Maharashtra

Nanded

CC/10/112

Bhagirathi Godawari Aquaeapure Pri.Lit - Complainant(s)

Versus

Manager,United India Insurance Com.Lit - Opp.Party(s)

ADV.S.V.Ardhapurkar

30 Sep 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/112
1. Bhagirathi Godawari Aquaeapure Pri.Lit T.61MIDC NandnedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Manager,United India Insurance Com.Lit NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,PRESIDING MEMBER
PRESENT :

Dated : 30 Sep 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/112
                          प्रकरण दाखल तारीख - 08/04/2010
                          प्रकरण निकाल तारीख 30/09/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
      मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
       मा.श्री.सतीश सामते,                 -   सदस्‍य.
 
भगीरथी गोदावरी अक्‍वाप्‍युअर प्रायव्‍हेट लि.
टी-61, एम.आय.डी.सी. नांदेड मार्फत
मॅनेजिंग डायरेक्‍टर श्री.शैलेष सखाराम क-हाळे
वय 34 वर्षे,                                              अर्जदार
     विरुध्‍द.
युनायटेड इंडिया इन्‍सोरेन्‍स कंपनी लि.                     गैरअर्जदार
मार्फत शाखाधिकारी, तारासिंह मार्केट, नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.वाय.एस.अर्धापूकर
गैरअर्जदारा तर्फे वकील              -  अड.व्‍ही.एम.देशमूख.
 
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
 
             गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्‍हणून अर्जदाराने आपली तक्रार दाखल केली आहे.
              अर्जदाराची थोडक्‍यात तक्रार अशी की, अर्जदार यांची भगीरथी गोदावरी अक्‍वाप्‍युअर कंपनीत पॅकेज ड्रीकींग वॉटर प्रॉडक्‍शन केल्‍या जाते. प्रॉडक्‍शन तयार करण्‍यासाठी लागणारा कच्‍चा माल, फिनीश मटेरियल हे फॅक्‍टरीतच ठेवल्‍या जाते.  उत्‍पादन झाल्‍यानंतर मागणीनुसार त्‍यांचे सप्‍लाय केल्‍या जाते. अर्जदाराने खेळते भांडवलासाठी नांदेड येथील स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा (आय.ई) यांचेकडून कर्ज घेतलेले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास रु.15,00,000/-चे खेळते भांडवल (हॉयपो कॅश क्रेडीट) व रु.5,00,000/- च टर्म लोन वर्ष 2006 मध्‍ये मंजूर केलेले आहे. गैरअर्जदाराने दिलेल्‍या पॉलिसीचा क्र.230600/11/08111/00000912 असा असून पॉलिसी ही दि.26.03.2009 ते 25.03.2010 या कालावधी साठीची
 
