ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –179/2010 तक्रार दाखल तारीख –07/12/2010
निकाल तारीख – 16/07/2011
-------------------------------------------------------------
अबीदा हुसेनखॉ पठाण
वय 55 वर्षे,धंदा घरकाम ... तक्रारदार
रा.मुर्शदपुर ता.आष्टी जि.बीड
विरुध्द
1. मॅनेजर,
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कं. लि..
मार्फत शाखाधिकारी
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कं. लि
शाखा जालना रोड, बीड ता.जि.बीड सामनेवाला
2. मॅनेजर,
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कं. लि
अहमदनगर ता.जि. अहमदनगर.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड. सयद साजेद अली.
सामनेवाले तर्फे :- अड. एस.ऐ.चव्हाण.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार आष्टी येथील रहिवासी असून सामनेवाला नंबर 1 ही सामनेवाला नंबर 2 ची शाखा आहे.
तक्रारदाराने शेती व्यवसायासाठी सोनालिका ट्रक्टर सामनेवाला नंबर 2 कडून कर्ज घेण्याचे ठरले. तेव्हा सामनेवाला नंबर 2 कडे तक्रारदार गेली असता त्यांनीतक्रारदारांना सोनालिका ट्रक्टर वर रक्कम रु.2,90,000/- कर्ज देण्याची तयारी दर्शविली. तेव्हा सामनेवाला नंबर 2 ने रक्कम रु.2,90,000/- ची परतफेड एकूण 45 हप्त्यामध्ये करण्या बाबत तसेच कर्ज रक्कमेवर द.सा.द.शे. 13.63 टक्के व्याज 45 महिन्याकरिता राहिल. तसेच पहिल्या हप्त्याची परतफेड दि.06.11.2008 रोजी राहिल. पहिले 24 हप्ते दरमहा रु.12,782/-, दूसरे 15 महिने रु.5843/-, तिसरे पाच महिने दरमहा रु.7304/- व शेवटचा हप्ता रु.7193/- चा राहिल असे सांगितले. म्हणजेच 45 महिन्याचे व्याज रक्कम रु.1,48,226/- मुददलासहित रु.4,38,226/- दि.10.07.2012 पर्यत भरण्या बाबत सूचना केली.
सामनेवाला नंबर 2 ने सूचना केल्याप्रमाणे सर्व दस्ताऐवजाची पुर्तता तक्रारदाराने सामनेवाला नंबर 2 कडे केली.त्यानंतर सामनेवाला नंबर 2 यांनी तक्रारदारास ट्रॅक्टर वर कर्ज रक्कम रु.,290,000/- दिले. तक्रारदाराने सोनालिका ट्रॅक्टर घेतला. त्यांचा नंबर एम.एच.-23-बी-7687 आहे.
तक्रारदाराने वेळोवेळी नियमाप्रमाणे हप्त्याची रक्कम सामनेवाला नंबर 2 कडे जमा केली. त्याबददल सामनेवाला नंबर 2 ने दिलेल्या पावत्या आहेत. तक्रारदाराने हप्त्याची रक्कम भरण्यास उशिर झाला तर पेनाल्टी रक्कमेसह हप्ता भरले आहेत. तक्रारदाराने एकूण 17 महिने सामनेवाला नंबर 2 कडे रक्कम रु.1,74,180/- पेनाल्टी रक्कम रु.4150/- जमा केले.
तक्रारदारास घरगुती व वैद्यकीय उपचार झाले तातडीने रक्कमेची गरज भासली तेव्हा तक्रारदाराने ट्रॅक्टर सोनालिका विक्रीस काढला,तेव्हा सामनेवाला नंबर 2 च्या नाहरकत प्रमाणापत्राची गरज भासली. तेव्हा तक्रारदार ही सामनेवाला नंबर 2 कडे गेली. तिने खातेवही पाहिली असता सामनेवाला नंबर 2 यांनी तक्रारदाराची खातेवहीतील नोंद व्यवस्थितपणे घेतल्या नसल्याचे आढळून आले. सामनेवाला नंबर 2 ने सांगितले की, नाहरकत प्रमाणपत्र पाहिजे असेल तर रक्कम रु.2,25,000/- भरावे लागतील त्याचेशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही. रक्कमेची अत्य्रत गरज होती म्हणून तक्रारदाराने ट्रॅक्टरचा विक्री ठराव केला व मागितलेली रक्कम रु.2,25,000/- दि.25.03.2010रोजी भरली. त्यानंतर सामनेवाला नंबर 2 यांनी जमा पावती व नाहरकत प्रमाणपत्र दिले. तक्रारदाराचे अडाणीपणाचा सामनेवाला यांनी फायदा घेऊन तक्रारदाराकडून रक्कम रु.49,033/- जास्तीचे घेतले आहेत व तक्रारदाराची फसवणूक केली.
