Maharashtra

Nanded

CC/10/117

Sk.Minir Sk.Ahmed - Complainant(s)

Versus

Manager,State Bank of Hyderabad - Opp.Party(s)

ADV.S.G.Kolte

17 Aug 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/117
1. Sk.Minir Sk.Ahmed R/o.Sirahkhod Tq.Dharmabad Dist.Nanded NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Manager,State Bank of Hyderabad Dharmabad BranchNandedMaharastra2. Asstt.General Manager,State Bank of Hyderabad.Regional office,Shivaji magar,NandedNandedMaharastra3. Aditya Motors,4,Vinayakanager,Airport Road.NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,PRESIDING MEMBER
PRESENT :ADV.S.G.Kolte , Advocate for Complainant

Dated : 17 Aug 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/117.
                          प्रकरण दाखल तारीख - 13/04/2010
                          प्रकरण निकाल तारीख 17/08/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
      मा.श्री.सतीश सामते,                 -   सदस्‍य.
 
शेख मूनिर पि. शेचा अहेमद
वय 52 वर्षे, धंदा शेती                                   अर्जदार
रा.सिरजखोड ता.धर्माबाद,जि. नांदेड
     विरुध्‍द.
1. स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद
     शाखा धर्माबाद जि. नांदेड मार्फत शाखाधिकारी          गैरअर्जदार
2.   स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद
     रिजनल ऑफीस, शिवाजी नगर नांदेड
मार्फत असीस्‍टंट जनरल मॅनेजर
3.   आदित्‍य मोटर्स,
4-विनायक नगर, विमानतळ रोड,
मराठा हॉटेल, नवा मोंढा, नांदेड मार्फत पार्टनर.
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.एस.जी.कोलते
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील     -  अड.महेश कनंकदडे.
गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील        - अड.एस.एम.पूंड.
 
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
             गैरअर्जदार स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद यांचे सेवेच्‍या अनूचित प्रकाराबददल अर्जदार आपल्‍या तक्रारीत म्‍हणतात की, त्‍यांनी गैरअर्जदार यांचे कडे मार्जीन मनी रु.2,13,000/- भरुन एकूण रु.7,13,000/- किंमतीचे ट्रक्‍टर गैरअर्जदार क्र.1 च्‍या सांगण्‍यावरुन रु.5,00,000/- चे कर्ज सोडून गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून दि.01.01.2010 रोजी जॉन डिरे -5310 हे ट्रॅक्‍टर विकत घेतले. यात अर्जदार यांची मूख्‍य तक्रार गैरअर्जदार हैद्राबाद बँके विरुध्‍द आहे. ते एक प्रगतशिल शेतकरी असल्‍याकारणाने त्‍यांने आपली शेती गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे गहाण ठेऊन कर्ज मागितले होते. त्‍या संबंधी त्‍यांनी
 
