Maharashtra

Parbhani

CC/11/182

Rangnath Haribhaw Nagrgoje - Complainant(s)

Versus

Manager,Tata Motars Vasan Automotive Pvt.Ltd.Parbhani - Opp.Party(s)

Adv.N.V.Kokad

11 Sep 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/11/182
 
1. Rangnath Haribhaw Nagrgoje
R/o.Tandualwadi Tq.Gangakhed
Parbhani
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager,Tata Motars Vasan Automotive Pvt.Ltd.Parbhani
Rajendra Palace Bhalerao Complex,Parbhani
Parbhani
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr.P.P.Niturkar PRESIDENT
 HON'ABLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

निकालपत्र

                  तक्रार दाखल दिनांकः-23/09/2011

                                    तक्रार नोदणी दिनांकः-23/09/2011

                        तक्रार निकाल दिनांकः- 11/09/2013

                                                                               कालावधी 01 वर्ष. 11महिने. 19दिवस.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी

                                              अध्‍यक्ष                                                               श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.

                                                       सदस्‍य

श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.

---------------------------------------------------------------------------------------------------------       

    

      रंगनाथ पिता हरीभाऊ नागरगोजे.                              अर्जदार

वय 55 वर्षे. धंदा.शेती.                                          अॅड.एन.व्हि.कोकड.

रा.तांदुळवाडी ता.गंगाखेड जि.परभणी.

               विरुध्‍द

 

      व्‍यवस्‍थापक,                                            गैरअर्जदार.

   टाटा मोटर्स वासन अॅटोमोटीव्‍ह                          अॅड.अजय व्‍यास.

   प्रा.लि.राजेंद्र पॅलेस भालेराव कॉम्‍प्‍लेक्‍स,परभणी.

______________________________________________________________________        

     कोरम  -    1)    श्री.पी.पी.निटूरकर.       अध्‍यक्ष.

                  2)    श्री.आर.एच.बिलोलीकर                    सदस्‍य.    

                               

 

             (निकालपत्र पारित व्‍दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्‍य.)

गैरअर्जदाराने अर्जदारास त्‍याची ट्रक नं. एम.एच.- 22 एफ 191 जप्‍त करुन सेवेत त्रुटी देवुन मानसिक त्रास दिल्‍या बद्दलची तक्रार अर्जदाराने दाखल केली आहे.      

अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, अर्जदार हा मौजे तांदुळवाडी ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवासी असून तो शेती व्‍यवसाय करतो व तसेच शेतीस जोडधंदा म्‍हणून अर्जदाराने गैरअर्जदाराकडून एक ट्रक विकत घेतला ज्‍याचा न. एम.एच.-22 एफ 191 असा आहे. अर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, सदरचा ट्रक अर्जदाराने गैरअर्जदाराकडून नोव्‍हेंबर 2006 मध्‍ये खरेदी केला सदरचे वाहन मासिक हप्‍ता 28,600/- प्रमाणे 48 हप्‍त्‍यांत विकत घेण्‍याचा करार अर्जदाराने गैरअर्जदारा सोबत केला होता, त्‍याप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे निययमित प्रमाणे हप्‍ते भरले, परंतु आर्थीक अडचणीमुळे अर्जदारास चार हप्‍ते नियमित भरता आले नाहीत. या गोष्‍टीचा गैरफायदा घेवुन गैरअर्जदाराने अर्जदाराचे सदरील वाहन दिनांक 13/08/2010 रोजी ओढून नेले. त्‍यामुळे अर्जदाराची बदनामी झाली व मानसिकत्रास झाला व सदरचे वाहन अर्जदाराचे उत्‍पन्‍नाचे साधन असलेमुळे अर्जदाराचे वाहन जप्‍त केलेमुळे त्‍याचे आर्थीक नुकसान झाले. गैरअर्जदाराची उर्वरित रक्‍कम दिनांक 25/09/2010 रोजी 3,00,000/- रुपये जमा केले व गाडी त्‍यांनी परत मागणी केली, परंतु गैरअर्जदाराने पत्र देवुन अर्जदाराला गाडी आणण्‍यासाठी त्‍यांच्‍या वेगवेगळया कार्यालयात पाठविले, परंतु अर्जदारास गाडी दिली नाही. अर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, गैरअर्जदार सदरचे वाहन विक्री करण्‍याच्‍या बेतात आहेंत व त्‍यांने गाडीचे संपूर्ण रक्‍कम गैरअर्जदारास दिली आहे व सदरचे वाहन गैरअर्जदाराकडे एक वर्षा पासून त्‍यांच्‍या ताब्‍यात आहे व सदरच्‍या वाहनाची अर्जदारास गरज आहे या सर्व गोष्‍टीमुळे अर्जदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. म्‍हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह मंजूर करुन गैरअर्जदारास असा आदेश व्‍हावा की, अर्जदाराची ट्रक नं. एम.एच.-22 एफ 191 अर्जदारास परत द्यावे किंवा गैरअर्जदाराकडून अर्जदारास रु.10,60,000/- 9 टक्‍के व्‍याजदराने परत द्यावे तसेच अर्जदारास झालेल्‍या मानसिक त्रासाबद्दल 50,000/- रुपये गैरअर्जदाराने अर्जदारास द्यावेत.

  

        तक्रार अर्जाच्‍या पुष्‍टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. अर्जदाराने नि.क्रमांक 8 वर 39  कागदपत्रांच्‍या यादीसह एकुण 39 कागदपत्रे दाखल केली आहेत.ज्‍यामध्‍ये 1) दिनांक 16/10/2006 ची पावती, 2) 02/11/2006 ची पावती, 3) दिनांक 19/12/2006 ची पावती,  4) 22/08/2007 ची पावती, 5) 13/09/2007 ची पावती,  6) दिनांक 19/01/2007 ची पावती, 7) दिनांक 17/02/2007 ची पावती,  8) 24/03/2007 ची पावती,  9) दिनांक 30/04/2007 ची पावती,  10) दिनांक 14/06/2007 ची पावती,  11) 09/10/2007 ची पावती,  12) दिनांक 06/12/2007 ची पावती, 13) 19/12/2007 ची पावती,  14) 01/01/2008 ची पावती,  15) 21/02/2008 ची पावती, 16) दिनांक 08/03/2008 ची पावती,  17) दिनांक 28/05/2008 ची पावती,  18) दिनांक 20/06/2008 ची पावती,

 19) 18/07/2008 ची पावती,  20) दिनांक 13/09/2008 ची पावती,  21) दिनांक 08/10/2008 ची पावती, 22) 20/11/2008 ची पावती,  23) दिनांक 09/01/2009 ची पावती,  24) 24/02/2009 ची पावती,  25) 17/06/2009 ची पावती,  26) 20/11/2009 ची पावती, 27) 26/12/2009 ची पावती, 28) 12/03/2010 ची पावती,  29) 13/03/2010 ची पावती, 30) 25/09/2010 ची पावती,  31) दिनांक 20/09/2011 ची प्रपत्राची प्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी ची प्रत, 32) दिनांक 29/09/2010 रोजी अर्जदाराने आर.टी.ओ. परभणी यांना दिलेले पत्राची पावती, 33) 03/07/2011 रोजी अर्जदाराने आर.टी.ओ.परभणी यांना दिलेले पत्र, 34) आर.सी.बुकची प्रत,  35) दिनांक 13/08/2010 रोजी अर्जदाराच्‍या मालकीचे वाहन गैरअर्जदाराने ओढून नेल्‍याचे पत्र, 36) आर.टी.ओ.यांचे परवाना पत्र,  37) फिटनेस प्रमाणपत्र,  38) उपप्रादेशिक कार्यालय परभणी यांनी दिनांक 09/08/2011 रोजी अर्जदारास दिलेले पत्र, 39) अर्जदाराने दिनांक 19/09/2011 रोजी उपप्रादेशिक कार्यालय परभणी यांना दिलेले पत्र. इत्‍यादी कागदपत्रांचा सामावेश आहे.

