Maharashtra

Nanded

CC/09/201

Hanmant Madhavao Sangnor - Complainant(s)

Versus

Manager,State Bank of Inidia - Opp.Party(s)

15 Feb 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/201
1. Hanmant Madhavao Sangnor Dayaneshwar Nagar Purna Road NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Manager,State Bank of Inidia Yeshwant Nager,NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 15 Feb 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :2009/201
 
                    प्रकरण दाखल तारीख -   11/09/2009     
                    प्रकरण निकाल तारीख    15/02/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
                 मा.श्रीमती सुवर्णा देशमुख            - सदस्‍या
                 मा.श्री.सतीश सामते.                   - सदस्‍य
                
श्री.हनमंत पि.माधवराव संगणोर,
वय वर्षे 44, व्‍यवसाय नौकरी,                              अर्जदार.
रा. विस्‍तारीत ज्ञानेश्‍वरनगर,
नांदेड,
 
      विरुध्‍द.
 
1.   शाखा व्‍यवस्‍थापक,
स्‍टेट बँक ऑफ इंडिया,                             गैरअर्जदार.
शाखा यशवंतनगर,नांदेड.
2.   शाखा व्‍यवस्‍थापक,
     स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद,
     शाखा शिवाजीनगर,नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील            - अड.सी.बी.नरवाडे.
गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील       - अड.जे.एस.पांडे.
गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकील    - अड.महेश कनकदंडे.
 
निकालपत्र
 (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्‍य)
 
          गैरअर्जदार यांचे सेवेच्‍या त्रुटीबद्यल अर्जदार आपल्‍या तक्रारीत म्‍हणतात, अर्जदार यांचे गैरअर्जदार क्र. 1 यांचे बँकेत खाते क्र.10319446122 असुन यास ए.टी.एम. कार्डची सुवीधा आहे. अर्जदार यांनी दि.18/07/2009 रोजी शिवाजीनगर येथुन ए.टी.एम.सेंटरचा उपयोग केला असता, स्क्रिनवर येणा-या सर्व सुचनांचे पालन केल्‍यानंतर रु.20,000/- रक्‍कम निघाली नाही व स्लिपही आली नाही व स्क्रिनवर चेक युवर डेज विड्रॉवल लिमिट असा संदेश आला. दुस-या वेळेस प्रयत्‍न केला असता, असेच झाले व रक्‍कम निघत नसल्‍याने मशिनमध्‍ये काही बिघाड आहे म्‍हणुन अर्जदार निघुन आला. दुस-या दिवशी दि.19/07/2009 रोजी देगलुर नाका येथील ए.टी.एम.सेंटर येथुन अर्जदाराने रु.40,000/- काढले तेंव्‍हा  स्लिपवर दि.18/07/2009 रोजी जो व्‍यवहार पुर्ण झाला नाही त्‍यांचे रु.40,000/- बॅलेन्‍समधुन कमी झाल्‍याचे स्लिपवर दिसुन आले. अर्जदाराने लगेच एस.बी.आय.शाखा यशवंतनगर येथे प्रत्‍यक्ष जाऊन व्‍यवस्‍थापकास दि.18/07/2009 च्‍या व्‍यवहाराबद्यल माहीती दिली, त्‍यांनी चौकशीसाठी दोन दिवस लागतील असे सांगितले. दि.22/07/2009 ला गैरअर्जदार क्र. 1 याची भेट घेतली असता, त्‍यांनी उडवा उडवीची उत्‍तरे दिली. त्‍यामुळे अर्जदाराने लेखी तक्रार दिली. अर्जदाराने त्‍यांना सतत भेट दिली, अर्जदारांना प्रतिसाद मिळाला नाही. तेंव्‍हा त्‍यांनी सहायक व्‍यवस्‍थापक एस.बी.आय. शाखा नविन मोंढा यांना दि.05/08/2009 ला लेखी तक्रार दिली. प्रत्‍येक बॅकेंच्‍या ए.टी.एम.सेंटर मध्‍ये वेब कॅमेरा बसविलेला आहे. त्‍यामुळे ए.टी.एम.कार्डचा उपयोग करणा-याचे चलचित्र तयार होते. सदरील चलचित्र बघितल्‍यास त्‍यावरुन स्‍पष्‍ट होते की, सदरील व्‍यक्तिने पैसे घेतले की नाही. गैरअर्जदार क्र. 2 यांना दि.18/07/2009 चे चलचित्र देण्‍याचे निर्देश द्यावे असे म्‍हटले आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हेही कुठलीही मदत करण्‍यास तयार नाहीत. तेंव्‍हा अर्जदाराची मागणी आहे की, ए.टी.एम.मधुन न निघालेली रक्‍कम रु.40,000/- व्‍याजासह अर्जदारास मिळावेत तसेच मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारअर्जाचा खर्चही मिळावा अशी मागणी केली आहे.
 
