Maharashtra

Ahmednagar

CC/12/106

Shri Shankarrao Bhikaji Dabare - Complainant(s)

Versus

Manager,Shri Ravindra Vishwanath Shinde,Sampada Nagari Sahakari Patsanstha Ltd; - Opp.Party(s)

Patil/Deshmukh/Yeole

03 Oct 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/12/106
( Date of Filing : 14 Mar 2012 )
 
1. Shri Shankarrao Bhikaji Dabare
Gokul Kunj Niwas,Gulmohar Road,Near Joshi Hospital,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager,Shri Ravindra Vishwanath Shinde,Sampada Nagari Sahakari Patsanstha Ltd;
2nd Floor,Gurukul Building,Laltaki,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. Manager,Sampada Nagari Sahakari Patsanstha Ltd;
Branch-Gulmohor Road,2nd Floor,Gurukul Building,Laltaki,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
3. Shri Dnyandev Sabaji Wafare,
Siddhi Vinayak Colony,,Vaiduwadi, Savedi,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
4. Sau Sujata Dnyandev Wafare,Vice-Chairman
Siddhi Vinayak Colony,,Vaiduwadi, Savedi,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
5. Shri Sudhakar Parshuram Thorat
Vidya Colony,Shivaji Nagar,Nagar-Kalyan Road,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
6. Shri Bhausaheb Kushaba Zaware Director
Sudke Mala,Balikashram Road,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
7. Shri Uttamrao Dagdu Chemte,Director
Shriram Chowk,Vasant Tekdi,Tal Nagar,
Ahmednagar
Maharashtra
8. Shri Dinkar Babaji Thube,Director
Karjule Harya,Tal Parner,Dist Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
9. Shri Vishnupant Ganpat Vyawahare,Director
A/P Kanhur Pathar,Tal Parner,
Ahmednagar
Maharashtra
10. Shri Lahu Sayaji Ghangale,Director
4, Vishal Bunglow, Sukh Sagar Colony,Wani Nagar,Pipe Line Road,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
11. Hasan Amir Raje,Director
A/P -Parner,Tal Parner,
Ahmednagar
Maharashtra
12. Shri Baban Devram Zaware,Director
At Gargundi,Post Kanhur Pathar,Tal Parner,
Ahmednagar
Maharashtra
13. Harishchandra Savleram Londhe Director
Bhushan Nagar,Near Yash Nazrin Church,Kedgaon,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
14. Administrator, Sampada Patsanstha,
2nd Floor,Gurukul Building,Laltaki,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 03 Oct 2019
Final Order / Judgement

द्वाराः मा.अध्‍यक्ष श्री. विजय चंद्रलाल प्रेमचंदानी

(दिनांक ०३-१०-२०१९)

१.     तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अंतर्गत सदर तक्रार दाखल केली आहे.

२.     तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, सामनेवाले यांच्‍या पतसंस्‍थेमध्‍ये गुलमोहर रोडवर तेथे असलेल्‍या शाखेमध्‍ये खात्‍यात मुदत ठेव रक्‍कम जमा केली. तक्रारदाराने सामनेवालेकडे वेगवेगळ्या पावत्‍याद्वारे सामनेवालेकडे एकुण रक्‍कम रूपये ५,५०,०००/- जमा केली. सदर पावत्‍याच्‍या रकमा मिळून सामनेवालेकडून तक्रारदाराला रूपये ५,५७,६२३/- असे मिळणार होते. परंतु सामनेवाले यांनी मुदत संपल्‍यानंतरही तक्रारदारांची रक्‍कम दिली नाही. तक्रारदाराने खालील दिलेल्‍या तपशीलप्रमाणे सामनेवालेकडे रक्‍कम जमा केली होती.

अ.नं.

खातेदाराचे/ तक्रारदाराचे नांव

पावती नंबर

खाते नंबर

रक्‍कम

मॅच्‍युरीटी दिनांक

मुदतीनंतरची रक्‍कम

१.

डबरे गणेश शंकरराव/

डबरे शंकरराव भिकाजी

२४२

०२७५३

१,००,०००/-

२८/०७/११

१,०१,३८६/-

२.

डबरे शंकरराव/

डबरे पार्वती शंकरराव

२८२

०२७७९

१,००,०००/-

०२/०८/११

१,०१,३८६/-

३.

डबरे ऋषिकेश शंकरराव/

डबरे शंकरराव

२४०

०२७५१

१,००,०००/-

२८/०७/११

१,०१,३८६/-

४.

डबरे शंकरराव भिकाजी

७५०

०१४१२

१,००,०००/-

०१/०८/११

१,०१,३८६/-

५.

डबरे शंकरराव भिकाजी  

६९७

०२९४९

 ५०,०००/-

०६/०७/११

 ५०,६९३/-

६.

डबरे शंकरराव भिकाजी

६५९

०२९१५

१,००,०००/-

०९/०८/११

१,०१,३८६/-

       वरील नमुद रक्‍क्‍म सामनेवालेने तक्रारदाराला परत केली नाही व सामनेवाले क्र.१४ यांची प्रशासक म्‍हणुन सामनेवाले पतसंस्‍थेमध्‍ये नेमणुक करण्‍यात आली, असे समजले. त्‍याच्‍याकडुनही मागणी करून तक्रारदाराची हक्‍काची रक्‍कम तक्रारदाराला मिळाली नाही. म्‍हणून तक्रारदाराने सामनेवालेंना दिलेली सेवेत त्रुटी व केलेली अनुचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला म्‍हणून सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. 

       तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाला पतसंस्‍थाकडुन पतसंस्‍था व इतर सामनेवालेकडुन तक्रारदारांची मुदतपुर्ण झालेली एकूण रक्‍कम रूपये ५,५७,६२३/- व्‍याजासह तक्रारदारांना देण्‍याचा आदेश व्‍हावे तसेच तक्रारदारांना झालेल्‍या शारीरीक, मानसिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च सामनेवालेकडुन तक्रारदारांना देण्‍याचे आदेश व्‍हावे.

३.     त‍क्रारदारांची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्‍याचे आदेश पारीत करण्‍यात आले. सामनेवाले क्र.१४ यांना नोटीस वर्तमानपत्रात प्रसिध्‍द करूनसुध्‍दा प्रकरणात हजर झाले नाही, म्‍हणून सामनेवाले क्र.१४ यांचेविरूध्‍द सदर तक्रार निशाणी क्र.१ वर प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचे आदेश पारीत करण्‍यात आला.  सामनेवाले क्र.३ ते ७, ११ ते १३ यांनी निशाणी क्र.१९ वर खुलासा सादर केला.  सामनेवालेने खुलाश्‍यात असे नमूद केले की, तक्रारदाराने तक्रारीत लावलेले आरोप खोटे असुन त्‍यांना नाकबुल आहे. सामनेवाले क्र.३,५ व १२ यांनी पतसंस्‍थेमध्‍ये संचालक पदावरून राजीनामा दिलेला होता व पतसंस्‍थेच्‍या कोणत्‍याही दैनंदिन व्‍यवहारामध्‍ये कधीही भाग घेतलेला नव्‍हता.  त्‍यामुळे तक्रारदाराने सामनेवाले पतसंस्‍थातर्फे जमा केलेली रकमेचा कोणताही संबंध इतर सामनेवालेशी नाही. सदर रक्‍कम देण्‍याची जबाबदारी सामनेवाले क्र.१ ची असून व त्‍याच्‍या प्रशासकसामनेवाले क्र.१४ नियुक्‍त केला असल्‍याने त्‍याची जबाबदारी रक्‍कम देण्‍याची असून म्‍हणून सदर तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती करण्‍यात आली आहे.   

४.     सामनेवाले क्र.१,२ आणि १० यांना नोटीस मिळूनही त्‍यांनी स्विकारली नाही म्‍हणून सदर तक्रार सामनेवाले क्र.१,२ व १० यांच्‍याविरूध्‍द ‘एकतर्फा’ चालविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला. 

५.   तक्रारदाराने दाखल तक्रार दस्‍तऐवज, शपथपत्र, सामनेवलेंचा जबाब, दस्‍तऐवज व तोंडी युक्तिवादावरून मंचासमक्ष खालील मुद्दे विचारण्‍यात येत आहे.

अ.क्र.

मुद्दे

निष्‍कर्ष

१.

तक्रारदार क्र.१ ते ४ हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ?

होय

२.

सामनेवाले क्र.१ ते १४ यांनी तक्रारदार क्र. १ ते ४ यांना सेवेत त्रुटी दिलेली आहे काय ?

होय

३.

आदेश काय ?

अंतीम आदेशाप्रमाणे

 

 

मुद्दा क्र.१ -    

६.     तक्रारदार क्र.१ ते ४ यांनी सामनेवाले पतसंस्‍थेकडे सन २०११ मध्‍ये मुदत ठेव रक्‍कम जमा केली होती व सदर रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍याकरीता तक्रारकर्ता क्र.१ ते ४ पात्र आहेत. यात कोणताही वाद नसल्‍याने तक्रारकर्ता क्र.१ ते ४ हे सामनेवाले क्र.१ ते १४ यांचे ग्राहक आहे, असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी नोंदवण्‍यात येत आहे.  

मुद्दा क्र.२ –

७.     सामनेवाले क्र.३,५ व १२ यांनी पतसंस्‍थेमध्‍ये संचालक पदावरून राजीनामा दिलेला होता व पतसंस्‍थेच्‍या  कोणत्‍याही दैनंदिन व्‍यवहारामध्‍ये कधीही भाग घेतलेला नव्‍हता.  त्‍यामुळे तक्रारदाराने सामनेवाले पतसंस्‍थातर्फे जमा केलेली रकमेचा कोणताही संबंध इतर सामनेवालेशी नाही, असा बचाव घेऊन सामनेवाले यांनी त्‍याची बाजु मांडलेली आहे.  परंतु सामनेवाले यांनी दिलेला राजीनामा स्विकार करण्‍यात आला किंवा नाही, या संदर्भात सामनेवालेने कोणताही दस्‍तऐवज पुरावा सादर केलेला नाही. सामनेवाले हे पतसंस्‍थेचे संचालक पदावर होते. जरी पतसंस्‍थेच्‍या  दैनंदिन व्‍यवहारामध्‍ये प्रत्‍यक्ष सहभाग घेतला नसेल तरीसुध्‍दा पतसंस्‍थेच्‍या कामकाज व झालेल्‍या व्‍यवहाराची जबाबदारी सामनेवाले यांना टाळता येत नाही. सामनेवालेने तक्रारदार क्र.१ ते ४ यांची रक्‍कम मुदत ठेव म्‍हणुन स्विकारूनही मुदत संपल्‍यानंतर परत केलेली नाही.  तसेच सामनेवाले क्रमांक १४ हे प्रशासक होऊनसुध्‍दा तक्रारदार क्र.१ ते ४ यांना रक्‍कम परत केली नाही.  म्‍हणुन सामनेवाले क्र.१ ते १४ यांनी तक्रारदार क्र.१ ते ४ यांच्‍याप्रती न्‍युनतम सेवा दर्शविली आहे, असे सिध्‍द होते. सबब मु्द्दा क्र.२ चे उत्‍तर होकारार्थी म्‍हणून नोंदविण्‍यात येत आहे.   

मुद्दा क्र.३ –

८.     मुद्दा क्र.१ व २ च्‍या विवेचनावरून खालीलप्रामाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतीम आदेश

       १.  तक्रारकर्ता क्र.१ ते ४ यांची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

    २.

 सामनेवाले क्र.१ ते १४ यांनी वैक्तिगत किंवा संयुक्तिकरीत्‍या खालील नमुद        तपशीलाप्रमाणे देय दिनांक पासुन ११ % द.सा.द.शे. व्‍याज तक्रारदार क्र.१ ते ४ यांना द्यावे.

अ.नं.

खातेदाराचे/ तक्रारदाराचे नांव

पावती नंबर

खाते नंबर

रक्‍कम

मॅच्‍युरीटी दिनांक

मुदतीनंतरची रक्‍कम

१.

डबरे गणेश शंकरराव/

डबरे शंकरराव भिकाजी

२४२

०२७५३

१,००,०००/-

२८/०७/११

१,०१,३८६/-

२.

डबरे शंकरराव/

डबरे पार्वती शंकरराव

२८२

०२७७९

१,००,०००/-

०२/०८/११

१,०१,३८६/-

३.

डबरे ऋषिकेश शंकरराव/

डबरे शंकरराव

२४०

०२७५१

१,००,०००/-

२८/०७/११

१,०१,३८६/-

४.

डबरे शंकरराव भिकाजी

७५०

०१४१२

१,००,०००/-

०१/०८/११

१,०१,३८६/-

५.

डबरे शंकरराव भिकाजी  

६९७

०२९४९

 ५०,०००/-

०६/०७/११

 ५०,६९३/-

६.

डबरे शंकरराव भिकाजी

६५९

०२९१५

१,००,०००/-

०९/०८/११

१,०१,३८६/-

 

     ३.

सामनेवाले क्र.१ ते १४ यांनी तक्रारकर्ता क्र.१ ते ४ यांना झालेल्‍या  शारीरीक मानसिक त्रासापोटी प्रत्‍येकी रूपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च  रूपये ५,०००/- द्यावे.  सामनेवाले क्र.१ ते १४ यांनी वैक्तिगत किंवा संयुक्तिकरीत्‍या रक्‍कम अदा करावी.

        ४.    आदेशाची प्रत विनामुल्‍य उभयपक्षांना देण्‍यात यावी.

        ५.     सदर प्रकरणाची ‘क’ व ‘ब’ फाईल तक्रारदार यांना परत करण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.