मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार अर्ज क्रमांक : 02/2011 तक्रार अर्ज दाखल झाल्याचा दि.05/01/2011 तक्रार अर्ज निकाली झाल्याचा दि.29/01/2011 श्री.एम.एम.गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या श्रीमती रुखसाना सुलतान मालगुंडकर रा.मु.दत्तनगर, देवरुख, ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द 1. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कं.लि., करीता व्यवस्थापक पुरुषोत्तम पाटील शाखा कोल्हापूर देवेंद्र भवन, उषा टॉकिज शेजारी, दुसरा मजला, युको बँकेचेवर, कोल्हापूर. 2. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कं.लि., करीता व्यवस्थापक गणेश पाटील शिर्के प्लाझा, पहिला मजला, शिर्के पेट्रोल पंपाजवळ, जयस्तंभ, रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ एस.एच.पेडणेकर -: नि.1 वरील आदेश :- 1. विरुध्द पक्षाच्या श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कं.लि., यांनी तक्रारदार हिचेकडून कर्जाची रक्कम स्विकारली नसलेमुळे व ना-हरकत दाखला दिला नसलेमुळे सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2. सदरचे प्रकरण आज मंचासमोर ऍडमीशन हिअरींगसाठी ठेवण्यात आले असून तक्रारदार व त्यांचे वकिल मंचासमोर हजर आहेत. दरम्यान तक्रारदाराचे तक्रारीमध्ये काही त्रुटी निदर्शनास आलेमुळे तक्रार अर्जात आवश्यक तो बदल करायचा असलेचे कारणाखाली तक्रारदाराने नि.9 वर पुरशीस दाखल केली असून सदरची तक्रार मागे घेत असलेचे नमूद केले आहे. 3. तक्रारदारास नव्याने दुरुस्त तक्रार दाखल करण्याची परवानगी देणेचे अटीवर तक्रारदार सदरची तक्रार मागे घेत असलेचे तक्रारदाराने तिच्या नि.9 वरील पुरशीसमध्ये नमूद केले असून आम्ही सदरचे प्रकरण तक्रारदाराचे पुरशीसनुसार निकाली काढणेचे दृष्टीकोनातून खालील आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. तक्रारदाराने नि.9 वर दिलेल्या पुरशीसनुसार तक्रारदारास तक्रार अर्ज मागे घेण्याची परवानगी देणेत येते तसेच तक्रारदाराने नव्याने दुरुस्त तक्रार दाखल करणेची परवानगी देखील देण्यात येते. 2. खर्चाबद्दल काही हुकूम नाही. रत्नागिरी दिनांक : 29/01/2011 (एम.एम.गोस्वामी) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. M. M. Goswami] PRESIDENT | |