          गैरअर्जदार क्र. 1 हे वकीला मार्फत हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांच्‍या विरुध्‍द दाखल केलेली तक्रार ही योग्‍य नाही कारण गैरअर्जदार क्र. 2 यांच्‍या ए.टी.एम.सेंटरवर अर्जदाराचे व्‍यवहार झाले व अर्जदारास काय संदेश स्क्रिनवर आले याबद्यल त्‍यांना माहीत नाही परंतु अर्जदाराच्‍या तक्रारीनंतर कागदोपत्री पुराव्‍यावरुन व संगणकाच्‍या उपलब्‍धतेवरुन  अर्जदारास दि.18/07/2009 रोजी पुर्ण रक्‍कम मिळाल्‍याचे दर्शविलेले आहे. त्‍यामुळे गैरअर्जदारांच्‍या सेवेत कुठलीही त्रुटी नाही. अर्जदाराचा दि.18/07/2009 रोजी अपुर्ण व्‍यवहार झाला हे त्‍यांना मान्‍य नाही. दि.19/07/2009 रोजी देगलुर नाका ए.टी.एम.सेंटरमधुन व्‍यवहार झाला हे त्‍यांना मान्‍य आहे. अर्जदाराने त्‍यांचेकड कुठलीही तोंडी तक्रार केली नाही. अर्जदार पहिल्‍यांदा दि.22/07/2009 रोजी लेखी तक्रार घेऊन आला व त्‍याच दिवशी त्‍यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांना तक्रारी विषयी सविस्‍तर माहीती कळविली. गैरअर्जदार क्र. 2 यांनी दि.05/08/2009 रोजी गैरअर्जदाराला कळविले की, अर्जदाराने केलेला व्‍यवहार पुर्ण झाला आहे व त्‍यांचेकडे कुठलीही रक्‍कम शिल्‍लक नाही परंतु अर्जदाराची शंका निरसन न झाल्‍यामुळे वरीष्‍ठ कार्यालयाकडे देखील तक्रार केली. याप्रमाणे गैरअर्जदार क्र. 1 यांचे ए.टी.एम.सेंटर मुख्‍य कार्यालय यांच्‍या रेकॉर्डवरुन माहीती मागीतली असता, अर्जदारास पुर्ण रक्‍कम मिळाल्‍याचे सिध्‍द होते व अर्जदार म्‍हणतात त्‍याप्रमाणे ए.टी.एम.सेंटरमध्‍ये वेब कॅमेरा असतो व त्‍याचे चलचित्र तयार होते हे त्‍यांना मान्‍य आहे व हा व्‍यवहार गैरअर्जदार क्र. 2 च्‍या ए.टी.एम.चा असल्‍यामुळे त्‍याबाबतची माहीती त्‍यांनी कागदोपत्री दिली आहे. त्‍यामुळे चलचित्राची प्रत दाखल करण्‍याचा प्रश्‍न येत नाही. गैरअर्जदार यांचेकडुन पुन्‍हा रक्‍कम मिळावी म्‍हणुन ही खोटी तक्रार दाखल केलेली आहे. सबब अर्जदाराची तक्रार रु.10,000/- खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
          गैरअर्जदार क्र. 2 हे वकीला मार्फत हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी त्‍यांचे ए.टी.एम.सेंटरचा उपयेग केला आहे त्‍या वेळेस पैसे मिळाले असून त्‍यांनी दोन वेळेस पैसे काढल्‍याचे बँकेच्‍या जे.पी.लॉगवरुन लक्षात येते तसेच अर्जदारास पैसे मिळालेच नसते तर त्‍यांनी ताबडतोब बँकेचे शाखाधिकारी यांच्‍याशी संपर्क साधुन तक्रार करणे आवश्‍यक होते परंतु अर्जदाराने असे केले नाही. त्‍यामुळे अर्जदारास संपुर्ण पैसे मिळाले हे सिध्‍द होते. अर्जदाराने म्‍हटल्‍याप्रमाणे चलचित्र कॅमेरामधे फक्‍त एटीम सेंटरमध्‍ये आलेल्‍या व्‍यक्तीचे चित्र येते परंतु त्‍यांनी किती पैसे काढले हे दिसत नाही. अर्जदाराने आजपर्यंत आम्‍हास कुठल्‍याही प्रकारची लेखी निवेदन व तक्रार दिलेली नाही. त्‍यामुळे नुकसान भरपाई देण्‍यास आम्‍ही बांधील नाही. अर्जदार गैरअर्जदार क्र. 1 यांचे खातेदार असुन त्‍यांनी एटीएम मधुन पैसे काढल्‍यावर एस.