                मंचातर्फे गैरअर्जदारास लेखी निवेदन दाखल करण्‍यासाठी नोटीसा काढण्‍यात आल्‍या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 17 वर आपले लेखी निवेदन सादर केले. त्‍यात त्‍यांचे असे म्‍हणणे आहे की, सदरची तक्रार ही करारा बद्दल असले कारणाने जि.दिवाणी स्‍वरुपाची आहे व विद्यमान मंचास सदरची केस चालवण्‍याचा अधिकार नाही. व तसेच गैरअर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, अर्जदार हा मंचासमोर स्‍वच्‍छ हाताने आलेला नाही व त्‍याने प्रमुख गोष्‍टी विद्यमान मंचासमोर आणल्‍या नाही व त्‍यात त्‍यांचे असे म्‍हणणे आहे की, अर्जदाराची सदरची ट्रक गैरअर्जदाराने ताब्‍यात घेवुन कराराच्‍या नियमा प्रमाणे अर्जदाराने कराराच्‍या अटीचे उल्‍लंघन केलेमुळे विक्री केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांच्‍या मध्‍ये ट्रक खरेदी बाबत करार नं. 26781 अन्‍वये दिनांक 31/10/2006  रोजी करार झाला होता. गैरअर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, अर्जदाराने सदरच्‍या कराराचा उल्‍लंघन केलेमुळे गैरअर्जदाराने अर्जदाराची ट्रक विक्री केली व सदरच्‍या विक्री मधून आलेली रक्‍कम अॅडजस्‍ट करुन व अतिरिक्‍त रक्‍कम रु.1,73,058/- अर्जदारास परत केलेले आहे व सदरची रक्‍कम अर्जदारास गैरअर्जदाराने चेकव्‍दारे दिली ज्‍या चेकचा नं. 977780 आहे व तो दिनांक 03/12/2010 चा एच.डी.एफ.सी. बॅंकेचा होता. त्‍यामुळे गैरअर्जदार अर्जदाराचे काहीही देणे लागत नाही, त्‍यामुळे सदरची केस खारीज होणे योग्‍य आहे. व तसेच त्‍यांचे असे म्‍हणणे आहे की, अर्जदाराने सदरची ट्रक ही व्‍यापार कारणा करीता घेतली होती म्‍हणून अर्जदार हा ग्राहक होत नाही व सी.पी. अॅक्‍ट 1986 प्रमाणे सदरची तक्रार मंचासमोर चालू शकत नाही.

      गैरअर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, अर्जदार व गैरअर्जदार यांचे मध्‍ये ट्रक खरेदी बाबतचा दिनांक 31/10/2006  रोजी करार झाला होता ज्‍या कराराचा नं. 26781 असा होता सदरचा करार अर्जदाराने ( 10,60,000 ट्रक बाबत + 2,39,560/- फायनान्‍स चार्जेस + 45,000/- इन्‍शुरंन्‍स असे एकुण 13,44,560/- चा करार केला होता. अर्जदाराने 13,44,560/- रु. रक्‍कमेचा करारापोटी गैरअर्जदारास 47 हप्‍त्‍यामध्‍ये पहिला हप्‍ता 28,003/- व उर्वरित 46 हप्‍ते 28,600/- प्रमाणे गैरअर्जदारास परत करण्‍याचा करार झाला होता व गैरअर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, अर्जदाराने सदरचा करार हप्‍त्‍या प्रमाणे हप्‍ता वेळेवर भरणा केलेला नाही व अनेक वेळा कराराचा भंग केलेला आहे. गैरअर्जदाराने अनेक वेळा अर्जदारास करारा प्रमाणे पैसे भरा, असे सांगीतले, परंतु त्‍याचा कांहीही उपयोग झाला नाही, व तसेच गैरअर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, अर्जदाराने त्‍यांच्‍या सोबत झालेल्‍या करारा मध्‍ये मान्‍य केले आहे की, जर अर्जदाराने सदरचा करार अटी भंग केले तर गैरअर्जदार सदरचे वाहन जप्‍त करणेस हक्‍कदार आहेत. Clause – 18 of Agreement ) खालील प्रमाणे आहे.

      Agreement empowers the O.P. to take the possession of the Vehicle/ assets which clearly states that “ If one or more of the events specified in Clause 17 above occurs ( “Event of Default” ) the Lender by notice in writing to the Obligors, declare the Loan to be immediately due and payable ( whereupon the same shall become due and payable together) and forthwith recall the Loan together with all interests and other monies payable by the Obligors pursuant to this Loan Agreement, and in default of such payment enforce the charge created in terms of this Loan Agreement. Further, the Lender shall be entitled to, at all times to, take possession, seize recover, appoint a receiver / manager, remove the Asset from its place of standing, and also be entitled.

      गैरअर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, अर्जदाराने कराराच्‍या अटीचा भंग केलेमुळे गैरअर्जदाराने दिनांक 13/08/2010 रोजी शांततेने व अर्जदाराला बळजबरी न करता ताब्‍यात घेतले असून अर्जदाराची तक्रार खोटी असल्‍या कारणाने खर्चासह खारीज करण्‍यात यावी, अशी मंचास विनंती केली आहे.

      गैरअर्जदाराने लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ नि.क्रमांक 18 वर गैरअर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.

      गैरअर्जदाराने नि.क्रमांक 20 वर 5 कागदपत्रांच्‍या यादीसह 5 कागदपत्रे दाखल केली आहेत, ज्‍यामध्‍ये दिनांक 31/10/2006 रोजीचे कागदपत्राची प्रत, Cardex – II दिनांक 17/08/2010 ची pre sale notice ची प्रत, पोस्‍टल रिसिप्‍टची प्रत, इ.कागदपत्रे दाखल केली आहेत.

      दोन्‍ही बाजुंच्‍या  कैफियतीवरुन व दाखल केलेल्‍या कागदपत्रा वरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.

           मुद्दे.                                            उत्‍तर.

1                    गैरअर्जदाराने अर्जदाराची ट्रक ज्‍याचा न. एम.एच.-22 एफ 191

अर्जदाराच्‍या ताब्‍यातुन घेवुन अर्जदारास सेवेत त्रुटी

दिली आहे काय  ?                                   होय.

2        आदेश काय ?                               अंतिम आदेशा प्रमाणे.

 

कारणे.

मुद्दा क्रमांक 1.

               अर्जदार हा त्‍याचा ट्रक नंबर न. एम.एच.-22 एफ 191 चा मालक

आहे. ही बाब नि.क्रमांक 8/34 वर दाखल केलेल्‍या आर.सी.बुकच्‍या प्रतीवरुन सिध्‍द होते. अर्जदार व गैरअर्जदारा मध्‍ये सदरचा ट्रक खरेदी बाबतचा दिनांक 31/10/2006 रोजी करार झाला होता. ज्‍या कराराचा नं.26781 असा आहे ही बाब अॅडमिटेड फॅक्‍ट आहे. सदरच्‍या ट्रक खरेदी करारावेळी अर्जदाराने गैरअर्जदारास 10,60,000/- रुपये ट्रक बाबत अधिक रु.2,39,560/- फायनान्‍स चार्जेस व 45,000/- रुपये इन्‍शुरंस चार्जेस असे एकुण 13,44,560/-रुपये अर्जदाराने गैरअर्जदारास द्यावयाचे ठरले व सदरील रक्‍कम देतांना अर्जदाराने 47 EMI देण्‍याचे ठरले. ही बाब देखील अॅडमिटेड फॅक्‍ट आहे. सदरच्‍या करारा प्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 02/11/2006 पासून ते 25/09/2010 पर्यंत एकूण रुपये 14,07,529/- रुपये भरले ही बाब नि.क्रमांक 8/1 ते 8/30 वर दाखल केलेल्‍या पावत्‍यावरुन सिध्‍द होते.

