Maharashtra

Ahmednagar

CC/15/532

Seva Welding Works,Prop.Jabbarkhan Dilawarkhan Pathan - Complainant(s)

Versus

Manager,The Oriental Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Keskar

15 Oct 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/15/532
( Date of Filing : 05 Dec 2015 )
 
1. Seva Welding Works,Prop.Jabbarkhan Dilawarkhan Pathan
Stall No.780,Kolhewadi Road,Delhi Naka,Sangamner,Tal Sangamner,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager,The Oriental Insurance Co.Ltd.
Mandaliya Karyalaya,Navin Nagar Road,Opp.Post Office,Sangamner,Tal Sangamner,
Ahmednagar
Maharashtra
2. Manager,The Oriental Insurance Co.Ltd.
Oriental House,A-25/27,Asaf Ali Road,New Delhi-110002
New Delhi
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 15 Oct 2019
Final Order / Judgement

निकालपत्र

(द्वारा मा.सदस्‍या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.  तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार हा संगमनेर जिल्‍हा  अहमदनगर येथील रहीवासी असून त्‍याचा सेवा वेल्‍डींग वर्क्‍स या नावाने व्‍यवसाय आहे. दिनांक २५-०८-२०१४ रोजी संगमनेर येथे अतिपावसाने बहुतांश भागात पाणी साचल्‍याने नागरीकांचे तसेच व्‍यवसायिकांचे मोठे हाल झाले होते. तक्रारदार हे नादुरूस्‍त वाहने दुरूस्‍त करणे, वाहनाचे सुटे भाग विकणे, वाहनांच्‍या   नादुरूस्‍त भागांची जुळवणी करणे, अशी कामे करतात. सामनेवाले क्र.१ हे सामनेवाले क्र.२ चे मुख्‍य कार्यालय आहे. तक्रारदाराने सामनेवाले क्र.२ यांच्‍याकडे त्‍यांच्‍या दुकानीत मालाची स्‍टॅण्‍डर्ड फायर पॉलिसी (फ्लड क्‍लेम)  अंतर्गत विमा उतरविला होता. तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍याकडे उरविलेल्‍या  विमा पॉलिसीचा नंबर १६४३००/११/२०४/४३६ असा होता. सदरहु पॉलिसीचा कालावधी दिनांक १८-१२-२०१३ ते १७-१२-२०१४ असा होता. सदर विमा रक्‍कम रूपये ५,००,०००/- करीता विमा उतरविला होता. त्‍यानंतर दिनांक २५-०८-२०१४ रोजी तक्रारदाराच्‍या   दुकानामध्‍ये दुर्घटना घडली. त्‍यासाठी संगमनेर येथील तहसीलदार कार्यालयामार्फत पाहणी पंचनामा करण्‍यात आला. सदरच्‍या दुर्घटनेत  तक्रारदाराचे स्‍पेअर पार्ट एकुण रक्‍कम रूपये ५,७५,०००/- चे नुकसान झाले. सदरील व्‍यवसायासाठी तक्रारदाराने स्‍थानीक वित्‍तीय संस्‍थेकडुन रक्‍कम रूपये ८००,०००/- चे वित्‍त सहाय्य घेतले असुन त्‍या कर्जाची तक्रारदार परतफेड करीत आहे. पुराच्‍या पाण्‍याने खराब झालेले स्‍पेअर पार्ट तक्रारदाराला फेकुन द्यावे लागले. तक्रारदाराने सदरहु नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाले यांना    दि.२६-०८-२०१४ रोजी कळविले व स्‍टॅण्‍डर्ड फायर पॉलिसी (फ्लड क्‍लेम) पॉलिसीप्रमाणे क्‍लेम सामनेवाले यांच्‍याकडे सादर केला. दिनांक ०३-०६-२०१५ रोजी सामनेवाले यांनी तक्रारदाररला कायदेशीररित्‍या मिळणारी नुकसान भरपाई अदा न करता केवळ  ११,८४५/- एवढी रक्‍कम मंजुर केली. तक्रारदार हा सदरची संपुर्ण रक्‍कम मिळत असतांना त्‍याला कमी रक्‍कम दिली. त्‍यामुळे तक्रारदाराने तक्रार मंचात दाखल करून परिच्‍छेद क्रमांक ९ प्रमाणे मागणी केली आहे.