बी.आय.च्‍या खात्‍यातुन पैसे वजा झालेले आहेत. अर्जदारास पैसे मिळालेच नसतील तर हा वाद गैरअर्जदार क्र.1 यांच्‍याशी आहे गैरअर्जदार क्र. 2 यांचा काहीही संबंध नाही. प्रकरण दाखल करण्‍यापुर्वी अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 यांना कुठलीही नोटीस दिलेली नाही किंवा सेवेच्‍या त्रुटीबद्यल माहीती दिलेली नाही. त्‍यामुळे प्रकरण प्रिमॅच्‍युअर्ड आहे. गैरअर्जदारोनी जे.पी.लॉग दि.16/07/2009 ते 20/07/2009 या कालावधीतील कॅश टॅली रिपोर्ट दाखल केलेला आहे, त्‍याचे अवलोकन केले असता, असे दिसुन येते की, गैरअर्जदाराकडुन कुठलीही त्रुटी झालेली नाही. अर्जदाराचे ट्रांजक्‍शन हा स्‍कसेसफुल झालेला आहे तसेच त्‍या दिवशीच्‍या मशीन मधील कॅश पडताळणी करुन पाहीले असता, त्‍यात (एक्‍सेस) जास्‍तीची रक्‍कम नाही म्‍हणजेच अर्जदारास पुर्ण रक्‍कम मिळाली आहे. त्‍यामुळे तक्रार खारीज करावी असे म्‍हटले आहे. अर्जदाराने एस.बी.एच. ए.टी.एम. येथे मशीनमध्‍ये कार्ड वापरला असता, याची तात्‍काळ माहीती एस.बी.एच. कार्ड सेंटर ला मिळाली तेथुन त्‍यांनी एटीएम हब जे की संपुर्ण बँकेचे कॉमन सेंअर असते त्‍यांना कळविले त्‍यानंतर एटीएम हब सेंटरने ते कार्ड एस.बी.आय. चे असल्‍यामुळे त्‍याची माहीती एस.बी.आय कार्ड सेंटर/एस.बी.आय.हब सेंटरला कळवले तेथुन ज्‍या बँकेत खाते आहे तेथे माहीती देण्‍यात आली लगेचच एस.बी.आय. बँच मधुन त्‍याच्‍या खात्‍यातील रक्‍कम वजा करुन त्‍याची माहीती उलट एस.बी.आय. कार्ड सेंटर- -ए.टी.एम.सेटर - एस.बी.एच हब- एस.बी.एच.एटीएम ने कळविण्‍यात येते यामध्‍ये ती माहीती मध्‍येच कुठेतरी लिंक फेल झाल्‍यास एटीएम ए.बी.एच पर्यंत पोहचली नसल्‍यास एटीएम मधून पैसे येऊ शकत नाही. अश वेळेस रक्‍कम परत एस.बी.आय.ने खात्‍यामध्‍ये जमा करण्‍याची आवश्‍यकता आहे. एटीएम हब- एसबीआय- हब याच्‍याशी संपर्क साधुन निधीची माहीती घेणे आवश्‍यक आहे व प्रत्‍यक्ष कार्यवाही त्‍यांनी केली नाही हे पाहणे आवश्‍यक आहे. प्रस्‍तुत प्रकरणात एक तर अर्जदारास पैसे मिळालेले असु शकतात. त्‍यामुळे गैरअर्जदाराची कुठलीही सेवेत त्रुटी झालेली नाही. गैरअर्जदारास झालेल्‍या त्रासाबद्यल रु.10,000/- मिळावेत शिवाय अर्जदाराची त्‍यांच्‍या विरुध्‍द तक्रार खारीज करण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
          अर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र दाखल केले आहे. तसेच गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आपापले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्‍तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात.
     मुद्ये.                                    उत्‍तर.
1.   गैरअर्जदाराच्‍या सेवेतील त्रुटी सिध्‍द होते काय?        नाही.
2.   काय आदेश?                                              अंतीम आदेशा प्रमाणे.
                                                कारणे.