      गैरअर्जदार यांनी नि.क्रमांक 17 वर दाखल केलेल्‍या लेखी जबाबा मध्‍ये त्‍यांचे म्‍हणणे की, अर्जदाराने हप्‍ते भरतांना डिफॉल्‍ट केलेला आहे व कराराचे उल्‍लंघन केलेले आहे. या बाबतचा कोणताही पुरावा मंचासमोर आणलेला नाही, जर अर्जदाराने कराराचा भंग केला असेल असे गृहीत धरले तरी पण गैरअर्जदाराने वेळोवेळी हप्‍ते स्‍वीकारुन व तसेच शेवटचा हप्‍ता दिनांक 25/09/2010 रोजी 3,00,000/- रुपये स्‍वीकारले आहेत, या वरुन असे सिध्‍द होते की, Novation of Contract  (वेळोवेळी कराराचे पुनर्जिवन) झालेले आहे. तसेच गैरअर्जदाराचे म्‍हणणे की, अर्जदाराचा सरदचा ट्रक ताब्‍यांत घेऊन विक्री केली व सदरच्‍या विक्रीतून आलेल्‍या रक्‍कमेतून अर्जदाराचे A/c Adjust केले व ऊर्वरित जादा रक्‍कम रुपये 1,73,058/- हे अर्जदारास दिनांक 03/12/2010 चा एच.डी.एफ.सी. बॅंकेचा चेक नंबर 977780 अन्‍वये दिले या बाबतचा कोणताही ठोस पुरावा मंचासमोर आणला नाही. सदरचा ट्रक कोणास, केव्‍हा व किती रक्‍कमेस विक्री केला त्‍याचा देखील पुरावा मंचासमोर आणला नाही.

      म्‍हणून गैरअर्जदाराने अर्जदाराचा ट्रक जप्‍त करुन बेकायदेशिर कृत्‍य केलेले आहे. कारण सदरची कॉंट्रॅक्‍ट व्‍हॅल्‍यु 13,44,560/- रुपये असतांना अर्जदाराने गैरअर्जदारांकडे 14,07,529/- रुपये भरलेले आहेत. हे अर्जदाराने दाखल केलेल्‍या पावत्‍या वरुन सिध्‍द झालेले आहे.

      गैरअर्जदाराने अर्जदाराराचा ट्रक ज्‍याचा न. एम.एच.-22 एफ 191 हे बेकायदेशिरपणे ताब्‍यांत घेऊन अर्जदारास निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे व मानसिक त्रास देखील दिला आहे. असे मंचास वाटते. म्‍हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्‍तर देवुन मंच पूढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                            आदेश

1     अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

2     गैरअर्जदाराने अर्जदारास आदेश तारखे पासून 30 दिवसांच्‍या आत अर्जदाराची

      ट्रक ज्‍याचा न. एम.एच.-22 एफ 191 अर्जदारास परत ताब्‍यांत द्यावे.

3     गैरअर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्‍या आत मानसिक त्रासापोटी

      रु. 25,000/- फक्‍त. (अक्षरी रु. पंचेविसहजार फक्‍त) अर्जदारास द्यावे.

4         आदेशाच्‍या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्‍यात.

 

 

  श्री.आर.एच.बिलोलीकर.                           श्री. पी.पी.निटूरकर

            मा.सदस्.                                                                      मा.अध्यक्ष.

 

 
 
[HON'ABLE MR. Mr.P.P.Niturkar]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.