           सामनेवाले यांनी त्‍यांची लेखी कैफीयत नि.१४ नुसार दाखल केली आहे.  सामनेवालेने तक्रारदारची पॉलिसी व पॉलिसीचा क्रमांक मान्‍य केला आहे. तक्रारदाराच्‍या कथनाप्रमाणे त्‍यांनी सामनेवाले यांना दिनांक २५-०८-२०१४ रोजी त्‍यांच्‍या दुकानामध्‍ये पाऊस झाल्‍यामुळे पाणी साठले व मशिन व इतर वस्‍तु खराब झाले. त्‍यानंतर सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या सर्हेअरची नेमणुक करून सर्व्‍हेअरला तपासणी करण्‍यासाठी तक्रारदाराच्‍या दुकानात पाठविले. सर्व्‍हेअरने तेथे जाऊन छायाचित्रे काढली व तक्रारदाराला आवश्‍यक असलेल्‍या कागदपत्राची मागणी केली. परंतु तक्रादाराने संपुर्ण कागदपत्र सादर करण्‍यासाठी उशीर केला. त्‍यामुळे  सर्व्‍हेअरने केलेल्‍या तपासणीनुसार व त्‍याच्‍या तपासणी अहवालावरुन हे स्‍पष्‍ट झाले की, ऑटोमोबॉइलचे पार्ट त्‍यामध्‍ये बसत नाही. सामनेवाले यांनी पुढे  असे कथन केले की, ज्‍या मशीनचे नुकसान झाले त्‍यामध्‍ये ड्रिल मशीन, रंधा मशीन, वेल्‍डींग मशीन, इतर मशीनरी यांचे पाण्‍यामुळे नुकसान झाले. नॅशनल ट्रेडर्सच्‍या कोटेशननुसार इलेक्‍ट्रीकल मोटर व मशीनरी या उपयोगात येऊ शकत नाही. त्‍या बदलुन घेणे गरजेचे आहे असे नमुद केले व त्‍याचा तपशील सादर केला. तसेच तक्रारदाराकडे मशीन खरेदी केल्‍याचे बिल नाही. सर्व्‍हेअरने       दि.३१-०३-२०१३ रोजी तपासणी करून त्‍याचा तपशील दिला आहे. इन्‍शुरन्‍स  पॉलिसीनुसार ऑटोमोबॉईल स्‍पेअरपार्ट त्‍या पॉलीसी अंतर्गत बदलत नाही, परंतु सर्व्‍हेअरने तपासणी करून मशीनचे जे नुकसान झाले त्‍याबाबतची नुकसानीची एकुण रक्‍कम रूपये ११,८५०/- एवढी त्‍यांच्‍या तपासणी अहवालानुसर सादर केली. त्‍यामुळे सामनेवाले कंपनीने तक्रारदाराला सदरची रक्‍कम मंजुर केली आहे व ही बाब तक्रारदार यांना मान्‍य आहे. त्‍यामुळे सामनेवाले यांनी सर्व्‍हेअरच्‍या तपासणी अहवालानुसार होणारी रक्‍कम मंजुर केली व तसे पत्र दिनांक ०३-०६-२०१५ ला पाठवुन तक्रारदाराला कळविले. परंतु तक्रारदाराने सदरची रक्‍कम स्विकारली नाही. तक्रारदाराने सदरची तक्रार विनाकारण खोट्या स्‍वरूपाची दाखल केली आहे. त्‍यामुळे तक्रादाराची तक्रार खर्चासह नामंजुर करण्‍यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी मंचाला केली आहे.

३.   तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्र तसेच त्‍यांचे वकील श्री.केसकर   यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद तसेच सामनेवाले यांचे वकील श्री.बंग यांनी दाखल केलेले शपथपत्र, कैफीयत, कागदपत्र यावरून न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.

अ.नं.   

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्रारदार हे ग्राहक आहेत काय ?

होय

(२)

सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ?

होय

(३)

तक्रारदार नुकसान भरपाईची रक्‍कम मिळणेस पात्र आहे काय ?

होय

(४)

आदेश काय

अंतिम आदेशा प्रमाणे

कारणमिमांसा

४.  मुद्दा क्र. (१) :   तक्रारदार हा संगमनेर जि अमदनगर येथील रहिवासी असून सेवा वेल्‍डींग वर्क्‍स या नावाने व्‍यवसाय करतो. त्‍याने सामनेवाले कंपनीकडे स्‍टॅण्‍डर्ड फायर पॉलिसी (फ्लड क्‍लेम) असा विमा उत‍रविला होता. सदर विम्‍याचा पॉलिसी क्रमांक १६४३००/११/२०४/४३६ असा असून त्‍या पॉलिसीचा कालावधी १८-१२-२०१३ ते १७-१२-२०१४ असा होता.  सदरील विमा हा रक्‍कम रूपये ५,००,०००/- एवढया रकमेचा होता, ही बा स्‍पष्‍ट करण्‍यासाठी प्रकरणात पॉलिसीची प्रत दाखल केलेली आहे. तसेच सामनेवाले यांनीसुध्‍दा त्‍यांच्‍या लेखी कैफीयतीमध्‍ये विमा उतरविला होता, ही बाब मान्‍य केली आहे. यावरून हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारदार हा सामनेवालेचा ग्राहक आहे. सबब मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

५.  मुद्दा क्र. (२ व ३) :   तक्रारदार यांचा सेवा वेल्‍डींग वर्क्‍स असा व्‍यवसाय आहे.  दिनांक २५-०८-२०१४ रोजी संगमनेर येथे जोरदार झालेल्‍या पावसामुळे तक्रारदाराच्‍या दुकानात पाणी साचल्‍यामुळे त्‍यांच्‍या स्‍पेअर पार्ट मशीनचे नुकसान झाले. त्‍यामुळे तक्रारदाराला सामनेवाले यांनी सदरच्‍या घटनेबाबत दिनांक      २६-०८-२०१४ रोजी कळविले. त्‍यानुसार सामनेवाले यांचा सर्व्‍हेअरने त्‍या ठिकाणी जाऊन पाहणी केली व त्‍याचा तपासणी अहवाल एकत्रपणे सामनेवालेकडे सादर केला. सर्व्‍हेअरने तपासणी केल्‍यानंतर त्‍या तपासणी अवहालानुसार सामनेवाले यांनी रूपये ११,८४५/- एवढी रक्‍कम मंजुर केली. मात्र तक्रारदाराने त्‍याच्‍या  तक्रारीत कथन केले की, त्‍याचे रक्‍कम रूपये ११,०००,००/- चे नुकसान झाले. त्‍यानंतर रक्‍कम रूपये ८,००,०००/- स्‍पेअर पार्टसाठी कर्ज प्रकरण केले होते व रक्‍कम रूपये ५,७५,०००/- चे पावसामुळे नुकसान झाले, असे कथन केले. तक्रादाराच्‍या या कथनावर सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या लेखी कैफीयतीमध्‍ये असा बचाव घेतला की, तक्रारदाराचे दुकानात पावसामुळे झालेल्‍या नुकसानीबाबत कळविलेनंतर सामनेवाले यांच्‍या सर्व्‍हेअरने जाऊन पाहणी केली व त्‍यानुसार त्‍याने अहवाल सादर केला.  सदरचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.

Particulars

Replacment Value Rs.

Depreciation 50%

Salvages Value Rs.

Loss Amount

5 HP Motor

13700

6850

1000

5850

3 HP Motor

10300

5150

600

4550

1 HP Motor-

2 Motors

13700

6850

400

6450

Welding Machine

22450

11225

0

22850

Total Rs.

60150

 

 

22850

             अशाप्रकारे  रक्‍कम रूपये २२,८५०/- एवढ्या एकुण रकमेची बॅलन्‍स शीट तयार करून दिली. तक्रारदार यांच्‍याकडे या पाच मशीनींचा विमा उतरविलेला होता,  मात्र ऑटोमोबॉईलच्‍या स्‍पेअरपार्टबाबतचा विमा इन्‍शुरन्‍स पॉलिसीच्‍या  अटी व शर्तीनुसार नियमात बसत नाही. त्‍यामुळे सर्व्‍हेअरने काढलेली एकुण रक्‍कम  रूपये २२,८५०/- त्‍यातुन रूपय १,०००/- सालवेज व रूपये १०,०००/- एक्‍सेस क्‍लॉज ऑफ इन्‍शुरन्‍य पॉलिसी, अशी कमी करून ती सामनेवाले यांनी    दिनांक ०३-०६-२०१५ रोजी पत्र देऊन कळविले व त्‍यात नमुद केले की, डिस्‍चार्ज व्‍हाऊचर व कॅन्‍सल चेक इन्‍शुरन्‍स कंपनीकडे द्यावे व ही रक्‍कम तक्रारदाराने स्विकारावी.  परंतु तक्रारदाराने सदरची रक्‍कम स्विकारली नाही. सामनेवाले यांनी सर्व्‍हेअरच्‍या अहवालाप्रमाणे रक्‍कम तक्रारदारास देण्‍यास पत्र पाठ‍वुन कळविले. परंतु मंचाने लेखी कैफीयतीचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, एकुण रक्‍कम रूपये २२,८५०/- ही सालवेज झाली, डिप्रेशीएशन व रिप्‍लेसमेंट करून रक्‍कम रूपये २२,८५०/- ही काढलेली होती. असे असतांना पुन्‍हा  त्‍या रकमेमधुन रक्‍कम रूपये १,०००/- सालवेज व रक्‍कम रूपये १०,०००/- ही एक्‍सेस क्‍लॉज्‍नुसार कमी केलेली आहे, असे कथन केलेले आहे. परंतु एकदा रक्‍कम वजा करून टोटल रक्‍कम काढल्‍यानंतर पुन्‍हा त्‍याच बाबींसाठी रक्‍कम वजा करणे ही बाब निश्चितच सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी केलेली आहे. सामनेवाले यांनी सर्व्‍हेअरने दिलेल्‍या अहवालानुसार  एकूण रक्‍कम रूपये २२,८५०/- रक्‍कम तक्रारदाराला देणे गरजेचे होते. परंतु तसे न करता पुन्‍हा त्‍या  रकमेमधुन रक्‍कम वजा करून रूपये ११,८५०/- इतकी रक्‍कम मंजुर केली. यावरून सामनेवाले यांनी तक्रारदाराला सेवेत त्रुटी दिली आहे, ही बाब स्‍पष्‍ट होते.

