Maharashtra

Nashik

CC/206/2011

Shri Indradev Sahjuram Jaiswal - Complainant(s)

Versus

Manager, Shri Sant Savtamali Gramin bigersheti Sahkari Patsantha - Opp.Party(s)

Shri S.K.Rokde

18 Jan 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/206/2011
 
1. Shri Indradev Sahjuram Jaiswal
R/o Malegaon M.I.D.C. Sinnar Tal Sinnar Dist. Nashik
Nashik
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager, Shri Sant Savtamali Gramin bigersheti Sahkari Patsantha
Dhodvirnagar Sinnar, Dist Nashik
Nashik
Maharashtra
2. Shri Dr. Gajiram lahanu Pawar, Chairman Shri Sant Savtamali Gramin bigersheti Sahkari Patsantha
Chauda chowk wada, G.L.Pawar Hospital Sinnar, Dist Nashik
Nashik
Maharashtra
3. .Sau Lata Gajiram Pawar, Vice Chairman Shri Sant Savtamali Gramin bigersheti Sahkari Patsantha
Chauda chowk wada, G.L.Pawar Hospital Sinnar, Dist Nashik
Nashik
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.S.Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.V.Dani MEMBER
 
PRESENT:Shri S.K.Rokde, Advocate for the Complainant 1
 
ORDER

(मा.अध्‍यक्ष, श्री.आर.एस.पैलवान  यांनी निकालपत्र पारीत केले)

 

                      नि  का      त्र                 

      अर्जदार यांना सामनेवाले पतसंस्‍थेकडून मुदतठेवीची रक्‍कम रु.66,585/- मिळावी व या रकमेवर दि.26/03/2011 पासून रक्‍कम फिटेपावेतो द.सा.द.शे.18% दराने व्‍याज मिळावे. मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई पोटी रु.2,00,000/- मिळावेत, त्‍यावर दि.26/03/2011 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपावेतो द.सा.द.शे.18% दराने व्‍याज मिळावे.  अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.20,000/- मिळावेत, सदर खर्चाची रक्‍कम फिटेपावेतो द.सा.द.शे.18% दराने व्‍याज मिळावे. या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.

     याकामी सामनेवाले क्र.2 यांनी पान क्र.13 लगत लेखी म्‍हणणे व पान क्र.14 लगत प्रतिज्ञापत्र तसेच सामनेवाला क्र.3 यांनी पान क्र.15 लगत लेखी म्‍हणणे व पान क्र.19 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी मंचाची नोटीस घेण्‍यास नकार दिला असल्‍याचा शेरा पाकिटावर नमूद आहे.  त्‍यावरुन सामनेवाला क्र.1 यांना नोटीशीची माहिती झालेली असूनही ते मंचात हजर झाले नाहीत व म्‍हणणे दाखल केले नाही म्‍हणून त्‍यांचेविरुध्‍द दि.01/12/2011 रोजी एकतर्फा  आदेश करण्‍यात आले.

     अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः

 

मुद्देः

1.   अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय.

2.  सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यात कमतरता केली आहे काय?-- होय.

    फक्‍त सामनेवाला पतसंस्‍था यांनी सेवा देण्‍यात कमतरता केलेली आहे.

3.  अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून ठेवपावतीवरील रक्‍कम व्‍याजासह वसूल होऊन

    मिळणेस पात्र आहेत काय?-- होय. अर्जदार हे सामनेवाला पतसंस्‍था यांचेकडून

    ठेवपावतीवरील रक्‍कम  व्‍याजासह वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत.

4.  अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम  

    वसूल होवून मिळण्‍यास पात्र आहेत काय?- होय. अर्जदार हे सामनेवाला

    पतसंस्‍था यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम वसूल होवून   

    मिळण्‍यास पात्र आहेत.

5.  अंतीम आदेश?  -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले पतसंस्‍थेविरुध्‍द अंशतः

    मंजूर करणेत येत आहे व अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.2 व 3

    यांचेविरुध्‍द  व व्‍यवस्‍थापक यांचेविरुध्‍द नामंजूर करण्‍यात येत आहे.

 

विवेचनः

     याकामी अर्जदार यांनी पान क्र.24 लगत लेखी युक्‍तीवाद सादर केलेला आहे. सामनेवाला क्र.2 व 3 यांचेवतीने अँड.पी.जी.दिघे यांनी युक्‍तीवाद केलेला आहे.

अर्जदार यांनी याकामी पान क्र.22 लगत मुळ अस्‍सल ठेवपावती दाखल केलेली आहे. पान क्र.22 लगतची ठेवपावती सामनेवाला यांनी स्‍पष्‍टपणे नाकारलेली नाही. पान क्र.22 लगतच्‍या ठेवपावतीचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाला क्र.2 व 3 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व प्रतिज्ञापत्रामध्‍ये सामनेवाला क्र.2 व 3 हे कधीही पतसंस्‍थेचे चेअरमन, व्‍हा.चेअरमन नव्‍हते व नाहीत. आजमितीस संस्‍था विसर्जित झालेली असून त्‍याबाबतचे आदेश दि.24/08/2011 रोजी पारीत करण्‍यात आलेले आहेत तसेच दि.24/08/2011 रोजीच्‍या आदेशानुसार संचालक व चेअरमन यांचे अधिकार काढून घेवून त्‍यावर श्री.आर.बी.त्रिभुवन सहाय्यक सहकार अधिकारी सिन्‍नर यांची नेमणूक करण्‍यात आलेली आहे. सबब अर्ज रद्द करण्‍यात यावा. असे म्‍हटलेले आहे. 

वरील सामनेवाला यांचे म्‍हणण्‍याचा विचार होता तसेच प्रस्‍तुत तक्रार अर्जाचे कामी सामनेवाले क्र.2 व 3 यांना महाराष्‍ट्र सहकारी कायदा कलम 88 नुसार जबाबदार धरलेले आहे व तसा अहवाल तयार झालेला आहे याबाबत कोणतेही कागदपत्र मंचासमोर दाखल नाहीत. याचा विचार होता मा. उच्‍च न्‍यायालय,  औरंगाबाद खंडपीठ यांचेसमोरील रिट पिटीशन क्र. 5223/2009 निकाल तारीख 22/12/2010 सौ. वर्षा रविंद्र इसाई वि. राजश्री राजकुमार चौधरी या निकालपत्रामधील अंतीम आदेश व विवेचनाचा विचार करता प्रस्‍तुत तक्रार अर्जाचेकामी सामनेवाले क्र.2 व 3 यांना व व्‍यवस्‍थापक यांना संस्‍थेचे कारभाराबाबत व अर्जदार यांचे देय रकमेबाबत वैयक्‍तीकरित्‍या जबाबदार धरता येत नाही असे या मंचाचे मत आहे.    

     सामनेवाले क्र.1 ही पतसंस्‍था असून पतसंस्‍थेच्‍या कर्जाऊ रकमेच्‍या येणा-या वसूलीच्‍या रकमेतून ठेवीदारांच्‍या ठेव रकमा देण्‍याची पतसंस्‍थेची जबाबदारी आहे.   वरील सर्व कारणाचा विचार होता सामनेवाला क्र.1 पतसंस्‍था यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केली आहे असे या मंचाचे मत आहे.

पान क्र.22 चे ठेवपावतीचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला  पतसंस्‍था यांचेकडून पान क्र.22 चे ठेवपावतीवरील संपुर्ण रक्‍कम व्‍याजासह वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाले यांचेकडून रक्‍कम वसूल होऊन मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाले यांचेविरुध्‍द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला पतसंस्‍था यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.3500/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्‍कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, प्रतिज्ञापत्र, त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे अर्जदार यांचेतर्फे वकिलांचा युक्‍तीवाद, सामनेवाला तर्फे वकिलांचा युक्‍तीवाद व वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेः

 

                           आ दे श

 

1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.2 व 3 यांचेविरुध्‍द व व्‍यवस्‍थापक  

   यांचेविरुध्‍द नामंजूर करण्‍यात येत आहे.

2) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला पतसंस्‍था विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात

   येत आहे.

3) आजपासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना सामनेवाला पतसंस्‍था यांनी

   पुढीलप्रमाणे रकमा दयाव्‍यातः

3.अ) ठेवपावती लेजर पा.नं.0167 वरील रक्‍कम रु.66,585/-दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि.27/3/2011 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.8 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

4) वर कलम 3 अ मधील ठेवपावतीचे मुद्दल किंवा व्‍याज यापैकी काही रक्‍कम

   यापुर्वी सामनेवाला यांनी अर्जदार यांना अदा केली असल्‍यास त्‍याची वजावट वर

   कलम 3 अ मधील रकमेमधून करण्‍यात यावी.

5) आजपासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना सामनेवाला पतसंस्‍था यांनी मानसिक

   त्रासापोटी रक्‍कम रु.3500/-  दयावेत.

6) आजपासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना सामनेवाले पतसंस्‍था यांनी अर्जाचे

   खर्चापोटी रु.1000- दयावेत. 

 

 
 
[HON'ABLE MR. R.S.Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.V.Dani]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.