म्हणून तक्रारदारांनी सामनेवाला नंबर 2 यांना दि.23.07.2010 रोजी नोटीस पाठवून रक्कम रु.49,033/- ची मागणी केली. त्यांना नोटीस प्राप्त झाली परंतु तक्रारदारांना रक्कम अद्यापही मिळाली नाही.
सामनेवाला यांनी तक्रारदारास खालील रक्कम सेवेत कसूर केल्यामुळै द्यावी,
1. तक्रारदारास सामनेवाले यांचेकडून त्यांनी तक्रारीची
घेतलेली रक्कम तक्रार दाखल केलेल्या तारखेपासुन
ते संपुर्ण रक्कम वसुल होईपर्यत द.सा.द.शे.18 टक्के
व्याज मिळणेस पात्रआहे. रु.49,033/-
2. तक्रारदारास सामनेवाला यांचेकडुन सदरची रक्कम
वसुलीकामी सामनेवाला नंबर 2 यांच्याकडे ब-याच
वेळा जावे लागले तसेच वकिलामार्फत त्यांना
नोटीस पाठवावी लागली त्यापोटी तक्रारदार हिस सोसावा
लागलेला खर्च. रु.3000/-
3. मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.40,000/-
4. तक्रारीचा खर्च रु.5000/-
--------------
एकूण रु.97,033/-
--------------
विनंती की, सामनेवाला नंबर 1 व 2 यांनी तक्रारीदाराकडून जास्तीची घेतलेली रक्कम रु.49,033/- देण्या बाबत आदेश व्हावेत, वर नमुद केल्याप्रमाणे रक्कम रु.49,033/- द.सा.द.शे.18 टक्के व्याज दराने तक्रार दाखल केल्यापासून संपूर्ण रक्कम वसुल होईपर्यत देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला नंबर 1 व 2 यांनी त्यांचे एकत्रित खुलासा दाखल केला. तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तक्रारीतील सर्व व्यवहार आणि तक्रारदारास कारण अहमदनगर येथे झालेले आहे. सामनेवाला क्र.1यांचे या व्यवहाराशी कोणताही संबंध नाही.त्यामुळे सदरची तक्रार न्यायमंचात चालू शकत नाही.तक्रारदार आणि सामनेवाला नंबर 2 यांचेत कर्जाचे संदर्भात करार
AHNGRO 810310002 झालेला आहे.त्यावेळी तक्रारदारांनी मान्य केले होते की,कर्जाची परतफेड तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे तक्रारदाराने करावयाची होती. सामनेवाला नंबर 2 यांनी तक्रारीच्या तोंडी विनंतीवरुन विमा पॉलिसी नंबर 10003/31/10/123219 कालावधी 26.09.2009 ते 25.09.2010 चा घेतलेला होता व त्यांची रक्कम तक्रारदाराकडे येणे होती. तसेच तक्रारदाराने हप्ता उशिरा भरण्यास त्या बाबतचा जादा आकार घेण्या बाबतची अट करारात नमुद आहे. त्यानुसार तक्रारदारांना रक्कम देणे बंधनकारक होते. त्यासाठी तक्रारदारांनी दंड देणे आवश्यक आहे. तक्रारदारांनी एकूण 17 हप्ते रु.1,74,180/-चे दि.08.03.2010 पर्यत भरलेले आहेत. वास्तवात तक्रारारांनी रक्कम रु.2,17,294/- भरणे आवश्यक होते त्यामुळे तक्रारदाराकडे थकबाकी रक्कम रु.43,114/- दि.08.03.2010पर्यत होती. तक्रारदारांनी वेळेवर हप्ते भरले नाहीत त्यामुळे जादा आकार रक्कम रु.4044/- देणे बंधनकारक झाले.तक्रारदारांनी तक्रारीसोबत पावत्या दाखल केलेल्या आहेत त्यातील दोन पावत्या दि.02.02.2009 पावती नंबर686234 रु.12800/-आणि पावती नंबर 1085408 दि.14.12.2009रक्कम रु.20,000/- ची सामनेवालाचे क्षेत्रीय अधिकारी यांनी तात्पु़ पावत्या दिलेल्या आहेत. त्या पावत्याची नोंद दि.21.01.2009 रोजी दाखविण्यात आलेले आहे.