     तक्रारदाराने त्‍याच्‍या तक्रारीत कथन केले की, त्‍याला एकुण रक्‍कम रूपये ११,००,०००/- नुकसान झाले आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी मशीनच्‍या स्‍पेअर पार्टसाठी तसेच न्‍यु चॅनेल, न्‍यु स्‍टील शीट, वुडन स्‍ट्रीप्‍स, डॅश बोर्ड, वेल्‍डींग रॉड, बॉक्‍सेस यासाठी दि.मुस्‍लीम को-ऑपरेटीव्‍ह बॅंक लि. मुधन रक्‍कम रूपये ८,००,०००/- चे  कर्ज प्रकरण केले. परंतु याबाबी त्‍यांच्‍या दुकानासाठी वापरलेल्‍या वस्‍तुसाठी आहेत. त्‍याबाबतचा सामनेवालेकडुन विमा उतरविलेला नाही. त्‍या वस्‍तुंसाठी सामनेवाले यांना जबाबदार धरता येणार नाही. सामनेवाले यांनी पाच मशीनचा विमा उतरविलेला आहे. त्‍या मशीनची तपासणी करून दिलेला तपासणी अहवालानुसार रक्‍कम देण्‍याची जबाबदारी सामनेवाले यांची आहे. परंतु इतर बाबींसाठी तक्रारदाराने कर्ज प्रकरण केले, त्‍यामध्‍ये सामनेवाले विमा कंपनीचा कोणताही संबंध नाही व ऑटोमोबॉईल्‍सचे स्‍पेअर पार्टवर विमा हा विमा पॉलिसीअंतर्गत अटी व शर्तीनुसार बसत नाही. त्‍यामुळे पॉलिसीमध्‍ये नमुद केल्‍याप्रमाणे ज्‍या  मशीन खराब झाल्‍या आहेत त्‍याबाबतची नुकसानीची रक्‍कम देण्‍याची जबाबदारी ही सामनेवाले कंपनीची आहे. त्‍यामुळे सामनेवाले कंपनीने तक्रारदाराला त्‍या  नुकसानीची रक्‍कम देणे आवश्‍यक आहे. तसेच तक्रारदाराने त्‍या मशीनींचे कोणतेही बिल प्रकरणात दाखल केले नाही. सर्व्‍हेअरच्‍या तपासणी अहवालाप्रमाणे २२,८५०/- एवढी रक्‍कम काढलेली आहे व ती रक्‍कम योग्‍य आहे, हे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे सामनेवाले यांनी तपासणी अहवालानंतर पुन्‍हा रक्‍कम कमी करून एकूण रक्‍कम रूपये ११,८४५/- एवढी मंजुर केली हे  निश्चितच चुकीचे आहे व सेवेत त्रुटी दिली आहे. त्‍यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सर्व्‍हे अहवालाप्रमाणे रक्‍कम रूपये २२,८५०/- देणे बंधनकारक आहे. सबब मुद्दा क्र.२ व ३ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

६.  मुद्दा क्र. (२) : मुद्दा क्र.१,२ व ३ चे विवेचनावरून आम्‍ही  खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.   

आदेश

      १.     तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

      २.  सामनेवाले यांनी तक्रारदाराला नुकसानभरपाईची रक्‍कम रूपये २२,८५०/-                       (अक्षरी  रूपये बाव्‍वीस हजार आठशे पन्‍नास मात्र) व  त्‍यावर ९ टक्‍के व्‍याज तक्रार             दाखल दिनांक १७-१२-२०१५ पासुन रक्‍कम अदा होईपर्यंत द्यावे.  

     ३.   सामनेवाले यांनी तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५,०००/-                 (अक्षरी पाच हजार), व  सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन                    हजार) द्यावा.

    ४.    वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत  मिळण्‍यापासून ३०                    दिवसाच्‍या आत करावी.

    ५.   या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

    ६.   तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.