निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 10/01/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 13/01/2011 तक्रार निकाल दिनांकः- 11/07/2011 कालावधी 05 महिने 28 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. दादाराव पिता बाबुराव सोनवणे. अर्जदार वय 50 वर्ष.धंदा.व्यवसाय. अड.जी.एच.दोडिया. रा.वाटूर फाटा.ता.परतुर जि.परभणी. विरुध्द व्यवस्थापक. गैरअर्जदार. दि.ओरियंटल इन्शुरंस कं.लि. अड.ए.डि.गिरगावकर. दौलत बिल्डींग.शिवाजी चौक.परभणी ता.जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री अनिता ओस्तवाल.सदस्या.) गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन हि तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा इंडिका कार क्रमांक एम.एच.-22-एच/433 मालक व ताबेदार आहे.सदर कारची विमा पॉलिसी ( पॉलिसी क्रमांक 182003/31/2009/1053 ) अर्जदाराने गैरअर्जदाराकडून घेतली आहे.दिनांक 06/05/2009 रोजी सदरील वाहनास अपघात होऊन वाहनाचे अंदाजे रक्कम रु. 1,00,000/- पेक्षा जास्त नुकसान झाले.अर्जदाराने अपघात बद्दलची माहिती गैरअर्जदार विमा कंपनीस दिल्यानंतर गैरअर्जदाराने सर्व्हेअर म्हणून अशोक संदानी याची नेमणुक केली सर्व्हेअरने सर्व्हे करुन अहवाल विमा कंपनीकडे सादर केला.तदनंतर अर्जदाराने क्षतीग्रस्त वाहनाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी गैरअर्जदाराकडे आवश्यक कागदपत्राची पुर्तता करुन क्लेम दाखल केला.गैरअर्जदाराने दिनांक 31/03/2010 रोजी अर्जदाराचा क्लेम पत्राव्दारे नामंजूर केला त्यात असें नमुद करण्यात आले की, गैरअर्जदाराने नियुक्त केलेल्या चौकशी अधिका-याच्या अहवाला नुसार अर्जदाराने अपघातापूर्वी सदर वाहनाची विक्री केलेली होती. वास्तविक पाहता अर्जदाराने सदरचे वाहन कोणत्याही व्यक्तीस विक्री केलेले नाही.गैरअर्जदाराने चुकीच्या व खोटया कारणास्तव अर्जदाराचा क्लेम नामंजूर केला.म्हणून अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार मंचासमोर दाखल करुन गैरअर्जदाराने क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.1,00,000/- 9 टक्के व्याजदराने द्यावी तसेच मानसिक व शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- 9 टक्के व्याजासह अपघात तारखेपासून व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5,500/- द्यावी.अशा मागण्या अर्जदाराने मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.5/1 ते नि.5/5 मंचासमोर दाखल केली. मंचाची नोटीस गैरअर्जदार यांना मिळाल्यानंतर त्यानी लेखी निवेदन नि.11 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे.गैरअर्जदारांचे म्हणणे असे की, अर्जदाराने सदरचे वाहन सुनिल जाधव या व्यक्तीस विकले आहे.त्या व्यक्तीने सदर वाहनाचा उपयोग व्यावसायिक कारणासाठी केलेला असल्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचे उल्लंघन झालेले आहे. सर्व्हेअरने केलेल्या सर्व्हे नुसार सदर वाहनाच्या नुकसानीचे मुल्यांकन फक्त रक्कम रु.70,000/- केलेले आहे. पुढे चौकशी अधिका-याने दाखल केलेल्या चौकशी अहवालानुसार उपरोक्त बाब निदर्शनास आल्यामुळे गैरअर्जदाराने योग्य कारणास्तव अर्जदाराचा क्लेम नामंजूर केलेला आहे.तसेच अर्जदाराने अपघाताची माहिती व पुरेशी कागदपत्र वेळेत दाखल केलेली नाही.म्हणून वरील सर्व कारणास्तव अर्जदाराचा क्लेम नामंजूर करण्यात आल्याचे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे.गैरअर्जदाराने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.12 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.14/1 ते नि.14/4 वर दाखल केले. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय 2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराच्या वाहनास अपघात दिनांक 06/05/2009 रोजी झाला क्षतीग्रस्त वाहनाची नुकसान भरपाई देण्याचे गैरअर्जदाराने नाकारले अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराने सदरचे वाहन सुनिल जाधव यास अपघातापूर्वी विकलेले होते व अपघाता समयी सदर वाहनाचा उपयोग व्यावसायिक कारणासठी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तींचे उल्लंघन झालेले आहे. त्यामुळे अर्जदाराचा क्लेम योग्य कारणास्तव नाकारण्यात आलेला आहे. निर्णयासाठी महत्वाचा मुद्दा असा की, गैरअर्जदाराने अर्जदाराचा क्लेम योग्य कारणासाठी नाकारलेला आहे. काय ? नि.14/1 वर गैरअर्जदाराने चौकशी अधिका-च्या अहवालाची झेरॉक्सप्रत मंचासमोर दाखल केली आहे,परंतु त्याच्या पृष्ठयार्थ चौकशी अधिका-याचे शपथपत्र दाखल करण्यात न आल्यामुळे चौकशी अधिका-याचा अहवाल हा वैध नाही किंवा तो ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याजोगा असल्याचे ही मंचास वाटत नाही तसेच अर्जदाराने सदर वाहनाची विक्री सुनिल जाधव यास केल्या बाबतचा ठोस पुरावा मंचासमोर दाखल करण्यात आलेला नाही.सर्व संबंधीत कागदपत्र सध्या तरी अर्जदाराच्या नावावर आहेत व सदर वाहनास पॉलिसी पिरीयड मध्ये अपघात झालेला असल्यामुळे व अर्जदारा व्यतिरिक्त अन्य कुणीही क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाईची मागणी केलेली नाही.या सर्व बाबी विचारात घेता.गैरअर्जदाराने अर्जदाराचा वाजवी क्लेम मंजूर करण्यास काहीच हरकत नव्हती तकलादु स्वरुपाचे कारण पुढे करुन गैरअर्जदाराने अर्जदाराचा क्लेम नामंजुर करुन त्याचा न्याय हक्क डावलण्यात आलेला आहे असे मंचाचे मत असल्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले. गैरअर्जदाराने नियुक्त केलेलया सर्व्हेअरचा सर्व्हे रिपोर्ट नुसार (नि.14/4) क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसानीचे मुल्यांकन रक्कम रु.70,000/-करण्यात आलेले आहे.त्यामुळे तेवढीच रक्कम अर्जदारास मंजूर करणे योग्य असल्याने आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आ दे श 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार विमा कंपनीने निकाल कळाल्यापासून 30 दिवसाच्या आत अर्जदारास क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.70,000/- दिनांक 31/03/2010 रोजी पासून ते पूर्ण रक्कम देय होईपर्यंत 9 टक्के व्याजदराने द्यावी. 3 तसेच गैरअर्जदाराने मानसिक त्रासापोटी अर्जदारास रक्कम रु.1,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- आदेश मुदतीत द्यावी. 4 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |