जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/174 प्रकरण दाखल तारीख - 25/06/2010 प्रकरण निकाल तारीख – 02/02/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. बाबाराव पि. किशनराव गोरे वय 32 वर्षे, धंदा वहातूक व्यापार अर्जदार. रा. कामठा (खु) ता.जि. नांदेड. विरुध्द. मॅनेजर, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लि. रा.तिसरा माळा, जानकी चेंबर्स गैरअर्जदार जानकी नगर, हिंगोली रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.जी.के.पोफळे गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमुख, सदस्या ) गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. थोडक्यात अर्जदाराची तक्रार अशी की, अर्जदार हे वाहतूक व्यापार करण्याचा व्यवसाय करतात. गैरअर्जदार हे व्यावसायीकांना ट्रक, वाहणे, वगैरे खरेदी करण्यासाठी कर्जाऊ अर्थ पुरवठा करतात. अर्जदाराने वर्ष 2007 मधे ट्रक खरेदी कण्यासाठी गैरअर्जदाराकडून रु.11,70,000/- चे कर्ज 7.17 टक्क्याने घेतले व सदर कर्ज 45 हप्त्यामध्ये परतफेड करावयाचे ठरले होते. अर्जदाराने दि.10.12.2007 रोजी पहिला हप्ता भरला. अर्जदाराने 29 हप्त्याची परतफेड रु.9,34,000/- ची केली. अर्जदाराकडे रु.3 ते 4 लाख बाकी नीघण्याची शकयता आहे.. सर्व कूटूंब हे अर्जदारावर अवलंबून होते. अर्जदाराची खूप आर्थिक ओढाताण झाली. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे हप्ते भरल्याचा हीशोब दि.21.6.2010 रोजी मागितला असता गैरअर्जदाराने त्यांस पूर्ण 45 हप्ते भरा व आजपर्यत भरलेल्या हप्त्यावरील जास्तीचे दंड व व्याज मिळून जवळपास रु.55,000/- बाकी आहेत. अर्जदाराने करारनामा दाखवा म्हणून विनंती केली पण त्यांनी करारनामा दिला नाही.अडचणीमूळे काही हप्ते वेळेवर भरणे झाले नाही. अर्जदार यांनी हप्ते न भरल्यामूळे गैरअर्जदार हे ट्रक जबरदस्तीने ताब्यात घेतील त्यामूळे अर्जदार व त्यांचे कूटूंबावर उपासमारीची वेळ येईल म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, ट्रक गेरअर्जदाराने ताब्यात घेऊ नये म्हणून मनाई आदेश दयाव. यामध्ये गैरअर्जदाराचे काहीही नूकसान होणार नाही. तसेच अर्जदाराची मागणी आहे की, अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह मंजूर करावा व मानसिक ञासाबददल खर्च द्यावा. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार ही खोटी असून ती फेटाळावी असे म्हटले आहे. अर्जदाराने रु.11,70,000/- चे कर्ज घेतले आहे व गैरअर्जदाराच्या हक्कात लोन कम हायपोथीकेशन अग्रीमेंट करुन दिला आहे. त्यामूळे सदर करारानुसार लवाद नेमण्याचा करार झाला आहे. म्हणून या मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही. कर्जाच्या रक्कमेवर फलॅटरेटने 7.65 टक्के व्याजदर ठरला होता. करारनाम्याप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दि.10.09.2010 रोजी रक्कम रु.10,70,1925/- जमा करणे आवश्यक होते परंतु अर्जदाराने रु.9,34,000/- जमा केलेले आहेत. अर्जदाराने जरी वरील रक्कम भरली असली तरी त्यांचेकडून रु.5,71,377/- येणे बाकी आहे. कर्ज न भरण्यासाठी दाखविलेली कारणे ही खोटी आहेत व त्याकरिता कोणतेही कागदपञे अर्जदाराने दिलेली नाहीत.अर्जदाराने केव्हाही ठरलेल्या तारखेवर ठरलेली रक्कम भरलेली नाही व कर्जाची रक्कम भरण्यास जाणीवपूर्वक कसूर केला आहे. अर्जदाराने वेळेत कर्जाचा हप्ता न भरल्यामूळे नियमाप्रमाणे विलंब व्याजाची आकारणी केली आहे ती कराराप्रमाणे केलेली आहे.गैरअर्जदार यांनी ट्रकचा ताबा घेण्याचा आजपर्यत प्रयत्न केलेला नाही. अर्जदार हा कर्जाची रक्कम बुडविण्याच्या हेतूने तक्रार दाखल केली असून मनाईहूकूम दिल्यास गैरअर्जदार हे कर्जाची रक्कम वसूलच करु शकणार नाही. वाईट हेतूने दाखल केलेली तक्रार ही खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञाप्रमाणे व दोन्ही बाजूचा यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ? होय. 2. अर्जदाराने मागणी केलेली नूकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार बांधील आहेत काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून ट्रक क्र.एम.एच.-22/एन-719 साठी अर्थपुरवठा घेतला होता म्हणजे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत व गैरअर्जदार यांनी सूध्दा हे मान्य केले आहे की ट्रक घेण्यासाठी अर्जदार व त्यांचे मध्ये करार झालेला आहे म्हणून अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. त्यास्वत अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये झालेल्या कराराप्रमाणे अर्जदाराने दि.10/12/2007 पासुन प्रत्येक महीन्याला रु.33,455/- रुपये गैरअर्जदार यांचेकडे भरण्याचे मान्य केले होते. अर्जदाराने घेतलेले कर्ज रु.11,70,000/- आहे. अर्जदाराने ज्या तारखेला तक्रार दाखल केली दि.25/06/2010 तारखेला अर्जदाराने 31 हपते भरणे आवश्यक होते म्हणजेच दि.10,37,105/- एवढी रक्कम अर्जदाराने भरणे आवश्यक होते त्या जागी दि.10/09/2010 पर्यंत अर्जदाराने रु.11,70,925/- भरावयाच्या ऐवजी रु.9,34,000/- भरले त्यामुळे उर्वरीत रक्कमेवर त्यास रु.55,000/- दंड व्याज लागलेले आहे असे सकृतदर्शनी वाटते. तरी देखील अर्जदाराने गैरअर्जदार यांची बरेचशी रक्कम परतफेड केलेली आहे. उर्वरीत हप्ते अर्जदाराने नियमीत व आजपर्यंत लागलेल्या दंडाचे समांतर हप्ते पाडुन गैरअर्जदाराने अर्जदाराकडुन नियमीत हप्त्यासोबत प्रती महिना भरुन घ्यावेत. अर्जदाराचा ट्रक गैरअर्जदारांनी ओढुन नेला तर त्याची महिना प्राप्ती बंद होईल व तो कर्जही फेडू शकणार नाही या गोष्टीचा गैरअर्जदाराने विचार करुन नियमाप्रमाणे लागलेले व्याज त्यांस लावावे पण दंडव्याजाचे हप्ते पाडून त्यांचेकडून नियमित हप्त्यासोबत घ्यावेत. गैरअर्जदार यांनी अर्जदारास कर्ज दिलेले आहे हे बरोबर आहे पण त्यास्तव तो गैरअर्जदारास व्याज देत आहे यांचाही विचार गैरअर्जदारांनी करावा व अर्जदारास सन्मानाची वागणूक दयावी. दंड व्याज नियमाप्रमाणे लावून त्यांचे समांतर हप्ते अर्जदारास करुन देऊन त्यांचेकडून कर्ज हप्ते स्विकारावेत या नीर्णयास्तव हे मंच आलेले आहे. अर्जदाराने कर्ज घेतेवेळी केलेल्या कराराचे पालन करावे. कर्ज कमी भरल्यामुळे लागलेल्या दंड व्याजातून अर्जदार स्वतःची सुटका करुन घेऊ शकत नाही. आदेश 1. गैरअर्जदार यांनी लावलेल्या दंड व्याजाचे समांतर हप्ते करुन देऊन अर्जदाराकडून ते भरुन घ्यावेत.1. 2. अर्जदाराने करार केल्याप्रमाणे नियमित हप्ते भरावेत.2. 3. खर्च ज्यांचे त्यांने सहन करावा.3. 4. उभयपक्षांना निकाल कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक.
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |