Maharashtra

Ahmednagar

CC/16/117

M/s. Sai Ganesh Tours & Travels,Prop.Anil Anandrao Musmade - Complainant(s)

Versus

Manager,United India Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Ghalme

19 Nov 2018

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/16/117
( Date of Filing : 02 Apr 2016 )
 
1. M/s. Sai Ganesh Tours & Travels,Prop.Anil Anandrao Musmade
Shirdi,Tal Rahata,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager,United India Insurance Co.Ltd.
Kisan Kranti Building,2nd Floor,Market Yard,Ahmednagar-414 001
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Ghalme, Advocate
For the Opp. Party: Adv.A.K.Bang, Advocate
Dated : 19 Nov 2018
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी- मा.अध्‍यक्ष )

1. तक्रारकर्ता यांनी सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्‍वये दाखल केली आहे.

2.   तक्रारकर्ताने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारदार यांनी व्‍यवसायासाठी व त्‍याचे स्वतःचे वापरासाठी महिंद्रा व्‍हर्टिगो लोगन कार क्र.एम.एच.17-ए.जी.6611 अशी कार घेतली होती. सदर कारचा विमा दिनांक 26.11.2014 ते 25.11.2015 या कालावधीकरीता तक्रारकर्ताने सामनेवालाकडून घेतला होता. तक्रारदाराचे कार चालक याचे परवाना हा दिनांक 14.07.1994 ते 21 जुलै 2018 पर्यंत वैध आहे. तक्रारदार यांची वरील नमुद कार दिनांक 28.10.2015 रोजी पुणे येथून शिर्डीकडे जात असताना विळद घाट, अहमदनगर येथे अपघात झाला. सदर अपघातामुळे कारचे नुकसान सुमारे रुपये 77,513/- इतके झाले. तक्रारदाराने सामनेवालाकडे त्‍या संदर्भात कळविले व सामनेवाला यांचे कंपनीचे अधिकृत सर्व्‍हेअर श्री.संदीप सी. मोरे यांनी त्‍या संदर्भात निरीक्षण केले व तपास अहवाल दिनांक 10.12.2015 रोजी तक्रारदार यांना दिला. दिनांक 08.02.2016 रोजी सामनेवालाने तक्रारदाराला पत्र पाठूवन क्‍लेम रद्द केल्‍याचे कळविले. व त्‍यामध्‍ये फिटनेस सर्टीफिकेट नसल्‍याबाबत सामनेवालाने कळविलेले आहे. परंतू फिटनेस सर्टीफिकेट कायदेशीर नाही असे लिहीलेले कारण कायदेशीर नाही व योग्‍य नाही म्‍हणून सामनेवाला यांनी तक्रारदाराप्रति न्‍यूनत्‍तम सेवा दर्शविलेली आहे. तक्रारकर्ताने सामनेवाला याला वकीलामार्फत दिनांक 8 मार्च,2016 रोजी विमा दावाची मागणी करण्‍याकरीता नोटीस पाठविली. सदर नोटीस सामनेवाला कंपनी यांना प्राप्‍त होऊनसुध्‍दा कोणतीही दखल घेतली नसल्‍याने सदर तक्रार तक्रारदाराने मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

3.   तक्रारकर्ताने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाला कंपनी यांनी तक्रारदाराचे कारचे झालेले अपघाताची नुकसान भरपाई म्‍हणून 1,00,000/- रुपये व्‍याजासह द्यावे. तसेच तक्रारदाराला झालेल्‍या मानसिक व शारीरीक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च मिळावा.

4.   तक्रारदाराची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्‍यात आली. सदरहू नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर सामनेवाला प्रकरणात हजर झाले. निशाणी क्र.10 वर लेखी उत्‍तर दाखल केले. सामनेवाला यांनी लेखी उत्‍तरात असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ताने तक्रारीत सामनेवाला यांचेविरुध्‍द लावलेले आरोप खोटे असून नाकबूल आहेत. सामनेवालाने पुढे असे कथन केलेले आहे की, तक्रारदाराच्‍या वाहनाचा अपघात झाल्‍यानंतर सामनेवाला कंपनी यांनी श्री.संदीप सी.मोरे यांना अपघाताचे झालेल्या वाहनाची तपासणी करता नियुक्‍त करण्‍यात आले. सदर वाहनाचा निरीक्षण करुन निरीक्षकानी दिनांक 10.12.2015 रोजी अंतिम अहवाल सामनेवाला कंपनीकडे सादर केला व त्‍यात तक्रारदाराचे एकूण नुकसान 25,800/- झाले आहे असे नमुद करण्‍यात आले. तक्रारदाराने वाहनाचा फिटनेस सर्टीफिकेट सादर केला नसल्‍याने त्‍यासंदर्भात सामनेवाला कंपनी यांनी आर.टी.ओ कडून तक्रारदाराचे वाहनाचे फिटनेस सर्टीफिकेट संदर्भात माहिती मागविले, त्‍यात माहितीनुसार तक्रारदाराचे वाहनाचे फिटनेस सर्टीफिकेटची वैधता दिनांक 05.04.2013 ते 04.04.2014 पर्यंत होती. व त्‍यानंतर दिनांक 29.01.2016 ते 28.01.2017 पर्यंत होती. तक्रारदाराचे वाहनाचा अपघात दिनांक 28.10.2015 रोजी झाला असून त्‍यावेळी सदर वाहनाचा फिटनेस सर्टीफिकेट नव्‍हते. म्‍हणून सामनेवाला कंपनी यांनी दि.18.12.2015 रोजी तक्रारदाराचे वाहनाचा फिटनेस सर्टीफिकेट नसल्‍याने पॉलीसीचे शर्त व अटी भंग झाली आहे म्‍हणून विमा दावा नाकारला, यात सामनेवाला कंपनी यांनी तक्रारदाराप्रति कोणतीही न्‍युनत्‍तम सेवा दर्शविलेली नाही. म्‍हणून तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली.

5.   तक्रारकर्ताने दाखल तक्रार, दस्‍तावेज, शपथपत्र, सामनेवालानी दाखल केलेली कैफियत /जबाब, शपथपत्र पुरावा, साक्षीदाराचे शपथपत्र, तक्रारदाराचे लेखी युक्‍तीवाद व उभय पक्षांचे युक्‍तीवादावरुन मंचासमक्ष खालील मुद्दे विचारात घेण्‍यात येत आहे.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारकर्ता हे सामेनवाला कंपनीचे ग्राहक आहेत काय.?                    

 

... होय.

2.

सामनेवाला कंपनी यांनी तक्रारकर्ताचेप्रति न्‍युनत्‍तम सेवा दर्शविलेली आहे काय. ?

 

... होय.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

 

का र ण मि मां सा

6.   मुद्दा क्र.1 बाबत  ः- तक्रारदार यांनी त्‍याचे मालकीचे महिंद्रा व्‍हर्टिगो लोगन कार क्र.एम.एच.17-ए.जी.6611 याकरीता सामनेवाला कंपनीकडून विमा पॉलीसी क्रमांक 162981/31/14/01/00002066 घेतली होती. त्‍याची कालावधी दिनांक 26.11.2014 ते 25.11.2015 पर्यंत वैध होती ही बाब उभय पक्षांना मान्‍य असून तक्रारकर्ता हा सामनेवालाचा ग्राहक आहे असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

7.   मुद्दा क्र.2 बाबत  सामनेवालाने त्‍याचे बचाव पक्षात अशी बाजू मांडली आहे की, तक्रारदाराचे वाहनाचे फिटनेस सर्टीफिकेटची वैधता दिनांक 05.04.2013 ते 04.04.2014 पर्यंत होती. व त्‍यानंतर दिनांक 29.01.2016 ते 28.01.2017 पर्यंत होती. तक्रारदाराचे वाहनाचा अपघात दिनांक 28.10.2015 रोजी झाला असून त्‍यावेळी सदर वाहनाचा फिटनेस सर्टीफिकेट नव्‍हते. म्‍हणून सामनेवाला कंपनी यांनी दि.18.12.2015 रोजी तक्रारदाराचे वाहनाचा फिटनेस सर्टीफिकेट नसल्‍याने पॉलीसीचे शर्त व अटी भंग झाली आहे.

मा.केरळा उच्‍चन्‍यायालय यांनी दिलेल्‍या न्‍याय निवारणानुसार 

PAREED PILLAI vs ORIENTAL INSURANCE CO. LTD., ...........................

3. Obviously, the main point involved in these cases is with regard to the 'right of recovery' from the insured, given in favour of the insurer [after satisfying the liability towards the third parties/claimants] for causing the transport vehicle to be driven without a valid Permit/Fitness Certificate/Driving Licence. MACA No. 2030 of 2015 and connected cases According to the insured/owner, absence of valid Permit/Fitness Certificate is only a 'technical breach' and it does not constitute a 'fundamental breach'; by virtue of which, right of recovery from the insured is not automatic; unless it is established by the insurer that absence of valid Permit/Fitness Certificate was the reason for/had contributed to the accident.     

      सदर प्रकरणात सुध्‍दा सामनेवाला त्‍याच्‍या कैफियत किंवा शपथपत्र पुरावाव्‍दारे हे सिध्‍द करु शकले नाही की, तक्रारदाराचे वाहन फिटनेस सर्टीफिकेट नसल्‍यामुळे अपघात झाला. वरील नमुद न्‍याय निवारणाचा अहवाल देताना मंचाचे असे मत ठरले आहे की, एखाद्या वाहनाची फिटनेस सर्टीफिकेट नसल्‍यास ती बाब तांत्रिक उलंघ्घन आहे व त्‍यांना मुलभूत उलंघ्‍घन म्‍हणता येत नाही. म्‍हणून सामनेवाला कंपनी यानी पॉलीसीचे शर्त व अटीचे मुलभूत उलंघ्‍घन नसतानाही फक्‍त तांत्रिक उलंघ्‍घन कारणांस तक्रारदाराचे अपघाती झालेल्‍या वाहनाचा विमा दावा नाकारुन तक्रारदाराप्रति न्‍युनत्‍तम सेवा दर्शविलेली आहे असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

8.   मुद्दा क्र.3 ः- सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी जबाबासोबत तसेच त्‍यांचे बचाव पक्षात निरीक्षक श्री.संदीप सी.मोरे यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. त्‍या शपथपत्रात व त्‍या शपथपत्रानुसार निशाणी क्र.13 दाखल केलेले निरीक्षकाचे अहवालानुसार ही बाब सिध्‍द होते की, तक्रारदाराचे वाहनाचे नुकसान 25,800/- पर्यंत झालेले आहे ही बाब ग्राह्य धरुन व मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारकर्ताची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   सामेनवाला यांनी तक्रारकर्ता यांना विमा दाव्‍याची रक्‍कम रु.25,800 (रक्‍कम रु.पंचवीस हजार आठशे फक्‍त) द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह दिनांक 08.02.2016 पासून रक्‍कम अदाईकीपर्यंत द्यावे.

3.   सामनेवाला यांनी तक्रारकर्ता यांना झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- (रक्‍कम रु.दहा हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रु.5,000/- (रक्‍कम रु.पाच हजार फक्‍त ) द्यावा.

4. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

5.   उभय पक्षांना या आदेशाची प्रत विनामुल्‍य द्यावी.

6.   तक्रारकर्तास या प्रकरणाची “ ब ” व “ क ” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.