मुद्या क्र. 1
     अर्जदार यांनी त्‍यांचे एस.बी.आय.येथील खाते क्र.10319446122 याच्‍याशी संलग्‍न एटीएम कार्ड क्र.6220180192200011-885 याचा दि.18/07/2009 रोजी एस.बी.एच. एटीएम सेंटर शिवाजीनगर येथील उपयोग करुन पैसे काढण्‍याचा प्रयत्‍न केला असता, विस विस हजार दोन्‍ही वेळेस कॅश निघाले नाही व‍ स्क्रिनवर चेक युवर डेज विड्रावल लिमिट असा संदेश आला म्‍हणुन विड्राल पुर्ण झाले नाही. मशीनमध्‍ये बिघाड आहे असे अर्जदारांना वाटले दि.19/07/2009 रोजी एस.बी.एच. देगलुर नाका येथील एटीएम मधुन विस विस हजार दोन्‍ही वेळेस असे रु.40,000/- अर्जदाराने काढले तेंव्‍हा स्लिपवर पाहीले असता, त्‍या वेळेस शिल्‍लक रक्‍कमेतुन स्लिपवर एकुण रु.40,000/- कमी झाल्‍याचे त्‍यांचे लक्षात आले. 18 तारखेचा हा व्‍यवहार 19 तारखेला त्‍यांच्‍या लक्षात आले तेंव्‍हा त्‍यांनी ज्‍या बँकेचे एटीएम आहे त्‍या बँकेत चौकशी करणे आवश्‍यक होते व त्‍या दिवशी तक्रार न करता ज्‍या बँकेचे एटीएम आहे त्‍या ऐवजी त्‍यांनी ज्‍या बँकेत त्‍यांचे खाते आहे त्‍यांचेकडे दि.22/ 07/2009 रोजी तक्रार केली म्‍हणजेच तीन दिवसांनी तक्रार केली ?  अर्जदारांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे तक्रार केली नाही असे दिसुन येते. व्‍यवहार हा गैरअर्जदार क्र. 2 यांच्‍या एटीएम मध्‍ये झालेला आहे व एटीएमचा व्‍यवहार हा अर्जदार व संगणक यांनाच माहीत असते, दुस-या कोणालाही व्‍यवहाराची कल्‍पना नसते. अर्जदाराची तक्रार मिळाल्‍यावर गैरअर्जदार क्र. 1 ने गैरअर्जदार क्र. 2 यांना दि.05/08/2009 रोजी कळविले त्‍यानुसार त्‍यांनी पुर्ण चौकशी करुन गैरअर्जदार क्र. 1 यांना माहीती दिली. गैरअर्जदार क्र. 2 यांनी दि.18/07/2009 चे जे.पी.लॉग व त्‍या दिवशीचे एटीएम मशीनमध्‍ये भरलेली कॅश याची पुर्ण तपासणी केली असता, विस विस हजाराची दोन वेळा ट्रांजॅक्‍शन सक्‍सेसफुल झाल्‍याचे म्‍हटलेले आहे. याप्रमाणे दि.18/07/2009 रोजीचे ट्रांजक्‍शन क्र.2488 व 2489 व जर्नल ट्रेस नंबर 726248000 याप्रमाणे तसेच जे.पी.लॉग प्रमाणे गैरअर्जदार क्र. 2 यांनी दि.18/07/2009 चे एटीएम मधील कॅश टॅली होते व ती बरोबर आहे असे म्‍हटले आहे. त्‍यामुळे एटीएम मधील कॅश मधुन अर्जदाराचे ट्रांजॅक्‍शन सक्‍सेसफुल झाल्‍याचे दिसते. गैरअर्जदार क्र. 1 यांचे स्‍टेटमेंट पाहीले असता, यात दि.18/07/2009 रोजीचे दोन वेळा विस विस हजाराचे केलेला ट्रांजॅक्‍शन त्‍यांच्‍या खात्‍यावर डेबीट पडले आहे व त्‍यामधील कुठलाही लिंक चुकली असल्‍यास ती कॅश रिवर्स झालेली नाही. अर्जदारांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे तक्रार केल्‍याचे पुर्ण पत्र व्‍यवहार याप्रकरणांत दाखल आहे व गैरअर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचेशी सतत पत्र व्‍यवहार केलेला आहे व गैरअर्जदार क्र. 2 यांनी ताबडतोब याची दखल घेतल्‍याचे दिसुन येत नाही किंवा लगेचच परत पत्र व्‍यवहार केल्‍याचे दिसत नाही व नंतर गैरअर्जदार क्र. 2 यांनी सखोल चौकशी केली व पुर्ण रेकॉर्ड दाखल केलेले आहे. अर्जदार म्‍हणतात त्‍याप्रमाणे त्‍यांच्‍या तक्रारीची चौकशी अंती जे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी रेकॉर्ड दाखल केलेले आहे ते पुर्णतः संगणीकृत आहे. यात कोणालाही मॅन्‍युअली हस्‍तक्षेप करता ये‍ईल हे मुळीच शक्‍य नाही. दोन्‍ही गैरअर्जदारांनी अर्जदारांना सहानुभूती दाखविली, पुढील ट्रांजक्‍शनची चौकशी करण्‍यासाठी ए.एस.सी.बेलापुर पर्यंत चौकशी केलेली आहे जे एटीएमचे मेन सेंटर आहे. याप्रमाणे एटीएम मशीनमध्‍ये कॅश जर टॅली होत असेल व तरीही अर्जदाराचे समाधान होत नसेल तर पुढील लिंक SBH HAS GIVEN A LETTER STATING THAT NO EXCESS CASH WAS FOUND ON 18/07/2009 IN ATM JP LOG IS SHOWING THAT BOTH THE TRANSACTIONS ARF SUCCESSFUL. PLEAS ADVICE US. This txn was successful at ASC. If customer did not receive the amount, physical cash in atm should be excess. Verify JP Log to find out exact status of the transaction. If excess cash not found, check for any compensatory error, Please attach a scaned copy of the JP Log using Attachement link with the request. यावरुन पुर्ण लिंक तपासल्‍यानंतर देखील कुठलीही डिलिंक झालेली नाही व कॅश रिवर्स झालेली नाही व हा संगणीकृत कागदपत्र पुरावा उपलब्‍ध आहे. त्‍यामुळे या रेकॉर्डवरच विश्‍वास ठेवणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे अर्जदाराची तक्रारी विषयी आम्‍हास सहानुभूती जरी असली तरी देखील उपलब्‍ध पुराव्‍यावरुन ट्रॅजॅक्‍शन सक्‍सेसफुल झालेले असुन दि.18/07/2009 रोजी रुपये विस-विस हजार असे दोन वेळा नंतर रु.40,000/- कॅश अर्जदारास मिळाल्‍याचे निष्‍पन्‍न होते. त्‍यामुळे गैरअर्जदारांनी कुठेही सेवेत त्रुटी केली हे सिध्‍द होत नाही.
     अर्जदार यांनी दाखल केलेला केस लॉ ए.टी.एम.फेल्‍युअर बाबत आहे. (रेंगे विरुध्‍द एस.बी.एच) या प्रकरणांस लागु होणार नाही कारण ए.टी.एम.मशीन ok असल्‍याबद्यलचा अहवाल गैरअर्जदार यांनी दाखल केला आहे. तसेच III (2007) CPJ 67 (NC)  जे.पी.शर्मा विरुध्‍द आय.सी.आय.सी.आय बँक लि,राष्‍ट्रीय आयोग, या प्रकरणांस लागु होणार नाही कारण चुक Advice दिल्‍याबद्यल केस आहे.
     वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                            आदेश.
 
1.   अर्जदाराचा तक्रारअर्ज खारीज करण्‍यात येतो.
2.   दावा खर्च ज्‍यांनी त्‍यांनी आपापला सोसावा.
3.   संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्‍यात यावा.
 
(श्री. बी.टी.नरवाडे पाटील)                                      (श्रीमती.सुवर्णा देशमुख)                                  (श्री.सतीश सामते)       
       अध्‍यक्ष                                                                       सदस्‍या                                                       सदस्‍य
गो.प.निलमवार,लघुलेखक