 
त्‍यांचे जमिनीचा सर्च रिपोर्ट ही घेतला होता व ट्रॅक्‍टरसाठी रु.5,00,000/- कर्ज देण्‍याचे मान्‍य केले होते. त्‍यांचे शब्‍दावर विश्‍वास ठेऊन गैरअर्जदार क्र.3 यांनी ट्रॅक्‍टर दिला व तो ट्रॅक्‍टर अर्जदार वापरत आहेत परंतु यानंतर गैरअर्जदार क्र.1 यांनी कर्ज देण्‍याचे नाकारले. त्‍यामूळे अर्जदाराची पंचायत झाली.  गैरअर्जदार क्र.3 यांनी अर्जदाराकडून पैसे घेऊन आरटीओ कडे  टॅक्‍स भरुन टेंम्‍पररी पासींग करुन एम.एच.-26-79 नबंरही मिळाला. तसेच विमा कंपनी कडे हप्‍ते भरुन विमा संरक्षण ही घेतले. दूदैवाने दि.28.01.2010 रोजी ट्रॅक्‍टरचा अपघात होऊन त्‍यांचे मागचे चाकाखाली सापडून एक व्‍यक्‍ती मरण पावला. त्‍यांच वेळेस पोलिस स्‍टेशन मध्‍ये गून्‍हा नोंदविण्‍यात आला.  त्‍यामूळे अर्जदार यांचे मागणी आहे की, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना रु.5,00,000/- चे कर्ज देण्‍याचे आदेश दयावेत. तसेच मानसिक ञासाबददल योग्‍य वाटेल ती रक्‍कम व दावा खर्च मिळावा असे म्‍हटले आहे.
              गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे संयूक्‍तरित्‍या दाखल केलेले आहे. अर्जदार हा बँकेचा कर्जदार नाही व त्‍यांला कूठलेही कर्ज आजपर्यत मंजूर केलेले नाही. अर्जदाराच्‍या शेती बददल बँकेस काहीही माहीती नाही. गैरअर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.3 यांना मार्जीन मनी स्विकारण्‍या बददल सांगितले नाही किंवा तसे अर्जदारास ही सांगितलेले नाही व कूठेलेही आश्‍वासन दिलेले नाही.म्‍हणून अर्जदाराशी कूठलाही संबंध नाही. ट्रॅक्‍टरच्‍या अपघाताबददलचा मजकूर बॅकेस मान्‍य आहे. कूठलेही कारण नसताना अर्जदाराने विनाकारण बँके विरुध्‍द प्रकरण दाखल केलेले आहे. यात बँकेची कोणतीही चूक अथवा सेवा ञूटी अथवा अनूचित प्रकार नाही. अर्जदाराने बँकेच्‍या वकिलाकडून सर्च रिपोर्ट घेऊन कर्जाची मागणी केली. त्‍या कागदपञाची छाननी करुन पाहिले असता बँकेचा गोपनिय अहवाल मागितला तेव्‍हा बँकेचे असे लक्षात आले की, अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 याचेकडून आधीच ट्रॅक्‍टर विकत घेतला आहे व त्‍यांचा वापरही करीत आहेत, त्‍यामूळे अशा जून्‍या ट्रॅक्‍टरला बॅक कर्ज देणार नाही. बँकेच्‍या प्रक्रियेनुसार बँकेचा अहवाल तसेच बँकेचा गोपनीय अहवाल पाहिल्‍यानंतरच बँक कर्ज मंजूर करते व त्‍यासाठी अर्जदाराची शेती बँकेकडे गहाण ठेवावी लागते. प्रस्‍तूत प्रकरणात कर्ज मंजूरीचे कागदपञ, गहाण खत तयार झालेले नाही. त्‍यामूळै आता अर्जदारास ट्रॅक्‍टर दिला असेल तर ती अर्जदार व गैरअर्जदार क्र.3 यांची जबाबदारी आहे. अर्जदार ज्‍या ट्रॅक्‍टरचा वापर करीत आहे त्‍यांचा दि.28.01.2010 रोजी अपघात होऊन त्‍यात एका व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झालेला आहे व यानंतर पोलिसांनी ट्रॅक्‍टर जप्‍त ही केलेला आहे.   यानंतर  अर्जदाराने  सदरचे  ट्रॅक्‍टर परत मिळावे म्‍हणून धर्माबाद
 
 
न्‍यायालयात म्‍हणून अर्ज केला त्‍यावेळी सदरील वाहन हे मूळ प्रकरणाचा निकाल लागेपर्यत कोणत्‍याही प्रकारे गहाण, हस्‍तांतरण विक्री करु नये व रंगात बदल करु नये, असा आदेश दिला आहे. हा आदेशाचे पालन करणे सर्वाना आवश्‍यक आहे.त्‍यामूळे बॅंक कोणत्‍याही परिस्थितीत सदरचा ट्रक्‍टर गहाण करुन घेऊ शकत नाही. अर्जदाराने दाखल केलेले कागदपञ असे दर्शवितात की, अर्जदाराने वकिलाचा अहवाल दि.30.12.2009 रोजी घेतलेले व लगेच दि.28.02.2010 रोजी अपघात झाल्‍यानंतर बँकेकडे कर्ज मागणी केली. त्‍यामूळे गोपनिय अहवालाच्‍या आधारावर कर्ज मंजूर करता येऊ शकत नाही. त्‍यांने दाखल केलेली तक्रार ही खोटी असून गैरअर्जदारास विनाकारण ञास देणारी आहे म्‍हणून रु.10,000/-खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
 
              गैरअर्जदार क्र.3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण दाखल करण्‍यास अर्जदारास कोणतेही कारण नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास वेळोवेळी उत्‍तम सेवा दिलेली आहे असे असतानाही अर्जदाराने खोटी तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून रु.2,13,000/- मार्जीन मनी स्विकारुन त्‍यांचे विनंतीनुसार ट्रॅक्‍टरची डिलेव्‍हरी दिली व उर्वरित रु.5,00,000/- रक्‍कम ते कोणाकडून कर्ज घेऊन किंवा स्‍वतः देण्‍याचे आश्‍वासन दिले या बाबत तक्रारीनुसार गैरअर्जदार क्र.1 यांनी गैरअर्जदार यांना कोणतेही आश्‍वासन दिले नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास ट्रॅक्‍टरची जी रक्‍कम मागितली कारण या व्‍यवहारा बददल अर्जदार यांनी खोटे सांगून ट्रॅक्‍टर  घेतला आहे. दोन महिन्‍यात रक्‍कम देण्‍यात येईल असे सांगितले आहे. सीझन असल्‍याकारणाने ट्रॅक्‍टरचा बराच व्‍यवसाय होईल म्‍हणून सवलत देण्‍याची विनंती केली, परंतु दिलेल्‍या मूदतीत त्‍यांनी रक्‍कम दिली नाही उलट त्‍याचेवर केस केली हे योग्‍य नाही. ट्रॅक्‍टरचा आरटीओ चे टेम्‍पररी पासींग व विम्‍यासाठी गैरअर्जदार क्र.3 यांनी अर्जदाराकडून वेगळी रक्‍कम घेतली नाही. म्‍हणून अर्जदराचा तक्रार अर्ज खोटा असून तो खर्चासह फेटाळण्‍यात यावा असे म्‍हटले आहे.
                 अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 2 व 3 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
 