 
आहे. अर्जदाराने या पॉलिसी द्वारे गैरअर्जदाराकडे रु.25,00,000/- चा विमा काढलेला आहे. दि.13.06.2009 रोजी सकाळी 2.00 वाजता अर्जदाराच्‍या फॅक्‍टरीत शॉर्ट सर्कीटमूळे आग लागली. अग्‍नीशमन दलाच्‍या प्रयत्‍नाने आग विझवण्‍यास मदत झाली पण अर्जदाराच्‍या व फॅक्‍टरीत असलेल्‍या कर्मचारी यांच्‍यामूळे बरेच नूकसान होण्‍याचे वाचले. घटनेची माहीती ग्रामीण पोलिस ठाणे नांदेड येथे दिली. त्‍यांनी घटनास्‍थळाचा पंचनामा केला. अर्जदाराचे झालेले नूकसान व घटनास्‍थळाचे परिस्थितीचे वर्णन पोलिसांनी केले आहे. दि.15.06.2009 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार यांच्‍या कार्यालयात आगीच्‍या घटनेमूळे झालेली नूकसानी बददल लेखी अर्ज दिला. सदरील अपघातात अर्जदाराचे रु.28 लाख ते रु.30 लाख रुपयाचे नूकसान झाल्‍याचे गैरअर्जदारास लेखी कळवले होते. गैरअर्जदाराच्‍या अधिका-यांनी व त्‍यांच्‍या सर्व्‍हेअर्सनी अर्जदारास स्‍टॉक स्‍टेटमेंट, पोलिस पेपर्स व सर्व पावत्‍या इत्‍यादी कागदपञांची मागणी केली, अर्जदाराने सर्व कागदपञे गैरअर्जदाराकडे दाखल केले. तसेच कर्जाच्‍या नियमाप्रमाणे अर्जदाराने आपले स्‍टॉक स्‍टेटमेंट आपल्‍या बँकेकडे दाखल केले आहे व ते बँकेने स्‍टॉक पाहून तपासले आहे. स्‍टेटमेंट नुसार त्‍यावेळेस रु.29,00,000/- चे मटेरीयल व स्‍टॉक असल्‍याची नोंद आहे. अर्जदाराने पॉलिसीप्रमाणे रु.25,00,000/- मिळण्‍यास पाञ आहे. गैरअर्जदाराने कोणतेही कारण न देता परस्‍पर रु.8,34,239/- स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद यांच्‍याकडे डी.डी. द्वारे पाठवले व बँकेने ही रक्‍कम अर्जदाराच्‍या कर्ज खात्‍यात जमा केली. त्‍यानंतर बँकेने माहीती दिल्‍यानंतर अर्जदारास रक्‍कम कमी मिळाल्‍याचा माहीती झाली. म्‍हणून अर्जदाराने गैरअर्जदारास संपूर्ण रक्‍कम न देण्‍याचे कारण विचारले असता गैरअर्जदार व त्‍यांच्‍या अधिका-याकडे कोणतेच योग्‍य उत्‍तर नव्‍हते व त्‍यांनी उर्वरित रक्‍कम रु.16,65,761/- दिली नाही म्‍हणून अर्जदाराने वकीलामार्फत गैरअर्जदार यांना दि.18.03.2010 रोजी नोटीस पाठवून वरील रक्‍कमेची मागणी केली, सदरील नोटीस मिळाल्‍यावरही गैरअर्जदाराने कोणतेही उत्‍तर दिले नाही. त्‍यामूळे अर्जदारास मानसिक ञास सहन करावा लागला आहे. म्‍हणून अर्जदाराची मागणी आहे की, गैरअर्जदारांनी नूकसानीची राहीलेली उर्वरित रक्‍कम रु.16,65,761/- दि.30.11.2009 पासून 18 टक्‍के व्‍याजासह देण्‍याचा आदेश व्‍हावा, तसेच नूकसान भरपाईपोटी रु.30,000/-व रु.50,000/- मानसिक ञासापोटी मिळावेत अशी मागणी केली आहे.
              गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. तक्रार मधील परिच्‍छेद क्र.1 ते 5 मधील मजूकरा संबंधाने गैरअर्जदारास आक्षेप नाही. पॉलिसी रु.25,00,000/- ची
 
 
होती हे मान्‍य आहे, तसेच पॉलिसीचा कालावधी सूध्‍दा मान्‍य आहे. तसेच विमा अर्जदाराने स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद यांचे मार्फत घेतलेला होता. गैरअर्जदाराने अर्जदारास नियमानुसार देय असलेली सर्व नूकसान भरपाईची रक्‍कम रु.08,35,153/- दिलेली आहे.त्‍यामूळे अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ही गैरवाजवी व अवास्‍तव असल्‍यामूळे ती खारीज करावी असे म्‍हटले आहे. ग्रामीण पोलिस स्‍टेशन नांदेड यांनी केलेल्‍या पंचनाम्‍यामधील नूकसानीचे दाखवलेले आकडे हे अंदाजे असून ते पुराव्‍याकामी गृहीत धरले जाऊ शकत नाहीत. तसेच अर्जदाराने दि.15.06.2009 रोजी अर्जामधील नूकसान भरपाईचे आकडे फूगवून दाखवलेले आहेत. घटनेच्‍या दीवशी रु.08,15,153/- चे नूकसान झाल्‍याचे दिसून येते. हे म्‍हणणे बरोबर नाही की,अर्जदाराच्‍या फॅक्‍टरीत घटनेच्‍या दिवशी रु.29,00,000/- चा माल होता व तेवढया मालाचा त्‍यांचे नूकसान झाले. अर्जदाराने असत्‍य स्‍टॉक स्‍टेटमेंट बँकेकडे कर्जासंबंधाने दाखल केलेले आहे. अर्जदाराने दाखल केलेले स्‍टॉक स्‍टेटमेंटस हे ऑडीट झालेल्‍या अर्थ खात्‍यातील नोंदीशी मिळत नाही. अर्जदाराने दि.31.03.2009 रोजी बँकेत सादर केलेल्‍या स्‍टॉक स्‍टेटमेंटमध्‍ये स्‍टॉक किंमत रु.21,51,018/- आहे तर ऑडीट झालेल्‍या अर्थ खात्‍यामध्‍ये स्‍टॉक किंमत रु.7,24,581/- अशी दाखवलेली आहे. त्‍यामूळे हे स्‍पष्‍ट होते त्‍या दिवशी कारखान्‍यामध्‍ये रु.29,00,000/- चा माल नव्‍हता. सर्व्‍हेअर दि.18.06.2009 रोजी घटनास्‍थळावर गेले असता त्‍यावेळेस जबाबदार व्‍यक्‍ती कोणीही हजर नव्‍हता व कोणत्‍याच प्रकारचे रेकार्ड उपलब्‍ध नव्‍हते. त्‍यामूळे सर्व्‍हेअरने अर्जदाराकडे नूकसान भरपाई ठरविण्‍यासंबंधाने कागदपञाची मागणी केली. कागदपञाची पाहणी, तपासणी व त्‍या सर्व कागदपञाचे विस्‍तृत विश्‍लेषण करुन घटनेच्‍या दिवशी कारखान्‍यामध्‍ये रु.9,45,539/-किंमतीचा माल होता. त्‍यातून सॉलव्‍हेज रक्‍कम रु.1,05,773/- कमी करुन एकूण नूकसान भरपाई रु.8,35,153/- झाल्‍याचे ठरविले व तसा अहवाल विमा कंपनीकडे दि.05.11.2009 रोजी सादर केला. निदेर्शीत केलेल्‍या रक्‍कमेची आगाऊ व्‍हाऊचर विमाधारकाकडे सही साठी दिले व सदरचे व्‍हाऊचर विमाधारकाने सही करुन विमा कंपनीचे हक्‍कात दिल्‍यानंतर रु.8,35,153/- चा धनादेश विमाधारक यांना नूकसान भरपाईचे रक्‍कमेची संपूर्ण क्‍लेमच्‍या पूर्ण समायोजनार्थ (फूल अन्‍ड फायनल सेंटलमेंट) देण्‍यात आले. जो अर्जदाराने स्‍वेच्‍छेने स्विकारले आहे. अर्जदार यांनी दि.18.0.3.2010 रोजी पाठविलेल्‍या नोटीसीचे उत्‍तर गैरअर्जदार विमा कंपनीने अड.व्‍ही.एम. देशमूख यांच्‍यामार्फत अर्जदारास टपालाने पाठविले
 
 
 
परंतु अर्जदाराने सदर उत्‍तर घेण्‍यास इन्‍कार केला आहे तशी नोंद टपाल खात्‍याने उत्‍तराचा लिफाफयावर करुन लिफाफा गैरअर्जदारास परत केला. त्‍यामूळे गैरअर्जदाराच्‍या सेवेत कोणतीही ञूटी नसून अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
 
                       अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
          मूददे                                      उत्‍तर
1.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?          होय.
2.   अर्जदार किती रक्‍कम मिळणेस पाञ आहेत ?          आदेशाप्रमाणे. 
2.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
 
                  अर्जदार ही एक डिकींग वॉटर प्रोडक्‍शंन बनवीण्‍यारी कंपनी ज्‍यासाठी त्‍यांना कच्‍चा माल, उत्‍पादित माल कारखान्‍यातच ठेवला जातो. ज्‍यांचे सूरक्षेसाठी गैरअर्जदार यांचेकडे त्‍यांने स्‍टँडर्ड फायर अन्‍ड स्‍पेशल पेरील्‍स पॉलिसी घेतली आहे. कारखान्‍यासाठी त्‍यांने स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद यांचेकडून कॅश क्रीडीट व टर्म लोन  चे घेतलेले असून एकूण रु.25,00,000/- चा विमा उतरविला होता. दि.13.06.2009 रोजी अर्जदाराच्‍या फॅक्‍टरी मध्‍ये दूपारी 2 वाजता शॉर्ट सर्कीट मूळे आग लागली. फॅक्‍टरीतील कर्मचारी व मॅनेजिंग डायरेक्‍टर यांनी अग्‍नीशमन दला द्वारे आग विझवली. त्‍यात कच्‍चा माल व कारखान्‍यातील मालाचे बरेच नूकसान झाले. सदरील घटनेची माहीती पोलिस स्‍टेशन ग्रामीण यांना दिल्‍यावर त्‍यांनी जायमोक्‍यावर जाऊन पंचनामा केला. अर्जदाराच्‍या मते त्‍यांचे रु.28,00,000/- चे नूकसान झाले व ते त्‍यांनी गैरअर्जदार यांना कळविले. त्‍यांचे सर्व्‍हेअरने येऊन स्‍टॉक स्‍टेटमेंट, पोलिस पेपर्स व पावती बघून किती नूकसान हे असेस केले.विमा पॉलिसी नंबर 30600/11/ 08/ 111/00000912 हे गैरअर्जदार यांनी मान्‍य आहे. परंतु गैरअर्जदाराच्‍या सर्व्‍हेअरच्‍या अहवालानुसार रु.9,45,539/- एवढया मालाचे नूकसान झाले व यासाठी त्‍यांनी रु.8,45,153/- अर्जदाराच्‍या बँकेस चेक दिलेला आहे. गैरअर्जदार यांच्‍या वकिलांनी यूक्‍तीवाद करते वेळेस हे सांगितले की, वरील
 
 
रक्‍कम ही अर्जदार यांनी स्‍वतः सही करुन व बॅंकेनेही सही करुन वन टाईप फूल अन्‍ड फायनल सेटंलमेंट अमाऊट म्‍हणून स्विकारली आहे. त्‍यामूळे त्‍यांना आता परत अधिकची रक्‍कम मागता येणार नाही. यूक्‍तीवादाचे वेळी  या मंचाने गैरअर्जदार यांना असे आपल्‍याकडे काही पूरावा असल्‍यास दाखल करण्‍याची सूचना केली होती परंतु असा कोणताही पूरावा गैरअर्जदार यांचेकडून  या प्रकरणी समोर आलेला नाही. अर्जदाराचा तक्रार अर्ज पाहिलयास ते म्‍हणतात गैरअर्जदार यांनी परस्‍पर ही रक्‍कम बँकेस पाठविली आहे व बँकेने हे कर्ज खात्‍यात जमा केलेले आहे व त्‍यांचे मालाचे नूकसान अधिकचे असून आणखी रु.16,65,761/- ते मिळण्‍यासाठी ते हक्‍कदार आहेत. त्‍यांनी त्‍यांचे मर्जीने रक्‍कम घेतलेली नाही. एकंदरीत सूचनेचा आढावा घेतल्‍यास कारखान्‍यास आग लागली सर्व माल जळून खाक झाला, विमा कंपनीने दिलेली रक्‍कम बँकेचे कर्ज खात्‍यात जमा झाली. अर्जदार कंपनीच्‍या हाती काहीच आले नाही व नूकसान माञ झालेले आहे. अशा परिस्थितीत ही रक्‍कम स्विकारण्‍यास मजबूरीने ते अंडर प्रोटेस्‍ट तयार झाले असा त्‍यांचा अर्थ घेण्‍यास हरकत नाही. सर्व्‍हे रिपोर्ट पाहिला असता सर्व्‍हेअने फॅक्‍टरीचे बिल्‍डींगचे अतोनात नूकसान झालेले आहे परंतु यांचा विमा नाही. यांनी फक्‍त स्‍टॉकचा विमा काढलेला आहे. परिच्‍छेद नंबर 7 वर सर्व्‍हेअरने असे नमूद केले आहे की, प्रवेश करताच क्षणी खूप धूर मध्‍ये होता व रिकाम्‍या पेट बॉटल्‍स तळ मजल्‍यावर आगीमूळे वितळून गेलेल्‍या होत्‍या व खाली असेही म्‍हटले आहे की, No loss असे notices on ground floor  म्‍हणतात वर म्‍हणतात तळ मजल्‍यावर बाटल्‍याचा खच पडला आहे व वर म्‍हणतात लॉस नव्‍हता. म्‍हणजे एकच परिच्‍छेद मध्‍ये विरोधी वीधान दिसून येत होते. बिल्‍डींगचे काय नूकसान झाले हे यात दिले आहे परंतु यांचा विमा काढला नसल्‍यामूळे यावीषयी जास्‍त चर्चा नको. सर्व्‍हेअरने हे म्‍हटले की, ते गेल्‍यावर कंपनीचे संचालक हे खूप जखमी झाले व त्‍यांनाही प्‍लॅस्‍टर बँडेंज लागलेले असून ते अडमिट आहेत. म्‍हणून सर्व्‍हेअरने त्‍यांची भेट हॉस्‍पीटलमध्‍ये जाऊन घेतली. सर्व्‍हेअरने आग भयानक होती असा उल्‍लेख केलेला आहे. आग दि.12.06.2009 रोजीला लागली त्‍यांच दिवशी त्‍यांनी जाऊन सर्व्‍हे केला. आगीचे कारण शॉट सर्कीट होते. पूर्ण कच्‍चा माल जळून खाक झाल्‍यानंतर तेथे साल्‍व्‍हेज शिल्‍लक राहीले नाही. त्‍यामूळे मालाचा हीशोब लागणे कठीण आहे.  सर्व्‍हेअरने डिसेंबर 2008 पासूनचा स्‍टॉक घेतला आहे. त्‍यात डिसेंबर 2008 ते मे,2009 पर्यत 21 ते 24 लाख पर्यतचा स्‍टॉक मेंन्‍टेन केल्‍या गेला होता अशा स्‍टेटमेंटच्‍या कॉपी त्‍यांने बघीतल्‍याचे म्‍हटले आहे.   दि.31.3.2009  रोजीला   as per   books   रु.7,24,581/-  चा
 
