::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 16/04/2016 )
आदरणीय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून अंदाजे 9 ते 10 वर्षा आधीपासून शॉप किपर इन्श्युरंस पॉलिसी घेतली होती. सदर पॉलिसीचे वेळोवेळी प्रिमियम भरुन विरुध्दपक्षाकडून सदरहू पॉलिसी नुतनीकरण करुन घेतली होती व त्या पॉलिसीचा क्र. 182200/48/2015/472 असा असून, कालावधी दि. 22/04/2014 ते 21/04/2015 असा आहे. सदर पॉलिसीनुसार तक्रारकर्त्याचे दुकानाच्या बिल्डींगचे, तयार कापडाचे व दुकानातील फर्निचर, जनरेटर, सी.सी.टी.व्ही. कॅमेरा, नगद रकमेचे, दुकानाचे समोरील काचाचे व त्याला लागणाऱ्या खर्चाचे, मशिनरीचे इत्यादीला होणाऱ्या नुकसानीची नुकसान भरपाई करुन देण्याकरीता सदर पॉलिसी उतरविली होती. तक्रारकर्त्याने सदर दुकानाचे छतावर एक जनरेटर, किर्लोस्कर कंपनीचे, एस.पी. 7.50 कि.वॅ. लावला होता. सदरहु जनरेटर हा रु. 1,45,475/- चा होता. सदरहू पॉलिसी कालावधीमध्ये दि. 28/05/2014 रोजी संध्याकाळी 5.00 वाजताचे दरम्यान सदर जनरेटरला अचानकपणे आग लागुन तो संपुर्णपणे जळुन गेला. त्यामुळे तक्रारकर्त्याचे नुकसान झाले. या बाबतची सुचना दि. 30/05/2014 रोजी विरुध्दपक्षाकडे दिली व क्लेम करिता आवश्यक ती कागदपत्रे विरुध्दपक्षाकडे जमा केले. त्यानंतर विरुध्दपक्षाने अतिशय विलंबाने दि. 30/10/2014 रोजीचे पत्र तक्रारकर्त्याला पाठवून सदरच्या रकमेची नुकसान भरपाई देता येत नाही, म्हणून सदरचा क्लेम खारीज केला. जनरेटरला शॉर्ट सर्कीट झाल्यामुळे पॉलिसीचा एक्सक्लुजन अट क्र. 7 प्रमाणे क्लेम देता येत नाही, असे कारण विरुध्दपक्षातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि. 17/04/2015 रोजी वकीलामार्फत ई-मेलव्दारे विरुध्दपक्षास नोटीस पाठविली. सदर नोटीस मिळूनही विरुध्दपक्षाने नोटीसची पुर्तता केलेली नाही. तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व एकुण रक्कम रु. 2,37,789/- व्याजासह देण्याचा आदेश तक्रारकर्त्याला विरुध्दपक्षाकडून देण्यात यावी, तसेच सदरहू तक्रारीच्या खर्चापोटी रु. 5000/- देण्याचा आदेश व्हावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 06 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष यांनी सदर प्रकरणात लेखी जबाब दाखल केलेला आहे. त्यानुसार तक्रारीतील आरोप नाकबुल करुन विरुध्दपक्ष यांनी अधिकचे कथनात असे नमुद केले की, तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्षाकडुन विमा पॉलिसी घेतली होती व तो अनेक वर्षापासून पॉलिसी घेत होता. तक्रारकर्त्याला पॉलिसी मधील अटी व शर्तीची पुर्ण कल्पना देण्यात आली होती. तक्ररकर्त्याने दि. 30/5/2014 रोजी अर्ज देवून कळविले की, त्याच्या दुकानावर लावण्यात आलेल्या जनरेटरला दि. 28/5/2014 रोजी शॉर्टसर्कीट होवून आग लागली आणि जनरेटर जळुन खाक झाला. विरुध्दपक्षाव्दारे तक्रारकर्त्याकडुन कागदपत्रे गोळा करण्यात आले व सर्व्हेअरव्दारे सदरहु नुकसानीचा सर्व्हे करण्यात आला. सर्व बाबीचे अवलोकन करुन सर्व्हेअरने आपले मत दिले की, सदरहु जनरेटर नऊ वर्षे जुने असल्याची बाब लक्षात आली व नुकसान रु. 58,506/- इतके आकारण्यात आले. परंतु दिलेल्या माहीतीनुसार व्होल्टेजच्या शॉट सर्कीटमुळे जनरेटरला आग लागली होती. पॉलिसीच्या अटी नुसार सदरची आग किंवा नुकसान शॉट सर्कीट अथवा जास्त चालविण्यात आलेले असल्यास विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास पात्र राहणार नाही. त्यामुळे या अटीनुसार तक्रारकर्त्याचा दावा नामंजुर करण्यात आला. परतु त्याबद्दल त्याला अगोदर पत्राव्दारे स्पष्टीकरण मागविण्यात आले. तक्रारकर्त्याने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नसल्यामुळे त्याचा दावा नामंजुर समजण्यात आला. तक्रारकर्त्याने पाठविलेल्या नोटीसला जबाब देण्यात आला होता. वरील सर्व कारणामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर दाखल केले व उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष यांचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलले सर्व दस्तऐवज, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद व तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले न्यायनिवाडे यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला,तो येणे प्रमाणे…
उभय पक्षात या बद्दल वाद नाही की, तक्रारकर्ते जे जे मेन्सवेअर या नावाने व्यवसाय करतात. तक्रारकर्ते यांनी शॉप किपर इन्श्युरन्स पॉलिसी विरुध्दपक्षाकडून घेतली होती. पॉलिसी कालावधी बद्दल व पॉलिसी बद्दल वाद नाही. उभय पक्षात हा वाद नाही की, तक्रारकर्ते यांनी त्यांच्या दुकानात छतावर किर्लोस्कर कंपनीचा जनरेटर लावला होता व त्याला दि. 28/5/2014 रोजी अचानकपणे आग लागली होती, त्या बद्दलची माहीती तक्रारकर्त्यातर्फे विरुध्दपक्षास देण्यात येवून, त्याबद्दलचा विमा क्लेम तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्षाकडे दाखल केला होता. उभय पक्षात वरील सर्वमान्य असलेल्या बाबींवरुन तक्रारकर्ते विरुध्दपक्षाचे ग्राहक आहेत, असा निष्कर्ष मंचाने काढला आहे.
उभय पक्षात या बद्दल वाद नाही की, सदर विमा दावा विरुध्दपक्षाने खालील कारण देवून नाकारला होता.
On close scrutiny of the papers submitted by your claim Viz-A-Viz the terms and conditions of the policy issued, we regret to inform you that your claim is not tenable on the following grounds:
- As per final survey report the cause of fire, nature and expent of fire, trend travel of fire, the said loss i.e. breakdown of your generator was due to short circuit which does not fall within the purview of policy and is fall in the general exclusion of the policy no. VII i.e. Electrical Risk Exclusion.
यावर तक्रारकर्ते यांनी असा युक्तीवाद केला की, विरुध्दपक्षाने सदर पॉलिसीच्या अटी शर्ती तक्रारकर्त्याला कधी दिल्या नाही. त्यामुळे सदर अट बंधनकारक नाही. विरुध्दपक्षाने रेकॉर्डवर सदर पॉलिसी अटी शर्तीसह दाखल केली आहे. त्याची प्रत त्यांनी तक्रारकर्ते यांना दिली होती, हे विरुध्दपक्षाने सिध्द केले नाही. परंतु सदर पॉलिसीच्या जनरल एक्सक्लुजन मधील अट क्र. VII अशी आहे…
7. Consequential loss of any kind or description, unless specifically covered.
जी विरुध्दपक्षाच्या विमा दावा नाकारणाऱ्या पत्रानुसार नाही, तसेच विरुध्दपक्षाच्या पत्रात नमुद केलेली Electrical Risk Exclusion ही अट सदर पॉलिसीच्या Special Exceptions नुसार नं. 3 वर नमुद आहे, ती अशी… 3. Damage to any electrical machine, apparatus, fixtures or fittings ( including electrical fans, electrical applicances) or to any portion of electric installation, arising from or occasioned by over-running, excessive pressure, short-circuiting, arcing, self heating or leakage of electricity from whatever cause ( lightning included) provided that this exemption will apply only to the particular electrical machine, apparatus, fixture, fitting or portion of electrical installation so affected and not to other machines, apparatus, fixtures, fittings or portions of electrical installation which may be destroyed or damaged by fire so set up. परंतु यात Generator हा स्पेशल शब्द नमुद नाही. त्यामुळे ही अट देखील जसीच्या तशी लागु पडत नाही. विरुध्दपक्षाच्या मते आग ही शॉट सर्कीट मुळे लागलेली होती व विरुध्दपक्षाच्या सर्वेअरच्या मते नुकसानीची पाहणी करुन व सदरहू जनरेटर नऊ वर्ष जुने असल्यामुळे, 40% घसारा काढून नुकसान हे रु. 58,506/- इतके आकारले आहे. सदर सर्वे रिपोर्टचे अवलोकन केल्यास, असे दिसते की, सर्वेअरने मटेरिअल चार्जेस मध्ये 40.00% Depriciation Value काढून व less Salvage किंमत काढून एकूण नुकसान हे रु. 68,506/- इतक्या रक्कमेचे आकारले. परंतु पुन्हा त्यातून less excess ही रु. 1000/- किंमत कशी व कां कमी केली? या बद्दलचे स्पष्टीकरण सर्वेअरने प्रतिज्ञालेख देवून मंचासमोर स्पष्ट केले नाही. म्हणून विरुध्दपक्षाच्या सर्वेअरने काढलेली नुकसान भरपाई रु. 68,506/- इतकी रक्कम, इतर नुकसान भरपाई व प्रकरण खर्चासह विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास दिल्यास ते न्यायोचित होईल, असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या न्यायनिवाड्याचा आदर राखत अंतीम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे.
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास शॉप किपर्स इन्श्युरंस पॉलिसीपोटी जनरेटरच्या नुकसान भरपाई बद्दलची, विमा रक्कम रु. 68,506/- ( अडुसष्ट हजार पाचशे सहा फक्त ) दरसाल दरशेकडा 8 टक्के व्याज दराने दि. 30/10/2014 ( दावा नकारलेली तारीख ) पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदाई पर्यंत व्याजासहीत द्यावी, तसेच शारीरिक मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- ( रुपये पांच हजार फक्त ) व प्रकरणाचा न्याईक खर्च रु. 3000/- ( रुपये तिन हजार फक्त ) इतकी रक्कम द्यावी.
- सदर आदेशाचे पालन, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे.
सदर आदेशाच्या प्रती संबंधीतांना निशुल्क देण्यात याव्या.