जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 11/2011 तक्रार दाखल तारीख- 15/01/2011
प्रेमसागर पि. बापुराव जोगदंड,
वय – 46 वर्ष, धंदा – व्यापार
रा.पंचशीलनगर, परळी वैजनाथ,जि.बीड. ....... तक्रारदार
विरुध्द
1. व्यवस्थापक, टीएमएल फायनान्सिलय सर्व्हिसेस लि;
बेझोला कॉम्पलेक्स, पहिला मजला,
व्ही.एन.परव मार्ग,चेंबुर, मुंबई -71
2. व्यवस्थापक, सान्या मोर्टास प्रा.लि.,
जालना रोड, औरंगाबाद ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – डी.एस.टेकाळे,
सामनेवाले1तर्फे – वकील – ई.जी.काकडे,
सामनेवाले2तर्फे – एकतर्फा आदेश,
।। निकालपत्र ।।
( घोषितद्वारा अजय भोसरेकर, सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हा परळी वैजनाथ ता.परळी वै.,जि.बीड येथील रहिवाशी असुन स्वत:च्या वापरासाठी एक चारचाकी वाहन खरेदी करण्याचे निश्चीत करुन सामनेवाले नं.2 यांचेकडून टाटा कंपनीचे इंडिगो एलएक्स ही कार नं.एमएच 44 बी 579 ही खरेदी केली. सदर वाहन खरेदी करताना तक्रारदाराने दि.21.10.2006 रोजी रक्कम रु.1,00,000/- व दि.8.11.2006 रोजी रक्कम रु.41,540/- पावती क्रं.1168 अन्वये जमा केले. उर्वरीत रक्कम सामनेवाले क्र.1 यांचेकडून हायपोथीकेशन कर्ज घेवून सदर वाहन ताब्यात घेतले. तक्रारदाराने अगाऊ हाप्ता रु.12,134/-भरणा केला. व एकुण 46 मासिक हाप्ते रु.10,800/- प्रमाणे भरण्याचे कबुल करुन उस्मानाबाद जनता सहकारी बँक, शाखा परळी यांचे धनादेश क्रं.64402 ते 64447 एवढे सहया करुन सामनेवाले क्रं.1 यांचेकडे दिले. सामनेवाले क्रं.1 यांनी धनादेश क्रं.64402,64404,64406 प्रत्यकी रु.10,800/- चे तक्रारदाराच्या खात्यातुन उचल केली. आक्टोबर,2007 मध्ये सामनेवाले नं.1 यांचे वसुली अधिकारी तीघेजन तक्रारदाराकडे आले व थकीत हप्ते भरण्यास सांगीतले. तक्रारदार हा उर्वरीत हप्ते भरण्यास असमर्थ असल्यामुळे तक्रारदाराने सदर वाहन सामनेवाले क्रं.1 यांचे वसुली विभागाच्या आलेल्या तीघाजनांच्या ताब्यात गाडी क्र. एमएच-44 बी-579 दिले. व त्यानी तक्रारदाराचे उर्वरीत कर्ज वजा जाता शिल्लक रक्कम व धनादेश मार्च,2008 पर्यन्त परंत देण्याचे आश्वासन दिले. तक्रारदाराने डिसेंबर,2008 पर्यन्त सामनेवाले यांची वाट पाहिली त्यानंतर सामनेवाले यांना वेळोवेळी प्रत्यक्ष व दुरध्वनीवरुन संपर्क केला असता उडवाउडवीचे उत्तरे देण्यास सुरुवात केली.
तक्रारदार हा एप्रिल,2009 मध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबजोगाई येथे गेला असता, सदर वाहन हे तक्रारदाराचे नांव असल्याचे दिसून आले. त्यामुळे तक्रारदाराने सामनेवाले नं.1 यांना तशी सूचना दिली. त्यानंतर दि.13.9.2010 रोजी लेखी पत्र पाठविले. दि.28.10.2010 रोजी स्मरणपत्र पाठविले. परंतु त्याचे उत्तरही सामनेवाले यांनी दिले नाही म्हणून सदर तक्रार तक्रादाराने या न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारदाराने सामनेवाले नं.1 याचेकडून एमएच 44 बी 579 हे वाहन ताब्यात मिळावे अथवा कर्ज वजा जाता शिल्लक रक्कम द.सा.द.शे.6 टक्के या दराने मिळावे व सामनेवाले नं.1 यांचेकडे दिलेले धनादेश क्रं.64405 व 64407 ते 64447 परत मिळावेत व त्याचा गैरवापर करण्यास मनाई करण्यात यावी. मानसिक, आर्थीक, शारीरिक व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.25,000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले लेखी म्हणणेच्या पुष्ठयार्थ एकुण 8 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले नं.1 यांनी आपले लेखी म्हणणे दि.5.4.2011 रोजी दाखल केले असुन त्यात त्यांनी सदर तक्रार ही या न्यायमंचास चालविण्याचा अधिकार नाही, असे म्हंटले आहे. कारण तक्रारदार व सामनेवाले क्रं.1 यांचेत झालेल्या कराराच्या कलम 23 नुसार तक्रारी हया आरबीटेटरकडे करण्याचे ठरलेले आहे. तसेच ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 24 (ए) नुसार सदर तक्रार ही दोनवर्ष मुदतीच्या कालबाहय झालेली आहे. तक्रारदार हा कलम 2(1) (डी) (1) या नुसार ग्राहक होत नाही म्हणून सामनेवाले यांनी मा.राष्ट्रीय आयोग Karnataka State Financial Corporation Vs Mrs. Sheela S. Kotecha, R.P.No.488 of 2005, decided on 16.9.2009
“When there has been a contract between the parties that being a bilateral action, both parties are bound by the terms and conditions as stipulated therein ” याचा आधार घेतला असुन तक्रारदाराची तक्रार ही खर्चासह खारीज करावी अशी मागणी केली आहे.
सामनेवाले यांनी आपले लेखी म्हणण्याचे पुष्ठयार्थ एकुण 7 कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रारदाराची तक्रार, सोबतची कागदपत्रे सामनेवाले यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, दोघांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर त्याचे बारकाईने आवलोकन केले असता,
सामनेवाले यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेमधील तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 24 (ए) नुसार सदर तक्रार ही मुद्दत बाहय आहे. सामनेवाले यांनी चुकीचे मांडले आहेत हे खोडून काढण्याच्या उद्देशाने कोणताही योग्य असा पुरावा या न्यायमंचासमोर तक्रारदाराने सादर केला नाही, म्हणंजेच सामनेवाले यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत कोणताही कसूर केला आहे सिध्द होवू शकत नाही.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
( अजय भोसरेकर ) ( पी. बी. भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड