निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 05/09/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 25/09/2012
तक्रार निकाल दिनांकः- 25/10/2013
कालावधी 01वर्ष. 01 महिना.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
बालासाहेब पिता रामराव लाड. अर्जदार
वय 48 वर्षे. धंदा.शेती व्यापार. अॅड.दिपक बलसेकर.
रा.माळसोन्ना ता.जि.परभणी.
विरुध्द
मा.व्यवस्थापक. गैरअर्जदार.
मे.श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कं.लि. अॅड.ए.जी.सोनी.
शाखा परभणी बरदाळे कॉम्पलेक्स,
पहिला मजला, तृप्ती मंगल कार्यालय जवळ,
वसमत रोड, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराची ट्रक विना नोटीस जप्त केली व अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची अर्जदाराची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हामाळसोन्ना ता.जि.परभणी येथील रहिवासी आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून हायर परचेस अॅग्रीमेंट नुसार ट्रक खरेदी करण्याचा करार केला. त्यानुसार गैरअर्जदाराने अर्जदारास 4,00,000/- मंजूर केले, अर्जदाराचे म्हणणे आहे की, अर्जदार व गैरअर्जदारा मध्ये दिनांक 14/01/2008 रोजी लेखी करार झाला व कराराव्दारे 45 हप्त्यात प्रत्येकी हप्ता 13,033/- रु.चा सदरचे कर्ज परतफेड अर्जदाराने करण्याचे ठरले. अर्जदाराने वाहन ट्रक क्रमांक MH - 21 – 9934 (Tata Model – 407 ) करीता 1,00,000/- गुंतवणूक करुन सदर वाहनाची Body Building व इतर service करीता 50,000/- रु.खर्च केले.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने चार ते पाच महिन्याच्या आतच अर्जदाराने सदर गाडीचे हप्ते न भरलेमुळे अर्जदारास कोणतेही नोटीस न देता अर्जदाराचे सदर वाहन जप्त केले व लिलाव करुन अर्जदाराच्या परस्पर अर्जदाराच्या ट्रकची विक्री केली व गैरअर्जदाराने सदर वाहनाची किंमत रेकॉडला कमी दाखविली. अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदाराचा भरपूर फायदा करुन दिला व वाहन विक्री करुन दिले. अशा परिस्थितीत गैरअर्जदार कंपनीने अर्जदारा विरुध्द परभणी येथील न्यायालयात Negotiable instrument Act अंतर्गत कलम 138 अन्वये तक्रार दाखल केली ज्या तक्रारीचा क्रमांक 1160/09 असा आहे. सदर केस 2,27,585/- रु. बद्दल होती सदर केस चालू असतांना गैरअर्जदाराने अर्जदाराच्या पश्चात 2,27,585/- रु.साठी दिनांक 23/03/2012 रोजी Arbitration Act प्रमाणे Arbitrator नियुक्त करुन 2,23,585/- च्या अवार्ड अर्जदारा विरुध्द करुन घेतला.
अर्जदाराचे म्हणणे की, मार्च 2012 मध्ये अर्जदार व गैरअर्जदार मध्ये चर्चा होवुन 1,10,000/- मध्ये तडजोड झाली होती सदर रक्कमे पैकी अर्जदाराने दिनांक 02/05/2012 रोजी 8500/- भरायचे ठरले, नंतर 35,000/- दिनांक 02/09/2012 रोजी व उर्वरित रक्कम नोव्हेंबर 12 पूर्वी भरायचे ठरले असतांना व ठरल्या प्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे 8,500/- रु.भरले. अर्जदाराचे म्हणणे की, दिनांक 27/08/2012 रोजी अर्जदार गैरअर्जदाराकडे गेला व नुकसान भरपाई मागीतली व गैरअर्जदाराने स्पष्टपणे नुकसान भरपाई देण्याचे नाकारले. म्हणून सदर तक्रार दाखल करणे भाग पडले अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करण्यात यावी व गैरअर्जदाराने अर्जदाराचे वाहन विना नोटीस जप्त केलेमुळे झोलेली नुकसान भरपाई 1,50,000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा व मानसिक त्रासापोटी 10,000/- व तक्रार अर्जाचा खर्चापोटी 5000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टायर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केले आहे.अर्जदाराने नि.क्रमांक 3 वर 1 कागदपत्राच्या यादीसह 1 कागदपत्रे दाखल केले आहे. ज्यामध्ये अर्जदाराने गैरअर्जदारास दिनांक 13/08/2012 रोजी पाठविलेल्या नोटीसची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे.
मंचातर्फे लेखी निवेदन सादर करण्यासाठी गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 13 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून 4 लाखाचे कर्ज मंजूर करुन घेतले व्याजदर 11.66 प्रतिवर्षी असा होता व प्रति महा हप्ता रु. 13033 प्रमाणे होते व कर्जफेड 45 हप्त्यामध्ये परतफेड करण्याचे ठरले. सदरचा कालावधी 15/2/2007 पासून 15/10/2010 पर्यंतचा ठरला होता, ज्याची एकुण रक्कम व्याजासह 5,86,485/- एवढी होती, परंतु अर्जदाराने कारारा प्रमाणे हप्त्याची परतफेड केली नाही, म्हणून गैरअर्जदाराने सर्व कायदेशिर गोष्टीचे पालन करुन अर्जदाराचे वाहन जप्त केले व वाहनाची विक्री केली व सदरील माहिती अर्जदारास वेळोवेळी कळविली. तसेच गैरअर्जदाराचे म्हणणे आहे की, अर्जदाराने सदरील वाहन व्यावसायीक कारणासाठी घेतले होते, त्यामुळे ग्राहक या संज्ञेत अर्जदार बसत नाही. म्हणून मंचास सदर केस चालवण्याचा अधिकार नाही. अर्जदाराने कोणतेही कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केला नाही, अर्जदाराने हप्त्याची परतफेड नियमीतपणे केली नाही. त्यामुळे अर्जदार Defaulter आहे व अर्जदाराची तक्रार ही खोटी आहे म्हणून गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खारीज करण्यात यावी. व अर्जदारास दंड लावण्यात यावा.
गैरअर्जदाराने नि.क्रमांक 14 वर 6 कागदपत्रांच्या यादीसह 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये Copy of Statement of Loan, Copy of Valuation report, Copy of Notice issued by Respondent to Complainant, Copy of Postal, Copy of Notice issue by Respondent to complainant, Copy of Post कागदपत्रे दाखल केली आहे. व तसेच गैरअर्जदाराने नि.क्रमांक 19 वर 1 कागदपत्रांच्या यादीसह 1 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये Arbitration चा Award ची नक्कल दाखल केली आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदाराची ट्रक क्रमांक MH - 21 – 9934
अर्जदारास नोटीस न देता जप्त करुन विक्री करुन अर्जदारास
सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराने गैरअर्जदाराकडून Hire Purchaser Agreement प्रमाणे एक ट्रक ज्याचा क्रमांकMH - 21 – 9934 हा 4,00,000/- रु. कर्जाव्दारे खरेदी केला होता व सदर कर्जाची परतफेड 45 हप्त्यामध्ये प्रत्येकी हप्ता 13,033/- अर्जदाराने करावयाचे ठरले होते ही बाब अॅडमिटेड फॅक्ट आहे.
फक्त वादाचा मुद्दा हा आहे की, गैरअर्जदाराने अर्जदाराचा ट्रक अर्जदारास नोटीस न देता जप्त करुन विक्री केले व त्यामुळे अर्जदाराचे 1,50,000/- रु. चे नुकसान झाले. अर्जदाराचे हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही. कारण गैरअर्जदाराने अर्जदारास वाहनाच्या हप्त्याची परतफेड केली नाही, म्हणून अर्जदाराचे वाहन जप्ती बाबत गैरअर्जदाराने अर्जदारास लेखी कळविले होते ही बाब नि.क्रमांक 14/4 वर दाखल कलेल्या दिनांक 14/07/2008 च्या नोटीस प्रत व नि.क्रमांक 14/6 वर दाखल केलेल्या 15/11/2008 च्या नोटीस प्रत वरुन सिध्द होते, तसेच अर्जदारा विरुध्द केस नं. 54/11
Arbitrator ने दिनांक 23/03/2012 रोजी अर्जदार हा गैरअर्जदाराचा Defaulter असल्यामुळे त्याचे विरुध्द 2,27,585/- रु. चा Award Pass केला ही बाब नि.क्रमांक 20 वर दाखल केलेल्या Award प्रत वरुन सिध्द होते.
अर्जदाराने गैरअर्जदाराकडे ठरल्या प्रमाणे संपूर्ण हप्त्याची परतफेड केली या बद्दलचा कोणताही कागदोपत्री पुरावा अर्जदाराने मंचासमोर दाखल केला नाही. यावरुन हे सिध्द होते की, अर्जदार हा गैरअर्जदाराचा Defaulter होता, म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराचे वाहन जप्त करुन योग्य त्या किमतीस विक्री केले. अर्जदाराचे म्हणणे की, सदर गैरअर्जदाराच्या कृत्यामुळे अर्जदारास 1,50,000/- रु. चे नुकसान झाले या बद्दल अर्जदाराने कोणताही कागदोपत्री पुरावा मंचा समोर आणला नाही. यावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदाराने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही वा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला नाही, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.