 
 
          मूददे                                       उत्‍तर
1.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?         नाही.
2.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1 व 2 ः-
              अर्जदार यांनी त्‍यांची शेती आधूनिक तंञाचा वापर करण्‍यासाठी व अधीक उत्‍पन्‍न मिळण्‍यासाठी ट्रॅक्‍टर खरेदीसाठी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे रु.2,13,000/- मार्जीन मनी भरुन रु.7,13,000/- चा जॉन डेरे ट्रॅक्‍टर गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून दि.01.01.2010 रोजी विकत घेतला होता.  त्‍या ट्रॅक्‍टर साठी गैरअर्जदाराने रु.5,00,000/- चे कर्ज देण्‍याचे मान्‍य केले होते व ते दिले नाही म्‍हणून गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे विरुध्‍द तक्रार दाखल केली होती.अर्जदार यांचेकडे गैरअर्जदार यांचा एकच कागद जो की,अनॅक्‍सर 2 दि.30.12.2009 रोजी आहे. यात अर्जदार यांचे शेती जमिन गट नंबर 42,132,229 व 240 मौजे अलूर ता.धर्माबाद येथील जमीनी बददलचा सर्च रिपोर्ट वकिलांनी घेतला होता. हा सर्च रिपोर्ट म्‍हणजे अर्जदाराची शेत जमिन किती आहे, व ती इतर ठिकाणी कूठेही गहाण ठेवली आहे काय ?  ती जमिन किती आहे व त्‍यांची व्‍हॅल्‍यू काय होते व अजून कोणत्‍या प्रकारचा बोजा ज्‍या जमिनीवर नाही हे सांगण्‍यासाठी सर्च रिपोर्ट आहे. हा सर्च रिपोर्ट  म्‍हणजे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी त्‍यांना रु.5,00,000/- चे कर्ज मजूंर केले असे होत नाही. गैरअर्जदार क्र.1 व2 यांचेकडे कर्ज मागणी बददलचा अर्ज दिला होता असा त्‍यांचा अर्जही उपलब्‍ध नाही किंवा गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास रु.5,00,000/- चे कर्ज मंजूर केले होते यावीषयी देखील कोणताही पूरावा नाही. त्‍यामूळे  मूळात गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी त्‍यांचे गोपनिय अहवालाप्रमाणे  अर्जदारास कर्ज मंजूर करावे किंवा करु नये हा त्‍यांचा हक्‍क आहे व या प्रकरणात गैरअर्जदारांनी अर्जदारास कर्ज मंजूर केलेले नाही. त्‍यामूळे येथे अर्जदार हे त्‍यांचे ग्राहक होत नाहीत. गैरअर्जदार क्र.3 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यात हे कबूल केले आहे की, त्‍यांनी अर्जदार यांना मार्जीन मनी घेऊन ट्रॅक्‍टर दिला ते त्‍यांचे सबंधावर व  शब्‍दावर विश्‍वास ठेऊन दिला. यावीषयी गैरअर्जदार क्र.1 यांनी कूठलाही फोन केला नाही किंवा कर्ज देण्‍यासंबंधी कूठलेही आश्‍वासन दिले नाही. अर्जदाराने दोन महिन्‍यामध्‍ये इतर कोणत्‍याही बँकेचे कर्ज घेऊन किंवा स्‍वतः रोख रक्‍कम देऊन दोन महिन्‍याची सवलत गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून घेतली होती. गैरअर्जदार क्र.3 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यात असे सांगितले आहे की, तक्रारदार  म्‍हणतात  याप्रमाणे  त्‍यांनी घेतलेल्‍या नवीन ट्रॅक्‍टर चे त्‍यांनी
 
 
आरटीओ कडे कोणतेही पासींग रजिस्‍ट्रेशन अघापपर्यत केलेले नाही. तक्रारदार म्‍हणतात हे खोटे असून फक्‍त पावती नंबर 270821 द्वारे दि.2.2.2010 रोजी रु.300/- जे भरलेले आहेत ते गैरअर्जदार क्र.3 यांचे नांवाची पावती आहे, अर्जदाराची पावती नाही. ही टेम्‍पररी पासिंगची आहे. यानंतर सात दिवसांत ट्रॅक्‍टरची पासिंग करुन घेणेही हे त्‍यांची जीम्‍मेदारी होती. बजाज अलायन्‍सचा विमा होता यात ट्रॅक्‍टर खरेदी केल्‍यानंतर बिलाचे आधारे इंजिन नंबर व चेसीस नंबर वर विमा कंपनी विमा देऊ शकते. या सर्व कागदपञाचा कर्ज देण्‍यावीषयी कोणताही संबंध नाही. अर्जदाराचा तक्रार अर्ज पाहिला असता त्‍यांची तक्रारच खोटी वाटते. त्‍यातल्‍या त्‍यात आरटीओ पासींग त्‍यात त्‍यांनी यूक्‍तीवादाचे वेळी आरटीओ ने ट्रॅक्‍टरचे पासिंग करुन दिले आहे व गैरअर्जदार क्र.1 यांचे आर सी बूक दाखल केलेले आहे पण त्‍यांचे म्‍हणणे खोटे असून त्‍यांनी मंचाची दीशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे. यात दि.28.01.2010 रोजी ट्रॅक्‍टरचा अपघात झाला व त्‍यात एक व्‍यक्‍ती मरण पावली. अर्जदाराने धर्माबाद न्‍यायालयाकडे धाव घेऊन न्‍यायालयाकडून ट्रॅक्‍टर वापस घेतला व परत देताना न्‍यायालयाने अर्जदारास सांगितले की, सदरील वाहन हे मूळ प्रकरणाचा निकाल लागेपर्यत कोणत्‍याही प्रकारे गहाण, हस्‍तांतरण विक्री करु नये व रंगात बदल करु नये, असे सांगितले. हा सर्व प्रकार गैरअर्जदार क्र.1 यांनी पाहिला, तसेच जमिनी बददलचे अर्जदाराचा सर्च रिपोर्ट पाहिला असता त्‍यांची जमिन ही अतीशय कमी आहे. त्‍या व्‍हॅल्‍यूऐशन द्वारे रु.5,00,000/- चे कर्ज देता येत नाही असाही विचार गैरअर्जदार क्र.1 ने केला असला पाहिजे व ट्रॅक्‍टर विकत घेतल्‍याचे नंतर अर्जदार दोन महिन्‍यांनी गैरअर्जदार क्र.1 कडे जातो व कर्ज मागणी करता व अशा परिस्थितीत त्‍यांनी कर्ज दिले नाही म्‍हणून यांस सेवेतील अनूचित प्रकार म्‍हणता येणार नाही. एकंदर सर्व दस्‍ताऐवज पाहिल्‍यानंतर असे लक्षात येते की, गैरअर्जदार क्र.3 यांचे रु.5,00,000/- अर्जदार यांना देणे बाकी आहे. तेव्‍हा त्‍यांनी तगादा लाऊ नये म्‍हणून न्‍याय मंचात प्रकरण दाखल केले, असे करुन त्‍यांनी वेळ काढू धोरण स्विकारले. म्‍हणून एकंदर अर्जदाराची तक्रारच खोटी असून ती अनूचित आहे असेच म्‍हणावे लागेल व त्‍यांनी नाहक काही कारण नसताना सर्व गैरअर्जदार यांना या प्रकरणात ओढले आहे. गैरअर्जदार क्र.3 यांना तर त्‍यांनी पैसे तर दिलेच नाहीत पण या प्रकरणात गोऊन मानसिक ञासही दिला आहे. म्‍हणून एकंदर अर्जदाराचा अर्ज आम्‍ही खोटा ठरवित आहोत व सर्व गैरअर्जदार यांना अर्जदार यांनी ञास दिल्‍याबददल Compensatory Cost लावण्‍याचा आदेश करीत आहोत.
 
 
 
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                             आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील अटीवर खारीज करण्‍यात येतो.
1.
2.                                         हा निकाल लागल्‍यापासून पासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना एकञित Compensatory Cost  म्‍हणून रु.4,000/- संयूक्‍तरित्‍या दयावेत तसेच गैरअर्जदार क्र.3 यांना Compensatory Cost म्‍हणून  रु.6,000/- दयावेत.
2.
3.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                                     श्री.सतीश सामते   
   अध्‍यक्ष                                                                                  सदस्‍य.
 
 
 
 
 
जयंत पारवेकर
लघूलेखक

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] PRESIDING MEMBER