 
स्‍टॉक लिहीलेला होता जेव्‍हा की स्‍टॉक स्‍टेटमेंट मध्‍ये रु.21,06,540/- स्‍टॉक रजिस्‍ट्रर सर्व्‍हेच्‍या वेळी उपलब्‍ध नव्‍हता. 9.12 हया सिरियल मध्‍ये सर्व्‍हेअरने हे कबुल केले होते. जास्‍तीत जास्‍त सेल हा नगदीचा होता. सेल बिल येऊ केले नाहीत. त्‍यामूळे सेल अन्‍ड परचेस टॅली केले असता रक्‍कम 2007 मध्‍ये परचेस रु.16,86,161/- व विक्री रु.21,46,680/-  नंतर 2008 मध्‍ये रु.19,68,387/- व सेज रु.18,40,060/- यानंतर 2009 मध्‍हये परचेस रु.29,95,967/- व सेल रु.9,10,620/- हे आधीच्‍या कालावधीतील दोन दोन महिन्‍याचा सेल परचेस चा आढावा घेतलेला होता. एकंदर 2007,2008 व 2009 याचा आढावा घेतल्‍याचेनंतर सेल 100 टक्‍केचे जवळपास दिसून येतो. परंतु यांचा अर्थ असे नाही की, दरवर्षी तो तितकाच राहीला पाहिजे. सेल हा कमी अधीक होऊ शकतो व उत्‍पादन हे नेहमीच शेडयूल प्रमाणे चालू असते. एखादया वेळेस काहीही कारणामूळे सेल नाही होऊ शकला व त्‍यामूळे त्‍याठिकाणी तेवढा स्‍टॉक शिल्‍लक राहतो. म्‍हणजे स्‍टॉक असू शकत नाही असे होत नाही. यात दि.01.04.2009 रोजीचे ओपनिंग स्‍टॉक रु.7,24,581/- दाखवलेला आहे व परचेस दि.1.4.2009 ते 11.6.2009 पर्यत रु.22,87,086/- दाखवलेले आहे. म्‍हणजे या काळातले टोटल स्‍टॉक म्‍हणजे जवळपास रु.25,00,000/- वर स्‍टॉक होता. सेल टॅक्‍सचे रिटर्न पाहिले असता याप्रमाणे ग्रॉस टर्न ओव्‍हर ऑफ सेल रु.9,10,620/- दाखवलेला आहे. यात परचेस रु.29,95,967/- दाखवलेला आहे व हे रिटर्न दि.16.7.2009 ला इ फाईल केल्‍या गेले होते. सर्व्‍हेअर  यांनी अंदाजाने एव्‍हरेज लाऊन हीशोब केलेला आहे व आपल्‍या सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये परचेसचा आकडा मान्‍य केलेला आहे. तेव्‍हा मान्‍य केलेला आकडा व रिटर्न मध्‍ये रु.2,00,000/- चा फरक आहे. आता रु.29,95,967/-,परचेस मधून सेल रु.9,10,620/- कमी झाले तर रु.20,85,347/- एवढा स्‍टॉक येतो. ही परिस्थिती दि.16.7.2009 ची आहे व आग ही दि.12.06.2009 रोजी लागली आहे. तेव्‍हा एक महिना आधीचा हीशोब जर घेतला व खरेदी ही दोन लाखाची नंतर केली असे गृहीत धरुन एक महिन्‍याचा स्‍टॉक रु.2,00,000/- अजून कमी केला तर साधारणतः रु.18,85,347/- एवढा स्‍टॉक येऊ शकतो. स्‍टॉक मध्‍ये कच्‍चा माल व फिनीश गूड या दोन्‍हीचा समावेश आहे. खरेदी निश्चितच आहे तेवढा सेल हा कमी अधीक असू शकाते. मागच्‍या दरवर्षीच्‍या विक्री वरुन सूरुवातीची विक्री काढता येत नाही. माल उत्‍पादन होऊन स्‍टॉक मध्‍ये राहू शकतो. एकच महिन्‍यामध्‍ये 25 व 30 लाखाचा सेल असू शकतो तेव्‍हा रु.,9,50,000/-चा लॉस झाला असा हीशोब लावणे अन्‍यायकारक ठरेल.अर्जदाराने सेल अकाऊटस प्रत्‍येकाचे नांवावर दिलेले आहे. तसेच बँकेने
 
 
दाखल केलेले दि.31.3.2009 चे स्‍टॉक स्‍टेटमेंट पाहीले असता ते रु.21,51,018/- चे आहे.अर्जदाराने जे स्‍टॉक रजिस्‍ट्रर दाखल केलेले आहे त्‍यात दि.1.4.2009 पासूनचा स्‍टॉक रजिस्‍ट्रर दाखल केलेले आहे. पण हे गैरअर्जदार यांना मान्‍य नाही. म्‍हणून यांच्‍याही जास्‍त खोलात जाणार नाही. वर चर्चा केल्‍याप्रमाणे जो स्‍टॉक दाखवण्‍यात आलेला आहे रु.18,85,347/- यांचे वर सर्व्‍हेअर यांनी प्रॉफिट कॅलक्‍यूलेट केले. सर्व्‍हेअरने देखील आपल्‍या सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये तिन वर्षाची सरासरी काढून अंदाजे स्‍टॉक गृहीत धरलेला आहे. वरील स्‍टॉक आम्‍ही अर्जदार व गैरअर्जदार यांचे म्‍हणणे व दोघाचेही कागदपञ व अर्जदार यांचे रिटर्न गृहीत धरुन व यातील प्रॉफिट लक्षात घेऊन काढलेला आहे. वरील स्‍टॉक रु.18,85,347/- इतके अर्जदाराचे आगीत नूकसान झाले व यातील गैरअर्जदाराने रु.8,35,123/- दिलेले आहेत व ते वजा जाता रु.10,50,224/- हे अजून अर्जदार यांना देणे बाकी आहेत. म्‍हणून गैरअर्जदार हे एवढी रक्‍कम देण्‍यास जबाबदार आहेत. यात साल्‍व्‍हेज नाहीच आहे त्‍यामूळे रक्‍कम कमी करण्‍याचा प्रश्‍नच येत नाही. तेव्‍हा सर्व्‍हेअर ही रु.1,05,773/- रक्‍कम कमी करणे चुकीचे आहे. पॉलिसी एक्‍सेसची रककम ही गैरअर्जदाराने दिलेल्‍या रक्‍कमेत धरलेलीच आहे. त्‍यामूळे वरील लॉस हा नेट लॉस समजण्‍यात यावा. अर्जदाराची फॅक्‍टरी जळून खाक झाली. त्‍यामूळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली असणार त्‍यात त्‍यांना कमी रक्‍कम मिळाली म्‍हणून तेव्‍हापासून गैरअर्जदार व्‍याज देण्‍यास ही बांधील आहेत. एकंदर पाहता कंपनीचे खूप नूकसान झाले आहे यात सर्व्‍हेअरनेही आपल्‍या अहवालात कबूल केले आहे की, यात पक्‍कयात जरी हीशोब नसला तरी नगदी हीशोब जास्‍त आहे. एकंदर या कंपनीचे मागील तीन ते चार वर्षाचा आढावा घेतला तर यांचा सेल जास्‍त दिसून येतो. त्‍या अनुषंगाने परचेस देखील मोठे राहणार व स्‍टॉक देखील मोठा राहणार यावीषयी शंका नाही.
 
              गैरअर्जदार यांनी II (2005) CPJ 476 Gukrat State Consumer Disputes Redressal Commission, Ahmedabad, यात  Consumer Protection Council & anr. Vs. Oriental Insurance Company & ors.  ही अथोरिटी दाखल केलेली आहे. यात सर्व्‍हेअरच्‍या रिपोर्टला जरी महत्‍व दिले असले तरी यात मूळातच सर्व्‍हेअरच्‍या रिपोर्ट चॅलेज केलेले आहे, म्‍हणून त्‍यांचे पुर्ण तपासणी जरुरी आहे.
 
              NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, CIRCUIT BENCH, AT CHENNAI,
 
 
 
 
 
              Insurance Claim –Damage of stock in fire – Assessment of loss – Reduction of assessment of loss for stock from Rs.21,59,568/- to Rs.4,53,966/- not jusrified – Reduction of amount on hypothetical, imaginative, and on assumptions and presumptions – Not justifiable reason to discard the books of accounts maintained, register maintained under RGI Register under Central Excise Rules, endorsement made by Superintendent of Central Excise with regard to cones which affected and unaffected by
fire, monthly stock statement,submitted to bak from where the complaint taken the loan – Complainant entitled to loss assessed by surveyor Rs.21,59,569/- .
 
यात  Texcomes Tubes Company   Vs. Oriental Insurance Co. Ltd and another  यात एकच महिन्‍याचे म्‍हणजे दि.12.5.2009 चे रु.24,16,540/- चे आहे व आग ही दि.12.6.2009 रोजी लागली आहे म्‍हणजे 12 दिवस आधीचे आहे. यातून काही विक्री झाले तरी नूकसानीचा आकडा मोठाच आहे व या सायटेशन प्रमाणे स्‍टॉक स्‍टेटमेंट ला महत्‍व दिले गेले आहे. म्‍हणून अर्जदाराच्‍या फॅक्‍टरची नूकसान हे निश्चितच सर्व्‍हेअरनी केलेल्‍या नूकसानी पेक्षा जास्‍तीचे आहे. म्‍हणून अर्जदार यांनी मागणी केलेली रक्‍कम जरी मोठी असली तरी आम्‍ही दोघाचाही विचार करुन व घटनेवरील नूकसानीचा विचार करुन वरील जे नूकसान ठरविले आहे ती नूकसान भरपाई मिळण्‍यास अर्जदार हक्‍कदार आहेत.
 
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                             आदेश   
 
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
2.                                         गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना आगीत झालेल्‍या नूकसानी साठी रु.10,50,224/- व त्‍यावर तक्रार दाखल दिनांक 08.04.2010 पासून 9 टक्‍के व्‍याजाने पूर्ण रक्‍कम वसूल होईपर्यत व्‍याजासह दयावेत.
3.                                         मानसिक ञासाबददल रु.50,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.3,000/- मंजूर करण्‍यात येतात.
4.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                   श्रीमती सुवर्णा देशमूख                              श्री.सतीश सामते   
   अध्‍यक्ष                                                                    सदस्‍या                                                     सदस्‍य.

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] PRESIDING MEMBER