कारण दि.31.01.2009 रोजीला शनिवार होता आणि महिन्याचा व्यवहार बंद करण्याचा दिवस होता म्हणून सदरची रक्कम दि.31.01.2009 रोजी जमा दाखवलेले आहे.माहे मार्च मध्ये तक्रार कर्ज परतफेडीसाठी आली असती सामनेवाला नंबर 2 यांनी तक्रारदारांना रक्कम रु.2,25,648/- ही कर्ज परतफेड रक्कम दाखवली त्यात रक्कम रु.43,114/- दि.08.03.2010, जादा चार्ज रक्कम रु.4044/- आणि पुढील मुददल रु.1,67,598/- विमा रक्कम रु.3864/- आणि कर्ज मूदतपूर्व बंद करण्याचा दंड रक्कम रु.5027/- आणि कागदपत्र व इतर आकार रु.2,000/-सदरच्या रक्कमेचे तक्रारदारांना स्पष्टीकरण दिले. तक्रारदार सदर रक्कमेवर कर्ज परतफेड करण्यास तयार झाली म्हणून तक्रारदाराच्या विनंतीवरुन सदरचे कर्ज प्रकरण रु.2,25,000/- उर्वरित रक्कम रु.608/- सूट देऊन मंजूरी देण्यात आली. तक्रारदाराला रक्कम रु.2,25,000/- भरण्या बाबत कोणतीही तक्रार नव्हती त्यांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आली आणि आता तक्रारदार जादा रक्कम रु.49,033/- भरण्या बाबतची तक्रार करीत आहेत. सदरचे तक्रारीतील विधाने ही विसंगत आहेत. सामनेवाला नंबर 2 यांनी तक्रारदाराकडून कोणतीही जादा रक्कम घेतलेली नाही. या प्रकरणात सामनेवालाच्या सेवेत कसूर नाही.सदरची तक्रार खोी दाखल केली असल्यामुळे ती खर्चासह रदद करुन सामनेवाले यांना रु.25,000/- खर्चासह देण्या बाबत आदेश व्हावेत.
तक्रारदाराची तक्रार,शपथपत्र, दाखल कागदपत्र, तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद, सामनेवाला यांचा खुलासा,शपथपत्र, दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले.सामनेवाला यांचे विद्वान वकील एस.ऐ.चव्हाण यांचा यूक्तीवाद ऐकला.ै
तक्रारीतील कागदपत्र पाहता तक्रारदारांनी ट्रॅक्टरसाठी सामनेवालेकडून रक्कम रु.2,90,000/- कर्ज घेतले होते त्यांची एकूण परतफेड 45 हप्त्यामध्ये करावयाची होती. सदर कर्जावरील व्याजाचा दर द.सा.द.शे. रु.13.63 टक्के व या संदर्भात कर्ज परतफेडीचे तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे हप्ते सामनेवाला यांनी नमुद केले आहे व या सर्व बाबी तक्रारदार यांना मान्य होत्या व तक्रारदारांनी त्या मान्य असल्यामुळेच तक्रारदार व सामनेवाला नंबर 2 यांचेत कर्जाचा करार झालेला होता.
सदरचा सर्व व्यवहार नगर येथे झाला होता व यासंदर्भात सामनेवाला नंबर 1 यांचे कार्यालयात कोणताही व्यवहार झाला नाही त्यामुळे सदरचे प्रकरण न्यायमंचात चालविण्याचा अधिकार नाही असा जोरदार आक्षेप सामनेवाला यांनी घेतलेला आहे. या संदर्भात तक्रारदाराच्या शपथपत्रात त्यांचे कोणतेही अपिल आलेले नाही व तक्रारदारांनी सदरची बाब नाकारलेली नाही.सदरची बाब तक्रारदाराने वर शपथपत्रात नाकारलेली नाही परंतु यूक्तीवादात तक्रारदारांनी नमूद केले आहे की, श्रीराम ट्रेडींग कंपनी लि. यांचे सोबत करार केलेला आहे सदर कंपनीचे मुख्य कार्यालय चैनई येथे आहे. कंपनीच्या शाखा अहमदनगर, बीड याठिकाणी आहेत त्यामुळे प्रचलित कायदयाप्रमाणे तक्रारदारांना बीड येथे तक्रार दाखल करता येते व तक्रार चालविण्याचा अधिकार न्यायमंचास आहे.
सामनेवाला नंबर 2 ची शाखा बीड येथे कार्यरत असल्याने जरी बीड शहरात किंवा सदर शाखेत कर्जाचा संबंधी कोणताही व्यवयहार झाला नसला तरी ग्राहक सरंक्षण कायदा 2(बी) प्रमाणे सामनेवालांची बीड शहरात शाखा असल्याने सदरची तक्रार न्यायमंचात चालू शकते असे न्यायमंचाचे मत आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी सदरचा आक्षेप ग्राहय धरणे उचित होणार नाही
तक्रारदारांनी व्याजासहीत सामनेवालाकडे दि.14.07.2012 पर्यत रक्कम रु.4,38,226/- भरले आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी 2010 मध्ये त्यांना ट्रॅक्टर विकावयाचे असल्याने सदर कर्जाची परतफेड केलेली आहे. सदर कर्जाची परतफेड ही दि.8.03.2010 पर्यत त्या दिवसअखेर त्यांचेकडे एकूण रक्कम रु.2,12,294/- बाकी असताना तक्रारदाराचा कर्ज भरणा रु.1,74,180/- झालेला होता. व त्यामुळे सदर थकबाकी रक्कम रु.43,114/- आणि नियमित हप्ता न भरल्याने जादा चार्ज रक्कम रु.4044/- व तसेच विमा हप्त्याची रक्कम रु.3864/-तसेच तक्रारदाराचे कर्ज मूदतपूर्व परतफेड करीत नसल्याने कराराप्रमाणे दंड वरु.5027/- व कागदपत्र आकार रु.2000/- अशी एकूण रु.2,25,648/-व तक्रारदाराच्या कर्ज परतफेडीची रक्कम सामनेवाला यांनी सांगितली व ती तक्रारदारांना मान्य झाल्याने सदर रक्कम रु.648/- सुट घेऊन तक्रारदारांनी रक्कम रु.2,25,000/- चा भरणा सामनेवाला नंबर 2 कडे केलेला आहे.
या संदर्भात तक्रारदारांना ट्रॅक्टर विकणे अत्यंत गरजेचे होते व त्या संदर्भात तक्रारदारांना ट्रॅक्टर विक्री करीत असताना सदर कर्जाचे संदर्भात नाहरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते. त्यासाठी कर्जाची परतफेड करणे आवश्यक होते असे तक्रारदाराच्या कथनावरुन दिसते व या संदर्भात तक्रारदारांनी सामनेवाला नंबर 2 यांना कर्ज परतफेडीचे संदर्भात काढून दिलेली रक्कम नाखुशीने वा नाराजीने भरली असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे नाही. वरील सर्व रक्कमेचा तपशिल पहिले असता सदरचा तपशिल हा करारातील अटी व शर्ती प्रमाणेच रक्कमा आकारलेल्या आहेत व या संदर्भात तक्रारदाराचा कोणताही आक्षेप नाही. तक्रारदाराचा केवळ आक्षेप सामनेवाला यांनी जास्तीची रक्कम घेतली व जास्तीची देत असताना तक्रारदारांनी त्या संदर्भात तक्रार कायम ठेऊन रक्कम भरल्याचे दिसत नाही किंवा तक्रारदाराचे तसे म्हणणे नाही. कर्ज परतफेड करीत असताना तक्रारदारांनी रक्कम भरुन गेल्यानंतर नंतर विचाराने तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केलेली आहे. कर्ज परतफेड मान्य झाल्यामुळे तक्रारदाराने रक्कम भरली त्यावेळी तक्रारदाराची त्या संदर्भात कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे तक्रारदारांना या ठिकाणी estoppell या तत्वाची बांधा येते असे या मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारदारांना या संदर्भात तक्रार करता येत नाही. वरील सर्व रक्कमेचा तपशिल तपासला असता सामनेवाला यांने तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याचे स्पष्ट होत नाही.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. तक्रार रदद करण्यात येते.
1.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड