर्जदाराने सर्व्हेअरने केलेल्या नुकसानीच्या मुल्यांकना प्रमाणे (Assessment) रक्कम अर्जदारास दिलेली आहे काय ? यासाठी गैरअर्जदाराने नि.15/4 वर बिलचेक रिपोर्टची मुळप्रत दाखल केली आहे.त्याचे अवलोकन करावे लागेल.बिलचेक रिपोर्ट प्रमाणे क्षतीग्रंस्त वाहनाच्या नुकसानीचे मुल्यांकन रक्कम रु.50,420/- केल्याचे स्पष्ट होते. वास्तविक पाहता गैरअर्जदाराने बिलचेक रिपोर्ट नुसार अर्जदारास रक्कम मंजूर करावयास हवी होती, परंतु प्रत्यक्षात रक्कम रु.45,600/- अर्जदारास कोणत्या आधारावर दिली ? त्याचे स्पष्टीकरण गैरअर्जदाराने लेखी निवेदनातून केलेले नाही. म्हणून माझ्या मते गैरअर्जदाराने बिलचेक रिपोर्टमध्ये नमुद केलेल्या रक्कमे पेक्षाही कमी रक्कम देऊन नक्कीच त्रुटीची सेवा अर्जदारास दिलेली आहे.तसेच अर्जदारास उपरोक्त रक्कम दिनांक 17/02/2011 रोजी मिळाली व त्यानंतर त्याने फरकाची रक्कम मिळण्यासाठी दिनांक 18/03/2011 रोजी मंचासमोर तक्रार दाखल केल्यामुळे त्याने उपरोक्त रक्कम गैरअर्जदाराकडून विना तक्रार स्वीकारली अथवा पूर्ण समाधानाने स्वीकारली असे मानता येणार नाही. त्यामुळे बिलचेक रिपोर्ट नुसार देय रक्कम रु.50,420/- त्या मधून अर्जदारास दिलेली रक्कम रु.45,600/- वजा जाता ( रु. 50420/- रु.45,600/-) = रु.4820/- इतकी मिळण्यास अर्जदारास नक्कीच पात्र आहे.म्हणून वरील सर्व बाबींचा सारासार विचार करुन मी खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास फरकाची रक्कम रु. 4820/- दिनांक 17/02/2011 पासून पूर्ण रक्कम पदरी पडे पावेतो द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने द्यावी. 3 गैरअर्जदाराने सेवात्रुटी पोटी व त्या अनुषंगाने होणा-या मानसिकत्रासा बद्दल रक्कम रु. 1,500/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.1000/- आदेश मुदतीत अर्जदारास द्यावी. 4 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सदस्या.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |